मोनिका ओ माय डार्लिंग वर चर्चा - ३० नोहेंबर पर्यंत नो स्पॉयलर्स प्लीज

Submitted by रघू आचार्य on 12 November, 2022 - 05:44

मोनिका ओ माय डार्लिंग या नेटफ्लिक्स वरच्या चित्रपटाबाबत चर्चेसाठी धागा. ११ तारखेला रिलीज झालेला आहे. स्पॉयलर्स नअकोत. आवश्यकच वाटत असेल तर ३० नोव्हेंबर पर्यंत किमान थांबावे ही विनंती. ३० तारखेनंतर ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी स्पॉयलर्सची रिस्क घेउनच चर्चा वाचावी.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पॉईलर??? स्ट्रेटफॉर्वर्ड कळते कोण आहे खुनी... त्यांनी दाखवलेच आहे....एकदा बघण्यासारखा आहे.. जास्त अपेक्षा ठेऊ नका...

झक्कीनंतर आयडी परत मिळालेले तुम्हीच. तुस्सी ग्रेट हो. झिम्मा, झिरो वर वेगळा धागा काढायला तुमची परवानगी घेतली असेल तर कळवायचं होतं हो.

आज तुकड्या तुकड्यात संपवला मोनिका माय डार्लिंग.. जवळपास चार ते पाच तुकड्यात पाहिला. प्रत्येक तुकड्यात काहीतरी ट्विस्ट होते. पण ओवरऑल काही मजा आली नाही. अंधाधुंनचा दर्जा तर बिलकुल नाही. अभिनयात राजकुमार असताना शंका नव्हती. राधिका आपटे फनी वाटली. हुमा कुरेशी कथेच्या गरजेनुसार हॉट वाटली. बॅकग्राऊंड म्युजिकचे काही प्रयोग होते. काही जमले काही बोअर झाले. कथा पटकथा संवादही काही वाईट नव्हते. पण काहीतरी गंडलेय जे नेमके काय ते सांगता येत नाही पण ओवरऑल मजा आली नाही. मला अध्येमध्ये पिक्चर बघायचा असल्याने बायकोची वेबसिरीज तिला तोडून तोडून बघायला लावली. त्यामुळे पिक्चर पुर्ण झाल्यावर तिने मला आणि पिक्चरला दोघांना शिव्या घातल्या. कोणाला बघाच म्हणून सजेस्ट नाही करणार पण असेल नेटफ्लिक्स तर बघून घ्या. एकदा बघायला हरकत नाही.

झिम्मा, झिरो वर वेगळा धागा काढायला तुमची परवानगी घेतली असेल तर कळवायचं होतं हो.
>>>>

झिरो एकवेळ समजू शकतो. शाहरूख आवडत नाही बरेच जणांना..
पण झिम्मा मराठी चित्रपट होता. गाजला होता. विषय आपल्या जिव्हाळ्याचा होता. आता धागा चेक केला तर ४००+ प्रतिसाद आहेत. ते ही विषयाला धरूम छान चर्चा झाली होती.
https://www.maayboli.com/node/80649
तर त्याला कश्याला या वादात खेचत आहात..

बाई दवे,
झिम्माचा धागा माझा होता.
झिरोवर धागा कोणी काढला होता? मी तर तो हल्लीच पाहिला. पिक्चर रिलीज व्हायच्या आधी काढलेला का मी धागा? आठवत नाही आता फारसे...

मोनिका हा पिक्चर मी नाही काढलेला. कुणाला आवडेल, कुणाला नाही. त्याच त्याच आयडींच्या त्याच त्याच मतांना जनता कंटाळली असेल तर इतरांनीही आपले मत मांडावे इतकीच अपेक्षा आहे. मग अजिबात आवडला नाही हे सुद्धा प्रामाणिक मतच असते. त्याने माझ्यासारख्याला फरक पडू नये. पॉलिटिकली करेक्ट किंवा आधीच्याने काय मत मांडले त्याच्यावर चिडून वेगळे मत मांडण्याला काही किंमत नसते.

मोनिका वरचा धागा पिक्चर रिलीज झाल्यावर , बघून झाल्यावर काढला आहे. जवळपास सर्वच क्रिटीक्सनी त्याचे कौतुक केले आहे.

टाईम्स ऑफ इंडीया
https://timesofindia.indiatimes.com/web-series/news/hindi/monica-o-my-da...

एनडीटीव्ही
https://www.ndtv.com/entertainment/monica-o-my-darling-review-wildly-ent...

CRITIC REVIEWS FOR MONICA, O MY DARLING : rottentomatoes
https://www.rottentomatoes.com/m/monica_o_my_darling

द हिंदू
https://www.thehindu.com/entertainment/movies/monica-o-my-darling-movie-...

जवळपास सगळीकडेच थोडं कौतुक थोडी टीका असे मिक्स्ड रिव्ह्यूज आहेत. पण इथल्या दोन चार नेहमीच्या आयडींप्रमाणे सूर नाही कुठेच. जग मोठं आहे म्हणायचं आपलं.

इंडीयन एक्सप्रेस
https://indianexpress.com/article/entertainment/movie-review/monica-o-my...

इंडीया टुडे
https://www.indiatoday.in/binge-watch/reviews/story/monica-o-my-darling-...

imdb वर ७.९ रेटींग आहे. २.१ के व्होटर्स.
https://www.imdb.com/title/tt15128068/ratings/?ref_=tt_ov_rt

१२३ तेलगू डॉट कॉम रिव्ह्यू
https://www.123telugu.com/reviews/ott-review-monica-o-my-darling-telugu-...

लल्लनटॉपचा रिव्ह्यू आत्ताच वाचला. जसा काही मीच लिहीलाय इतके तंतोतंत जुळले मत. मायबोलीवरच्या त्याच त्याच फडतूसगिरीपेक्षा वेगळी मतं मांडतात हे लोक, कोण ते चपड चपड, कोण तो त्याचा असिस्टंट ? मोजत नाही.

वर दिलेल्या सगळ्या लिंक्सवर क्रिटीक्स रिव्ह्यूज पण आहेत आणि युजर रिव्ह्यूज पण आहेत. बहुतेकांनी धक्के बसतात हे लिहीलेले आहे. मी पण तेच लिहीले आहे. आणि इतरांनी पण तेच लिहीले आहे. प्रेडीक्टेबलचा काय संबंध आहे इथे ? जरा वाचून लिहीत जा कि इतरांबद्दल. नाहीतर स्वत:चे मत मांडून गपचुप बसत जा, अंधाधुन मधे तब्बूने खून केलाय हे सुरूवातीपासून माहितीच असते. पण धक्के बसतात म्हणून तर पिक्चर चालला तो.

त्याच टीमचा मोनिका आहे म्हणून उत्सुकता. पठाणचा धागा वर्षभर आधी काढलाय. त्याच्यावर चपड चपड गप्प पडलेत.

प्रेडिक्टेबल याच्यासाठी कि पहिल्याच सिन मध्ये दाखवले आहे कि खून कोण करते ते... तरीही काही प्रेक्षकांना कळले नाही तर
नंतर चेहराच दाखवला आहे.. मग काय सस्पेन्स? किमान तो सिन तरी एडिट करायचा होता...

ते १.५ रेटींग कुठून लिहीले त्याचा खुलासा करा. मग बाकीचं बघू तुमचं काय आहे ते. वर अंधाधुन बद्दल काय लिहीलंय ते वाचून बघा जमल्यास. (तुमच्याइतके महान कुणीच नाहीत जगात हे मला मान्य आहे. पुष्पक विमान येतं तुमच्यासाठी).

तरीही काही प्रेक्षकांना कळले नाही तर
********************************** त्याने स्वतःचा चेहराच दाखवला आहे.. मग काय सस्पेन्स? >>> कितीही वाईट पिक्चर असू द्या. असे थेट लिहू नये. हा सीन पिक्चरमधे अर्ध्या भागानंतर येतो. तिथे बसायचा तो धक्का बसणार नाही. बघणार्याची मजा जाते. अशी घाण नका करत जाऊ प्लीज.

** च्प्ड यांचा प्रतिसाद त्यांनी स्पॉयलर आहे हे पटल्याने एडीट केल्याने त्यांचा कॉपी केलेला भाग एडिट केला

छपाक रिलीज झाल्यानंतर त्याला 1.5 रेटिंग होते imdb वर ...
त्यामुळे म्हणतो imdb ला फॉलो करू नका... >>>> छपाकचे रेटिंग मोहीम चालवून पाडले आणि कश्मीर फाईल्सचे वाढवले म्हणून आमबीडी ने ते रेटिंग रद्द केले. त्यामुळे ते विश्वासार्ह आहेत. मेरीच वेबसाईट, मैच अ‍ॅडमिन, मेराच सबकुछ फायनल असं नसतं त्यांच्यात.

स्पॉईलर अव्हॉइड करूनच लिहिले आहे... >> नाही तो स्पॉयलरच आहे. हा सीन बघताना पुढच्या क्षणी तो ********************************* आहे हे माहिती नसतं. इथे वाचून त्या सीनमधली मजा जाणार आहे.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट : च्पड यांचा प्रतिसाद एडिट केल्याने हा पण एडीट केला.

त्यात कसला धक्का? तरीपण धागाकर्ता नात्याने तुमचे म्हणणे मान्य करून प्रतिसाद एडिट करतोय... काढतो तो भाग...

तरीपण धागाकर्ता नात्याने >>> त्याचा काय संबंध ? धागाकर्ता म्हणजे खुदा नसतो. मत बरोबर होतं ते पटलं म्हणून एडिट केलं असेल तर तसं लिहा.

स्पॉयलर न लिहिता सांगतो की वाईनच्या बाटलीत नागाचे विष इंजेक्शनने टाकता येते, ही माहिती माझ्यासाठीतरी नवीन होती.
आता तुम्ही चित्रपट बघितला नाही, तरी चालेल.

Lol मी आज बघणार होतो , चला वेळ वाचला !