गेल्या काही वर्षात जी 'सो कॉल्ड' ऐतिहासिक चित्रपटांची जी लाट आली आहे त्या सर्वात एक कॉमन गोष्ट आढळते ती म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि अचाट साहस दृश्ये.
मग ते सांदण दरीत sling लावून अक्षरशः उडत येणारे मावळे, अंगावर आलेले बाण, भाले असे सहजपणे हातात पकडणे, पाण्यात भाला फेकून आग लावणे, शत्रूला जमिनीवर आपटून वरती उडवणे आणि मग फुटबॉल सारखी लाथ मारून 15 20 फुटांवर गिरक्या घेत फेकणे असले रम्य प्रकार.
आणि या सगळ्याला गोंडस नाव दिले जाते प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे म्हणून. या सगळ्यात आपण महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा अपमान करतोय हे कुणाच्या गावीच नसतं. महाराजांनी आणि मावळ्यांनी रक्त सांडून निर्माण केलेले स्वराज्य ही आपल्यासाठी एक अभिमानाची गाथा असली पाहिजे, पिटात शिट्ट्या मारणाऱ्या लोकांचे मनोरंजन करणारी तद्दन सुमार फिल्मी कहाणी नाही हे भान कधी येणार?
आणि तुम्हाला अचाटपणाच दाखवायचा आहे ना मग तो शिवचरित्रात ठायी ठायी आढळेल. मोजके सैन्य आणि तुटपुंज्या साधनांच्या साहाय्याने सामान्य जनतेच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग पेटवून चार बलाढ्य सुलतानशाह्यांना, नमवून हिंदवी स्वराज्य निर्माण करणे, गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करत लाटेप्रमाणे येणाऱ्या लाखोंच्या सैन्याला नामोहरम करणे आणि घरदारावर तुळशीपत्र ठेऊन रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणाऱ्या पराक्रमी वीरांची फौज तयार करणे हे जर अचाट नसेल तर काय आहे?
अक्षरशः मूठभर सैन्य घेऊन महिनोन्महिने चाकणचा किल्ला लढवणारे फिरंगोजी नरसाळा, प्राणांची पर्वा न करता दिलेरखानाच्या तळावर हल्ला करणारे मुरारबाजी, रात्रभर धावत राहूनही हजारो सैनिकांना खिंडीत रोखून धरणारे बाजी प्रभू, केवळ 60 सैनिकांना घेऊन पन्हाळा काबीज करणारे कोंडाजी, कड्यावर चढून जाऊन आक्रमण करणारे आणि ढाल तुटली तरी लढत राहणारे तान्हाजी, अक्षरशः उघडा बोडक्याने पठाणांची फौज कापून काढणारे रामजी पांगारा, ज्यांना महाभारती जैसा कर्ण असे म्हणले जायचे ते सूर्यराव जेधे हे सर्व मावळे सामान्य असूनही असामान्य होते आणि त्यासाठी त्यांना उडत वगैरे जायची गरज नव्हती.
आपल्या पाठीवर महाराजांचा शाबासकी देणारा हात आहे आणि आई भवानीचा आशिर्वाद आहे.. बस इतक्या बळावर या मावळ्यांनी कितीही बलाढ्य सैन्य आले तरी त्यांना धोबीपछाड घातलाय. फक्त मराठाच नव्हे तर कातकरी, भंडारी, हेटकरी, रामोशी, कोळी अशा अठरापगड जातीचे मावळे एकत्रीतपणे शत्रुवर जीवाच्या कराराने तुटून पडत आणि त्यांना सळो की पळो करून सोडत.
हे आपण आपल्या नव्या पिढीला कधी दाखवणार आहोत का नाहीत? का त्यांना शिवाजी आणि मावळे हे बाहुबली सारखे अचाट शक्तिप्रदर्शन करणारे काल्पनिक अतिमानव होते आणि त्यामुळेच ते जिंकले असा कमालीचा चुकीचा समज त्यांच्या मनात पेरणार आहोत?
नुसता पराक्रम नव्हे तर महाराजांनी अतिशय हुशारीने, कल्पकतेने आणि सखोल नियोजन करून ही युद्धे जिंकली आहेत. लाखोंच्या संख्येने आलेल्या अफझलखानाला जावळीच्या अरण्यात खेचून आणत त्याच्यासह सैन्याचा नायनाट करणे असो वा भौगोलिक रचनेचा फायदा घेत कारतालब खानाला उंबरखिंडीत सापळा रचून त्याला मुठीत नाक धरुन शरण यायला लावणे असो वा प्रचंड मोगली फौजेच्या गराड्यात सुरक्षित बसलेल्या शाईस्तेखानवर अचूक झेप टाकून त्याची बोटे तोडणे असो वा कडेकोट पहारा भेदून अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेत पन्हाळ्यावरून केलेली सुटका असो वा खुद्द आग्र्यातून औरंगजेबाला फसवून सुखरूप परत येणे असो हे किती रोमहर्षक आहे. हे अविचारी धाडस नव्हते, यामागे अभ्यास होता, अतिशय कुशल हेर यंत्रणा होती आणि कितीही धाडसी बेत असला तरी तो अंमलात आणणारे विश्वासू सहकारी होते.
हे जसेच्या तसे दाखवले तरी नव्या पिढीला कमालीचे स्फूर्तिदायक वाटेल. पण यांना हे असलं दाखवण्यात रस नाहीये, त्यांना फक्त बाहुबलीच दाखवून पैसे मिळवायचे आहेत आणि त्यासाठी स्वतंत्र कथा लिहायची नाही तर आयते जे मिळेल ते ओढून आपल्या साच्यात बसवायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी आता महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना वेठीस धरले आहे.
आता तर प्रतापराव गुजर यांचा नंबर लागला आणि शिवाजी म्हणून अक्षय कुमार....
आधीच तो भंसाळ्या दिसेल त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला डोंबाऱ्यासारखे ग्रुप डान्स करायला लावतो त्यात आता यांची भर
हे असेच चालत राहीले तर आग्र्याहून सुटका होताना महाराज धाडकन दरवाजाला लाथ मारतील, मग फौलादखान आणि बाकीचे सैनिक दहा दिशांना फेकले जातील. हे सगळे सौध्यात बसून बघणाऱ्या औरंगजेबाला महाराज सुनावतील ... अस्सल मराठा आहे मी, मराठ्याला आणि त्याच्या छाव्याला अडकून ठेवण्याची कुणा मुघलाची माय नाही व्यायली. लक्षात ठेव पातशहा, एक दिवस हीच मराठी भिमथडी तुझ्या दिल्लीवर चाल करून येतील आणि बादशहा त्यांचा अंकीत राहील.....
लग्गेच फुल्ल टाळ्या, शिट्ट्या आणि घोड्यावर बसून रुबाबात महाराज निघून जातील आणि औरंगजेब मान खाली घालेल वगैरे हे बघावं लागेल....
तेव्हाही लहान मुलांना हेच आवडतं बघायला म्हणून आपण समर्थन करत राहणार का?
एक शिवप्रेमी म्हणून या सगळ्या बाजारूपणाचा आता खरोखर उबग आला आहे आणि कुठंतरी हे थांबायला हवं असं मनापासून वाटतं
अक्षय चे सिनेमे फ्लॉप होतायत.
अक्षय चे सिनेमे फ्लॉप होतायत... त्यापेक्षा सलमान ला चित्रपटात घेतला तर बिजिनेस तरी चांगला होईल...
मीडीयाने पण या विषयाची दखल
मीडीयाने पण या विषयाची दखल घेतली आहे. पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख आणि इतिहास संशोधक श्रद्धा कुंभोजकर यांचे मत पटले.
https://www.bbc.com/marathi/articles/cv2pr5n8rz1o
पण आता यात आव्हाड उतरल्यामुळे
पण आता यात आव्हाड उतरल्यामुळे बोलवता धनी वेगळाच असल्याचे स्पष्ट होत आहे
म्हणजे महाराज राहिले बाजूला आता हे एकमेकांचे स्कोर सेटल करण्यात आणि गलिच्छ राजकारण करण्यात व्यस्त राहणार
त्यामुळे कोणी इतिहास अभ्यासक किंवा विचारवंत यात आता काही बोलणारच नाही
इग्नोर करावे.
इग्नोर करावे.
आता तेच करावं लागणार
आता तेच करावं लागणार
कारण आता मुद्दा मिळालाय त्यामुळे इतका धुरळा उडेल की विचारता सोय नाही
त्या वरच्या लिंक मध्ये हर हर महादेव चे दिग्दर्शक अभिजित यांनी सांगितलेला एक मुद्दा पटला
ते म्हणाले की हा सिनेमा सेन्सॉर बोर्ड ला दाखवला होता आणि त्यावर घेतलेल्या आक्षेपांना उत्तर दिले होते
आता प्रश्न येतो की हे कोण सदस्य आहेत ज्यांना ही उत्तरे पटली आणि हिरवा कंदील दिला?
आणि ती जी कमिटी नेमण्याचे घाटत आहे तोही पायंडा धोकादायक आहे कारण मग उद्या प्रत्येक गोष्टीतच नवी कमिटी नेमा आणि त्याशिवाय कुठली कलाकृती मंजूर केली जाणार नाही
ही कमिटी कोण नेमणार, कुठलेलोक त्यात असणार हे तेच लोक ठरवणार
रोगापेक्षा इलाज भयंकर असे काही होऊ नये हीच इच्छा
ही बातमी वाचल्यावरही बराच
ही बातमी वाचल्यावरही बराच धुरळा उडाला असेल असं वाटलं नव्हतं. आत्ता मुद्दामून सर्च दिला तेव्हा समजल.
माझ्यापर्यंत या बातम्या पोहोचतच नाहीत. युट्यूबचा अल्गोरिदम असा सेट झालाय कि नेटप्रदूषणापासून फ्री आहे.
तुमची तळमळ पोहोचतेय..शब्द न
तुमची तळमळ पोहोचतेय..शब्द न शब्द खराय.
पण हे रोखणं आपल्या हाती नाही..
माझ्यापर्यंत या बातम्या
माझ्यापर्यंत या बातम्या पोहोचतच नाहीत. युट्यूबचा अल्गोरिदम असा सेट झालाय कि नेटप्रदूषणापासून फ्री आहे. >> भारी!
सुखी आहात खरेच
सुखी आहात खरेच
आशुचॅंप वरच्या दोन्ही पोस्ट्स
आशुचॅंप वरच्या दोन्ही पोस्ट्स ना मम. (बातम्या आधी पाहिल्या नव्हत्या, आताच वाचून कळले काय सुरु आहे ते.)
कालाय तस्मै नम:
लेखाचे शीर्षक असे पाहिजे होते
लेखाचे शीर्षक असे पाहिजे होते
शिवाजी महाराज आणि मावळ्यांना टपोरी बनवू नका.
राजकिय फायदा घेणे ,इतिहास चा
राजकिय फायदा घेणे ,इतिहास चा चुकीचं अर्थ लावून त्याचा प्रसार करणे ,आपल्या सोयीचा इतिहास च सांगणे असे प्रकार हल्ली वाढले आहेत.
पण त्या मध्ये त्या महापुरुषांची चीच बदनामी होते.
काय फरक पडतो.. महाराष्ट्रात
काय फरक पडतो.. महाराष्ट्रात लोकांना माहित आहेच काय खरे काय खोटे.. कमीत कमी बाकीच्या भारतात पब्लिसिटी तरी होतेय आपल्या इतिहासाची...
सिने तारकांचा धागा वेगळा आहे.
सिने तारकांचा धागा वेगळा आहे.
सध्या हिंदी सिनेमासृष्टी
सध्या हिंदी सिनेमासृष्टी मोडून काढायचे प्रयत्न चालले आहेत, उद्या हा मोर्चा प्रादेशिक सिनेमासृष्टींकडेही वळू शकतो…
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
सुरेंद्रनाथ बाबर
https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/6265
हर हर महादेव कसला पाणचट
हर हर महादेव कसला पाणचट पिक्चर आहे! २/३ पाहिला आहे आणि अजून बाजीप्रभू स्वराज्यात सामील व्हायला तयार नाहीत, आणि महाराजही बॉस ला न आवडणारा एम्प्लॉयी असतो तसे त्याच्याशी कायम बोचर्या भाषेत बोलत आहेत. बहुतांश संवाद शुद्ध तुपातले प्रमाण भाषेतले आहेत. कधीकधी तर आमच्या शाळेत अ तुकडीतील शहरी मुले स्वतः कधी न पहिलेली ग्रामीण पात्रे सादर करताना जे संवाद म्हणत तसे वाटले. "बारा मावळांत ज्यांचे नाव दणाणत आहे" असे काहीतरी प्रीफिक्स पहिल्या १५ मिनीटांत दहा वेळा ऐकले. सुबोध भावे अभिनयात शिवाजी महाराज म्हणून चालून जाईल, पण संवाद, बॉडी लँग्वेज मधे नाही. शरद केळकर कायम वैतागलेला दिसतो. निशिगंधा वाडने मृणाल देवचा रोल केला आहे.
पन्हाळ्याला वेढा पडलेला असताना मधेच बाजीप्रभू सिद्धी जौहर शी गप्पा काय मारून येतात. सिद्दीही आपण मुंबईच्या गँग वॉर पिक्चर मधे आहोत अशा थाटात बाजीप्रभूंच्या कुटुंबाबद्दल त्यांना धमकी देतो. त्याच्या सेनेत पेरलेले हेर खलबते सुरू असताना अगदी उघडपणे आपण हेर आहोत हे कळेल अशा हालचाली करतात.
अफजुलखानाच्या (चित्रपटातील उल्लेख "अफ्जुल्ल्या") वधाचा सीन सगळा उल्टापुल्टा केला आहे. मराठी इतिहासात, पॉप्युलर कल्चर मधे हा प्रसंग कसा घडला त्याचे सर्व डिटेल्स सर्वांना माहीत असताना "नरसिंह-हिरण्यकशपू" स्टाइलमधे तो सादर करण्याचा खटाटोप कशाला? बरं तसे करायचे आहे तर तो सादरही इतक्या बालिश रीतीने केला आहे. सुभा त्याला एखाद्या तेलुगु हीरोच्या स्टाइलने हवेत उडवतो व मांडीवर आडवा पडतो. मग हा नरसिंहासारखा त्याचे पोट फाडतो. तेथेही जवळ कोठेतरी बाजी असतातच. मला वाटले मार्व्हल युनिव्हर्स सारखे तानाजी, मुरारबाजी वगैरे आजूबाजूच्या खिंडीत हजेरी लावून जातात की काय. मुळात त्या शामियानातही सुभा एकदम "हीरो के माफिक" घुसतो. या सगळ्या प्रसंगातील करामतच याने नलिफाय करून टाकली आहे.
आधी महाराज खानसाहेबांना घाबरले आहेत अशी कंडी पिकवून त्याला गाफील करायचे. मग भेटायला येतानाही दोन्हीकडचे सैनिक कमी करायचे, खानाला आदर दाखवत आत जायचे आणि मग त्याने दगा केल्यावर बाजी त्याच्यावर उलटवायची - यातले काहीही यात नाही.
शिवाजी महाराजांना "ह्यूमन" दाखवायचे वगैरे ठीक आहे. पण "माझी इच्छा हीच श्रींची इच्छा" असले संवाद? पन्हाळ्याच्या वेढ्यातून पळून जाताना एका ठिकाणी बाजी खुद्द महाराजांना त्यांचे वाक्य तोडून "तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही काय?" विचारतात. शिवाजी महाराजांना. सैनिकांसमोर. जरी ते करायचा उद्देश "तुम्ही पुढे जा, आम्ही लढतो" असे सांगायचा असला तरी. इथे मी थांबलो. यापुढे बघायची आपली डेअरिंग झाली नाही काल
शी अशी जर इतिहासाची तोडफोड
शी
अशी जर इतिहासाची तोडफोड केली असेल तर आव्हाडने याचा शो बंद पाडला तेच बरं होतं.
सुबोध भावे एरवी आपली मराठी, आपला इतिहास वगैरे करत असतो तर यावेळेस त्याला हा मूर्खपणा दिसला नाही का?
निशिगंधा वाडने मृणाल देवचा
निशिगंधा वाडने मृणाल देवचा रोल केला आहे >>
हा पिक्चर पाहणार नव्हतेच. पण अ आणि अ सिनेमांसारखी चिरफाड वाचायला नक्की आवडेल.
::हहगलो:
<अजून बाजीप्रभू स्वराज्यात सामील व्हायला तयार नाहीत,
शरद केळकर कायम वैतागलेला दिसतो. >
माझा रोल याला दिला याचा असा वचपा काढला की काय?
पावनखिंड पाहायचा प्रयत्न केला होता. हर हर महादेव धमाल विनोदी चित्रपट म्हणून पाहता येईल का?
प्रवाह पिक्चर्सवर सरसेनापती हंबीररावचा टीव्ही प्रिमियर आहे. त्याचाही रसास्वाद घ्या
फा अशक्य हसले पोस्ट वाचून.
फा
अशक्य हसले पोस्ट वाचून. मार्व्हल युनिव्हर्स काय अरे! लै डेंजर झालं असतं ते. एकूण हा पिक्चर पाहायचा नाही हे ठरवलं ते बरोबरच केलं म्हणायचं.
निशिगंधा वाडने मृणाल देवचा
निशिगंधा वाडने मृणाल देवचा रोल केला आहे. >>


"माझी इच्छा हीच श्रींची इच्छा" >>>
"तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही काय?>>
मृणाल देवचा रोल सुबोध भावेने केला नाही हेच थोर आहे. हल्ली सुबोध भावे दिसला कि कोणत्याही गाफील क्षणी तो नाही मी बोलत गाऊ लागेल ही भीती वाटते.
पन्हाळ्याच्या वेढ्यातून पळून
पन्हाळ्याच्या वेढ्यातून पळून जाताना एका ठिकाणी बाजी खुद्द महाराजांना त्यांचे वाक्य तोडून "तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही काय?" विचारतात. शिवाजी महाराजांना. सैनिकांसमोर.>>> बाप रे ! कठिणच आहे.
इतके कलाकार घेतले याबद्दलच
इतके कलाकार घेतले याबद्दलच सिनेमाच्या निर्माता दिग्दर्शकाचे आभार मानले पाहीजेत.
नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू, सिद्दी जौहर, अफजलखान, राजमाता जिजाऊ, बहिर्जी नाईक, बांदल सरकार या सर्वांच्या भूमिकेत आपले लाडके अभिनेते...सुबोध भावे !
अशी पाटी झळकू शकते.
अरे देवा.
अरे देवा.
पावनखिंड त्यामानाने बराच म्हणायची वेळ आली मग.
कठीण आहे.
कठीण आहे.
पावनखिंड पाहण्याचा मी सुद्धा प्रयत्न केला होता.
अरे देवा, हा चित्रपट भयानक
अरे देवा, हा चित्रपट भयानक असणारे हे ट्रेलरमध्ये वाटलं होतच
पण इतका असेल याची कल्पना नव्हती
तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही काय?" विचारतात. शिवाजी महाराजांना. सैनिकांसमोर>>> धन्य आहेत ते संवादलेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते
सुबोध भावे ला हे खटकलं नसेल? तो काय नवशिका किंवा एक्स्ट्रा आहे का की जे सांगितलं त्याप्रमाणे पाट्या टाकून यायचं?
अवघड आहे या लोकांचं
माझी इच्छा हीच श्रींची इच्छा"
माझी इच्छा हीच श्रींची इच्छा" असले संवाद? पन्हाळ्याच्या वेढ्यातून पळून जाताना एका ठिकाणी बाजी खुद्द महाराजांना त्यांचे वाक्य तोडून "तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही काय?" विचारतात. //
अरे देवा
फारएन्ड सगळी पोस्टच धमाल जमली आहे. सुबोध भावे काशिनाथ घाणेकर चित्रपटापर्यंत आवडत होता. नंतर त्याने सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेण्याकडे लक्ष केंद्रित केलं आणि अभिनयावरचा फोकस गेला असावा.
भावेनी यापुढे उकडीच्या मोदकाचं बायोपिक करावं. त्यात(च) ते शोभून दिसतील.
२/३ पाहिला आहे आणि अजून
२/३ पाहिला आहे आणि अजून बाजीप्रभू स्वराज्यात सामील व्हायला तयार नाहीत, आणि महाराजही बॉस ला न आवडणारा एम्प्लॉयी असतो तसे त्याच्याशी कायम बोचर्या भाषेत बोलत आहेत. बहुतांश संवाद शुद्ध तुपातले प्रमाण भाषेतले आहेत.
तेथेही जवळ कोठेतरी बाजी असतातच.>>>>
देशपांडे हे शिवाजी महाराज भोसले पेक्षा भारी होते हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न. जे बाबा पुरंदरेनी पुस्तके लिहून करण्याचा प्रयत्न केला तेच हा कोण अभिजित देशपांडे चित्रपटाच्या माध्यमातून करत आहे.
One of the main concerns is that there is no historical record of a fight between Baji Prabhu Deshpande and King Shivaji, nor is there any record of Deshpande being present when Afzal Khan was killed. Khan is portrayed as being held on Shivaji's lap while he tears at Khan's stomach like Narsimha. The note questioned, "Do they wish to portray Shivaji as an avatar of Narsimha?"
आणि त्यात उकडीचे का तळणीचे हा
आणि त्यात उकडीचे का तळणीचे हा वाद आहेच
त्यामुळे अनायासे प्रसिद्धी मिळेल
पाचाड चा जिजाऊंचा वाडा आहेत
पाचाड चा जिजाऊंचा वाडा आहेत त्यात त्यांचं जे चित्र लावलं आहे ना.. ते निशिगंधा वाड सारखं च आहे साधारण ....
सो निशिगंधा आहे तर ओके... अभिनयाबाबत माहीत नाही....
पण फारएन्ड ने भारी लिहिलंय....
खूप हसले......
Pages