Cooking for 2 hours just to eat for 10 min is the biggest scam in the world.
स्वैपाकाची आत्यंतिक नावड असणाऱ्या माझ्यासारख्याच कुणाचा तरी मनस्ताप असणार हा. वाचून अगदी सहानुभूती मिळाल्यासारखं वाटलं.
केव्हा तरी पडवीओसरीअंगणासकट स्वतःसाठी बारक्या दोन खोल्या बांधेन असं घोकत आलेय, ज्यात स्वैपाकघराला मात्र जागा असणार नाही. मागच्या ओटीवर उगीच पॅंट्रीसदृश एक ओटा आणि गॅसस्टोव्ह. एक तवा, उलथणं, चिमटा, एखादं बुरकुलं, झाकणी, उंच तटबंदीचा आटोपशीर थाळा आणि तुपाचं तांबलं. चिमटा. तांब्या आणि फुलपात्र. थाळ्यातच भाकरी थापून तव्यावरून काढली की त्यावरच अर्धीमुर्धी भाजी परतून शेजारच्या बर्नरवर आटवल रटरटवलं की झालं काम. एवढं होईतोवर थाळा धुऊन झालेला असेलच. हल्ली चटण्या लोणची मेतकुटं उत्तम पॅकींगमध्ये येतात. उघडून संपेपर्यंत त्यातच वापरलं की भरण्या, डबेडुबे नकोत. चहा पीत नाही, त्यामुळे तोही विषय आपोआपच रद्द होईल. दुधादह्याला बुरकुलं, फुलपात्र धावेल. आणखी काय लागतं एका माणसाला? हे एवढं माझ्याच्यानं जमेतोवर बाजारात (यंत्रमानवांनी) चावलेला घासही मिळायला लागलेला असेल. ते बेलाशक आणीन आणि वाटल्यास समर्थ कसे दहावेळा धुऊन अन्नप्राशन करत, तसं खळखळून धुऊन खाईन. रहाता राहिला अभ्यागतांचा पाहुणचार. येताना खाऊन पिऊन या अशी आधीच कल्पना देईन. अहो तोवर जजमेंट्स आणि शेरेबाजीच्या सातासमुद्रापार पोचणार मी, मग कुणाला काय वाटेल ह्याशी मज काही देणेघेणे उरेल म्हणता? त्यातून जे येतील ते निव्वळ मला भेटायला, माझ्याशी आंतरिक सख्य असणारे. म्हणजे मुळातच गाळण्यांमधून पोचलेले. आम्ही सगळेच आनंदानं मिळून करून खाऊ परतलेली भाकरी आणि भाजी. कधी थालिपीठ अन् केव्हा धिरडीघावनं. हाकेच्या अंतरावर एखादी ताई/दादा बघेन, जो येणाऱ्यांना चहा नाश्ता खाऊ घालील. झालं की, अरे हाय काय नाय काय.
'अंतरा'मध्ये असताना पशुपालकांबरोबर खूप संपर्क आला. तेव्हा धनगर आणि मेंढपाळांची जीवनशैली जवळून बघितली. आर्थिक सुबत्ता असलेल्या कुटुंबांचे पसारे दोन किंवा तीन बोजांचे जेमतेम. मोठाल्या खोल्यांमध्ये टांगलेल्या दांड्यांवर टाकलेली दोन लुगडी पोलकी, दोन दोन सदरे, बंड्या, धोतरं किंवा पायजमे. बाकी घोंगडी पसरलेली ऐसपैस रिकामी घरं. स्वैपाकघर नाही. पंजाबात असते तशा पद्धतीनं उघड्यावर शिजवणं. घराबाहेर अर्धगोलाकार पाव उंचीची भिंत आणि त्यावर सपरी. भिंतीच्या आत चूल. त्यावर तवा. भोवतीनं मांडलेला काथवट, पीठमीठतेलतिखटचहासाखरेचे थोडके डबेडुबे वगैरे सरंजाम. एका हाताला सरपणगोवऱ्या. वाऱ्याला बसून स्वैपाक. दोन किंवा तीन पदार्थ. उगीच लांबड नाही. होत आलं की तिथंच भोवतीनं सगळेजण थाळे, तांब्ये घेऊन ताजं, पहिल्या वाफेचं रपाटून पोटभर जेवणार आणि हातासरशी थाळे धुऊन आणणार. रांधणारीही बरोबरीनं गरम जेऊन चुलीभोवतीचं आवरून, तवा काथवट धुऊन रिकामी. नो उराउर, नो झाकपाक, नो शिळवड. अर्थात हे पक्क्या घरातल्या मुक्कामाचं. स्थलांतरं चालू असताना ह्याहीपेक्षा थोडक्यातला कारभार. शिवाय पिढ्यान् पिढ्यांचं दीक्षित डाएट. मधल्या वेळची खाणी अन् नाश्त्यांचे वाढाचार नसतातच. जोडीला सणकून डीथ्री, बिनतापवलेल्या दुधाबरोबर बी१२, बाकी प्रोटीन्सकॅल्शिअम्स वगैरे तर मुबलक. व्यायाम वेगळे करावे लागत नाहीत, रोजचं चालणं, शेरडामेंढरांची उसाभरच केवढीतरी. ह्या मिनिमल जगण्याची भुरळ मनावर कायमची पडली आहे.
खरेदीची फार असोशी मला कधी नव्हती. चार चार वर्षं कपडे घेत नाही, घेतलेले दहा दहा वर्षं वापरते. बरेचसे कपडे रिसायकल्ड असतात, बहिण-काकु सारख्या मापाच्या असण्याचे फायदे. क्वचित एखाददुसरा अपवाद वगळता घरातलं बहुतांश साहित्य कुटुंबातल्याच कुणा ना कुणाकडून विकत घेतलेलं आहे. पूर्वी समारंभात उलट आहेर म्हणून मिळायची तसली कशाचा कशात पायपोस नसलेली आणि साठलेली पोतंभर भांडी होती, बाबांनी तेच पोतं लग्नात मला पास केलं. त्यात उत्तम भागलं, अजूनही भागतंय. उगीच किरकोळ काही कधी आणलं असेल. सहा महिन्यांतून एकदा मारे यादी साठवून तुळशीबागेत जाणे आणि कशाला हवंय हे ते, असं करत नुसतंच भटकून रिकाम्या हाती घरी परतणे हा जवळजवळ रिवाज झालाय. पूर्वी पुस्तकं घेतली जायची, गेली चार पाच वर्षे तेही जवळपास बंद आहे. आणि असं असूनही घरातलं सामान बघितलं तर डोकं गरगरेल. उद्या आपण खपल्यावर मागच्यांना भरपूर डोकेदुखी ठेवून जाणार हे धडधडीत दिसतंय. संग्रह वाईट असं नुसतं म्हणायचं, पण आता आरामशीर जगायचं मुरलेलं अंगवळण अनडू कसं करावं ह्या विचारानं जीवाचा कायमचा अभिमन्यू झालाय.
गाडं गडगडत कुठवर पोचलं पहा. विचारांचेही पसारे आवरेनात, तिथं बाकी उजेड केव्हा पडायचा! भरल्या पोटाच्या गमजा सगळ्या. जेव्हा जे व्हायचं तेव्हा होवो खरं, आजच्यापुरती मनापासून एक दुवा देता दिली, एवढं पुष्कळ आहे.
- सई.
साधना, त्या साडी बद्दल - न
साधना, त्या साडी बद्दल - न मिळाल्या बद्दल लिहिलेला दोन भावनांचा खेळ छान लिहिला आहे.>>> +१.
सर्वांचे पुनश्च मनापासून आभार
सर्वांचे पुनश्च मनापासून आभार

प्राची, जमेल हळूहळू.
जाई, जिप्सी आयुष्य अनेकांना हवंहवंसं असेल.
रुपा, डिक्लटरींगबद्दल अगदी सहमत.
निकु, जाम हसले!
आस्वाद, ती जगण्याची पध्दत भुरळ घालणारी आहेच, शंकाच नाही, पण आपला भारतीयांचा जात्या तसा पिंड नाही, त्यामुळे आपण तसं जगू धजत नाही.
साधना, ह्या आतून बसणा-या धडका खरंच त्रासदायक असतात. साडीचा किस्सा वाचून चुकचुकले, पुन्हा नको बाई असं करूस
धन्यवाद मंडळी…
डबल पोस्ट.
धन्यवाद मंडळी…
धन्यवाद मंडळी…
आस्वाद, तसे शक्य आहे हे माहित आहे. पण ते भारताबाहेर.
लोक असे पैसे कमाऊन जग हिंडायला बाहेर पडतात आणि पैसे संपले की परत जाऊन पुढच्या भ्रमणासाठी पैसे कमवायला लागतात हे ऐकुन आहे.
भारतात नोकरीत गॅप आली की परत आधीसारखीच नोकरी मिळवणे कठिण जाते. शिक्षणात गॅप आली तर चांगल्या नाववाल्या कंपनीत नोकरी मिळणे कठिण होते. लोकसंख्येमुळे उमेदवारांवर भरमसाठ अटी लादुन शॉर्टलिस्टिन्ग करणे इथे शक्य आहे.
पण असे पोटापुरते मिळवुन बाकी वेळ स्वतःसाठी घालवणे मला आवडेल. नकोश्या गोष्टी टाळुन हवेते करायचे स्वातंत्र्य मिळवणे हेही माझ्यासाठी मिनिमलिझम होइल.
आजकाल इथे tiny house ची खूप फॅशन आलीये. ३००-४०० sqft घर असतं>>>>>
सुदैवाने आता हे करायची गरज नाही, भाड्याच्या घरातही तितकाच आनंद मिळतो हे मिनिमलिझम नव्या पिढीच्या लक्षात येत आहे.
मुंबईसारख्या महागड्या शहरात बहुसंख्य मममा हे इतके जरी घ्यायला जमले तरी गंगेत घोडे न्ह्यायले समजतात
पण असे पोटापुरते मिळवुन बाकी
पण असे पोटापुरते मिळवुन बाकी वेळ स्वतःसाठी घालवणे मला आवडेल. नकोश्या गोष्टी टाळुन हवेते करायचे स्वातंत्र्य मिळवणे हेही माझ्यासाठी मिनिमलिझम होइल>>>होय होय, सहमत, साधना.
आणि असे अनेक मुद्दे अॅड होऊ शकतील. मिनिमॅलिझमची व्याख्या व्यक्तिगणिक वेगवेगळी असू शकते.
से पोटापुरते मिळवुन बाकी वेळ
से पोटापुरते मिळवुन बाकी वेळ स्वतःसाठी घालवणे मला आवडेल. नकोश्या गोष्टी टाळुन हवेते करायचे स्वातंत्र्य मिळवणे हेही माझ्यासाठी मिनिमलिझम होइल, >> आवडलेच साधना..
माझा खुप दिवसांपासून तसा विचार चालू आहे. बघू या कधी जमतंय ते !
सहीच सई. आवडला लेख.
सहीच सई. आवडला लेख.
मी प्रतिसाद अजून वाचले नाहीयेत, वाचते सवडीने.
खूप दिवसांनी इथे बघून छान वाटलं.
बाकी आम्ही दुसऱ्या कारणाने मिनिमॅलिझम वर आलो आहोत. पुर्वी फार परिस्थिती नव्हती, गरजा कमी होत्या. आता परिस्थिती बरी आहे पण लेकरू सांगते, मोह सोडा, हवा कशाला इतका पसारा. त्यातही आनंद आणि समाधान. खंतही वाटत नाही. आहे तोच पसारा कमी करायचा आहे.
अंजु आनंद आणि समाधानच
अंजु
आनंद आणि समाधानच महत्वाचं सगळ्यात. बाकी सगळं गौण.
मिनिमॅलिझमचा (कंजूसवाद) वापर
मिनिमॅलिझमचा (कंजूसवाद) वापर करून येथे कमीत कमी प्रतिसाद देतो.
छान लेख. प्रतिक्रियाही छान .
छान लेख. प्रतिक्रियाही छान .
मलाही जरुरी पुरते उघडे स्वयंपाक घर, हातावरची भाकरी, वेळेवर डाळ तांदूळ मीठ- मिरची आणून खिचडी रांधणे.... अशा गोष्टींची क्रेझ वाटते.

किमानवाद आवडतो. शक्य तिथे इंप्लिमेंट ही करते. पण कुटुंबात राहताना, फक्त स्वतःच्याच तत्वांचा आणि आवडींचा आणि प्रायॉरिटीजचा विचार करुन चालत नाही . आठ - नऊ महिने काम आणि तीन- चार महिने जगभर फिरणे ही कल्पना किती आवडत असली तरी घरातील आजारपणे, जबाबदार्या, मुले, परीक्षा .......... ही यादी मॅक्सिमम होत जाते!!
पण अगदी रिफ्रेशींग लेख! अजून लिहीत राहा , सई. त्यात नको किमानवाद!
आंबट गोड, चामुंडराय, थँक्यु.
आंबट गोड, चामुंडराय, थँक्यु. यातल्या काही बाबी खरोखर जमतील तर काही फँटसीजच रहाणार. पण त्यात रमून दोन घटका छान जातात, एवढंच.
Pages