चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा फार जबरी पोस्टर आहे! पुण्यात्/भारतात असतो तर नक्कीच बघितले असते एक दोन यातले. नमक हलाल ऐवजी मुकद्दर का सिकंदर किंवा जंजीर असायला हवा होता. अभिमान व मिली हे दोन्ही असायची गरज नव्हती. त्यापेक्षा शक्ती किंवा शान हवा होता. बाकी लिस्ट चांगली आहे.

रमेश सिप्पी/यश चोप्रा/सलीम-जावेद हा एक ग्रूप, मनमोहन देसाई/प्रकाश मेहरा/कादर खान हा दुसरा आणि हृषिकेश मुखर्जी हा तिसरा ग्रूप असे तिन्ही आले असते बरोबर यात.

अरे भारी! मला पण आवडलं असतं यातले काही थिएटर मधे पुन्हा बघायला. हो मिली कशाला यात, त्यापेक्षा अजून बरेच चॉइस होते.

मिली छान आहे की. मला आवडला होता.
जंजीर (आणि आनंदही ) हवा होता. आनंद 'अमिताभ'चा फक्त नाही म्हणता येणार, पण आवडला असता थिएटरमध्ये बघायला. चुपके चुपके सुद्धा अमिताभचा नाहीच. धर्मेंद्रचा आहे.
सिलसिलापण चालला असता.

मीली बघितला नाही.
कालिया, नमक हलाल नसते तर चालले असते असे मला यादी बघुन वाटले.
मी कभी कभी थिएटरमध्ये नव्हता पाहिला तो पाहीन आता.
आणि दिवार किंवा डॉनही परत एकदा मोठ्या स्क्रीनवर पहावा वाटतोय.

<<सिलसिलापण चालला असता.>> +१

आपण लाख म्हणू हा हवा तो हवा, पण ते जमवण्यात अडचणही असेल.
अन्यथा यात त्रिशूलही असायलाच हवा होता.
मुकद्दर का सिकंदर आणि शराबीही चालला असता. किंबहुना मिस्टर नटवरलालही मला चालला असता. कारण हे अमिताभचे पिक्चर आहेत आणि त्यासाठी बघितले गेले आहेत.
मिली आवडीचा असला तरी मुळात तो अमिताभचा नव्हता. चुपके चुपके मध्येही त्याचे कॅरेक्टर धमाल असले तरी तो ही त्याचा नव्हता. तसेच कालिया नसता तरी चालले असते, त्यात काही विशेष केले नव्हते त्याने.

@ मानवमामा,
नमक हलाल नसता तर चालले असते
>>>>
असे का म्हणालात. मला जर पाच पिक्चर निवडायला सांगितले असते तरी मी त्यात नमकहलाल निवडला असता. तो तर अमिताभ स्पेशल पिक्चर आहे. एक नंबर कॉमिक बेअरींग पकडले आहे त्याने त्यात. कितीही वेळा बघा, फुल्ल धमाल. त्याचा तो माशी मारायचा सीनच कित्येक वेळा बघू शकतो. गाणी तर सगळीच मस्त. आज रपट जाये तो, पग घुंगरू बांध के, थोडी सी जो पी ली है, जवानी जानेमन....
तुम्ही चुकून नमकहराम आणि नमकहलाल मध्ये कन्फ्यूज नाही ना झालात Happy

कालिया, नमक हलाल नसते तर चालले असते असे मला यादी बघुन वाटले. >>> नमक हलाल बद्दल सहमत. तो तेव्हा महाप्रचंड हिट होता पण आता जेडेड वाटतो. कालिया त्याच्या टॉप पिक्चर्स पैकी म्हणता येणार नाही पण त्यातले अमिताभचे काम मात्र जबरदस्त आहे.

हृषिकेश मुखर्जींच्या चित्रपटांपैकी "अभिमान" ऑलरेडी असताना इतर कोणतेच असायची गरज नव्हती.

अमिताभने त्याची पहिली ईनिंग संपताना जे काही गचाळ चित्रपट केलेले त्यात एक वेगळा म्हणून "मै आझाद हू" मला आवडलेला.
अर्थात त्याचा या वरच्या लिस्टीशी संबंध नाही. पण सहज अमिताभचे चित्रपट डोक्यात घोळत असताना हा आठवला. चालला नसावा कदाचित, तरी कोणी बघितला नसल्यास बघा.
त्यातले "ईतने बाजू ईतने सर" गाणे आवडीचे. पहिले कडवे आजही गातो मी अधूनमधून..
https://www.youtube.com/watch?v=sy1IRoRTZTs

माझ्या मुलाला अमिताभ बिना दाढीमिशीचा होता हे बघून आश्चर्य वाटलेले. त्याने त्याला फक्त केबीसीतच पाहिलेले ना !

माझ्या मुलाला अमिताभ बिना दाढीमिशीचा होता हे बघून आश्चर्य वाटलेले. त्याने त्याला फक्त केबीसीतच पाहिलेले ना ! >>> Lol

त्रिशूल - यस. मि.नटवरलाल - यस. शराबी - नो. Happy

शराबी - नो >>> शराबी चित्रपट म्हणून माझाही नो. पण अमिताभची अदाकारी म्हणून येस. त्याचे शराबी व्यक्तीचे बेअरींग कमाल होते. दारू चढलेल्या सीनमध्ये ॲक्ट करणे सोपे असते. पण एखादा नॉर्मल सीनमध्येही हा थोडीशी टाकून आलाय असे भासवणे अवघड. जर एखाद्याला अमिताभची रेंज दाखवायची असेल तर हे असे एकेक पीस हवेत.

आदीपुरूषचं टीजर अजिबात आवडलं नव्हतं. पण सोडून दिलं (कुठे काही मत दिलं नाही).
आता ते टीजर ट्रोल होतंय अशा बातम्यांचे हेडिंग्ज पाहिले. तानाजीच्या वेळीही मराठमोळा तानाजी संपूर्ण भारतभर जातोय हेच अप्रूप होतं. सिनेमा अपील नव्हता झाला. सेमच दिग्दर्शक आहे.

अभिमान व मिली हे दोन्ही असायची गरज नव्हती. त्यापेक्षा शक्ती किंवा शान हवा होता. >>> अगदी अगदी ,शक्ति बाबत खुपच सहमत

त्रिशूल + १. तो तर अगदीच हवा होता.
शक्तीला पण +१

खरं तर कालिया मला फारसा आठवत नाहीय, दोनेक सीन्स आणि ते तुरुंगातलं पंछी को उड जाना है गाणं येतं डोळ्यासमोर. आणि रंगीबेरंगी स्वेटर घातलेला अमिताभ एल् ओ व्ही ई म्हणताना.
त्यावेळी विशेष इम्पॅक्ट केला नसल्याने मी तसे म्हणालो.

ऋन्मेष, नमाक हलालच म्हणायचे आहे मला. हिट होता, एंजॉय पण केला तेव्हा. ज्यांनी बघितलाच नाही त्यांच्यासाठी ठीक पण ज्यांनी बघितलाय (टिव्हीवर का असेना) त्यांनी परत जाऊन मोठ्या पडद्यावर बघण्याईतका खास मला वाटला नाही.

कालिया मी सुद्धा तुकड्या तुकड्यातच पाहिला आहे आणि कालिया म्हटले की ते तुरुंगातलं पंछी को उड जाना है हेच गाणं येतं डोळ्यासमोर Proud

पण बघायला हवा एकदा स्टार्ट टू एंड सलग..

कालिया मधलं हे गाणं मला सर्वात आवडतं - "तुम साथ हो जब अपने"
https://www.youtube.com/watch?v=U5tUJ3wd-8w

अमिताभ ज्यात नाचतो त्या गाण्यांपेक्षा तो नुसता चालत/फिरत गाणी म्हणतो ती जास्त आवडतात मला. त्याचा नाच स्पॉण्टेनियस फक्त माय नेम इज अँथनी गोन्साल्विस मधे वाटला. खैके पान बनारसवाला मधे किती स्पॉण्टेनियस होता माहीत नाही. कडव्यांमधल्या स्टेप्स असतील तशा.

त्यापेक्षा अशा गाण्यांमधे एकदम डिग्निफाइड वाटतो तो. फार क्वचित हीरो लोक असे नुसते फिरत गाणी म्हणत. अजूनही फार नाहीत.
https://www.youtube.com/watch?v=9Uv-zfUgTZ8&t=133s

किंवा
https://www.youtube.com/watch?v=wrV1xiZF_Yw&t=140s

<<अमिताभ ज्यात नाचतो त्या गाण्यांपेक्षा तो नुसता चालत/फिरत गाणी म्हणतो ती जास्त आवडतात मला.>> हे वाचून जिसका मुझे था इंतजार हेच गाणं डोक्यात आलं तेच तुम्ही पुढे दिले आहे Happy
याच गाण्यात पुढे इथपासून स्वतःला सावरे पर्यंत नाचतो ती स्टाईल सुद्धा माझ्या आवडीची.

डान्सेस मधे रेखाबरोबर अमिताभ ची केमिस्ट्री जबरदस्त असल्यामुळे तिच्यासोबत पण फार स्पॉन्टेनियस डान्सेस आहेत काही - रंग बरसे, ये लडकी है या शोला, तेरी रब ने बना दी जोडी वगैरे. टेक्निकली डान्सेस म्हणून ते ग्रेट नसतील पण त्यात त्याच्या स्वॅग आणि एक्सप्रेशन्स मुळे मला आवडतात फार.

याच गाण्यात पुढे इथपासून स्वतःला सावरे पर्यंत नाचतो ती स्टाईल सुद्धा माझ्या आवडीची. >>> परफेक्ट! मलाही तो सीन आवडतो. मूळचा रस्त्यावर नाचणारा विजय इथे डॉन बनून आलेला आहे. मधेच रंगात येउन नाचू लागल्यावर जेव्हा आपल्याला इथे लोक पाहात आहेत हे लक्षात येते तेव्हा तो थांबतो.

स्पॉन्टेनियस डान्स हवा तर परदेसिया बघावं. ती अंगात वीज भरल्याची अ‍ॅक्शन करते तरी हा बाबा विठोबागत कमरेवर हात ठेऊन आता युगे अठ्ठावीस हिला वाट बघायला लावणार पोजमध्ये... मग कधीतरी डोक्यात खिट्टी पडते नि गाडी 'लोगोंको कहने दो' ठेसनाला लागते... स्पाँटेनियस!

<<अमिताभ ज्यात नाचतो त्या गाण्यांपेक्षा तो नुसता चालत/फिरत गाणी म्हणतो ती जास्त आवडतात.>>
यातलंच एक मस्त गाणं म्हणजे, त्रिशूल मधलं " मोहब्बत बडे काम की चीज है "
सोबत चिकणा शशी कपूर..

Pages