चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रे (2022)

गेल्या वीकएंड ला काही करण्या सारखे नसल्याने हा सिनेमा पहिला.

बेसिकली हा सिनेमा अरनॉल्ड च्या प्रेडेतर चा पूर्वार्ध म्हणता येईल.

फक्त या वेळी कथा सतराव्या-अठराव्या शतकांतल्या नेटिव्ह इंडियन जमाती च्या काळात सेट केली आहे.

एकूण सांगायचे झाल्यास सिनेमा आवडला.

दीड तास डोक्याला ताप नाही अशा टाईप चा ऍक्शन थ्रिलर बघायचा असेल तरी नक्की पहा.

अमेरिकेत हुलू वर आहे आणि भारतात हॉटस्टार वर.

प्रे छान आहे, मला पण मजा आलेली पाहायला.
....

जॉन कारपेंटर दिग्दर्शित कल्ट क्लासिक सिनेमा "एस्केप फ्रॉम न्यू यॉर्क" (१९८१) पाहिला. ठीकठाक सिनेमा. हाईप आहे तितका नाही आवडला. कारपेंटरचे "द थिंग" आणि "इन द माऊथ ऑफ मॅडनेस" जितके आवडलेले तितका भारी नाही वाटला.

एस्केप फ्रॉम न्यू यॉर्क-
१९९७च्या डिस्टोपीयन अमेरिकेत, (१९९७ हे ८१ साली "भविष्य" होते) वाढत्या गुन्हेगारीमुळे संबंध मॅनहॅटन बेट जेल मध्ये परिवर्तित केले असते. तिथे गुन्हेगार आत गेला की पुन्हा बाहेर येत नसतो. आत गुन्हेगारांचेच राज्य असते. स्नेक प्लिस्केन नावाचा एलिट स्पेशल फोर्स सैनिक यूएस ट्रेझरी लुटायचा प्रयत्न करण्यासाठी न्यूयॉर्क मध्ये टाकला जाणार असतो, पण त्याच दरम्यान अत्यंत महत्वाच्या कामासाठी जाणाऱ्या यूएस प्रेसिडेंटचे विमान क्रॅश होणार असल्याने न्यूयॉर्क मध्येच उतरवावे लागते. आणि प्लिस्केनला प्रेसिडेंटना सुखरूप बाहेर काढण्याचा काम मिळते- यशस्वी झाल्यास त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार नाही . मिन्व्हाईल प्रेसिडेंटला न्यूयॉर्क तुरुंगावर राज्य करणाऱ्या "ड्युक"ने धरले असते. यूएस सरकारशी वाटाघाटी करून सगळ्या कैद्यांना न्यू यॉर्कबाहेर काढण्याचा त्याचा प्लॅन असतो.

कर्ट रसेल प्लिस्केनच्या भूमिकेत जबरदस्त आहे. त्यामुळे एकदा पाहायला हरकत नाही.
efny_4913.jpg
कारपेंटरचे पाहायच्या लिष्टमधले सिनेमे-
१. दे लिव्ह
२. बिग ट्रबल इन लिटल चायना
३. हॅलोवीन

आधीचे बरंच वाचन राहिलं आहे.

नवऱ्याने काल voot वर अलग पिक्चर लावलेला, बालपण आणि टीनेज मध्ये आवडला असता हा. त्या नायिकेला उगाच शेवटी मारून काय मिळवलं, अनेक त्रुटी होत्या पण तो चमचे सीन मला भारी आवडला.

कॉमी

कारपेंटर च्या लिस्ट मध्ये असॉल्ट ऑन प्रेसिन्क्ट 13 हि ऍड करा.

आताच्या स्टॅंडर्ड प्रमाणे थोडा लो बजेट प्रोडक्शन वाटेल पण सिनेमा चांगला ग्रिपिंग ऍक्शन थ्रिलर आहे.

लापि जुन्या माबोवर खुप वेळा वाजवली जाई पण तिचा लॉन्ग्फॉर्म माहित नव्हता. काय असेल ही लाल पिवळी हा विचार नेहमी डोक्यात येई Happy धन्यवाद फारेंड.

रणवीरा कि शमशेरा का आपटला ते ओटीटीवर पाहून समजले.
विक्रम रोणा(ना) नाही आवडला. खूप विक्सळीत आणि कंटाळवाणा.
कठपुतली खिळवून ठेवणारा वाटल्याने आवडला. शेवट गंडलाय. पण रहस्यपटात हल्ली रहस्याची उकल होताना असेच काही दाखवतात हल्ली. नावीन्य ठेवायचं, काहीतरी कारण द्यायचं म्हणून एक उपकथानक जोडायचं ही सर्कसच आहे.

बॉडीज बॉडीज बॉडीज (२०२२)
71GKwh3A8bL._RI_.jpg

जेन झी टिनेज पोरींचा ग्रुप "हरिकेन पार्टी" साठी एका श्रीमंत पोराच्या घरात जमली असतात. बाहेर वादळ येणार, आणि हे पार्टी करणार, असा प्लॅन असतो. ड्रग्ज, दारू सगळा माल अर्थात असतोच.

आणि रात्री, वादळ चालू झाल्यावर, ग्रुपमधला एक व्यक्ती मेलेला आढळतो. ग्रुपमधल्या एकमेकांवरचा शंका आणि भांडणं उफाळून येतात आणि राडा वाढतो.

सिनेमा आवडला ! मजेशीर आहे. शेवट खास आवडला.

Sita Ramam ... गोड मिट्ट लव्ह स्टोरी सोबत देशभक्ती .. तरीही बघण्या सारखा आहे. लीड pair ची chemistry .. आलिया - रणबीर पेक्षा खुपचं सुंदर आहे .मध्ये एक -दोन धक्के आहेत नक्कीच बघण्या सारखा आहे ..

बबली बाऊन्सर! मस्त निखळ मनोरंजक सिनेमा. खूप दिवसांनी पाहिला असा पिक्चर. स्टोरीलाईन घिसीपीटी आहे म्हणू शकतो. काय घडणार हे सुद्धा माहीत असते. पण तरीही कसे घडतेय याची उत्सुकता लागून राहतेच.
तमन्ना भाटियाला आधी बाहुबलीमध्ये पाहिलेले तेव्हा बोअर वाटलेली. पण यात धमाल काम केलेय तिने. जरूर बघा.

मणी

हो. सीता रामन चांगला वाटला

मृणाल ठाकूर ने चांगले काम केले आहे. एका मराठी अभिनेत्री ला चांगले रोल मिळत आहेत हे बघून बरे वाटले.

आज संध्याकाळी हरकत स्टुडिओ वर्सोवा इथे डबल स्क्रीनिन्ग आहे. ह्यातील गलियोंका शहर ह्या वाराणसी शहरा वरील डॉक्युमेंटरीवर माझ्या लेकीने काम केले आहे. तिकिटे इनसायडर.इन वर उपलब्ध आहेत. आग्रहाचे आमंत्रण.
https://insider.in/double-screening-15-seconds-of-a-lifetime-galiyon-ka-...

1. jiivi - तमिळ.प्राईमवर
एक हिरो असतो ज्युसवाला-सर्वनन आणि त्याचा मित्र चहावाला-मनी.
चेन्नईत रेन्टवर रहात असतात..
सर्वनन घर मालकिनीच्या घरी दागिने चोरी करतो त्या क्षणापासून त्याच्या कुटुंबासोबत स्ट्रेन्ज गोष्टी घडत जातात.
शेवट अनप्रेडिक्टेबल..चांगला आहे सिनेमा. सस्पेन्स, फैन्टसी.

2.पोलीस स्टोरी- युटुबवर.. हिंदी डब्ड.
मुळ मल्याळम आहे बहुतेक.
सीरीयल किलींग इन्वेस्टिगेशन, क्राईम,थ्रीलर सिनेमा आहे..
वोल्फ मास्क वाला किलर पोलिसांना किडनैप करून एक डोळा आणि हार्ट काढून बॉडी पार्सल करत असतो सोबत एक डोळस इन्साफ कि देवीची धातू ची मूर्ती ठेवून..

3.गरूडावेदा- युटुबवर.. हिंदी डब्ड..
ओरिजिनल तेलुगू.
आज एक गरूडावेदा हिंदी डब्ड. युटुबवर पाहिला..ओरिजिनल तेलुगू..
एक हैकर असतो व्हीलनसाठी काम करत असतो..महत्वाची सरकारी माहिती हैक करून पुरवणे.. त्याचा जीव धोक्यात येतो आणि अनावधानाने एक पोलीस (नायक) त्याला वाचवायला यात पडतो...ऐक्शन थ्रीलर सिनेमा आहे..चांगला आहे.

4.IRUL हिंदी डब्ड,युटुबवर, ओरिजिनल मल्याळम
सोबीन शाहीर, फहाद फासील आणि ती हिरोईन..तिघंच असतात सिनेमात...
सोबीन लेखक आणि हिरोईन वकिल..दोघं आऊटिंग ला जात असताना भर पावसात गाडी बंद पडल्यावर एका घरात आसरा घेतात त्या घरात असतो फहाद फासील.... मग त्या रात्री जे घडतं ते कन्फुजींग,थरारक......क्राईम थ्रीलर सिनेमा.... चांगला आहे...

विक्रम वेदा चा हिंदी रिमेक पहिला.

माझ्या मते तरी सिनेमा चांगला बनवलाय. सेम डायरेक्टर असण्याचा कदाचित परिणाम असेल.

ह्रितिक रोशन ने खरंच भारी काम केलाय. सेतुपतीच्या ओरीजिनल व्हर्जन शी डायरेक्ट कॉम्पेर करू नये.

प्रे बघायला हॉट स्टार लावले तर लक्षात आले सबस्क्रिप्शन संपलेय. लगेच रिन्यू केले. मग लक्षात आले की Hotstar वर फक्त ट्रेलर आहे.
Where to watch Prey (2022) in India search केलं तर त्यात Netflix दिसले. परत नीट बघितले नाही. Netflix बघणे होत नाही म्हणून गेल्या वर्षीच बंद केलेले सबस्क्रिप्शन परत सुरू केले. मग लक्ष्यात आले की तिथे वेगळा प्रे आहे २०२१ चा.
अशा रीतीने प्रे बघण्याच्या नादात OTT जालात स्वतःच Prey होऊन बसलो. Wink

Hotstar वर बहुतेक 7 Oct ला होईल रिलीज असे दिसतेय.

मानव Lol

पी एस १ (हिंदी) बघितला. मी नावं ही ऐकलं नव्हतं या मुव्हीचं. मैत्रिणीने सांगितलं मणीरत्नमचा आहे, ए आर रहमान चं म्युझिक वगैरे आहे खूप छान असेल तर बघूच आपण. गेलो पण भयंकर बोर निघाला. काहीच कळला नाही. काय थिम, कोण राजा इतकी अवघड अवघड नावं राजा, राज्यांची की अजिबात लक्षात राहणं शक्य नाही. उद्देशही कळला नाही. ऐश्वर्या नेहेमीसारखी दिसलीये. त्रिशा आणि ती समोरासमोर येतात तेव्हाचं फक्त १-२ ओळींचं गाणं चांगलं वाटलं बाकी पिक्चर ० मार्क.

विक्रम वेधा बघितला. फार आवडला. फुल्ल्टू अ‍ॅक्शन.
हृतिक साठी प्रचंड बदाम बदाम. टाळ्या शिट्ट्यामारू परफॉर्मन्स. शेवटची ५-१० मि थोडी ड्रामाटीक वाटली पण तरी ओके. बाकी पिक्चर मस्त एंगेजिंग आहे. सैफ सुधारला आहे अ‍ॅक्टींग, अ‍ॅक्शन मधे नक्कीच. आधीचा बायकी हिरो हाच का प्रश्न पडावा इतका बदललाय. राधिका आपटे अ‍ॅज युज्व्ल.
हृतिकने खाऊन टाकलाय मुव्ही.

पी एस १ काल तमिळ मध्येच पाहिला. खूपच आवडला. मणिरत्नम ने नुसते अ‍ॅक्शन अ‍ॅक्शन न करता बरोबर थोडे पॉलिटीक्स आणि थोडी अ‍ॅक्शन याचा मस्त संगम घातला आहे. काही काही सीन्स तर इतके एंगेजिंग झाले आहेत की सबटायटल्स पण वाचायची गरज पडत नाही. सुरूवातीला बर्‍याच गोष्टी घडत असल्याने थोडे न कळल्यासारखे होते पण पुढे सगळा नीट उलगडा होतो. कार्तीचे काम खुपच भावखाऊ झालेले आहे. श्रीलंकेतले सीन्स (बहुतेक थायलंड) मध्ये शूट झालेले सुंदर झालेले आहेत. आणि शेवटचा होडीवरचा मारामारीचा सीन अंगावर येतो. बाहूबली पेक्षाही जास्ती आवडला मला.

विक्रम वेधा चुम्मा पिक्चर आहे..
काय ती ॲक्शन, काय तो हृतिक. काय तो सैफ.. जबरदस्त एकदम. नुसता खिळवून ठेवतो चित्रपट. गर्लफ्रेंडसोबत बघायला जाल आणि तिला विसरून पिक्चर बघत बसाल ईतका भारी जमलाय. एक नंबर!

हृतिकच्या प्रत्येक सीनच्या एंट्रीला एक खतरनाक म्युजिक दिली आहे. त्यामुळे आणि स्टोरीच्या डिमांडमुळे हृतिक एक्स्ट्रा भाव खाऊन जातो. पण दोघेही डॅशिंग दिसतात. तोडीस तोड! दोघांची जुगलबंदी एंजॉय करायला पुन्हा बघणार हा पिक्चर..

पी एस १ हा इतिहासावर आधारीत आहे त्यामुळे बाहुबली सारखे अफाट ( आचरट ?) त्यात नाही म्हणून काही जणांचा अपेक्षाभंग झालंय

ह्रितिक सैफ चा विक्रम वेडा आवडला नाही.पण सैफ आवडला.राधिका उगीच आहे.
कथा असं फार काही नाहीये.ह्रितिक आणि सैफ ला जास्तीत जास्त पोस्टर पोझ सीन्स करता येतील असे प्रसंग शिवून कथा बनलीय.अल्कोहॉलिया गाणं नाच आणि सूर या दोन्ही प्रकारे आवडलं नाही.सैफ च्या अब्बास मित्राची पर्सनॅलिटी चांगली आहे. याला कुठेतरी पाहिलंय.
नुसतंच फाईट फाईट असेल तर वॉर खूप चांगला केला होता असं वाटलं.
आमच्या जवळ थिएटर(अनेकवचन) झाली
पण अगदी मस्त मजा येईल असे पिक्चर लागतच नाहीयेत.

Pages