कथाशंभरी२ - "स्वरूप पाहता लोचनी"-अनन्त_यात्री

Submitted by अनन्त्_यात्री on 6 September, 2022 - 12:55

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि .....

माबोमहाराजांचा आवाज त्याच्या कानात घुमू लागला, " स्वरूप जाणायचे तर मला त्वरित हाक घाल, मी मार्ग दाखवीन"

मंत्रचळ लागल्यासारखा रघू त्या बंद दारासमोर उभा राहून पुटपुटला," मी तयार आहे माबोमहाराज"

दार आरशासारखं चमकू लागलं अन् रघूला स्वरूपं दिसू लागली..

कधी खुनी, कधी मांत्रिक, कधी बलात्कारी, कधी परग्रहनिवासी,कधी हॅरीसुत, अन् एकदा तर चक्क बैल?

बैलरूपात आत्मदर्शन होताच हतबुद्ध होत्साता हंबरला रघू,"महाराज वाचवा आता. स्वरूप दर्शन नाही सहन होत"

कोसळताना चतुष्पाद रघूला जाणवलं त्याची शुद्ध हरपतेय.

तेव्हा माबोमहाराजांच्या आश्रमात ९ सप्टेंबर २०२२ च्या रात्रीचे १२ वाजत होते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही Happy

Biggrin भारी आहे !
बैल वाचून वेड्यासारखा हसतोय मी! Rofl

Biggrin

Lol भारीये
माबोकरांनी रघुला काय काय रुपं घ्यायला लावली आहेत.