लेखन उपक्रम ० - स्वरचित रचना

Submitted by संयोजक on 24 August, 2022 - 18:53

swarachit rachana-final.gif

नमस्कार मंडळी आपल्या हृदयावर अधिराज्य गाजविणारी, आपली मराठी भाषा किती सुंदर वाङ्मय प्रकारांनी समृद्ध आहे नाही का. भूपाळ्या, आरत्या, पाळणे, गवळणी, भारुड, लावण्या, पोवाडे, मंगलाष्टके, धावे, शेजारती, काकड आरती, अष्टके - अशा नाना अलंकारांनी सुशोभित अशी आपली भाषा आपणच प्रयत्नपूर्वक अधिकाधिक समृद्ध केली पाहीजे. मायबोली गणेशोत्सव २०२२ चे निमित्त साधून आपल्या स्वरचित रचना इथे लिहूया साहित्यदेवतेची पूजा करुन, फूल ना फूलाची पाकळी गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करु या. रचना, केवळ भक्तीपर असाव्यात असा आग्रह नाही.

हा मायबोलीकरांसाठीचा उपक्रम आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप शुभेच्छा !

रचना म्हणजे कोणती ? भक्तिपरच का ?
मुदत वगैरे
कृपया तपशील द्यावा

अगदी स्वरचित नाही जमणार पण सिलोनाबाई स्पेनकरांच्या 'आधारित' लावण्या चालू द्या प्लीज... मायबोली पेशल लावण्या लिहू... Wink
चालः फड सांभाळ
आयडी सांभाळ उडायला गं आला
आयडी सांभाळ उडायला गं आला
तुझ्या धाग्यावर आला जिल्हा गं तुझ्या धाग्यावर आला जिल्हा
तुझ्या धाग्यावर आला जिल्हा गं तुझ्या धाग्यावर आला जिल्हा
मूळ विषय काळढोण
त्यात नामांकित आली बेणं
तुझा धागा चालला जोमानं
तुझा धागा चालला जोमानं
पोस्ट पोस्ट ही विषारी टाकली
पेरापेरात अफवा भरली
नाही सत्यास जागा उरली
ढंग पाहून डोळा ओला
ढंग पाहून डोळा ओला
तुझ्या धाग्यावर आला जिल्हा गं तुझ्या धाग्यावर आला जिल्हा

सि Rofl

संयोजक, वाङ्मय करा तेवढं.
भक्तिपरच रचना करायच्या आहेत का?

रचना, केवळ भक्तीपर असाव्यात असा आग्रह नाही. >> अच्छा. पण मग विषय काय हवेत ते थोडे स्पष्ट कराल का? (माझी अशी समजूत होती की साहित्यदेवतेची पूजा हा विषय आहे) नाहीतर तसंही माबोवर सगळ्याच कविता स्वरचितच असतात ना?

काही तरी विषय दिलात, किंवा विडंबन करायचं सांगितलंत, आणि अजुन काही बंधनं टाकलीत की चारओळी हव्या, आधीच्या व्यक्तीने लावणी लिहीली तर तुम्ही अभंग लिहीला पाहिजे (नीडस मोअर ब्रेन स्टॉर्मिंग) किंवा अंताक्षरी सारख्या अक्षराने चालू झालं पाहिजे... तर आणखी मजा येईल. रादर डोकं चॅनलाईज होऊन काही लिहिता येईल. ओपन एंडेड फार सुचत नाही.
आणि एक आयड्या: विडंबन करा, म्हणजे मूळ वृत्त, मात्र इ. तेच ठेवून आशय/ भाव मात्र पूर्ण भिन्न असला पाहिजे. म्हणजे छबिदार छबी चालीत देशभक्तीपर गाणं पाहिजे. ए मालिक तेरे बंदे हम चालीत पोवाड पाहिजे असा काही केलं तर आणखी मजा येईल.
बाकी तुम्ही दिलेलंच करायचं असेल तरी यमकांची गिरण चालवूच! नो वरी! Happy

सी, मस्त लावणी! Lol

हेडर मधले चित्र बघून रीटा स्कीटर आता गणेशोत्सवातील गॉसिप्स लिहिणार असं वाटून गेलं.

रादर डोकं चॅनलाईज होऊन काही लिहिता येईल. ओपन एंडेड फार सुचत नाही.+१
झापडं लावलेल्या घोड्यासारखे आहोत हो आम्ही, झापडं द्या एकदाची Lol
सी, लावणी Lol

Happy फार नियम नको हो, एखाद दुसरा द्या.
अस्मिता (आणि अन्य कुणीही घेऊ इच्छिणारे), मागतेच आहेस तर तुला चॅलेंज देते Light 1 - बुगडीचे भजन लिहून दाखव Wink ते 'बुगडी माझी सांडली' 'गेली कुठे गावंना' इ इ मराठी गाण्यात "अरे ही बुगडी आहे का व्हर्जिनीटी?" प्रश्न पडेल इतकं गोरंमोरं करणारं असतं. लेट्स मेक बुगडी दागिना अगेन ....
(चॅलेंज घ्यायचा आग्रह नाही Happy गंमत म्हणून करू शकलीस तर... )

*चरैवती... चरैवती...*

नाजूकसे पंख पसरूनी
बघ पाखरे उडती
जगण्याचा मंत्र सांगती
चरैवती... चरैवती...

कोण पुरवितो इवल्या
चिमण्या चोचिंसाठी चारा
कोण भरवितो तयांच्या
इवल्या पंखामध्ये वारा

ओढ ही कुठली नेतसे
खेचुनी साता समुद्रापार
कोण दाखवी रस्ता, दिशा
वाऱ्यावर ते होती स्वार

कुठे जायचे कसे कळते
नाही चुंबक, नाही नकाशा
नाजूक त्यांचे पर फडफडती
घालती गवसणी आकाशा

प्रश्न तयांना कधी ना पडती
कोण मी, कुठे चाललो, कशासाठी
पंख पसरूनी ते झेपावती
गाती चरैवती... चरैवती

ओलांडीती ते पर्वत सागर
झेलीत पंखावर ऊनवारा
कधी पाऊस कधी विजा
तर कधी उबदार निवारा

ऋतू बदलता बदले निसर्ग
बदल हा विश्वाचा नियम
विश्वास ते ठेवीती प्रभुवर
काळजी तो वाहील कायम

ऊन सोनसळी कधी
झळाळे पंखावरती
कधी झेलीत चांदणे
गाती चरैवती... चरैवती

पंखावर कधी हिमकण
हिऱ्याप्रमाणे झगमगती
कधी पखरतो पाऊस
मोती ही पंखावरती

किती ही असो दुस्तर वाट
उचल पाऊल, जा ओलांडून
जीवन जगण्याची रीत
शिक रे मना पाखरांकडून...

येवो विपदा वा संकटे
अडचणी वा सुस्थिती
गीत गात जा आनंदे
चरैवती.... चरैवती....

गंधकुटी

रंग प्रार्थनेचे

सोनसळी बहावा फुले
जणू लक्ष लामणदिवे
नाम तुझे गोड देवा
सदा मनी मी ध्यावे

कृष्ण सावळी तुळस
डोले माझ्या अंगणात
रूप तुझे देखणे देवा
झुले माझ्या रे मनात

शुभ्र पांढरा तगर
मंदिराच्या दारात
सदा वसतोस देवा
तू माझ्या रे अंतरात

लाल पळस पांगारा
रूप तुझेच रे उदारा
तुझ्या नामस्मरणे
उजळे मनाचा गाभारा

केशराचे सडे
पारिजात घालतो
शिंपतो अत्तर केवडा
वाट तुझीच पाहतो

आकाशाची निळाई
रूप पाहते तळ्यात
तुझे गीत गाण्यासाठी
उतरे नादब्रह्म गळ्यात

तुझ्या कृपेचे इंद्रधनू
सप्तरंगात सजले
तुझ्यावर विसंबून
मी जागेपणी निजले

नीज तूच, तूच जाग
रंग तू, तूच गंध
शब्द तूच, तूच आर्त
नाद तू, तूच छंद

विश्वरूपी तू सर्वत्र
फुलात, पानात, दिपात
पूजा कशी करू तुझी मी
तू तर माझ्याही रूपात...

Gandhkuti