Submitted by संयोजक on 24 August, 2022 - 18:53
नमस्कार मंडळी आपल्या हृदयावर अधिराज्य गाजविणारी, आपली मराठी भाषा किती सुंदर वाङ्मय प्रकारांनी समृद्ध आहे नाही का. भूपाळ्या, आरत्या, पाळणे, गवळणी, भारुड, लावण्या, पोवाडे, मंगलाष्टके, धावे, शेजारती, काकड आरती, अष्टके - अशा नाना अलंकारांनी सुशोभित अशी आपली भाषा आपणच प्रयत्नपूर्वक अधिकाधिक समृद्ध केली पाहीजे. मायबोली गणेशोत्सव २०२२ चे निमित्त साधून आपल्या स्वरचित रचना इथे लिहूया साहित्यदेवतेची पूजा करुन, फूल ना फूलाची पाकळी गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करु या. रचना, केवळ भक्तीपर असाव्यात असा आग्रह नाही.
हा मायबोलीकरांसाठीचा उपक्रम आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप शुभेच्छा !
खूप शुभेच्छा !
रचना म्हणजे कोणती ? भक्तिपरच का ?
मुदत वगैरे
कृपया तपशील द्यावा
अगदी स्वरचित नाही जमणार पण
अगदी स्वरचित नाही जमणार पण सिलोनाबाई स्पेनकरांच्या 'आधारित' लावण्या चालू द्या प्लीज... मायबोली पेशल लावण्या लिहू...
चालः फड सांभाळ
आयडी सांभाळ उडायला गं आला
आयडी सांभाळ उडायला गं आला
तुझ्या धाग्यावर आला जिल्हा गं तुझ्या धाग्यावर आला जिल्हा
तुझ्या धाग्यावर आला जिल्हा गं तुझ्या धाग्यावर आला जिल्हा
मूळ विषय काळढोण
त्यात नामांकित आली बेणं
तुझा धागा चालला जोमानं
तुझा धागा चालला जोमानं
पोस्ट पोस्ट ही विषारी टाकली
पेरापेरात अफवा भरली
नाही सत्यास जागा उरली
ढंग पाहून डोळा ओला
ढंग पाहून डोळा ओला
तुझ्या धाग्यावर आला जिल्हा गं तुझ्या धाग्यावर आला जिल्हा
जबरदस्तच लावणी... सि _/\_
जबरदस्तच लावणी... सि _/\_
चतुर-मा-सी, लावणी झक्कास आहे
चतुर-मा-सी, लावणी झक्कास आहे एकदम!
सि
सि
संयोजक, वाङ्मय करा तेवढं.
भक्तिपरच रचना करायच्या आहेत का?
बार्सिलोना खतरनाक लावणी…
बार्सिलोना खतरनाक लावणी…
ईथलीही लावणी
ईथलीही लावणी
वाङ्मय करा तेवढं >> +१
वाङ्मय करा तेवढं >> +१
बदल केलेले आहेत. रचना, केवळ
बदल केलेले आहेत. रचना, केवळ भक्तीपर असाव्यात असा आग्रह नाही.
रचना, केवळ भक्तीपर असाव्यात
रचना, केवळ भक्तीपर असाव्यात असा आग्रह नाही. >> अच्छा. पण मग विषय काय हवेत ते थोडे स्पष्ट कराल का? (माझी अशी समजूत होती की साहित्यदेवतेची पूजा हा विषय आहे) नाहीतर तसंही माबोवर सगळ्याच कविता स्वरचितच असतात ना?
काही तरी विषय दिलात, किंवा
काही तरी विषय दिलात, किंवा विडंबन करायचं सांगितलंत, आणि अजुन काही बंधनं टाकलीत की चारओळी हव्या, आधीच्या व्यक्तीने लावणी लिहीली तर तुम्ही अभंग लिहीला पाहिजे (नीडस मोअर ब्रेन स्टॉर्मिंग) किंवा अंताक्षरी सारख्या अक्षराने चालू झालं पाहिजे... तर आणखी मजा येईल. रादर डोकं चॅनलाईज होऊन काही लिहिता येईल. ओपन एंडेड फार सुचत नाही.
आणि एक आयड्या: विडंबन करा, म्हणजे मूळ वृत्त, मात्र इ. तेच ठेवून आशय/ भाव मात्र पूर्ण भिन्न असला पाहिजे. म्हणजे छबिदार छबी चालीत देशभक्तीपर गाणं पाहिजे. ए मालिक तेरे बंदे हम चालीत पोवाड पाहिजे असा काही केलं तर आणखी मजा येईल.
बाकी तुम्ही दिलेलंच करायचं असेल तरी यमकांची गिरण चालवूच! नो वरी!
सी, मस्त लावणी!
सी, मस्त लावणी!
हेडर मधले चित्र बघून रीटा स्कीटर आता गणेशोत्सवातील गॉसिप्स लिहिणार असं वाटून गेलं.
रादर डोकं चॅनलाईज होऊन काही
रादर डोकं चॅनलाईज होऊन काही लिहिता येईल. ओपन एंडेड फार सुचत नाही.+१

झापडं लावलेल्या घोड्यासारखे आहोत हो आम्ही, झापडं द्या एकदाची
सी, लावणी
फार नियम नको हो, एखाद दुसरा
अस्मिता (आणि अन्य कुणीही घेऊ इच्छिणारे), मागतेच आहेस तर तुला चॅलेंज देते
(चॅलेंज घ्यायचा आग्रह नाही
नेकी और पुछ पुछ, प्रयत्न करते
नेकी और पुछ पुछ, प्रयत्न करते लोनाक्का
(No subject)
*चरैवती... चरैवती...*
*चरैवती... चरैवती...*
नाजूकसे पंख पसरूनी
बघ पाखरे उडती
जगण्याचा मंत्र सांगती
चरैवती... चरैवती...
कोण पुरवितो इवल्या
चिमण्या चोचिंसाठी चारा
कोण भरवितो तयांच्या
इवल्या पंखामध्ये वारा
ओढ ही कुठली नेतसे
खेचुनी साता समुद्रापार
कोण दाखवी रस्ता, दिशा
वाऱ्यावर ते होती स्वार
कुठे जायचे कसे कळते
नाही चुंबक, नाही नकाशा
नाजूक त्यांचे पर फडफडती
घालती गवसणी आकाशा
प्रश्न तयांना कधी ना पडती
कोण मी, कुठे चाललो, कशासाठी
पंख पसरूनी ते झेपावती
गाती चरैवती... चरैवती
ओलांडीती ते पर्वत सागर
झेलीत पंखावर ऊनवारा
कधी पाऊस कधी विजा
तर कधी उबदार निवारा
ऋतू बदलता बदले निसर्ग
बदल हा विश्वाचा नियम
विश्वास ते ठेवीती प्रभुवर
काळजी तो वाहील कायम
ऊन सोनसळी कधी
झळाळे पंखावरती
कधी झेलीत चांदणे
गाती चरैवती... चरैवती
पंखावर कधी हिमकण
हिऱ्याप्रमाणे झगमगती
कधी पखरतो पाऊस
मोती ही पंखावरती
किती ही असो दुस्तर वाट
उचल पाऊल, जा ओलांडून
जीवन जगण्याची रीत
शिक रे मना पाखरांकडून...
येवो विपदा वा संकटे
अडचणी वा सुस्थिती
गीत गात जा आनंदे
चरैवती.... चरैवती....
गंधकुटी
चरैवती.... चरैवती....
चरैवती.... चरैवती....
Keep moving
गंधकुटी
रंग प्रार्थनेचे
रंग प्रार्थनेचे
सोनसळी बहावा फुले
जणू लक्ष लामणदिवे
नाम तुझे गोड देवा
सदा मनी मी ध्यावे
कृष्ण सावळी तुळस
डोले माझ्या अंगणात
रूप तुझे देखणे देवा
झुले माझ्या रे मनात
शुभ्र पांढरा तगर
मंदिराच्या दारात
सदा वसतोस देवा
तू माझ्या रे अंतरात
लाल पळस पांगारा
रूप तुझेच रे उदारा
तुझ्या नामस्मरणे
उजळे मनाचा गाभारा
केशराचे सडे
पारिजात घालतो
शिंपतो अत्तर केवडा
वाट तुझीच पाहतो
आकाशाची निळाई
रूप पाहते तळ्यात
तुझे गीत गाण्यासाठी
उतरे नादब्रह्म गळ्यात
तुझ्या कृपेचे इंद्रधनू
सप्तरंगात सजले
तुझ्यावर विसंबून
मी जागेपणी निजले
नीज तूच, तूच जाग
रंग तू, तूच गंध
शब्द तूच, तूच आर्त
नाद तू, तूच छंद
विश्वरूपी तू सर्वत्र
फुलात, पानात, दिपात
पूजा कशी करू तुझी मी
तू तर माझ्याही रूपात...
Gandhkuti
अरे ही बुगडी आहे का
अरे ही बुगडी आहे का व्हर्जिनीटी? >>
रीटा स्कीटर आता गणेशोत्सवातील
रीटा स्कीटर आता गणेशोत्सवातील गॉसिप्स लिहिणार >> अरे रीटा स्कीटर कशी काय मिस झाली! त्याला एक तरी लाईक बनतोच!