भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@rmd , मी अनु , देवकी , जाई,
हो, जखमा भयंकर होत्या. तोंड रक्तबंबाळ झालं होतं. पण स्नो खूप सोशिक आहे. शांतपणे सहन केलं सगळं. कण्हणं नाही. कुई कुई सुद्धा केलं नाही. पीनट बटरमधून बिनतक्रार औषधं घेतली. मीच रडत होते त्याला बघून.
आता पूर्ण बरा होऊन मजेत आहे स्नो.

@धनवन्ती -बिचकत नाही पण सावध असतो. पूर्वी एखादा भू भू रस्त्यात दिसला तरी एकंदरीत बेफिकीर , बेपर्वा असे. तू तुझ्या वाटेने जा, मी माझ्या. आपल्याच जातभाईकडून हल्ला होऊ शकतो अशी त्याला (आणि आम्हालाही ) कल्पना नव्हती. पण आता कोणी आलाच अंगावर, तर घेईन शिंगावर असा अविर्भाव असतो. त्याची गंमत वाटते Happy

@जाई , स्नो Clumber Spaniel आहे.

@आशुचँप, ओडिनसुद्धा पुन्हा हुंदडायला लागला हे छान झालं. नवीन धाग्याची वाट पाहतेय !
तुम्हां सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार !
आता नवीन धाग्यावर नव्या - जुन्या भूभू बाळांना भेटू या Happy

स्नोच्या सोशिकपणाबद्दल उगा गैरसमज नको ( आणि आपला तो बाळया म्हणून अवास्तव कौतुकही नको म्हणून थोडं स्पष्टीकरण Happy )
@ जाई ,
दुसऱ्या भू भूने चावा घेतल्यावर कळवळला की चांगलाच पण मग घरी आल्यावर हूं की चूं न करता निपचित पडून असे. साधारण 3 ऱ्या दिवशी नेहमीसारखा खेळकर झाला. असो.

आईग्गं बिचारा स्नो...
बाळंच ही आपली.
आता बरा आहे बघून बरं वाटलं.

एक गंमत आमच्या बोक्याची.
तो बाहेर जातो अक्खा दिवस निदान समर मधले तरी सगळे दिवस म्हणून मुलीच्या आग्रहाखातर त्याला ट्रॅ़कर लावलाय कॉलरमधे. ती लोकेशन ट्रॅक करुन घेऊन येते कुठून कुठून तो वेळेत आला नाही तर. मोस्टली तो आमच्या कम्युनिटीमागच्या झाडीतच असतो. जे ५-७ मिनिटच लांब आहे. पण त्याला घेऊन येताना तो ईतका टंगळमंगळ करतो. उचलून घेतलेलं आवडत नाही हातपाय झाडतो. मग हिच्या मागे चालताना मधेच जमिनीवर लोळेल, उगीच एका जागी थांबेल किती वेळ, एखाद्या झाडामागेच जाईल. अर्धा तास लावतो एवढ्याश्या अंतरासाठी. वाटेत एक पार्क लागते तिथल्या घसरगुंडीवरच गेला एकदा Lol जस्ट लाईक लहान मुल.

हिच्या मागे चालताना >> मागे चालतो कसा मुळात ? Happy म्हणजे लीश वगैरे लावता का?
घसरगुंडीवरच गेला एकदा >> Happy क्यूट!

क्युट, आमच्या ईथे पण एक फॅमिली वॉक करतांना त्यांची माउ त्यांच्या बरोबर अस्ते. मागे नाही पण ठरावि क अंतर ठेउन आस पास खेळत अस्ते . गंमत वाटते बघायला..

माउईची मज्जा. मी २ दिवसाच्य ट्रिप वरून आले आणि बेडरूम मधे सूटकेस आवरत होते. माउई तिथेच घुटमळत होता. नंतर मी खाली आले तरी बराच वेळ तो आला नाही. नेहमी म्हणजे माझे शेपूट असल्यासारखं खाली/ वर जिथे जाईन तिथे येतो म्हणून मला जरा आश्चर्यच वाटलं. तेवढ्यात वरून खुस फूस खूस फूस आवाज यायला लागला. मग मी वर दुसर्‍या खोलीत असलेल्या मुलीला ओरडून म्हटले बघ गं जरा तो काय करतोय माझ्या खोलीत. ती अजून उठतेय तोवर धुबुक्कन बेड वरून उडी मारल्याचा आवाज आला आणि सुर्रर्र पळत माउई बुवा खाली आले Lol काहीच न झाल्यासारखा हॅ हॅ करत माझ्याकडे बघत माझ्याजवळ येऊन बसला. पण १००% नॉटी फेस होता. वस्ताद आहे, त्याचं नाव पण मी घेतले नव्हते पण त्याला माझ्या टोन वरून समजले असावे बहुतेक.
naughty.jpg
मग वर जाऊन पाहिले तर हाही माझ्या मागे 'आता काय होणार' अशा चिंतातूर चेहर्‍याने बघत मागो माग ! फार काही डिझास्टर नशीबाने नव्हते, पण तिथे ऑफिस इव्हेन्ट मधे मिळालेली एक ड्रॉ स्ट्रिंग ची बॅग होती ती ओढाताण करून स्ट्रिंग तोडून ठेवली होती Happy त्यामुळे मी जास्त न रागावता काय केले हे ? हे कुणी केले? म्हणून हसायला लागले तर लगेच लाडात येऊन चाटायला लागला मग. फार फनी होते एकेक एक्सप्रेशन Happy

>>>>>>>लगेच लाडात येऊन चाटायला लागला मग. फार फनी होते एकेक एक्सप्रेशन Happy
हाहाहा

<<<काहीच न झाल्यासारखा हॅ हॅ करत माझ्याकडे बघत माझ्याजवळ येऊन बसला. >>
सुपर क्युट आहे तो...फोटो जेनिक एकदम..
दृष्ट काढत जा त्याची..

हाहाहा भारी किस्सा
कसला डॅम्बीस आहे माव्या Happy

अंजली - बोक्याला ट्रॅकर लावायची आयडीया भारी आहे
त्याला घरी आणतानाचा प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला
Happy

चिडकू - बिच्चारा, कसला पेशंस ने बघतोय, ओड्या ने भुंकून लगेच राग व्यक्त केला असता

माव्या खव्या गोंडस आहेस अगदी! Happy

अंजली - बोक्याला ट्रॅकर लावायची आयडीया भारी आहे>>>>>>>> हो माझी मुलगी काय काय शोधत असते असं. तिचा फार लाडका आहे तो. त्याच्यासाठी काही पण. Wink

त्याला घरी आणतानाचा प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला>>>>>>>>>>. एकदा विडीओ करणार आहे Lol

अंजली_१२,
हो ना आपली बाळंच नाही तर काय म्हणायचं....आणि आपला काही तरी ऋणानुबंधही असतो अशी माझी श्रद्धा आहे Happy
तुमचा बोकाही लोभस आहे. तुम्ही वर्णन केलेल्या त्याच्या सगळ्या करामती मजेशीर आहेत. खरंच विडिओ करा एखादा.
नुकतीच नेटफ्लिक्सवर Inside the mind of a Cat - documentary बघितली. छान आहे.
माउईच्या डोळ्यांत तर नेहमीच खोडकर भाव असतात. त्याला रागावणं शक्यच नाही. त्याच्याही खोड्या वाचते अधून मधून.

Pages