श्री वेंकटेशा सुप्रभातम : एक अवर्णनीय अनुभूति

Submitted by अश्विनीमामी on 17 August, 2022 - 11:08

तिरुपती बालाजी हे आमचे माहेरकडून कुलदैवत. आईला घेउन जायचे होते पण तिची हालचाल कमी झाल्याने ते काही जमले नाही. तिरुपतीला जायची इच्छा व्यक्त केल्यानंतर काहीच महिन्यात ती गेल्याने ते शल्य मनातच राहिले. आपण असे किती ओळखतो आपल्या पालकांना. प्रत्यक्ष नजर भेट झाली नाही तरी वेंकटेश बालाजी हे दैवत कायमच मनात वास्तव्य करून असते. तिरुमलाचा राजा, विश्वकर्ता. ह्या मंदिरावर नॅशनल जिऑग्रोफिक्स ने केलेली डॉक्युमेंटरी बघितली आहे.

हैद्राबादचे बिर्ला मंदिरही फार सुरेख आहे. संपूर्ण शुभ्र संगमरवराचे मंदिर संध्याकाळच्या प्रकाशात अगदी स्वर्गीय दिसते. तेथील बालाजी मुर्तीचे मी अनेक वेळा दर्शन घेतले आहे. आलेल्या पाहुण्यांना नेले आहे. आईबाबांना पुण्याहून घेउन आलो तेव्हाही एकदा व्हिलचेअर करून नेले होते. इथे ज्येनांसाठी एक लिफ्ट पण आहे. कार पार्कच्या समोर एक धार्मिक साहित्य पुस्तके, सीडी, जपमाळा, क्यासेटी विकणारे दुकानही आहे.

ह्याच्या शेजारच्याच टेकडीवर नेहरु तारांगण व सायन्स सेंटर म्युझिअम असे आहे. इथेच तो भला मोठा डायनासोरचा सांगाडा ही आहे. मुलांसाठी उत्तम ठिकाण. व्हॉटेवर रॉक्स युअर बोट!! आय विल टेक बोथ थँक यु.

ह्या मंदिरात तसेच दक्षिणेत अनेक ठिकाणी कायम ऐकू येणारे स्त्रोत्र म्हणजे श्री वेंकटेशा सुप्रभातम. ह्याची गोडी अवीट आहे मला
विशेष करून महान गायिका एम एस सुब्बलक्ष्मी व बरोबरच्या गायिकांनी म्हटलेले वेंकटेश्वरा सुप्रभातम ऐकायला आवडते. पहाटे चार साडेचार ला उठले की अनेकवेळा ऐकते. ह्या वेळेस महानगरी मुंबईपण अगदी शांत असते.

https://www.youtube.com/watch?v=R-bwYbOExt8

इथे ऐकता येइल. पण तोटा एकच की जर प्रिमिअम व्हर्जन नसेल तर युटुयुब मध्येच जाहिराती टाकते. त्याने अगदी रसभंग होतो. माझ्याकडे स्पॉटिफाय प्रिमिअम आहे त्यामुळे मी ऑडिओच ऐकते. आपसूकच ध्यान होउन जाते.

मूळ व्हर्जन पण उपलब्ध आहे.

https://www.youtube.com/watch?v=AzJ38LSBEpQ

हे तर सर्व आत्ता पर्यंतचे आहे व बर्‍यापैकी वैयक्तिक अनुभव आहे. पण खरा आश्चर्याचा धक्का पुढेच आहे. इन्स्टाग्रामवर नेहमीप्रमाणे रील्स बघताना बेजवाडा फूड व इतर दक्षिणी चॅनेल्स वर ह्याच सुप्रभातमची पुरुष गायकांनी गायलेल्या व्हर्जनची एक दोन वाक्यांची झलक ऐकायला मिळाली. व इतके सुरेख शांत वाटले. सुखद धक्का!! मग ट्रॅक शोधला तर माधवन च्या रॉकेट्री सिनेमात हे पूर्ण पुरुषी आवाजात आहे.
स्पॉटिफाय वर सर्च केले तर पूर्ण ट्रॅक मिळाला आहे. आधी नुसता ऐकला मग हेडफोन वरून ऐकला आज सकाळी आयवा स्पिकर वर फोन जोडून घरभर ते सूर पसरवले. मी घरी उदबत्ती वगैरे ठेवत नाही नाहीतर एकदम मंदिरात बसल्याचेच फीलिन्ग येते. फारच छान आहे. जरूर ऐका.
एम एस सुब्बलक्ष्मी मॅडमची व्हर्जन आहे ती जरा हाय पिच मध्ये आहे तर ही लो पिच आहे. ह्याला मागे व्हायोलिन, सनई, मृदंगम ह्यांचे संगीत दिले आहे. मृदंगम वाला जरा मध्ये मध्ये धडपडतो असे वाट्टॅ कारण सुप्रभातम त्या एका विशिष्ट पद्धतीनेच म्हणायचे असते. पण पुढे तो बरोब्बर पावले टाकतो. बापे सिंगर्स नी कमाल केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=P-4OtWtwOig&t=623s

श्लोकाचे क्रेडिट्स खालील प्रमाणे.

ROCKETRY'S SRI VENKATESA SUPRABATHAM - SONG CREDITS:
Music Arranged & Produced By: Divakar Subramaniam
Chorus Singers: Vignesh G, Sai Vignesh, Venkataramanan L, Nikhil Shankar, Vikram Pitty
Mix & Mastering Engineer: Dan Konopka

पण माझे ऐकाल तर ओरिजिनल स्कोअर स्पॉटिफायवर जरूर ऐका. ग्रेट रेफ्रेशिंग ऑडिओ एक्स्पिरीअन्स. : मनाला ताजे तवाने करणारा एक अद्भुत धार्मिक संगीतानुभव.

मूळ लिरिक्स इंग्रजीत सापडले. ते खाली देत आहे. उद्या पहाटे डॉक्टराला भेटायचे आहे ते झाले की सवडीने संस्कृत लिहून काढीन. बरोबरीने म्हणायाला छान वाट्ते. माझे जवळ जवळ पाठच झाले आहे.

1. Kowsalya supraja Rama poorva sandhya pravarthathe
Uthishta narasardoola karthavyam daiva mahnikam

2. Uthishto Uthishta Govinda uthishta garudadhwaja
Uthishta kamala kantha thrilokyam mangalam kuru
3. Mathassamasta jagatham madukaita bhare
Vakshoviharini manohara divya moorthe
Sree swamini srithajana priya danaseele
Sree Venkatesha dayithe thava suprabhatham

4. Thava suprabhatham aravinda lochane
Bhavathu prasanna mukha chandra mandale
Vidhisankarendra vanitha bhirarchithe
Vrishasaila natha davithel daya nidhe

5. Athriyadhi saptharushayssamupasyasandyam
Aakasa sindhu kamalani manoharani
Aadaya padhayuga marchayithum prapanna
Seshadrisekha ravibho Thava suprabhatham

6. Panchananabja bhava shanmukavasavadhya
Tryvikramadhi charitham vibhudhasthuvanthi
Bhashapathipatathi vasara shuddhi marath
Seshadri sekha ravibho thava subrabhatham

7. Eeshathprapulla saraseeruha narikela
Phoogadrumadi sumanohara Balikanam
Aavaathi mandamanilassaha divya gandhai
Seshadri sheka ravibho thava suprabhatham

8. Unmeelya nethra yugamuththama panjarasthaa
Paathraa vasishta kadhaleephala payasani
Bhukthvaa saleelamatha keli sukha patanthi
Seshadri sekha ravibho thava suprabhatham

9. Thanthreeprakarshamadhuraswanaya
vipanchyaa Gayathyanantha charitham
thava naradopi Bhashasamagrama sakruthkara sara rammyam
Seshadri sekha ravibho thava suprabhatham

10. Brunga valeecha makaranda rashanuvidda
Jhankara geetha ninadaissa sevanaya
Niryathyupaantha sarasee kamalodarebhyaha
Seshadri sekha ravibho thava suprabhatham

11. Yoshaganena varadhadni vimathyamaane
Ghoshalayeshu dhadhimanthana
theevraghoshaaha Roshaathkalim
vidha-dhathe kakubhascha k**bhaha
Seshadri sekha ravibho thava suprabhatham

12. Padmeshamithra sathapathra kathalivargha Harthum shriyam
kuvalayasya nijanga Lakshmya Bheree
ninadamiva bibrathi theevranadam
Seshadri sekhara vibho thava suprabhatham
13. Sreemannabheeshta varadhakhila
lookabandho Sree Sreenivasa
Jagadekadayaika sindho
Sree devathagruha bhujanthara divyamurthe
Sree Venkatachalapathe thava suprabhatham

14. Sree swamy pushkarinikaplava nirmalangaa
Sreyorthino hara viranchi
sanadadhyaha Dware vasanthi
varavethra hathothamangaha
Sree Venkatachalapathe thava suprabhatham

15. Sree seshasaila garudachala venkatadri
Narayanadri vrishabhadri vrishadri
mukhyam Akhyam thvadeeyavasatheranisam vadanthi
Sree Venkatachalapathe thava suprabhatham

16. Sevaaparaashiva suresa krusanudharma
Rakshombhunatha pavamana dhanadhi
nathaha Bhaddanjali pravilasannija seersha deSaha
Sree Venkatachalapathe thava suprabhatham

17. Dhateeshuthevihagaraja mrugadhiraja Nagadhiraja gajaraja hayadhiraja
Swaswadhikara mahimadhika marthayanthe
Sree Venkatachalapathe thava suprabhatham

18. Sooryendhubhouma bhudhavakpathi
kavya soori Swarbhanukethu divishathparishathpradanaa
Twaddhasa dasa charamavadhidaasa daasa
Sree Venkatachalapathe thava suprabhatham

19. Thwathpadadhulibharita spurithothha manga
Swargapavarga nirapeksha nijantharanga
Kalpagamakalanaya kulatham labhanthe
Sree Venkatachalapathe thava suprabhatham

20. Thvadgopuragra sikharani nireekshmana Swargapavarga
padaveem paramam shrayantha Marthyaa manushyabhuvane
mathimashrayanthe
Sree Venkatachalapathe thava Suprabhatham
21. Sree bhoominayaka dayadhi guna mmruthabdhe
Devadideva jagadeka saranya moorthe
Sreemannanantha garudadibhirarchithangre
Sree Venkatachalapathe thava suprabhatham
.
22. Sree Padmanabha Purushothama Vasudeva Vaikunta Madhava Janardhana chakrapane
Sree vathsachinha saranagatha parijatha
Sree Venkatachalapathe thava suprabhatham

23. Kandarpa darpa hara sundara divya murthe
Kanthaa kuchamburuha kutmialola drishte
Kalyana nirmala gunakara divyakeerthe
Sree Venkatachalapathe thava suprabhatham

24. Meenakruthe kamatakola Nrusimha varnin Swamin
parashvatha thapodana Ramachandra
Seshamsharama yadhunandana kalki roopa
Sree Venkatachalapathe thava suprabhatham

25. Elaa lavanga ghanasaara sugandhi theertham
Divyamviyathsarithi hemaghateshu poornam
Drutwadhya vaidika sikhamanaya prahrushta
Thishtanthi Venkatapathe thava suprabhatham

26. Bhaswanudethi vikachani saroruhani
Sampoorayanthi ninadai kakubho vihangha
Sree vaishnavassathatha marthitha mangalasthe
Dhamasrayanthi thava Venkata subrabhatham

27. Bhramadayassuravarasamaharshayastthe
Santhassa nandana mukhastvatha yogivarya
Dhamanthike thavahi mangala vasthu hasthaa
Sree Venkatachalapathe thava suprabhatham

28. Lakshminivasa niravadya gunaika sindo
Samsarasagara samuththaranaika setho
Vedanta vedya nijavaibhava bhakta bhogya
Sree Venkatachalapathe thava suprabhatham

29. ltnam vnsnacnala pamerlna suprabhatham
Ye manava prathidinam patithum pravrutha
Thesham prabhatha samaye smruthirangabhhajam
Pragnyam paraartha sulabham paramam prasoothe

माधवन गारुंनी एकदम मस्त काम केले आहे. त्यांचे अनेकानेक आभार.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह अमा! हे माझं पण एकदम फेवरेटेस्ट आहे. फार छान माहोल तयार होतो. प्रसन्न वाटतं.
स्पॉटीफाय वर नक्की ऐकेन.


श्रीवेङ्कटेश सुप्रभातम्

कौसल्या सुप्रजा राम पूर्वासन्ध्या प्रवर्तते ।
उत्तिष्ठ नरशार्दूल कर्त्तव्यं दैवमाह्निकम् ॥१॥

उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज ।
उत्तिष्ठ कमलाकान्त त्रैलोक्यं मङ्गलं कुरु ॥२॥

मातस्समस्तजगतां मधुकैटभारेः
वक्षोविहारिणि मनोहरदिव्यमूर्ते ।
श्रीस्वामिनि श्रितजनप्रियदानशीले
श्रीवेङ्कटेशदयिते तव सुप्रभातम् ॥३॥

तव सुप्रभातमरविन्दलोचने
भवतु प्रसन्नमुखचन्द्रमण्डले ।
विधिशङ्करेन्द्रवनिताभिरर्चिते
वृशशैलनाथदयिते दयानिधे ॥४॥

अत्र्यादिसप्तऋषयस्समुपास्य सन्ध्यां
आकाशसिन्धुकमलानि मनोहराणि ।
आदाय पादयुगमर्चयितुं प्रपन्नाः
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥५॥

पञ्चाननाब्जभवषण्मुखवासवाद्याः
त्रैविक्रमादिचरितं विबुधाः स्तुवन्ति ।
भाषापतिः पठति वासरशुद्धिमारात्
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥६॥

ईषत्प्रफुल्लसरसीरुहनारिकेल
पूगद्रुमादिसुमनोहरपालिकानाम् ।
आवाति मन्दमनिलस्सह दिव्यगन्धैः
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥७॥

उन्मील्य नेत्रयुगमुत्तमपञ्जरस्थाः
पात्रावशिष्टकदलीफलपायसानि ।
भुक्त्वा सलीलमथ केलिशुकाः पठन्ति
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥८॥

तन्त्रीप्रकर्षमधुरस्वनया विपञ्च्या
गायत्यनन्तचरितं तव नारदोऽपि ।
भाषासमग्रमसकृत्करचाररम्यं
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥९॥

भृङ्गावली च मकरन्दरसानुविद्ध
झङ्कारगीतनिनदैस्सह सेवनाय ।
निर्यात्युपान्तसरसीकमलोदरेभ्यः
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥१०॥

योषागणेन वरदध्नि विमथ्यमाने
घोषालयेषु दधिमन्थनतीव्रघोषाः ।
रोषात्कलिं विदधते ककुभश्च कुम्भाः
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥११॥

पद्मेशमित्रशतपत्रगतालिवर्गाः
हर्तुं श्रियं कुवलयस्य निजाङ्गलक्ष्म्या ।
भेरीनिनादमिव बिभ्रति तीव्रनादं
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥१२॥

श्रीमन्नभीष्टवरदाखिललोकबन्धो
श्रीश्रीनिवास जगदेकदयैकसिन्धो ।
श्रीदेवतागृहभुजान्तरदिव्यमूर्ते
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥१३॥

श्रीस्वामिपुष्करिणिकाप्लवनिर्मलाङ्गाः
श्रेयोऽर्थिनो हरविरिञ्चसनन्दनाद्याः ।
द्वारे वसन्ति वरवेत्रहतोत्तमाङ्गाः
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥१४॥

श्रीशेषशैल गरुडाचलवेङ्कटाद्रि
नारायणाद्रि वृषभाद्रिवृषाद्रि मुख्याम् ।
आख्यां त्वदीयवसतेरनिशं वदन्ति
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥१५॥

सेवापराश्शिवसुरेशकृशानुधर्म
रक्षोऽम्बुनाथ पवमान धनादिनाथाः ।
बद्धाञ्जलि प्रविलसन्निजशीर्ष देशाः
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥१६॥

धाटीषु ते विहगराज मृगाधिराज
नागाधिराज गजराज हयाधिराजाः ।
स्वस्वाधिकार महिमाधिकमर्थयन्ते
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥१७॥

सूर्येन्दु भौम बुध वाक्पति काव्यसौरि
स्वर्भानु केतु दिविषत्परिषत्प्रधानाः ।
त्वद्दास दास चरमावधि दासदासाः
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥१८॥

त्वत्पादधूलि भरितस्फुरितोत्तमाङ्गाः
स्वर्गापवर्ग निरपेक्ष निजान्तरङ्गाः ।
कल्पागमाकलनयाकुलतां लभन्ते
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥१९॥

त्वद्गोपुराग्रशिखराणि निरीक्षमाणाः
स्वर्गापवर्गपदवीं परमां श्रयन्तः ।
मर्त्या मनुष्यभुवने मतिमाश्रयन्ते
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥२०॥

श्रीभूमिनायक दयादिगुणामृताब्धे
देवाधिदेव जगदेकशरण्यमूर्ते ।
श्रीमन्ननन्तगरुडादिभिरर्चिताङ्घ्रे
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥२१॥

श्रीपद्मनाभ पुरुषोत्तम वासुदेव
वैकुण्ठ माधव जनार्दन चक्रपाणे ।
श्रीवत्सचिह्न शरणागतपारिजात
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥२२॥

कन्दर्पदर्पहर सुन्दर दिव्यमूर्ते
कान्ताकुचाम्बुरुह कुटमल लोलदृष्टे ।
कल्याणनिर्मलगुणाकर दिव्यकीर्ते
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥२३॥

मीनाकृते कमठ कोल नृसिंह वर्णिन्
स्वामिन् परश्वथतपोधन रामचन्द्र।
शेषांशराम यदुनन्दन कल्किरूप
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥२४॥

एला लवङ्ग घनसारसुगन्धितीर्थं
दिव्यं वियत्सरिति हेमघटेषु पूर्णम् ।
धृत्वाऽद्य वैदिक शिखामणयः प्रहृष्टाः
तिष्ठन्ति वेङ्कटपते तव सुप्रभातम् ॥२५॥

भास्वानुदेति विकचानि सरोरुहाणि
सम्पूरयन्ति निनदैः ककुभो विहङ्गाः ।
श्रीवैष्णवास्सततमर्थितमङ्गलास्ते
धामाश्रयन्ति तव वेङ्कट सुप्रभातम् ॥२६॥

ब्रह्मादयस्सुरवरास्समहर्षयस्ते
सन्तस्सनन्दनमुखास्तवथ योगिवर्याः ।
धामान्तिके तव हि मङ्गलवस्तुहस्ताः
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥२७॥

लक्ष्मीनिवास निरवद्यगुणैकसिन्धो
संसार सागर समुत्तरणैकसेतो ।
वेदान्तवेद्यनिजवैभव भक्तभोग्य
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥२८॥

इत्थं वृषाचलपतेरिह सुप्रभातं
ये मानवाः प्रतिदिनं पठितुं प्रवृत्ताः ।
तेषां प्रभातसमये स्मृतिरङ्गभाजां
प्रज्ञां परार्थसुलभां परमां प्रसूते ॥२९॥

/\
वेंकटरमणा गोविंदा
माझेही सासरमाहेरचे हेच कुलदैवत!
(तुम्हाला योग्य वाटले तर हे वर घेऊ शकता , मला आनंदच वाटेल.)

वाह!!! उत्कट आहे.
अमा जस्त लिहीत जा. म्हणजे वारंवारता वाढवा प्लीज.
लिंकवर जाउन ऐकते आहे. मस्त आहेत.

हे अनेकदा ऐकलेले आहे. छान वाटतं. मेल व्हर्जन ऐकतो.
मराठी लोकांचे कुलदैवत मला वाटायचं इथलंच असेल. बालाजी असतं माहित न्हवतं.

मस्त! एम एस सुब्बालक्ष्मींचे आकाशवाणीवर पहाटे अनेकदा ऐकले आहे. खूप सुंदर आहे ऐकायला. पहिल्या नोकरीत माझे दोन जवळचे मित्र तमिळ होते. त्यांच्या घरीसुद्धा लावत असत.

मलाही हे ऐकायला खूप आवडतं. एकदम छान, मंगल वातावरण निर्माण होतं.
आम्ही बंगलोरला रहायला आलो तेव्हा हमखास सकाळी सकाळी हे ऐकू यायचं. तेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं. अर्थात सुबलक्ष्मींचंच. आताही कधी ऐकताना तेच दिवस आठवतात. Happy
रॉकेट्री बघितलाय मी. पण सुरुवात चुकली होती. आता ऐकते ते.

तव सुप्रभातम् खूपच छान आहे. पूर्वी रेडिओवरून अनेकदा ऐकायला मिळत असे. ते सुब्बलक्ष्मींचे असे. व्यंकटेशाचे नानाप्रकारे गुणवर्णन केले आहे तेही नादमय आणि अर्थपूर्ण आहे. लेखही आई वडिलांच्या आठवणींमुळे हृद्य झाला आहे.

अतिसुंदर अनुभव! जुन्या आठवणी जाग्या केल्यात. आमच्या लहानपणी वर्षभर सकाळ ही कधी रेडिओवरच्या उठी उठी गोपाळा, किंवा कधी वडिलांच्या 'ऊठ घोड्या, झोपलास काय गाढवासारखा' ने होत असली, तरी नरकचतुर्दशीची पहाट ही सुब्बलक्ष्मींच्या 'उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरडध्वज'ने होत आलेली आहे. ह्या स्तोत्रात काहीतरी अंगभूत पावित्र्य, चैतन्य वगैरे वगैरे म्हणतात ते आहे. तुम्ही तो उदबत्तीचा धूर कायसा म्हणता तो न लावताही लावल्याचा अनुभव येतो हे स्तोत्र ऐकताना.

कालेजात असताना मित्रांसह बेंगलोर-म्हैसूर आणि मधेच वाट वाकडी करून तिरुपतीला गेलो होतो. खरं म्हणजे आमचा तसा काही जायचा इरादा नव्हता, पण आमचा डायवर (ओळखीतलाच होता) बालाजीचा निस्सीम भक्त. तो आमच्या मागे लागला की साउथला आलोच आहोत तर तिरुपतीला जाऊच यात. त्याच्या आग्रहाखातर तिथे गेलो. रात्री ११ ला पोहोचलो आणि लवकर दर्शन होण्याचे सगळे मार्ग (पैसे देऊन तिकीट वगैरे) बंद झाले होते. फुकटातली दर्शनाची रांग चालू होती. तसं रात्री तिथे आम्हाला रहायला पण कुठे खोल्या मिळेनात. म्हणून म्हटलं चला त्या रांगेत झोप काढू. दुसर्‍या दिवशी सकाळ/दुपार पर्यंत पोहोचू. मग मनाचा हिय्या करून 'गोविंदा गोsssविंदा' (त्यातलं sss कळायला तुम्हाला ती साउथची गोsssविंदा आरोळीच ऐकायला हवी) म्हणत रांगेत घुसलो. 'आठ तासांची निश्चिंती झाली बगुनाना' असं एक्मेकांना म्हणालो. पाहतो तर काय आश्चर्य! काही कारणाने त्यांनी आता सर्व प्रवेश बंद केले होते आणि आमच्या सकट आत असलेल्या बाकी सर्व लोकांना पटापट पळवत थेट बालाजीसमोर नेलं. अवघ्या २० एक मिनिटात दर्शन. आमचा डायवर मित्र रडायचाच बाकी होता. मग बाहेर पडून मंदिर - बिंदीर बघून, प्रसाद - ब्रिसाद घेऊन आम्ही आमच्या गाडीत परतलो तेव्हा दोन - बीन वाजले होते. बाहेर इतकी कडाक्याची थंडी होती की आम्ही गाडीतच खिडक्या बंद करून बसल्या बसल्या पेंगायला लागलो. साधारण चारच्या की कायशा सुमाराला त्या वेंकटेश सुप्रभातमाने जाग आली. आणि त्या अनुभवाचं वर्णन काय सांगू महाराजा! ४ दिवस प्रवासाने शिणलेले, कालच्या गर्दीत निरनिराळ्या घामांच्या संगतीत आलेले, गाडीतल्या काचबंद कुबटपणाने कुचंबून गेलेले आम्ही त्या स्तोत्राच्या नुसत्या ऐकण्यानेच अभ्यंग स्नान कर्तो आहोत की काय असा अनुभव प्राप्तकर्ते झालो. वेंकटेश स्तोत्र येती काना, तोचि दिवाळी दसरा. मग सकाळी आमच्या डायवर मित्राने गहिवरून त्याचे केस कुठेतरी दान केले आणि आम्ही परतलो.

अमा आणि अस्मिता, तुम्ही वर दिलेल्या स्तोत्रात मला काही श्लोक सापडले नाहीत. मजा म्हणजे त्या चालीत मध्येच खटाखट गियर बदलून वेगळं वृत्त सुरू होतं आणि त्या "कमलाकुच चूचुक कुङ्कमतो" सारख्या करामतीमुळे मला ती पुढची कडवी खूप भावतात. आत्ता स्पेशली मी ती कडवी शोधून काढली. कदाचित मूळ स्तोत्राचा भाग नसतील, तरी ती नसली की काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं, म्हणून खाली ती देत आहे,

कमलाकुचचूचुककुङ्कमतो
नियतारुणितातुलनीलतनो ।
कमलायतलोचनलोकपते
विजयीभव वेङ्कटशैलपते ॥

सचतुर्मुख-षण्मुख-पञ्चमुखे
प्रमुखा खिलदैवतमौलिमणे ।
शरणागत-वत्सल-सारनिधे
परिपालय मां वृषशैलपते ॥

अतिवेलतया तव दुर्विषहै
रनुवेलकृतैरपराधशतैः ।
भरितं त्वरितं वृषशैलपते
परया कृपया परिपाहि हरे ॥

अधिवेङ्कटशैलमुदारमते-
र्जनताभिमताधिकदानरतात् ।
परदेवतया गदितानिगमैः
कमलादयितान्न परङ्कलये ॥

कलवेणुरवावशगोपवधू
शतकोटिवृतात्स्मरकोटिसमात् ।
प्रतिपल्लविकाभिमतात्-सुखदात्
वसुदेवसुतान्न परङ्कलये ॥

अभिराम-गुणाकर-दाशरधे
जगदेक-धनुर्थर-धीरमते ।
रघुनायक-राम-रमेश-विभो
वरदो भव देवदयाजलधे ॥

अवनीतनया-कमनीयकरं
रजनीकर-चारुमुखाम्बुरुहम् ।
रजनीचर-राजतमोमिहिरं
महनीयमहं रघुराममये ॥

सुमुखं सुहृदं सुलभं सुखदं
स्वनुजं च सुकायम मोघशरम् ।
अपहाय रघूद्वय मन्यमहं
न कथञ्चन कञ्चन जातुभजे ॥

विनावेङ्कटेशं न नाथो न नाथः
सदावेङ्कटेशं स्मरामि स्मरामि ।
हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद
प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ ॥

अहं दूरदस्ते पदां भोजयुग्म
प्रणामेच्छया गत्य सेवां करोमि ।
सकृत्सेवया नित्य सेवाफलं त्वं
प्रयच्छ प्रयच्छ प्रभो वेङ्कटेश ॥

अज्ञानिना मया दोषा न शेषान्विहितान् हरे ।
क्षमस्व त्वं क्षमस्व त्वं शेषशैल शिखामणे ॥

वाह अमा,
एकदा पार्टी करुन रात्री मल्लू मैत्रिणीकडे रहायला गेले. सकाळी जाग आली ती एम. एस. च्या आवाजातल्या श्री वेकंटेश सुप्रभातम् ने. पार्टीचे डिटेल्स आठवत नाहीत पण ती सुंदर सकाळ जरूर आठवते. त्यानंतर कधी कधी आठवणीने ऐकते. आता हे वर्जनही आवडले.

वा अमा! माझेही आवडते स्तोत्र! सुब्बलक्ष्मीच्या आवाजाची जादू काही खासच आहे! त्यांच्या आवाजातले विष्णुसहस्त्र नामही किती छान वाटते!

र्रॉकेट्री बद्दल मम ! +१११

लेख तर सुंदर आहेत पण प्रतिसाद वाचतानाही अगदी अगदी झाले. हपा - छान आठवण!

सर्वांचे धन्यवाद.

डॉक्टराकडून सरळ हपिसातच आले आहे व काम करत आहे. अजून थोडी रेडिओ अ‍ॅक्टिविटी दिवस भर राहील. मग घरी जाउन कुत्र्याला बघायला हवे कारण सक्काळी अंधारातच घर सोडलेले. शक्ती परत आली की बघते परत. आज जाताना मुलुंड ते घाटकोपर परत ऐकले रॉकेट्रीतले. एकदम काम आणि क्वाएट वाटतं.

ह पा ते गिअर बदलण्याबद्दल अगदी अगदी. माझी एक थिअरी आहे. कोणत्याही सुखद अनुभवाचा एक मध्य /उच्च बिंदू असतो. ह्या रचनेत तो ते कमला कुच चुंचुक सुरू झाले की येतो. मग पुढे गाडी नीटच जाणार शिखाम्हणे परेन्त.

इडली पो डीत एक इडली फस्त झाली की हा मध्य बिंदु येतो. मग पुढे आपण फिल्टर कॉफी परेन्त जाणारच.

सुबुलक्ष्मीचें सुप्रभातम अनेक वर्षांपासूनचे फेव्ह आहे, AIWA चा वॉकमन आणि HMV च्या ऑडियो कॅसेट युगापासून ऐकतोय !! स्पष्ट आघात असलेले स्वर-शब्द आणि तरी अपूर्व वात्सल्याने ओतप्रोत - एकाचवेळी ! जैसे मख्खन भरी थाली में सोने की महीन सुईयाँ बरस रही हों !

प्युअर ब्लिस !

पुरुष कंठातले मात्र आधी ऐकले नव्हते, तुमच्या ह्या लेखामुळे आता ऐकीन, अनेक आभार _/\_

खूप म्हणजे खूपच सुंदर आहे हे स्तोत्र !! मी रोज पहाटे मॉर्निंग वॉक च्या वेळी सुब्बालक्ष्मी च्या आवाजातले नियमित ऐकते . खूप पवित्र आणि शांत वाटतं !! रोज ऐकून मला बऱ्यापैकी पाठ सुद्धा झालंय .

अमा, तुमच्यामुळे एका सुंदर स्तोत्राची ओळख झाली आणी मला एक स्वर्गीय अनुभव मिळाला. अस्मिताने तर त्यावर कळस चढवला. तुम्हा दोघींना मनापासून धन्यवाद. आणी हरचंद तुम्हाला सुध्दा धन्यवाद.

@ अमा,

... कमला कुच चुंचुक सुरू झाले की .... सुखद अनुभवाचा उच्च बिंदू

अगदी अगदी.

@ हरचंद पालव, तो भाग 'भावयामी' / भावरंगम आहे, गेयर बदलण्याची अनुभूती बरोब्बर टिपली तुम्ही Happy

शेवटी क्षमस्व त्वं म्हणतांना सुब्बुलक्ष्मी त्याला 'छमस्व त्वं' म्हणतात, कानाला फार गोड वाटतो त्यांचा द्रविड उच्चार.

शेवटच्या चार लायनी ऐकताना सुबुलक्ष्मी आंटी व त्यांची बहीण पूजा व पठण संपवून इडलीचा स्टँड उतरवुन सांबार गरम करून फोडणी द्यायच्या गडबडीत आहेत असे वाटते. हिर्‍याची चमकी त्यांना जशी शोभते. कोणालाच नाही शोभत.

अमा + १
गरम गरम इडली व सांबार डोळ्यासमोर आले.

घंटाशाला या तेलुगु गायकाने गायलेली भगवतगीता सुद्धा छान आहे. एकेक संस्कृत श्लोक आणी तेलुगु अनुवाद. संस्कृत उच्चार सुंदर आहेत.

हा लेख उघडून वाचला सुद्धा नसता कारण नाही भाविक,नाही गाण्यातले कळत.
पण . . . दोन वर्षांपूर्वी ओर्डर निघाली की ते श्री वेंकटेशा सुप्रभातम डाउनलोड करा. मी केले पहिले जे मिळेल ते. पुरुषी गायकाचे होते. ते नको होते मग अम्मा सुब्बूंचे मिळवले. जाहिराती नाहीत.
आता आदेश निघाला की 'आपण एवढे फिरतो तर एकदा बघूया ना बालाजी तिरुपतीचं काय प्रकरण आहे.' तर पुढच्या दीड महिन्याने बेत ठरला आहे.
पण . . . माहिती काढल्यावर समजले की तो बालाजी डोळ्यांवरची पट्टी काढणार नाही. आणि दर्शन होण्याची शक्यता नाही. मग ठरवले की तिरुमलाला जाऊन तर येऊ.
पण . . .ज्या दिवशीचा दर्शन पास मिळतो त्याच्या आदल्या दिवशीच तिरुमलाचे बसवाले वरती नेतात. फारच त्रांगडं आहे. रोज पंचवीस हजार भाविकांना दर्शन हे काय सोपे नाही.
बरेच यूट्यूब तपासले आणि Traveling Tadka channel वाल्या(https://youtube.com/c/TravelingTadka ) पुण्याच्या बाईंचे विडिओ आवडले. दर्शनाची आशा सोडली. मग तिरुमलाला काय आहे हे कळले Jeevan Jallosh channel video तून.

असो. तिरुमला यशस्वी झाले नाही तरी तिरुपतीच्या इडल्या खाऊन येऊ.

बाकी सर्व प्रतिसाद प्रसाद म्हणून वाचले. श्लोक इंग्रजी, संस्कृत छान. तर बालाजी इच्छुक भक्तांना पावो. आम्हाला नाही दिसला तरी चालेल.

(( अल्लिपिरी सोपान चढून जाणाऱ्यांवर हा बालाजी २४ तास प्रसन्न होतो हे कळलं.
पण . . एकटाच जाऊ शकेन. कुटुंबाचं काय?))

कमलाकुचचूचुककुङ्कमतो>>>
साठी धन्यवाद. Happy त्याशिवाय खरंच अपूर्ण होतं.
या ओळींपासून आधी मिळालेले चैतन्य व ऊर्जा काहीसे स्थिर व शांत होऊन आत्मविश्वासाच्या रूपाने मागे रेंगाळते असा अनुभव आहे. मुग्धप्रपातासारखे कोसळून झाले की जलाशयात विलीन होऊन आपलेच प्रतिबिंब कुठेतरी स्तब्ध झाल्याने आपल्याला दिसावे, व ते बघून 'तू जशी आहेस तशी संपूर्ण आहेस' असे जाणवून आश्वासक वाटायला लागावे असे काहीसे !!!
सर्व प्रतिसाद आवडले. रॉकेट्रीची लिंक आवडली. व्हिज्यूअल्सही अफाट आहेत.

अस्मिता, फारच सुंदर लिहिलं आहे. प्रपात आणि जलाशयाची उपमा अगदी चपखल. कोसळल्यानंतर जलाशयात त्याचे तरंग जसे थोडे शांत होतात, तसंच वृत्त आहे कमलाकुच.. ला.

ह.पा. तुझी पोस्टही भारी!

माझी एक थिअरी आहे. कोणत्याही सुखद अनुभवाचा एक मध्य /उच्च बिंदू असतो >>> असे मलाही बर्‍याच गाण्यांबद्दल वाटते.

सुंदर लेख! प्रतिसादही आवडले.
श्री वेंकटेशा सुप्रभातमचा मराठी अनुवाद या संकेत स्थळावर आहे…..
https://www.marathisrushti.com/articles/shre-venkatesh-suprabhatam-with-...
https://www.marathisrushti.com/articles/shre-venkatesh-suprabhatam-with-...

..... सुबुलक्ष्मी आंटी व त्यांची बहीण पूजा संपवून इडलीचा स्टँड उतरवुन सांबार गरम करून......

अमा, वाफेत लपून बसलेल्या शुभ्र इडल्या आणि सांबाराचे भांडे डोळ्यापुढे आले. सगळा जीव खाण्यात माझा बघा Happy

स्तोत्रात वेंकटेश्वराचे प्रिय पोपट कदलीफलपायसम मजेत खात असल्याचा उल्लेख तर आहेच पण माझ्यासारख्या अन्य भोजनरसिकांच्या लक्षात आणून द्यावे म्हणून ज्या-ज्या खाद्यान्नाचा उल्लेख आला आहे त्याची ही जंत्री :-

श्रीफल / नारळ
सुपारी
मध /मधु
दही / दधि
कदलिफलपायसम (केळीचे शिकरण हो)
लवंग
वेलदोडा
कापूर
सुगंधी तीर्थ

फ्लेवर प्रोफाइल बघा पदार्थांची !

त्या काळच्या माम्या भाच्यांसाठी गोडधोड म्हणजे कदलिफलपायसम करत होत्या तर!! कापूर,लवंग घालून कारण भाचे इकडे आले अन जेवून आजारी पडले असं व्हायला नको. नारळी भातातही तिकडे लवंग,कापूर घालतातच.
बाकी तिकडच्या तांदुळाच्या खिरीपुढे सर्व इतर पक्वान्ने नगण्य.

Pages