
अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
एक अंगावर लावा यचे औषध
एक अंगावर लावा यचे औषध मिळते. उघडून पाठीच्या कण्यावर एक लाइन टाकायची ती आपण हून पसरते. तीन महिने प्रोटेक्षन असते टिक्स पासून.
ते टिक्स झाल्यानंतर चे स्पॉट
ते टिक्स झाल्यानंतर चे स्पॉट ऑन
आता त्याच्या अंगावर एक बारीक पण टिक नाहीये
मी अगदी कानाच्या पडद्यापासून ते पावलांची गादी, ते ढुम्बी शेपटी सगळं अगदी बारकाईने चेक करतो
ते आता आम्ही कॅनाल ला जातो तिथ पावसाळ्यात डबकी झाली आहेत छोटी छोटी, तिथेच डास, गोचीड झाल्या असतील
कारण साध्य कुठल्याच भुभु सोबत खेळत नाहीये तो
ना पाळीव न भटक्या
त्याचं झालं की लागोपाठ दादू आजारी
त्यालाही सणसणीत ताप, जुलाब, डोकेदुखी
मला वाटलं याचं इन्फेक्शन त्याला झालं का काय
पण डॉ म्हणाले असं नाही वाटत आहे
हे व्हायरल आहे
आणि आता ओड्या परत पूर्वीसारखा टवटवीत व्हायला लागला आहे
टच वुड
बायको म्हणाली अजिबात इंस्टा वर फोटो टाकायचे नाहीत, नजर लागली आपल्या बाळाला
I agree with her.
I agree with her.
ओडू बरा झाला का? लौक्कर
ओडू बरा झाला का? लौक्कर ठणठणीत होऊन दंगामस्ती करायला लागूदे!
ओडीन फील बेटर बेबी !
ओडीन फील बेटर बेबी !
स्नो कसा आहे आता? जखम भरली का
बरा झाल्याचा ओड्याला इतका
बरा झाल्याचा ओड्याला इतका आनंद झालाय की काल अक्षरशः चेकाळून गेला होता, घरभर धावाधाव, नाचा नाच केली, सगळ्यांच्या अंगावर उड्या मारून चाटून झालं, इतकं की आवरेना अक्षरशः
त्याला कुल डाऊन व्हायला चक्क खोलीत बंद करावा लागला थोडा वेळेसाठी
डॉ ना फोन केला तर म्हणाले औषधे बंद करू नका इतक्यात
20 दिवसांचा कोर्स आहे तो पूर्ण करा
कारण फिव्हर परत येण्याची टेंडसी असते
फक्त आता दिवसातून एकच गोळी आणि एकदा सिरप
अरे वा ,ओडिन ची रिकव्हरी ची
अरे वा ,ओडिन ची रिकव्हरी ची बातमी वाचून छान वाटले . आता त्याच्या खोडयांच्या गोष्टी वाचता येतील परत . औषध घालण्यासाठी करण्याचे प्रयोग मी वाचत होते तुमचे . खरंच , अगदी लहान बाळाला जपतात तसे जपता तुम्ही सगळे !!
अरे वा ,ओडिन ची रिकव्हरी ची
अरे वा ,ओडिन ची रिकव्हरी ची बातमी वाचून छान वाटले .>>>> +१०००
बरं झालं. ओडीनला असेच उत्तम
बरं झालं. ओडीनला असेच उत्तम आरोग्य लाभो.
मस्त असाच मस्ती करू दे
मस्त असाच मस्ती करू दे
ओडीन बरा झाला वाचून छान वाटलं
ओडीन बरा झाला वाचून छान वाटलं. आज्जी आणि आईने दृष्ट काढली की नाही?
ओड्याचे किस्से नाही लिहीले
ओड्याचे किस्से नाही लिहीले बरेच दिवसात एकेक करत टाकतो
आजचा एक - पोहायला घेऊन गेलो होतो कॅनॉलवर. नेहमीप्रमाणे तो दणादण उड्या मारून पोहत होता. तिथे जवळच तारा टाकायचे काम सुरु होते ते कामगार कौतुकाने बघत होते. काहींनी तर फेसबुक लाईव्ह केला तर काहीनी घरी व्हिडीओ कॉल लावून दाखवला. एका कामगाराला इतकी सुरसुरी आली की तो पण उतरला पोहायला. आणि दोनच राऊंड पोहून माझ्यापाशी आला म्हणाला, भारी कुत्रा आहे राव, कसला स्टॅमिना आहे, मी दोन राऊंडमध्येच संपलो. पाण्याला प्रचंड फोर्स आहे. हा गेले पाऊण तास पोहतोच आहे.
म्हणलं हो त्याला पोहायचा स्टॅमिना जबराट आहे....
पण हेच रनिंगला जाम कंटाळा करतो....
म्हणजे आम्ही रनला जातो तेव्हा सुरुवातीला जाम उत्साहात असतो. लीश लावलेला नसतो त्यामुळे मस्त बागडत असतो. पळत पळत पुढे जातो, फुल्ल स्पीडने पळत मागे येतो. झाड दिसलं तर त्यावर शू करतो. परत पळत येऊन मला गाठतो. म्हणजे माझा एक किमी होईपर्यंत त्यांचे पुढे मागे करत दीड पावणेदोन तर नक्की होतात.
दुसऱ्या किमीला मग पळापळ कमी होते पण बागडत असतोच. याचा वास घे त्याचा वास घे वगैरे पण आता फार अंतर ठेवत नाही माझ्यात आणि त्याच्यात
तिसऱ्या किमी ला मात्र शिस्तीत माझ्या बाजूने दुडक्या चालीने येत राहतो. मी आपला पहिल्या किमी पासून सेम स्पीड धरुन धावत असतो आणि स्पीड जास्त नसतोच त्यामुळे तो थोडा फास्ट चालला तरी माझ्या रनींगच्या स्पीडला मॅच करतो...
चौथ्याला मात्र त्याची टंगळमंगळ सुरु होते. बरेचवेळा आम्ही कॅनॉल रोडवर लूपमध्ये पळतो. गाडी पासून साधारण एक दीड किमी पळत जातो परत उलटे येतो. परत जातो असे. मग अशावेळी त्याला माहीती असते मी यु टर्न घेणारे ते, तो अलीकडेच थांबून राहतो, मी जाऊन परत येईपर्यंत निंवात हॅहॅ करत जीभ काढून बसून राहतो, मी आलो की परत जॉईन.
मी म्हणतो त्याला मी तुला रनिंगला आणलंय, तु मला नाही - कळलं ना
पाचव्या किमी ला मग अगदीच ढेपाळलेला असतो. माझ्या मागून पाच दहा पावलांवरून डुलत डुलत येत राहतो. मी त्याला कितीही चिडवले हात तुझी, काय तुझा स्टॅमिना, मी दोन पायांनी तुझ्या चार पायापेक्षा फास्ट आहे तरीही दाद देत नाही.
आणि सगळ्यात वैताग म्हणजे घरी येऊन मस्त एक पॉवर नॅप घेतो आणि उठल्यावर गडी परत फ्रेश की चला बॉल खेळू, परत पळापळी करू
मग अशावेळी मी पुर्ण दुर्लक्ष करतो किंवा वरच्या खोलीत नेऊन ठेवतो...
मस्त
मस्त
हाहाहा खूपच रोचक वर्णन. आवडले
हाहाहा खूपच रोचक वर्णन. आवडले.
बापरे बराच स्टॅमीना आहे
बापरे बराच स्टॅमीना आहे ऑड्याचा पोहण्याचा...
अरे वा किती धमाल चालू आहे
अरे वा किती धमाल चालू आहे ओडू ची.
अहो पण त्याला एका वेळी ओव्हर एक्सर्ट करू नका. त्याच्या क्षमतेप्रमाणेच पळू द्या किंवा व्यायाम करुद्या मध्ये ब्रेक घेउद्या. रागवू नका काळजीनेच लिहीत आहे. कारण त्यांना समजत नाही.
हो हो रोज काय इतकं नाही
हो हो रोज काय इतकं नाही
5 किमी आठवड्यात 2 वेळा किंवा एकदाच
एरवी altrnate दिवस 3 किमी आणि 2 अडीच किमी इझी वॉक
पोहणे एकदाच आठवड्यात कारण नंतर त्यात कोरडा करणे फार व्यापाचे
पण इतका व्यायाम नाही करवला तर हैराण करतो
घरात धावत राहतो, उड्या मारतो
त्यांच्या अंगातली एनर्जी रिलीज नाही झाली तर ते अस्वस्थ होतात
त्याच्या निमित्ताने माझाही उलट नियमितपणे व्यायाम होतो
मला कंटाळा आला असला तरी तो ऐकत नाही मग झक मारत जावं लागतं
शेवटी आम्ही गेटला पाटी लावली
शेवटी आम्ही गेटला पाटी लावली
Guard Labrador on duty म्हणून
https://www.instagram.com/p/ChJ1rjoJXH7/?igshid=YmMyMTA2M2Y=
उठा उठा, प्रतिसादाची सीमा जवळ
उठा उठा, प्रतिसादाची सीमा जवळ आली...
नवीन धागा काढायची वेळ झाली...
टीप - उठा व सीमा ही कोणाची नावे समजू नयेत.
777 Charlie movie pahila ka??
777 Charlie movie pahila ka??? Mala odya ch disat hota sarkha
हो अगदी, मी लिहिलं होतं इथे
हो अगदी, मी लिहिलं होतं इथे त्याबद्दल
2000 झाले नवा धागा काढु का?
अंजली_१२, स्नोची जखम भरली
अंजली_१२, स्नोची जखम भरली आहे आता पूर्ण ! आणि पुन्हा बागडतोय ! ( गोष्ट जुनी झाली आता
)
तुम्ही विचारल्यानंतर मी प्र चि टाकायचा खटाटोप करत होते आणि त्यामुळे आज- उद्या करु असं चाललं होतं. ते प्र चि प्रकरण झेपत नाही मला. शेवटी नवीन धागा निघण्यापूर्वी मनावर घ्यावंच म्हटलं. बघते अजूनही जमतंय का ..
आस्थेने खुशाली विचारणाऱ्यां सगळ्या मायबोलीकरांचे आभार !
(No subject)
(No subject)
आणि हा पूर्ण बरा झाल्यावरचा मागच्या १-२ आठवडयातला आहे. ( हुश्श! जमवलं एकदाचं
)
बापरे! किती भयंकर जखमा आहेत
बापरे! किती भयंकर जखमा आहेत या! स्नो बरा झालेला पाहून खूप बरं वाटलं.
अरे बापरे
अरे बापरे
बऱ्याच होत्या जखमा.लवकर बरं वाटुदे.
आई ग! भरपूर जखमा झाल्या
आई ग! भरपूर जखमा झाल्या होत्या.लेकराला लवकर बरे वाटू दे.
<<2000 झाले नवा धागा काढु का?
<<2000 झाले नवा धागा काढु का?>>
ये भी कोई पुछनेकी बात है ??
चंद्रा, खूपच जोरात चावलाय तो दुसरा भूभू. बिचारा स्नो.. तो आता दुसर्या भूभूना बिचकत तर नाही ना ?
आई ग! भरपूर जखमा झाल्या
आई ग! भरपूर जखमा झाल्या होत्या.लेकराला लवकर बरे वाटू दे>>> हो ना
बघवल्या नाहीत त्या जखमा. किती कळवळला असेल बिचारा.
कोणते ब्रीड आहे स्नो चे?
बापरे कसला बेकार लागलं आहे
बापरे कसला बेकार लागलं आहे
खरेच डोळा वाचलाय थोडक्यात
आता बरा झालाय बघून खूप छान वाटलं
असाच मस्त राहू दे
Pages