चातुर्मासाच्या कथा - चतुर मा'सी' सह (नागपंचमी)

Submitted by Barcelona on 12 August, 2021 - 19:09

चातुर्मासाच्या कथा हा आपल्या लोकपरंपरेचा वारसा आहे. त्यातील लयवेल्हाळपण, भाबडेपण आकर्षक आहे आणि काळ बदलला तरी परिकथेसारख्या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे त्या जात आहेत. ह्या कथा टिकायला हव्या. त्या नव्या स्वरूपात लिहीण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही पण जरा मजेशीर प्रश्न विचारून कुणा समर्थ लेखकाला 'क्या किजिएगा इस स्टोरी का?' ह्याचे उत्तर द्यायला भाग पाडायचे इतपतच धाग्याचा उद्देश. धार्मिक भावना दुखावण्याचा, खिल्ली उडवण्याचा अजिबात उद्देश नाही. जरा सजगपणे वाचू इतकंच!!
मूळ कथा विनाकंस, सी ताईची कॉमेंट्री कंसात.
_______________________

आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता, त्याच्या शेतांत एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणं नांगर घेऊन शेतांत गेला.
(कथा नाय घडली तर आधीच नागपंचमीचा दिवस कसा, नुसतं पंचमी होती लिहा हो… उद्या ‘गांधीजयंतीचा दिवस होता. करमचंद काळजीने येरझाऱ्या घालत होते आणि सुईणीने “तुम्हाला गांधीजी झाले” वर्दी दिली’ अशी कथा लिहाल… )

नांगरतां नांगरतां काय झालं? वारूळांत जीं नागांची नागकुळां होतीं, त्यांना नांगराचा फाळ लागला. लौकरच तीं मेलीं.
(अर्रर्र .. नांगरणे करताना असे होत असावं. निसर्ग नि मानवातील झगडा!!!)

कांहीं वेळानं नागीण आली, आपलं वारूळ पाहूं लागली, तो तिथं वारूळ नाहीं आणि पिलंही नाहींत.
(मोठे अर्रर्र. निदान क्लोजर मिळण्यापुरतं पिलांचे कलेवर दिसायला हवे होते. हा नांगर आहे की सुमित मिक्सर… पार भुकटी केली काय???)

इकडे तिकडे पाहूं लागली, तेव्हां नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनांत आलं, ह्याच्या नांगरानं माझीं पिलं मेलीं. तो रोष मनांत ठेवला.
(फार सी.आय.डी पाहिल्याचा परिणाम असावा - मीन्स अँड मोटीव्ह दोन्ही सापडलं की तिला!!)

शेतकर्‍याचा निर्वंश करावा असं मनांत आणलं.फोफावतच शेतकर्‍याच्या घरी गेली. मुलांबाळांना, लेकीसुनांना, शेतकर्‍याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजणं मरून पडली.
(लैच जबराट विष की …. इथे सॉंग सिच्यूएशन - "बिडी जलाई ले"…नागिणीमाते, गेले सगळे!! आता काढ जरा विडी काडी, खा जरा दम. लैच पिडलं ह्या बेण्याने)

पुढं तिला असं समजलं कीं, ह्यांची एक मुलगी परगांवीं आहे, तिला जाऊन दंशा करावा म्हणून निघाली. ज्या गांवी मुलगीं दिली होती त्या ठिकाणी आली, तों त्या घरीं बाईनं पाटावर नागनागीण, नऊ नागकुळं काढलीं आहेत, त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाणे, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनांत आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे.
(रेपरेशन्स!! आज राजकारणात रेपरेशन्स बद्दल बोलतात. त्याचा उगम तर हिथे की ओ … )

इतक्यांत नागीण उभी राहिली. तिला म्हणूं लागली, “बाई बाई तूं कोण आहेत? तुझी आईबापं कुठं आहेत?”
( Sad बाईला तू काय करते, काय जेवली ऐवजी थेट आई-बाप विचारणं म्हणजे....)

इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहाते तों प्रत्यक्ष नागीण दृष्टीस पडली. बाई बिचारी भिऊं लागली. नागीण म्हणाली. ” भिऊं नको, घाबरूं नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे.” तिनं आपली सर्व हकीकत सांगितली, ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटलं. ती मनांत म्हणाली, ‘ही आपल्याला इतक्या भक्तीनें पुजते आहे, आपलं मत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनांत आणलं आहे हें चांगलं नाहीं.” असं म्हणून सांगितली, तिनं ती ऐकली, वाईट वाटलं.
(अरे इससे अच्छा तो मैं "बदलापूर" मूव्ही देख लेती… ये नागिन है या वरूण धवन?? माझ्या पूर्वजांनी ज्यांनी बदलापूर नाही पाहिला त्यांना यू डिडन्ट मिस मच इन लाईफ, यू हॅड नागीण! )

तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला.तिनं तिला अमृत दिलं, ते घेऊन त्याच पावलीं ती माहेरीं आली. सगळ्या माणसांच्या तोंडांत अमृत घातलं. सगळीं माणसं जिवंत झालीं. सगळ्यांना आनंद झाला.
(व्हिडियो गेम आहे काय आयुष्य म्हणजे… अमुक ढमुक बाटली ओतली की लोकं जिवंत होतात. )

बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हां बापानं विचारलं, ” हें व्रत कसं करावं?” मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटीं सांगितलं कीं, ” इतकं कांहीं झालं नाहीं तर निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीचे दिवशी जमीन खणूं नये. भाज्या चिरूं नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊं नये. नागोबाला नमस्कार करावा.” असं सांगितलं, तेव्हापासून तो नागपंचमी पाळूं लागला.
(पुरणाचे दिंड करावे हे कुणी सांगितलं? जिने ज्याने सांगितलं त्यांचे खरे उपकार!)

जशी नागीण तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

(बदला ही भावना काढून टाकणे सोपे नसते. विशेषतः ज्याने अन्याय केला त्याला काही गम-पस्तावा नसेल तर जास्तच अवघड असते. पण तरी जमेल तसं, तेव्हा माफ करावे कारण आपल्यावर अन्याय केला तरी इतर कुणाचे आयुष्य घडवले ही असेल आणि आपल्यावरच अन्याय मुद्दाम केला नसेल, अजाणता ही घडला असेल. बाकी निसर्ग-मानव झगडा चालू #मॉडर्नचातुर्मास)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक कथा आहे बहुतेक नागपंचमीचीच आहे,ती राजाची की कुणाची तरी सून माहेरपणाला नागाच्या बिळात आलेली असते(आत कशी शिरली ते माहीत नाही)आणि नागीण बाळंत होत असते तर हिच्या हातात दिवा देते,बिळात खूप अंधार असतो म्हणून (सून तिथं प्रेझेंट नसताना नागीण दिवा कसा पेटवत असेल माहीत नाही),ती सून पिल्लांची वळवळ बघून घाबरते आणि तिच्या हातून दिवा पडतो तो पिलांच्या शेपटीवर,त्यांच्या शेपट्या जळतात,मग नागीण चिडते आणि नवऱ्याला सांगून त्या सुनेला तिच्या सासरी पोचवते (पुन्हा बिळातून बाहेर कशी पडली माहीत नाही),पिल्लं मोठी झाल्यावर तुटक्या शेपटीबद्दल विचारतात मग नागीण सगळी स्टोरी सांगते आणि मग पिल्लं बदला घयायला जातात त्या सुनेकडे(बहुतेक सेल्फी पण घेतला असेल नागिणीने,नैतर पिल्लं डायरेक्ट कशी पोचली असतील) पुढे काय ते नीट आठवत नाही

येस येस, ती नावं ती सून ठेवते
माझे लांडोबा पुंडोबा जिथे कुठे असतील तिथे सुखात असुदे असं म्हणून प्रार्थना करून लाह्या वाहते
मग बदला कॅन्सल
Moral सेम वर सी ताई ने सांगितले तेच

सामो Rofl ... उ बो, बरोबर अंदाज. माझ्या आयडीला १२ वे वर्ष लागल्याने बार्सिलोना. अर्थात कुणी बार देत असेल तर त्यालाही ना नाही Light 1
आदू - Happy आठवणीने धागा वर काढल्याबद्दल आभार. नागपंचमीच्या शुभेच्छा.

Pages