चातुर्मासाच्या कथा - चतुर मा'सी' सह (नागपंचमी)

Submitted by Barcelona on 12 August, 2021 - 19:09

चातुर्मासाच्या कथा हा आपल्या लोकपरंपरेचा वारसा आहे. त्यातील लयवेल्हाळपण, भाबडेपण आकर्षक आहे आणि काळ बदलला तरी परिकथेसारख्या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे त्या जात आहेत. ह्या कथा टिकायला हव्या. त्या नव्या स्वरूपात लिहीण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही पण जरा मजेशीर प्रश्न विचारून कुणा समर्थ लेखकाला 'क्या किजिएगा इस स्टोरी का?' ह्याचे उत्तर द्यायला भाग पाडायचे इतपतच धाग्याचा उद्देश. धार्मिक भावना दुखावण्याचा, खिल्ली उडवण्याचा अजिबात उद्देश नाही. जरा सजगपणे वाचू इतकंच!!
मूळ कथा विनाकंस, सी ताईची कॉमेंट्री कंसात.
_______________________

आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता, त्याच्या शेतांत एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणं नांगर घेऊन शेतांत गेला.
(कथा नाय घडली तर आधीच नागपंचमीचा दिवस कसा, नुसतं पंचमी होती लिहा हो… उद्या ‘गांधीजयंतीचा दिवस होता. करमचंद काळजीने येरझाऱ्या घालत होते आणि सुईणीने “तुम्हाला गांधीजी झाले” वर्दी दिली’ अशी कथा लिहाल… )

नांगरतां नांगरतां काय झालं? वारूळांत जीं नागांची नागकुळां होतीं, त्यांना नांगराचा फाळ लागला. लौकरच तीं मेलीं.
(अर्रर्र .. नांगरणे करताना असे होत असावं. निसर्ग नि मानवातील झगडा!!!)

कांहीं वेळानं नागीण आली, आपलं वारूळ पाहूं लागली, तो तिथं वारूळ नाहीं आणि पिलंही नाहींत.
(मोठे अर्रर्र. निदान क्लोजर मिळण्यापुरतं पिलांचे कलेवर दिसायला हवे होते. हा नांगर आहे की सुमित मिक्सर… पार भुकटी केली काय???)

इकडे तिकडे पाहूं लागली, तेव्हां नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनांत आलं, ह्याच्या नांगरानं माझीं पिलं मेलीं. तो रोष मनांत ठेवला.
(फार सी.आय.डी पाहिल्याचा परिणाम असावा - मीन्स अँड मोटीव्ह दोन्ही सापडलं की तिला!!)

शेतकर्‍याचा निर्वंश करावा असं मनांत आणलं.फोफावतच शेतकर्‍याच्या घरी गेली. मुलांबाळांना, लेकीसुनांना, शेतकर्‍याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजणं मरून पडली.
(लैच जबराट विष की …. इथे सॉंग सिच्यूएशन - "बिडी जलाई ले"…नागिणीमाते, गेले सगळे!! आता काढ जरा विडी काडी, खा जरा दम. लैच पिडलं ह्या बेण्याने)

पुढं तिला असं समजलं कीं, ह्यांची एक मुलगी परगांवीं आहे, तिला जाऊन दंशा करावा म्हणून निघाली. ज्या गांवी मुलगीं दिली होती त्या ठिकाणी आली, तों त्या घरीं बाईनं पाटावर नागनागीण, नऊ नागकुळं काढलीं आहेत, त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाणे, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनांत आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे.
(रेपरेशन्स!! आज राजकारणात रेपरेशन्स बद्दल बोलतात. त्याचा उगम तर हिथे की ओ … )

इतक्यांत नागीण उभी राहिली. तिला म्हणूं लागली, “बाई बाई तूं कोण आहेत? तुझी आईबापं कुठं आहेत?”
( Sad बाईला तू काय करते, काय जेवली ऐवजी थेट आई-बाप विचारणं म्हणजे....)

इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहाते तों प्रत्यक्ष नागीण दृष्टीस पडली. बाई बिचारी भिऊं लागली. नागीण म्हणाली. ” भिऊं नको, घाबरूं नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे.” तिनं आपली सर्व हकीकत सांगितली, ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटलं. ती मनांत म्हणाली, ‘ही आपल्याला इतक्या भक्तीनें पुजते आहे, आपलं मत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनांत आणलं आहे हें चांगलं नाहीं.” असं म्हणून सांगितली, तिनं ती ऐकली, वाईट वाटलं.
(अरे इससे अच्छा तो मैं "बदलापूर" मूव्ही देख लेती… ये नागिन है या वरूण धवन?? माझ्या पूर्वजांनी ज्यांनी बदलापूर नाही पाहिला त्यांना यू डिडन्ट मिस मच इन लाईफ, यू हॅड नागीण! )

तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला.तिनं तिला अमृत दिलं, ते घेऊन त्याच पावलीं ती माहेरीं आली. सगळ्या माणसांच्या तोंडांत अमृत घातलं. सगळीं माणसं जिवंत झालीं. सगळ्यांना आनंद झाला.
(व्हिडियो गेम आहे काय आयुष्य म्हणजे… अमुक ढमुक बाटली ओतली की लोकं जिवंत होतात. )

बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हां बापानं विचारलं, ” हें व्रत कसं करावं?” मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटीं सांगितलं कीं, ” इतकं कांहीं झालं नाहीं तर निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीचे दिवशी जमीन खणूं नये. भाज्या चिरूं नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊं नये. नागोबाला नमस्कार करावा.” असं सांगितलं, तेव्हापासून तो नागपंचमी पाळूं लागला.
(पुरणाचे दिंड करावे हे कुणी सांगितलं? जिने ज्याने सांगितलं त्यांचे खरे उपकार!)

जशी नागीण तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

(बदला ही भावना काढून टाकणे सोपे नसते. विशेषतः ज्याने अन्याय केला त्याला काही गम-पस्तावा नसेल तर जास्तच अवघड असते. पण तरी जमेल तसं, तेव्हा माफ करावे कारण आपल्यावर अन्याय केला तरी इतर कुणाचे आयुष्य घडवले ही असेल आणि आपल्यावरच अन्याय मुद्दाम केला नसेल, अजाणता ही घडला असेल. बाकी निसर्ग-मानव झगडा चालू #मॉडर्नचातुर्मास)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला गांधीजी झाले Lol
धमाल Lol , हे पाच झोके घेण्याचं कुणी सांगितले की मग ?
मस्तच. चतुर मा सी नावही फार चपखल.. Happy
धनुडी ला एक पुपो !
---
मूळकथा कुठे आहेत का ऑनलाईन ?

पाच झोके पण लागतात खरं Lol ऑनलाईन वेबदुनिया वर सापडतात किंवा काही वर्तमानपत्रे ही देत आहेत त्या त्या दिवशी.

माझ्याकडे कुणीतरी फॉर्वर्ड केलेले एक अख्खं चातुर्मास कथांचे पीडीएफ आले !!!!!!!! कथा फॉर्वर्डच करणार असतील तर निदान विचार करून कराव्या. का वाचतो ह्या कथा? अमुक केलं की तमुक होतं अशी कर्म आणि फलाची इतकी लिनीयर रिलेशनशिप शिकवतात..... की एकदम परिकथाच वाटतात.

नागिणी ने तिच्या मुलीचा पत्ता काढून आणि तीने त्या मुलीच्या घरी घरी जाई पर्यन्त , तसेच त्या मुलीने अमृत घेऊन घरी येऊ पर्यन्त चा जो वेळ आहे तो वर त्या शेतकर्याची फॅमिली तशीच मरून होती, म्हणजे मुलीला माहित असून ही त्यांचा अंतिम संस्कार ही झाला नव्हता HAHAHAH

ती मुलगी शेतकऱ्याची आहे हे नागिणीला माहिती आसते तरी तिला विचारते ......
सी, (आय डी) कसं सुचतं हो तुम्हाला Happy

ओ आमचे पातोळे पण घाला त्यात...

बदले की आग मे जलती नागीन दुश्मन के घर जहर भरे दात लेके पहुंची.... आणि तिथे लाहीभोजन बघुन सगळे विसरली.....

उद्या ‘गांधीजयंतीचा दिवस होता. करमचंद काळजीने येरझाऱ्या घालत होते>>>> पहिल्याच वाक्यात सिक्सर Lol सी मला तुझ्या कहाण्यांमुळे रोजची तिथी कळतेय.

आज आम्ही कापणे भाजणे या सर्व क्रिया केल्या.
पुरण दिंड किंवा कडबु मेन लंच म्हणून अजिबात खाववत नाहीत(तसेही साईड आयटम म्हणून पण खाववत नाहीत)
त्यावेळी ही गोष्ट आठवली Happy

>>आज आम्ही कापणे भाजणे या सर्व क्रिया केल्या.

शाब्ब्ब्ब्बास!! तुम्हाला "प्रोग्रेसिव्ह" हे सर्टफुकट बहाल करण्यात येत आहे. Happy

धन्यवाद सर्वांना. Lol व्यत्यय, तुम्हालाही घ्या एखादं सर्टफुकट. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय हे ब्बरोब्बर स्पॉट तर करता आले Wink .

धनुडी ला एक पुपो !>>>> थॅंक्यु गं अस्मे. खावीशी वाटतच होती, इतकी चर्चा झाल्यावर Happy

गांधीजयंतीचा दिवस होता. करमचंद काळजीने येरझाऱ्या घालत होते आणि सुईणीने “तुम्हाला गांधीजी झाले” वर्दी दिली’ अशी कथा लिहाल >> Lol

कथा अपूर्ण आहे. आणि पंचमी चुकीच्या अर्थाने रूढ झालेले आहे.

जेव्हा नागीणीला कळलं शेतकऱ्याची मुलगी नागाला पूजते तिने विचारलं का?
तेव्हा शेतकऱ्याच्या मुलीने सांगितले की आमच्या गावी एक मोठा नाग आहे. तो न्यायनिवाडा करतो. तोच आमचा पंच आहे. आम्ही त्याला पुजतो.

आपण शेतकऱ्याच्या घरात सगळ्यांना मारलं हे चूक की बरोबर हे नागिणीला कळे ना. शेतकऱ्याची मुलगी आपल्या माहेरचे सगळे गेल्याने शोकाकुल झाली होती. मग न्याय निवाड्या साठी त्यांनी त्या नागाकडे जायचे ठरवले.
दोघी गावाजवळच्या मोठ्या वारुळाकडे गेल्या. आणि पंच महाराज आमचा न्यायनिवाडा करा म्हणुन वारूळावरची पुंगी जोराने फुंकली.

वारुळातून नाग मोठ्या दिमाखाने बाहेर आला. आपण पंच असल्याचा त्याला मोठा अभिमान होता.
अमरीश पुरी सारख्या भारदस्त आवाजात म्हणाला
" नाsssग पंच मी! सांगा काय केलात राडा, पंच मी, करेन तुमचा निवाडा!"
नागिणीने घडले ते सांगितले. शेतकऱ्याची मुलगी रडत म्हणाली "पंच महाराज, माझे बाबा मुद्दाम कुणा प्राण्याला नाही मारणार हो, कोंबडा, बकराही स्वतः नाही मारत. हा निव्वळ अपघात आहे!"

नागोबा: "नाग पंच मी! मला सांग मी तुझ्या घरच्यांना जिवंत केलं तर तू खुष होशील का? तुझा निवाडा होईल का?

मुलगी म्हणाली "पंच महाराज, माझ्या घरचे जिवंत झाले तर मला आनंद होईल तरी दुःख मात्र राहील आणि नीट निवडा झाला नाही असे वाटेल."

नागोबा: "नाग पंच मी! माझा निवाडा तुला मंजूर नाही?"

मुलगी: " तसे नाही महाराज, पण या नागिणीची लेकरं ही हकनाक गेलीत ना. त्यांना पण जिवंत करता आलं तर दोघींना न्याय मिळेल. निवाडा पूर्ण होईल."

नागोबा: "नाsssग पंच मी! खुष झाला!
जा मुली जा! जा नागिणी जा! जगून घ्या आपले आयुष्य.... आपल्या सग्या सोयऱ्यांबरोबर!
हा अमृताचा घडा घेऊन जा आणि जिवंत करा त्यांना जा!"

असे बोलून शेपटीने त्याने एक घडा वारुळा समोर ठेवला आणि "नाग पंच मी!" म्हणत परत वारुळात गेला.

"आजचा दिवस किती आनंदाचा! काय बरं म्हणावं आजच्या दिवसाला?" अमृताचा घडा उचलताना मुलगी आनंदाने चित्कारली.

त्या आवाजने डिस्टर्ब झाल्याने नागोबा चिडून ओरडले "नाssग, पंच मी! जा की आता गुमान!"

दोघींना वाटले "नाग पंच मी" हेच आजच्या दिवसाला म्हणावं असं नागोबा सांगताहेत. आणि त्या दिवसाला "नाग पंच मी" म्हणायचे ठरवले. पुढे त्या पंच मी चे लोकांना पंचमी वाटून तो दिवस पंचमीच्या दिवशी नागपंचमी म्हणुन साजरा केला जाऊ लागला.

कथा नाय घडली तर आधीच नागपंचमीचा दिवस कसा >>> नागपंचमीचा दिवस होता मेक्स सेन्स. म्हणूनच तर शेतकर्‍याची मुलगी नागाची पूजा करत असेल ना? नाहीतर काय 'उगाच ही पंचमी मोकळी ठेवायला नको' म्हणून नागाची पूजा करत होती का काय ती? Proud

ती मुलगी शेतकऱ्याची आहे हे नागिणीला माहिती आसते तरी तिला विचारते ...... >>> हे मात्र खरंच गमतीशीर आहे. तिलाच चावायला गेली आणि शेतकर्‍याची मुलगी कोण हे माहितीच नव्हतं? मग काय रँडम चावा? की आधी आधार कार्ड वगैरे मागायचा विचार होता नागिणीचा? Wink

उद्या ‘गांधीजयंतीचा दिवस होता. करमचंद काळजीने येरझाऱ्या घालत होते आणि सुईणीने “तुम्हाला गांधीजी झाले” वर्दी दिली’ अशी कथा लिहाल…
>>
Lol

नागाच्या पिल्लाले का ग्ग खवळीलं ... हे गाणे तेव्हा असते तर शेतकर्‍याकडून मुळातच अशी चूक झाली नसती

बाकी ते अमृत येतेय या आशेवर ते मुडदे तसेच पडून होते का? मेरे करन अर्जुन आयेंगे म्हणत Proud

अरे स्मार्ट नाग आणि स्मार्ट अमृत यावर कुणाला प्रश्न पडले नाही. ते मुडदे आणि अंत्यसंस्कारावर पडले होय! स्मार्ट नाग क्षणात एकीकडून दुसरीकडे जातो आणि स्मार्ट मुलगी क्षणात दुसरीकडून एकीकडे Wink येते आणि घालते ते अमृत मलम घशात. सिंपल.
स्मार्ट डोअर बेल, स्मार्ट पॉटी सीट वरुन हे स्मार्ट लोण पाळीव प्राण्यांत येईल. तेव्हा स्मार्ट नागाचे पेटंट काढून ठेवा बरं.

या कथेवर अत्यंत विनोदी आऊटलुक्स वर आलेले आहेत.
कालच कपाटातून नारिंगी कथांचं पुस्तक काढून ठेवलंय Happy
मूळ कथा वाचतेच.

Lol
अरेरेरे नागांंवर पंच मारून साजरी करतात का नाग'पंच'मी ! जे जे पंच मारतील त्यांना 'बेलंची नागीण निघाली' ऐकताना लाईट किंवा इंटरनेट जाईल हा शाप लागेल. जर तिच्याकडे अमृत होतं तर तिने स्वतःच्या नाग कुटुंंबाला जिवंत का नाही केलं ? सुमित मिक्सरमधे प्यूरे झाली म्हणून का ? प्यूरे वर अमृत वर्क होत नाही का ?

(बदला ही भावना काढून टाकणे सोपे नसते. विशेषतः ज्याने अन्याय केला त्याला काही गम-पस्तावा नसेल तर जास्तच अवघड असते. पण तरी जमेल तसं, तेव्हा माफ करावे कारण आपल्यावर अन्याय केला तरी इतर कुणाचे आयुष्य घडवले ही असेल आणि आपल्यावरच अन्याय मुद्दाम केला नसेल, अजाणता ही घडला असेल. बाकी निसर्ग-मानव झगडा चालू #मॉडर्नचातुर्मास) >> आवडलं

जर तिच्याकडे अमृत होतं तर तिने स्वतःच्या नाग कुटुंंबाला जिवंत का नाही केलं ......हायला अस्मिता क्या सही बोली रे तू! इतक्या वर्षांत कसे सुचले नाही?

हा पा,विचार छान आहे.आचरणात आणायला फार कठीण!

हा पा,विचार छान आहे.आचरणात आणायला फार कठीण! >> हो ना! मी तर मला चावणाऱ्या डासालाही मारतो. डासास कुठे ठाऊक असतं की तो/ती अमुक एक व्यक्तीला त्रास व्हावा म्हणून चावतो/चावते आहे? सेंटिअंट बीईंगस ना माफ करणं तर फारच अवघड आहे.

Lol अस्मे खरंच की अमृत होतं तर स्वतः च्या पिल्लांनाच जिवंत करायचं ना. काय लॉजिक लावतात काय माहित. बाकी मानवच्या कथेत नाग एवढ्या वेळा पंच मी पंच मी म्हणत होता मला वाटलं आता मुलगी किंवा नागिण कोणीतरी देणारच पंच याला Lol

Pages