
अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
(No subject)
(No subject)
हा आमचा हॅरी. सहा महिन्याचा
हा आमचा हॅरी. सहा महिन्याचा आहे. German Shorthaired Pointer ब्रिड आहे.

नवऱ्याच मला हुंडा गिफ्ट !
आधी मी फार बीचकले नसले तरीही हॅरी आणि मी एकमेकांपासून अंतर राखून होतो. तो माझ्यावर भुंकल्यापासून तर दोन ध्रुवांवर आम्ही दोघे अशी सिच्युएशन.
एकदा तर मी तरी राहीन किंवा हा तरी अशी स्थिती. ते ही या धाग्यावर नियमितपणे हजेरी लावत असूनही.
शेवटी नीट बसून विचार केला, तो मुका प्राणी आहे , पुढाकार आपणच घ्यायला हवा वगैरे स्वतःच स्वतचं ब्रेन स्टॉम्र्मिंग केलं आणि पुढे पाऊल टाकले.
हॅरीनेही हात मिळवला आणि त्याने माझ्या बाजूला बसून झोप घेण्यापर्यंत प्रगती केली...
क्युट आहे हॅरी.
क्युट आहे हॅरी.
अरे वा हॅरी
अरे वा हॅरी
मायबोली वर स्वागत
जाई, कौतुक आहे तुमचेही
मोठे पाऊल उचललेत
अरे वा, शाबास जाई हॅरी
अरे वा, शाबास जाई
हॅरी क्यूट आणि फ्रेन्डली दिसतोय.
हार्दिक अभिनंदन, स्वीटी
हार्दिक अभिनंदन, स्वीटी तर्फे एक टेल वॅग.
नांदा सौख्यभरे. आनंद ओसंडुन वाहे.
हॅरीतर्फे सर्वांना थँकयू .
हॅरीतर्फे सर्वांना थँकयू .
हॅरीच्या डोक्यावरची गोल गोल
हॅरीच्या डोक्यावरची गोल गोल बिंदी कसली क्यूट आहे! खूप आवडला हॅरी.
मी सध्या इंस्टा वर
मी सध्या इंस्टा वर rabbitfoot821 या भुभ्याला फॉलो करतोय
कसला गोंडस लॅब आहे
अगदी दृष्ट लागेल इतका देखणा
अमा दुसर्या फोटो मधे मला माउ
अमा दुसर्या फोटो मधे मला माउ एकदम बाप्पा सारखी वाटली LOL
हॅरी एकदम प्रेमळ दिसतो आहे..
<<शेवटी नीट बसून विचार केला,
<<शेवटी नीट बसून विचार केला, तो मुका प्राणी आहे , पुढाकार आपणच घ्यायला हवा वगैरे स्वतःच स्वतचं ब्रेन स्टॉम्र्मिंग केलं आणि पुढे पाऊल टाकले >>
खूप छान...
सगळ्यांनी असा विचार केला तर खूप प्राण्यांचे आयुष्य सुकर होईल.
माउईला मोठे बॉल खेळायला भयंकर
माउईला मोठे बॉल खेळायला भयंकर आवडते आहे सध्या. मोठा म्हणजे चांगला फुटभर व्यासाचा. हलका बॉल असेल तर मस्त व्हॉलिबॉल खेळल्यासारखे उडी मारून उडवतो नाकाने किंवा पंजाने. पण खेळता खेळता इतकी मस्ती येते एकदम, की त्या बॉल वरच उड्या मारायला लागतो. किंवा मग तोंडात धरता येतायत का बघतो. एन्ड रिजल्ट असा की या एका आठवड्यात ३ बॉल फोडले आहेत!!
२ बॉल तर काल एकाच दिवसात फोडून फडकी झाली त्यांची पार 


पहिला फुटल्यावर मला अंदाज आला होता तेव्हा ६ चे पॅक आणले होते. आता ४ उरलेत!
पण जितका वेळ ( काही मिनिटे?) खेळतो तो वेळ त्याला बघताना फुल्ल पैसा वसूल असतो ! चेहरा पहा वरच्या फोटोत किती खूष ( प्राउड!) आहे
कसला गोड दिसतोय तो
कसला गोड दिसतोय तो
हसतोय असं वाटतं.
बाकी वरच्या फोटोंमधले प्राणी पण क्युट.
हाहा जाम क्युट आहे
हाहा जाम क्युट आहे
कसलं क्युट
कसलं क्युट
आनंद ओसंडून वाहतोय चेहऱ्यावर
किति क्युट दिसतोय माउई... मला
किति क्युट दिसतोय माउई... मला नेहमीच माउई खोडकर लाडोबा वाटतो
Neighbours च्या गाडीमध्ये
Neighbours च्या गाडीमध्ये खाली कुठेतरी मांजराचे छोटे पिल्लू होते, ते म्हणतात की त्यांनी गाडी 100 km चालवत आणली, इतका वेळ ते कसे आणि कुठे होते गाडी खाली माहित नाही पण घरी आल्यावर ते मोठ्या आवाजात ओरडत होते so मी check केल्यावर मला हे समजले. नंतर 1 तास प्रयत्न करून त्याला बाहेर काढण्यात यश आले. शेजारचे त्याला घरात घेण्यास तयार नसल्याने रात्रभर त्याला माझ्याकडे ठेवून घेतलं पण माझ्याकडे आधीच एक cat आणि एक dog आहे so मला त्याला ठेवून घेता येणार नाही. साधारण दीड महिन्याच्या असावे असे वाटतंय. काय करावं त्याच ते कळत नाहीय. Pls suggest
आज ४ महिन्याचे झालो आम्ही ...
आज ४ महिन्याचे झालो आम्ही ....
आज खास या धाग्याचे आभार
आज खास या धाग्याचे आभार मानण्यासाठी लिहितेय. मला प्राण्यांची खूप भीती वाटते, त्यात लहानपणी कुत्रे चावून इंजेक्शन्स घ्यायला लागल्याने जास्तच. पण येथे नियमीत वाचून गेल्या आठवड्यात दारी आलेल्या कुत्रीला खायला घालू शकले, पावसाने कुडकुडली होती बिचारी, बसायला पोते दिले आणि खायला घातले तर पटापट चट्टामट्टा केला. खुप समाधान वाटले.
माझ्या मनातील भीतीवर काही अंशी मात करून एका गरजूची मदत करु शकले ते इथल्या पोस्ट्स वाचूनच. सगळ्या बाळांना आणि त्यांच्या पालकांना अनेक धन्यवाद!
नीलाक्षी मॅडम : प्रतिसाद ऑफ द
नीलाक्षी मॅडम : प्रतिसाद ऑफ द डे अवार्ड आपल्यास देण्यात येत आहे व माझ्या तर्फे खण नारळ. तुमच्या खात्यात गुड कर्मा जमा झालेले आहे.
गेल्या आठ दहा दिवसात मी लिटरली पसे पसे भरून पेडिग्री कावळे कुत्रे मांजरी ह्यांना खायला देत आहे. जस्ट त्यांचे भिजलेले कुडकुड लेले जीव वाचवायला. पक्षी तर इतके गारठलेले आहेत की काव काव करायचे ही त्राण नाही त्यांच्यात. आज उन्हे पड ली आहेत म्हणजे सर्व बाहेर
भटकतील व मनसोक्त उडतील.
जास्त देउ शकत नाही पेडिग्रीच पण माझे पेडिग्रीचे बिल बिग बास्केट वर माझ्या घरच्या ग्रोसरीच्या बिला पेक्षा जास्त येत आहे. नो मॅटर.
त्यात लॉबीत पाउसाने जमीन घसरडी झाल्याने सर्व काका काकू आमच्या फिरायच्या भागात चकरा मारत असतात व अगदी बारकी ट्रीटो दिली कोणा कुत्र्यास दिली तरी भडकतात माझ्या नेहमीच्या कुत्रा बालकांना हे आजिबात कळत नाही मग
" इथं नको तिथं जाउ आडोश्याला उभं राहु. का? बघत्यात करावे लागते.
माझ्या फिरायच्या ब्यागेत डब्बीत हळद पूड, एक गार्बेज बॅग तीन चार पसे पेडिग्री. एका कुत्र्यास एक पसा पुरतो एकावेळी, ग्लुकोजबिस्किटाचे पुडे ट्रीट्स व टिशू गार्बेज बॅग असतात. माझा फोन व घरच्या किल्ल्या पण.
माउई साहेब गोड आहेतच. लव्ह हिम.
माझ्या मनातील भीतीवर काही
माझ्या मनातील भीतीवर काही अंशी मात करून एका गरजूची मदत करु शकले ते इथल्या पोस्ट्स वाचूनच. सगळ्या बाळांना आणि त्यांच्या पालकांना अनेक धन्यवाद!>>>
कसलं मस्त वाटलं हे वाचून
अगदीच टचिंग मोमेंट
खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन निलाक्षी
मामी - तुमचेही एफर्ट्स आणि माया खूप सही आहे
हॅट्स ऑफ तुम्हालाही
इथे एका मोठ्या मॉल पार्किंग
माझ्या मनातील भीतीवर काही अंशी मात करून एका गरजूची मदत करु शकले ते इथल्या पोस्ट्स वाचूनच. सगळ्या बाळांना आणि त्यांच्या पालकांना अनेक धन्यवाद!>>>>>>>>>>>> मस्तच. सध्या खूप पोस्टस वाचण्यात येतात. पावसामुळे आडोशाला आलेल्या कुत्र्यांना हाकलू नका वगैरे वगैरे. तुम्ही खूप छान काम केलंय.
इथे एका मोठ्या मॉल पार्किंग च्या मागे खूप भटक्या मांजरी आहेत. माझ्या माऊंचेच खाणे आम्ही तिथे नेऊन खायला देतो बर्याचदा. शक्य अस्तं तर आणल्या असत्या घरी पण खूप जास्त आहेत. एवढ्यांचा सांभाळ शक्य नाही.
निलाक्षी, फार छान !
निलाक्षी, फार छान !



आमचं ऑष्कु बाळ बघता बघता सहा महिन्याचं झालं !
पहिला हेअरकट , पहिली आंघोळ, पहिली स्पा ट्रिटम्नेट ..सगळं झालं.. फार मस्तं वय आहे हे.. रोज नवे काहीतरी शिकतो रोज नवे असते लिहायला, किती लिहिले तरी कमी !
ऑस्करला भटकंती फार आवडते, सारखं बाहेर जायचं असतं.. पार्क्स मधे नेतेच वॉकला पण इतरही शक्य तिथे सगळीकडे नेते त्याला.. ग्रोसरी, मॉल्स, अगदी फार्मसी मधेही परवानगी आहे डॉग्जना !
सदर्न कॅलिफोर्नियात कडक उन्हाळा असल्यामुळे संध्याकाळचे वॉक आम्ही रात्री साडे आठला पोस्टपोन केलय, पण याच्या डोक्यातल्या घडाळ्याला कोण काय करणार
साधारण साडेसहा पावणेसातला दारापाशी बसून बडबड करायला लागतो , मग माझा नवरा त्याला कडेवरून बाहेर नेऊन एक फेरी मारून मेलबॉक्स पर्यन्त नेऊन आणतो , मग आमच्या बॅकयार्डमधे सावली असते तिथे प्ले टाइम
॓



साडे आठला आमच्या कम्युनिटी मधले बरेच पेट पेरेन्ट्स वॉकला बाहेर पडतात आणि एका ठरलेल्या ठिकाणी लॉन वर सगळी भुभु बाळं जमा होतात , काय आनंदी, थेरेप्युटिक वातावरण असतं म्हणून सांगु !
अनेक साइझचे, वेगवेगळ्या वयाचे /रंगाचे अनेक डॉग्ज !
जर्मन शेपर्ड, चिवावा, लॅब्राडुड्ल, गोल्ड्न रिट्रिव्हर, गोल्डब डुड्ल, हस्की, माल्टिस, माल्टिपु, पुड्ल , कॅव्हॅशॉन आणि आमचा कॅव्हॅपु सगळी गँग एकत्रं धमाल करते, लोक अक्षर्शः कार थांबवून त्यांची स्ट्रेसबस्टर अॅक्टिव्हीटिज बघायला येतात !
इन्स्टाग्रॅमवर स्टोरीज पोस्ट करते मी बरेचदा !
क्युट दिसतंय हेअरकट केलेलं
क्युट दिसतंय हेअरकट केलेलं स्वच्छ आवरलेलं बाळ!!
सर्वांचे आभार! मला माहीत आहे
सर्वांचे आभार! मला माहीत आहे की खुप लोकं प्राण्यांसाठी खुप काही करत आहेत / असतात. मला त्याचा छोटा भाग बनता आले याचे समाधान.
दिपांजली ऑश्कु मस्त दिस्तोय! सगळ्या प्राण्यांच्या फोटोत एक गोष्ट कॉमन जाणवली - एकतर प्रचंड एनर्जी आणि कमालीची उत्सुकता!
अमा तुमचे काम भारीच!
भूभूंचे गेट टुगेदर मस्त आहे.
भूभूंचे गेट टुगेदर मस्त आहे.
(अॅड्मिन स्मायली यादी वाढवु शकाल का?)
https://twitter.com
https://twitter.com/StrictlyChristo/status/1549690727424147456
त्या व्हिडिओत कसले मस्त हेड
त्या व्हिडिओत कसले मस्त हेड टिल्ट मारतो आहे तो भुभू
फार क्यूट!
भरत, cutest video आहे. आमचं
भरत, cutest video आहे. आमचं डॉग बाळ सुध्दा ठराविक शब्दांना असंच react करतं त्यामुळे घरी सगळ्यांनी तो व्हिडिओ परत परत पाहिला.
अमा, तुमच्या सगळ्या पोस्ट किती गोड असतात. तुम्हाला आणि तुमच्या भुब्या आणि माऊना एक tight hug आणि पप्पी.
Pages