MBBS नंतर पुढील उच्च शिक्षणाबद्दल माहिती आणि सल्ला हवा आहे.

Submitted by दक्षिणा on 13 June, 2019 - 04:51

माझ्या एका मित्राची मुलगी सध्या इयत्ता बारावीत आहे, पुढे तिला एम बी बी एस करायचे आहे. post graduation करून न्युरो सर्जन व्हायचे आहे. त्यांचा सध्याचा प्लान असा आहे की तीने एम बी बी एस जर्मनी/ इंग्लंड युरोपीय देश मध्ये करावे, आणि पी जी अमेरिका/कॅनडा इथे करावे. त्यासाठी पुण्यात अशा कोणत्या संस्था आहेत ज्या अशा मुलांना बाहेर जायला सर्व मार्गदर्शन करतात? मला त्यांचे संपर्क हवे आहेत किंवा त्या कशा शोधू ते मला कुणी सांगू शकेल का? शिवाय मला खालील माहिती हवी आहे.

* एम बी बी एस करण्यासाठी जर्मनी/ इंग्लंड युरोपीय देश यातील कोणता पर्याय उत्तम आहे?
* डिग्री चा एकूण कालावधी किती असेल?
* त्या संपूर्ण कालावधी साठी आर्थिक तजवीज किती असावी?
* अशा प्रकारे दुसऱ्या देशात उच्च शिक्षणासाठी जायला पुण्यात कोणत्या संस्था मार्गदर्शन करत असतील तर त्यांचा संपर्क.
* कोणत्याही संस्थेतर्फे न जाता वैयक्तिकरीत्या आपल्याला अर्ज किंवा प्रवेश घेणे सोपे आहे का? असेल तर तो कसा घेऊ शकतो?

वरील सेम माहिती पी जी साठी पण हवी आहे.

कृपया जाणकार लोकांनी मार्गदर्शन करावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीकरांच्या कोणी जवळच्याने किंवा ओळखीच्याने भारताबाहेर एमबीबीएस केले आहे का?
करत आहेत चीन मधे, तीन वर्ष झाले, पहिल वर्ष चीनमधे आणी मागचे २ वर्षे इथुनच.

हे म्हणजे 3 वर्षांपूर्वी धागा काढला ते, ते आता काय करतात ?

पुलंच्या कथानायिकेसारखे नको, एसटी ला अपघात घडवणारी कथानायिका कुठेतरी दुसरीकडे गेली असणार आणि बाकीचे लोक पंचनामा करत बसलेत.

म्हणून सहज विचारले.

मेडिकलला मिळाले नाही म्हणून आमच्यावेळी जे रडले होते, त्यांना नंतर फार फार सुंदर देश फिरायला मिळाले

आणि डॉकटर झालेले सरकारी दवाखान्यात अन झोपडपट्टीत सेवा करत बसलेत

प्रांतावार भाषा असतात कि भाषावार प्रांत हा प्रश्न मला अनेक दिवस सतावतोय. भारतात अत्यंत दुर्मिळ अश्या प्रदेशात कुठली भाषा बोलली जात असावी ह्यावर मी करतेय संशोधन. कारण आपल्या देशाची फाळणी हि झालीच आहे भाषेमुळे. साहित्याचा मुलभूत हक्क, उर्दू कविता आणि श्वसनरोग हा एकत्रित विषय घेऊन माझी सध्या डॉक्टरेटची तयारी चालू आहे. प्रसिद्ध कवी संपत भूसनाळे हे मला मातीमोल मार्गदर्शन करत आहे. प्रस्तुत लेख हा भाषेची खिल्ली उडवणारा असल्यामुळे मला "तिडीक" जे म्हणतात मराठीत, ती भरली आहे. तिडीक कुठे भरते? तर फक्त डोक्यात. मी आता एक पुस्तक लिहिते आहे - सांकेतिक भाषेत आवाजाची गती - ह्या नावाचं. विहंगम पुस्तक असेल ते. येते आता.

Pages