टॕटू -- २

Submitted by रंगिला on 17 May, 2022 - 04:16

त्यातल्या त्यात उपलब्ध टी शर्ट मधून मी माझाच एक ट्रेंडी टी शर्ट कपाटामधून काढला. एका हातात एक फुलांचा बुके आणि दुसर्या हातात एक गिफ्ट पॅक घेऊन मी तिच्या दरवाज्याची बेल वाजवली. तिने काही क्षणात दरवाजा उघडला. बुके आनि गिफ्टची बॅग दोन्ही हातात असून मी दोन्ही हात पसरले. खरच अपेक्षा नव्हती की ती येऊन बिलगेल. पण आताच्या काळात हग हे फ्रेंडली असतात या पेक्षा त्यात जीव गुंतवायचा नसतो म्हणुन मी दोन्ही हाताचा वापर करुन तिला जवळ ओढायचे टाळले.

काही क्षणातच ती दुर झाली आणि माझ स्वागत करत मला बसायला सुचवल. मी ही ज्याला कोच म्हणता येईल लांबलचक आसनावर बसण्यापुर्वी बुके तिच्या हातात दिला. निशीगंधाच्या फुलांचा वास घेऊन तिने मला तो आवडला असल्याचे सुचीत केले. दुसरी गिफ्ट असलेली कॅरी बॅग मी तिच्या हातात सोपवली आणि तिला गिफ्ट आवडतात का पहात राहिलो.

एक होतो कॅफे कॉफी डे च गिफ्ट कुपन, सोबत होत तिच्या टॅटु पार्लरच गिफ्ट कुपन आणि सोबत होता कॅटबरी चॉकलेटचा गिफ्ट पॅक. हे सगळ पाहून तिची कळी खुलली. तिनही गोष्टी तिच्या आवडीच्या होत्या.

"तुला वेलकम ड्रिंक म्हणुन काय आवडेल ? मग मी तुला माझ घर दाखवते."

मी काहीच बोललो नाही. नुसत सुचक हसलो. यावर ती म्हणाली "चहा हवा असेल तर चहा, कॉफी हवी असेल तर कॉफी आणि एखादे कोल्ड ड्रिंक हवे असेल तर ते पण आहे फ्रीज मधे. " यावर मी म्हणालो "त्या वॉश बेसीन वरच्या कपाटात एखादा मॉउथ वॉश असेल ना ?"

" हम्म्म भलताच फास्ट आहेस . आहे आहे त्यात मॉउथ वॉश आहे. घे तुला लगेच हवा असेल तर " . मी लगेच उठलो आणि मॉउथ वॉश ने तोंड धुतले. शेजारच्या नॅपकिन ला तोंड पुसले. ती शांत पणे कोच वर बसलेली होती.

मी शेजारी येऊन बसलो आणि म्हणालो, गिफ्ट आवडली ना ? यावर ती म्हणाली

"कॅफे कॉफी डे च गिफ्ट कुपन ठिक आहे पण टॅटु पार्लरच गिफ्ट कुपन जरा एक्स्पेनसीव्ह आहे. मला कुणाला अस खर्चात टाकायला नाही आवडत. तुला माहित आहे ना मी आर जे म्हणजे रेडीओ जॉकी आहे. मला पुरेसा पगार मिळतो आपले शौक पुरे करायला. "

मी म्हणालो "फार काही एक्स्पेनसीव्ह नाही. फार विचार करु नकोस. जिथे पाहिजे तिथे टॅटु कर आणि जमल तर मला दाखव. "

"रंगा फारच प्रेमात पडला आहेस टॅटु च्या ? " श्रीरंग माझ नाव. सर्व परिचीत मला रंगा म्हणतात आणि आज तिने ते उच्चारुन जवळीक साधली. यावर म्हणलो "टॅटुच्या तर प्रेमात मी पडलो आहेच आणि सोबत टॅटुवालीच्या सुध्दा."

हो ..... असे म्हणत तिने अशी कृती केली आणि मी तिच्या आणखी जवळ सरकलो. एक पुसटसा कीस घेऊन मी तिची प्रतिक्रीया पाहू लागलो. ती अगदी शांत होती. जशी माझ्या प्रेमात अनेक वर्ष असावी. " बाकी तु मला टॅटू पार्लरला नेलस आणि इकडे बोलावलस मी जाम खुष आहे. "

प्रतिक्रीया येण्याची मी वाट पहात होतो.

यावर ती म्हणाली चल घर दाखवते म्हणुन मी तिचा हात हातात घेऊन तिचे सुसज्ज किचन, डबल बेड वाली बेड रुम आणि तितकाच उत्कटतेने सजविलेला तिचा हॉल पहात राहिलो.

स्मिता ने इकडे इकटीने रहायला बरे सोडले तुला ? मी विचारले

"ममा तिच्या त्रासात व्यापली आहे. तिला हे माझ एकट रहाण आणि तुझ्या सारख्या पुरुषांना बोलावण अजिबात पसंत नाही. पण मीच तिला एक दिवस सगळी मुव्हिंग ऑउट ही वेब सेरीज दाखवली आणि ती ही समजून चुकली. गेल्या वर्षभरात ती एकडे आलेली नाही ना मला लेक्चर मारलय."

तुला खुप स्लो जायला आवडत का रंगा ? मी म्हणालो नाही गोईंग वुईथ फ्लो बस.....

ये म्हणुन तिने मला साद घातली आणि पुढे जे जे घडले ते एकमेकांच्या डोळ्यांच्या साक्षीने आणि मौन सहमतीने .

तिने माझ्या केसाळ छातीवर आता डोके ठेवले आणि एकमेकांच्या बाहूपाशात आम्ही पडून राहिलो.

मधेच ती उठून म्हणाली आता काय आवडेल ? यावर मी सिगरेटचा कश मारुन धुर सोडायची अ‍ॅक्शन केली. मला वाटले आता बहुतेक तिला आवडणार नाही. पण गेले अनेक दिवस मी धक्के पचवतोय त्यात आणखी एक धक्का म्हणजे ती एक पातळ सिगारेट असलेला पॅक, अ‍ॅश ट्रे आणि लायटर जवळच्या कपाटातून काढून समोर ठेऊन म्हणाली पेटव.

ते सगळ बाजूला करत मी तिला जवळ घेतले आणि "म्हणालो परत लगेच पेटवू ?" तिने एक हलकी थापट मारली.

"जे काम करायला इथे तु मला बोलावले आहेस ते तर मी केलेच नाही. "

यावर तिने विचारले ते काय ? तिच्या उघडा दंडावरुन हात फिरवत मी म्हणले सगळे टॅटु कुठे पाहिलेत ?

यावर ती म्हणाली, " ते पाहिल्याशिवाय तु मला सोडणार आहेस ?"

"पण एकाच भेटीत सगळे नीट दिसले नाहीत तर ?"

भिती तीच आहे रंगा, आज तुला हे अ‍ॅट्राक्शन आहे. उद्या काय ?

"ओके म्हणजे हा वन नाईट सॉरी वन डे स्टॅड नव्हता तर मी म्हणालो."

"एकमेकांच्या मधले आकर्षण टिकवायला अनेक गोष्टी आहेत शिल्पा ... हळू हळू एक्स्प्लोर करु" मी हसत म्हणालो.

जायच्या तयारीत आहेत रंगा ?

नाही ग मी आज मला न दिसलेले सगळे टॅटू वेळ देऊन पहाणार आहे. नुसते पहाणार नाही

मग ? तिने विचारले

त्या टॅटूला काही चव असते का ते ही पहाणार आहे,

चल नालायक ... अस म्हणुन शिल्पा चक्क लाजली.

तु लाजलीस की अस काळजाच पाणी होतय ....

बास बास, जे करायच ते कर पण न बोलता कर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

दोन्ही भाग वाचले, छान शैली आहे.
पण कथा कुठे जातेय हे कळत नाही. तुर्तास फक्त रसभरीत वर्णन वाचणे चालू आहे Happy

बास बास, जे करायच ते कर पण न बोलता कर>>
कथेला लैच स्कोप हाये बगा..
उसाचा मळा, टॅक्टरची ट्राली...

हाताला बसलेल्या सिगारेट च्या चटक्याने मी भानावर आलो
बघतो तर ती टॅटू वाली मुलगी केव्हाच आपले बिल चुकते करून निघून गेली होती

म्हणजे इतका वेळ आपण स्वप्न बघत होतो होय असे म्हणत मी माझ्या जुन्यापुराण्या स्कुटर ला किक मारली, वाटेत थोडी भाजी घेतली, बायकोला एक छानसा गजरा आणि पिल्लू साठी एक दिव्याची कार
Happy

आशुचँप

माझ्या स्वप्नांना सुरुंग लावायचाच असे ठरवले आहे का ? स्वप्नरंजनाचा तरी आनंद घेऊ दे