चेक बाउन्स झाल्यावर काय ऍक्शन घ्यावी?
कधी तरी कोणाला मदत करणे आपल्या इतक्या गळ्याशी येते कि विचार करून बुद्धी भ्रष्ट होते. माझे सामाजिक कार्यकर्ते आहेत. खुप मनापासून काम करतात. त्यांनी एका मॅगसेसे व पद्मश्री विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या महिला (नाव इथे सांगत नाही ) त्यांच्या एका प्रोजेक्ट ला भेट दिली. बाईंचे काम अवाक करण्यासारखे आहे. त्याच कॉन्टॅक्ट मधून एके दिवशी त्यांनी त्यांच्या एका प्रोजेक्ट साठी पैशांची मदत मागितली आणि (बरच काही सांगितले). आम्ही इकडून तिकडून घेऊन त्यांना १२ लाखांची मदत केली व त्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांची वागणूक बदलली. पैसे देताना त्यांच्या समाजकार्याच्या औरामुळे डोळे दिपून गेले होते. आपण एवढ्या मोठ्या व्यक्ती च्या कामात येत आहे हि भावना छान वाटत होती. पण काही महिन्यातच कळून चुकले कि आपण खूप मोठी चूक करून बसलो आहोत. कसा बसा त्यांच्या कडून PDC पदरात पडून घेतला तो पण त्यांनी त्यांच्या अससिस्टंट्च्या नावाने दिला होता. अपेक्षेप्रमाणे तो बाउन्स हि झाला. आता पुढे काय करावे हे कळतच नाहीए. डोकं सुन्न झालाय. मॅगसेसे आणि पद्मश्री घेतलेली व्यक्ती इतकी घसरू शकते ह्यावर विश्वास बसत नाही. दरम्यान पैसे घेतल्यापासून बाईनी गेले ६-७महिने फोन बंद ठेवलाय. त्यांचा असिस्टंटच बोलतो तो हि त्याच्या मूड व मर्जी प्रमाणे. कोणी काही मदत करू शकेल का ह्या केस मध्ये. काय लीगल ऍक्शन घ्यावी.
असं समोरच्याला कल्पना न देता,
असं समोरच्याला कल्पना न देता, त्या/तिचा कन्सेंट न घेता कॉल रेकॉर्ड करता येतो का?
>>>>
आपल्यासोबत होणारे कॉल रेकॉर्ड करू शकतो ना.
प्रत्यक्ष भेट घेऊन त्यावेळचा विडिओसुद्धा रेकॉर्ड करू शकतो. पुरावा तयार करायला.
अशा कॉलला कुणी विचारत नाही
अशा कॉलला कुणी विचारत नाही
चेक बाऊन्स झाला हा स्वतःच इतका मोठा पुरावा आहे
आपल्याला आलेला कॉल (incoming
आपल्याला आलेला कॉल (incoming call) record करायला काहीच बंधने असू नयेत, so called privacy issue च्या नावाने.
जर एखाद्याला इतकाच privacy issue असेल, स्वतःचा आवाज रेकॉर्ड होऊ नये असे वाटत असेल तर त्याने / तिने इतरांना कॉल करूच नये!
चेक बाऊन्स झाला हा स्वतःच
चेक बाऊन्स झाला हा स्वतःच इतका मोठा पुरावा आहे
>>>>
पण तो कश्यासाठी दिलेला हे महत्वाचे नाही का?
कॉल रेकॉर्डिंग
कॉल रेकॉर्डिंग तांत्रिकदृष्ट्या १.( कायद्याने समोरच्या व्यक्तिला तसा संदेश देऊन) करता येते, होते. तसेच.२. आगावू समज न देताही कॉल रेकॉर्ड करता येतो. हे बेकायदा आहे.
पुढचा मुद्दा तो कोर्टात पुरावा होतो का? नाही.
तो पुरावा धरला जात नाही.
चेक न वठणे गुन्हाच आहे. कुणाला दिला होता ती संस्था असेल तर संस्था जबाबदार. कर्मचारी त्यांचं ते पाहून घेतील.
व्यक्तिला दिला नसणार. चेकवर संस्थेचे अधिकृत पदाधिकारी सही करतात.
चेक न वठणे गुन्हाच आहे.
चेक न वठणे गुन्हाच आहे.
>>>
पण ते पैसे परतफेडीचे होते हे सिद्ध करता आले नाही तर फक्त चेक बाऊन्सचा फाईन लागेल ना. पैसे तर मिळणार नाहीत. कारण समोरची पार्टीच असा दावा करू शकते की आम्हीच तो मदत म्हणून दिला होता. अश्या केसमध्ये काय करावे?
कसली मदत करणार होते ?
कसली मदत करणार होते ?
सगळ्यांचे धन्यवाद! 12लाख फक्त
सगळ्यांचे धन्यवाद! 12लाख फक्त बाई मगसेसे आणि पद्मश्री आहेत म्हणुन दिले होते करण त्यांची गरज होती चेक बौन्स झल्यावर त्यंच्या सन्स्थेला विसिट दिली असता सगळा परिसर लॉक होता, ज्या संस्थेच्या कामने त्याना ओळख दिली ते सगळं बंद होते. दरम्यान ओळखीतून एक वकील नोटीस पाठवण्यासाठी गाठले. त्यानी 2दिवसात नोटीस पाठवायचया बोलिवर काहीहि काम सुरु करण्याच्या आधी गूगल पे ने 5k फी घेतली. त्यानंतर 15दिवस टोलवातोलवी केली. आपण चुकीच्या माणसाच्या हातात केस व पैसे दिल्याचे समजल्यावर धावतपळत मुळ गाव नाशिक गाठले व तिकडून नोटीस पाठवली. आता कल्याण्चे वकील बुवा पैसे परत करायलाच नकार देत आहेत. वरुन मलाच धमकी देत आहेत की त्यनी पैसे घेतले हे सिद्ध करुन दाखव. मलाच हे काय चालले आहे ते कळतच नाही. अशी कोन्ती वकिलांची असोसिअशन आहे का जिथे तक्रार करता येईल. ही लूट आहे. भीक नको कुत्र आवर अशी अवस्था झालीये
Pages