चेक बाउन्स झाल्यावर काय करावे

Submitted by सीमि on 9 May, 2022 - 08:37

चेक बाउन्स झाल्यावर काय ऍक्शन घ्यावी?

कधी तरी कोणाला मदत करणे आपल्या इतक्या गळ्याशी येते कि विचार करून बुद्धी भ्रष्ट होते. माझे सामाजिक कार्यकर्ते आहेत. खुप मनापासून काम करतात. त्यांनी एका मॅगसेसे व पद्मश्री विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या महिला (नाव इथे सांगत नाही ) त्यांच्या एका प्रोजेक्ट ला भेट दिली. बाईंचे काम अवाक करण्यासारखे आहे. त्याच कॉन्टॅक्ट मधून एके दिवशी त्यांनी त्यांच्या एका प्रोजेक्ट साठी पैशांची मदत मागितली आणि (बरच काही सांगितले). आम्ही इकडून तिकडून घेऊन त्यांना १२ लाखांची मदत केली व त्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांची वागणूक बदलली. पैसे देताना त्यांच्या समाजकार्याच्या औरामुळे डोळे दिपून गेले होते. आपण एवढ्या मोठ्या व्यक्ती च्या कामात येत आहे हि भावना छान वाटत होती. पण काही महिन्यातच कळून चुकले कि आपण खूप मोठी चूक करून बसलो आहोत. कसा बसा त्यांच्या कडून PDC पदरात पडून घेतला तो पण त्यांनी त्यांच्या अससिस्टंट्च्या नावाने दिला होता. अपेक्षेप्रमाणे तो बाउन्स हि झाला. आता पुढे काय करावे हे कळतच नाहीए. डोकं सुन्न झालाय. मॅगसेसे आणि पद्मश्री घेतलेली व्यक्ती इतकी घसरू शकते ह्यावर विश्वास बसत नाही. दरम्यान पैसे घेतल्यापासून बाईनी गेले ६-७महिने फोन बंद ठेवलाय. त्यांचा असिस्टंटच बोलतो तो हि त्याच्या मूड व मर्जी प्रमाणे. कोणी काही मदत करू शकेल का ह्या केस मध्ये. काय लीगल ऍक्शन घ्यावी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आम्ही इकडून तिकडून घेऊन त्यांना १२ लाखांची मदत केली व त्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांची वागणूक बदलली. >>>>मदत........ परत बोलीवर केली होती ???

१२ लाख फार मोठी रक्कम आहे. पोलिस केस करा त्वरीत. पण फायदा किती होईल कल्पना नाही. ईथले अनुभवी जाणकार लोकं सांगतीलच.

बाकी या प्रकारचे कैक अनुभव आहेत. वाटल्यास वेगळा धागा काढूया. ईथे तुमच्या मदतीचा धाग्यात नको.
पण एक आहे. जे काही अक्कलखाती घालवले ते तसे जाणार आहेत वा जाऊ शकतात याची कल्पना होती. त्यामुळे ते घालवताना मनाची आधीच तयारी होती की अमुकतमुक रक्कम गेली आणि परत आलीच तर आपली मनशांती तर जाणार नाही.

तुम्ही मात्र एवढी मोठी रक्कम काहीही लिखापढी न करता द्यायला नको होती. की काही कागदपत्रे केली आहेत?

मिश्र

बाईंनी मदत मागितली व यांनी केली. पोस्ट डेटेड चेक पदरात पाडुन घेतले म्हणजे पैसे परत करायच्या बोलीवर मदत केली होती हे स्पष्ट आहे.

मदतीच्या वेळेस अमुक दिवसात परत देणार वगैरे लिहिलेला काही कायदेशीर कागद केला असेल तर आशा आहे. नाहीतर पैसे गेले. अशा वेळी कागद करायचे देणारा विसरतो असा अनुभव आहे.

काहीच लिखापढी नसेल तर कायदेशीर मदत मिळणार नाही.
सोशल मिडियावर नावासकट लिहुन बदनामी करु अशी धमकी देता येईल. बाई हुशार असतील तर अशी धमकी येऊ शकते त्यानाही माहित असणार. त्या विरोधातही त्यानी तयारी ठेवलेली असणार. उद्या तुमच्यावरच बदनामीची केस ठोकतील. पैसे दिल्याची रितसर पावती व अकाऊन्टवर नोन्द असेल तरच सोशल मिडिया गाठा.

बाऊन्स झाला तर सिक्सर मारा. वकीलांना विचारून पोलीस कंप्लेंट किंवा कोर्टात केस टाका बिनधास्त.

चेक बाऊन्स झाले तर कायद्याची तरतूद आहे
A cheque bounce is an offence under Section 138 of the Negotiable Instruments Act, 1881 (“Act”) punishable with a fine which can extend to twice the amount of the cheque or imprisonment for a term not more than two years or both
https://cleartax.in/s/consequences-cheque-bounce-notice#:~:text=A%20cheq....

नक्की काय व्यवहार झाला होता त्याची काही माहिती दिलेली नाही. केवळ चेक बाउंस झाला ह्या गुन्ह्याबद्दल त्यांच्या असिस्टंटला कदाचित शिक्षा होऊ शकते. रेव्ह्यू ह्यांचा प्रतिसाद त्या दृष्टीने माहितीपूर्ण आहे. समाजकार्यासाठी पर्सनल लोन देणं (जर तसे असेल तर) हा प्रकार पहिल्यांदाच ऐकतो आहे. एकतर लोक सरळ देणगी देतात किंवा संस्था बँकेकडून कर्ज घेतात. त्यांनी जर परत करण्याच्या बोलीवर पैसे मागितले असतील तर तिथेच काळंबेरं आहे असं समजायला हवं होतं. बाई नक्कीच निर्ढावलेल्या दिसत आहेत. अशी वृत्ती असून सुद्धा जर मॅगेसेसे, पद्मश्री मिळवत असतील तर लोकांना आणि व्यवस्थेला मॅनेज करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे. तर व्यक्तिगत स्तरावर सोशल मीडियावर बदनामी करू वगैरे गोष्टींनी काही होईलसं वाटत नाही. वकिलाचा सल्ला घेणेच योग्य होईल. अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची असते: how much of your good money are you willing to throw after the bad money ? हे बारा लाख परत मिळवायच्या नादात आणखी किती पैसे (वकील वगैरे साठी) खर्च करण्याची तयारी आहे ह्याची सुद्धा एक मर्यादा आखून घ्यायला हवी.

फक्त चेक बाउन्स झालेला पुरेसं नाही. तो चेक कशासाठी दिला होता? वस्तू/सेवेची किंमत म्हणून, परतफेड म्हणून हेही आहे. हे सिद्ध करता येणार आहे का?

तसंच तक्रार नोंदवायला कालावधीही ठरवून दिलेला आहे. तो सरला असेल तर कोर्टात केस करावी लागेल.

चतुर नसलेल्या लोकांनी काय करावं! :ड

समाजकार्यासाठी पर्सनल लोन देणं (जर तसे असेल तर) हा प्रकार पहिल्यांदाच ऐकतो आहे. एकतर लोक सरळ देणगी देतात किंवा संस्था बँकेकडून कर्ज घेतात. त्यांनी जर परत करण्याच्या बोलीवर पैसे मागितले असतील तर तिथेच काळंबेरं आहे असं समजायला हवं होतं.>> मागतात.. मला अनुभव आहे (मी देऊ शकले नव्हते मात्र)

चेक बाऊन्स चा एफ आय आर लगेच होत नाही. तुम्हाला चेक देणार्या माणसाच्या निदर्शनास लेखी आणुन द्यायचे असते. मग तो हुशारीने आपल्याला माझा पैसे बुडविण्यअचा हेतु नाही असे सांगुन तोच चेक पुन्हा तुमच्या खात्यात भरायला सांगतो.

हा सगळा पत्रव्यवहार एस एम एस वर न ठेवता ईमेल करावा जेणे करुन पुरावा म्हणुन देता येतो.

चेक देणारा माणुस कोणत्या तरी व्यवहारात तुम्हाला पैसे देणे लागतो. चेकने त्याने तुम्हाला कर्ज दिले किंवा दान दिले असे सिध्द होऊ नये या साठी काय व्यवहार केला. तो तुम्हाला पैसे देणे का लागयाबाबती मधे तुमच्या कडे पुरावे हवेत.

मग परत परत चेक बाऊन्स झाला म्हणजे १२८ खाली एफ आय आर होतो.

असे नसावे

चेक एकदा बाऊन्स होणे हाही गुन्हाच आहे

चेक बाऊन्स होणे हा फौजदारी गुन्हा आहे. सेक्शन १३८ अंतर्गत. थेट कोर्टात केस दाखल करता येते.
आम्ही अशी एक केस केली आहे (आम्ही फिर्यादी आहोत). आम्ही वकिलामार्फत केस दाखल केली आहे.

एकतर तुम्ही त्यांच्या असिस्टनच्या अकाऊंटचा चेक घेऊन चूक केली कारण आता तुम्ही जरी केस केली किंवा सोशल मीडियावर टाकले तरी बाईंचा यात काहीही फॉल्ट नसून असिस्टनचा व्यवहार होता असे बाई सहज प्रूव करू शकतात.
शक्य असेल तर गोड बोलून ज्या नावाने बाईंचे सामाजिक व्यवहार चालतात त्या अकाउंटचा चेक घेण्याचा प्रयत्न करा.
सगळे फोन कॉल रेकॉर्ड करत जा. आधीचेही असतील ज्यात ते लोक पैशाचा व्यवहार झाला आहे असे कबूल करत असतील तो call महत्वाचा आहे
.

“ सगळे फोन कॉल रेकॉर्ड करत जा.” - असं समोरच्याला कल्पना न देता, त्या/तिचा कन्सेंट न घेता कॉल रेकॉर्ड करता येतो का?

Pages