मधुमेह आणि किडनी प्रॉब्लेम डायट

Submitted by च्रप्स on 28 April, 2022 - 14:48

नमस्कार...
क्रिएटिनाईन लेव्हल 1.46 आहे आणि टाईप 2 डायबिटीज.
पोटॅशियम कमी केले आहे.
मधुमेह आणि किडनी प्रॉब्लेम - चांगली डायट सुचवाल का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्र्प्स - इथे अनोळखी लोकांकडून सल्ले घेऊन ते अमलात आणण्यापेक्षा तुमच्या नेफ्रॉलॉजिस्ट , एंडोक्रिनोलॉजिस्ट आणि प्रायमरी केअर फिझिशयन अशा तिघांशी बोलून त्यांचे सल्ले अंमलात आणा. तुमच्या सारख्या परिस्थितीतून गेलेले / जवळच्या मंडळीच्या बाबत अनुभव असलेले मायबोलीकर असतील. पण तुमची केस यासर्वांपेक्षा वेगळी असणार . त्यामुळे तुमच्या डॉक्टर टीमचे सल्ले पाळा.

अनोळखी लोकांकडून सल्ले घेऊन ते अमलात आणण्यापेक्षा . . . .
बरोबर.

जवळच्या मंडळीच्या बाबत अनुभव -
बाबांना होता डाइबेटिस. ते केइएम परळ इथे पंचवीस वर्षे दर गुरुवारी जात. त्यांना एक आहार सुचवला होता तिकडच्या डॉक्टरांनी.
पाव/पोळी अधिक एक भाजी. दुधी/काकडी/टिंढा/पडवळ याच्या काचऱ्या परतून केलेली भाजी किंवा इतर भेंडी/वांगी/भोपळा वगैरेंची भाजी. तूर/मूग किंवा चणे उकडल्यावर/ शिजवल्यावरचे पाणी याचे रसम.
याने पोट भरते,पोट भरल्याची भावना होते पण नियंत्रण राहाते.

आमच्या जवळच्या हॉस्पिटलात डाएटिशियन सुद्धा असतात. इन पेशंटचा आहार त्यांचे केसपेपएस आणि हिस्टरी पाहून तेच ठरवतात. ओपीडीत त्यांना भेटताही येतं. अमेरिकेत अशी काही व्यवस्था नाही का?