बागकाम अमेरिका २०२२

Submitted by मेधा on 22 April, 2022 - 13:31

जगप्रसिद्ध फिलाडेल्फिया फ्लावर शो ची जागा आणि तारखा दोन्ही पँडेमिकमुळे बदलल्या आहेत. त्यामुळे माझं बागकामाचं वेळापत्रक गंडलंय.
सेंट पॅट्रिक डे ला वाटाणे आणि हिवाळी भाज्या अंगणात लावणे वगैरे पूर्वापार आलेले संकेत आता नव्याने आत्मसात करायला लागणार Sad
तरी अर्थ डे चं निमित्त साधून हा धागा उघडतेय.
तुमचे यंदाचे प्लान काय, नवीन काय लावणार, शंका / कुशंका, रोपे, बी बियाणांचे ऑन लाइन किंवा इन पर्सन सोर्सेस अशा सगळ्या माहितीच्या देवाण घेवाणीसाठी हा धागा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळे, वाटाणे, चुका, आणि दोन तीन प्रकारचे सॅलड ग्रीन्स एवढ्या बिया अंगणात पेरल्यात मागच्या आठवड्यात.
शिवाय घरात दोडके, अंबाडी, दुधी, मायाळू आणि झुकिनी यांच्या बिया पण सुरु केल्यात. टॉमेटो आणि मिरच्या तयार रोपं आणू पुढच्या महिन्यात .

मागच्या वर्षी प्लान्ट एक्सचेंज आणि लोकल प्लांट सेल मधून पीओनी, हायड्रेंजिया, सॉलोमन सील आणि भरपूर होस्टा लावले होते. ते सर्वच तग धरून आहेत.

दरवाज्यात सावली असलेला पण झळा येणारा स्पॉट आहे. तिथे बरेच प्रयोग केल्यावर हुचेरा तग धरून राहतात हे जाणवलेय. तेंव्हा हुचेरा चा कोलाज करायचा प्लॅन आहे. रोज ऑफ शॅरॉन ला फांड्यापासून प्रोपॅगेट करायचा प्रयत्न करतोय.

लोकं दरवर्षी इतकी उस्तवार करतात हे पाहून कौतुक वाटलं. आम्ही आपली पेरेनियल्स लावून टाकली आणि दरवर्षी नवीन पीक घेतो.

रोज ऑफ शॅरॉन ला फांड्यापासून प्रोपॅगेट करायचा प्रयत्न करतोय. >>> रोपं उतरतात की त्याची.

हायडेन्जिया प्रोपॅगेट केलाय का कुणी?

ट्रेडर जोमधून विकत आणलेल्या बेसिलच्या प्लान्टचे propogation करता येते का ? << मी बर्याचदा आणते पण कधीच ते वाढलं नाहीये, नेहमीच मुळांना बुरशी लागुन मेलं आहे. Sad

हायड्रेंजिया ( आणि लायलॅक, क्रेप मर्टल ) चे एक दोन असफल प्रयत्न केलेत काही वर्षांपूर्वी . यंदा परत करुन पाहणार आहे
रोझ ऑफ शॅरनच्या बिया विखरुन किती रोपं उगवतात नको तिथे!

मागच्या आठवड्यात टॉमेटो , मिरची, चार्ड आणि सॅलड ग्रीन्सची काही रोपं लावलीत अंगणात.
मुळा, वाटाणे, अरुगुला उगवलेत.

तुमच्या आसपास मास्टर गार्डनर्स चे प्लांट सेल असतील आता पुढचे काही आठवडे. शक्य असल्यास तिथे पण चक्कर मारा. चांगली व्हरायटी असते किमती पण वाजवी असतात

> रोपं उतरतात की त्याची. >> हो पण ट्रीम केल्यानंतर बराच फांद्या मिळतात त्या टाकून द्यायला जीवावर येते म्हणून हा प्रयोग.

हायडेन्जिया प्रोपॅगेट केलाय का कुणी? >> पूर्ण कट करून नाही केले. पण जमीनीलगत राहिलेल्या एका फांदीला वीड्स काढताना थोडे तासून निघाले. तो भाग मातीत घालून ठेवला होता. त्याला मूळे फुटली आहेत पण अजून तोडून वेगळी करून काय होईल पाहिलेले नाहीये.

गार्डेनियाचं रोप/झुडुप (मोठं रोप आहे) आणलंय तेव्हापासून त्याला कळ्या दिसतायत. पण आता एक महिना होत आला तरी उमललेल्या नाहीयेत. काय कारण असावं? आठवड्यापूर्वीच जमिनीत लावलं आहे रोप.

किती दिवसांचे अपडेट्स राहिलेत इथे लिहायचे.
यंदा मायाळू आणि अंबाडी अजिबात उगवले नाहीत. अळकुड्या आणायचं राहिलंच. त्यामुळे चार्ड, लाल माठ आणि चुका एवढ्याच पाले भाज्या !

हळकुंडं लावली होती ती जोमाने उगवलीत आता. या वीकेंडला पातोळ्या करणार
सान मार्झानो टॉमेटो आणि जुलाय फोर्थ टॉमेटो दोन्ही जोमात. लोणचं केलं, सॉस बनवून फ्रीझ केलाय, शेजार पाजारी सहकर्मचारी सगळ्यांना वाटणे चालू आहे.

घरून काम करायचा कोपरा खिडकीसमोर आहे. त्या खिडकीच्या पलिकडे स्प्रिंग पासून सॉलोमन सील, पल्मोनेरिया, हार्डी हिबिस्कस आणि क्लिओमी ची फुलं येत आहेत आणि त्या फुलांवर रुबी थ्रोटेड हमिंगबर्ड. घरून काम करण्याचा स्पेशल फायदा ...

मेधा अंबाडी आणि मायाळू कस लावलस सांगशील का? म्हणजे त्या च बी कस उगवत घातलस आणि कुठे मीळत.
मी लावलेली हळद ही छान उगवली आहे पण नागपंचमीला नाही मिळाली पान आता गणेश चतुर्थी ला मिळतील.

सीड्स ऑफ इंडिया म्हणुन वेब साइट आहे. तिथून मागवते मी बिया.

आमच्या इथून तासभराच्या अंतरावर एक मोठं ग्रीन हाउस आहे. तिथून काही वेळा मायाळूची रोपं आंणली होती.

दोन्ही झाडं ग्रोसरी मधून आणलेल्या फांद्या रोवून पण लागतात असे ऐकले आहे. पण मी कधी प्रयत्न नाही केला