राणीबागेतला पाणघोडा - विडिओसह

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 February, 2022 - 05:47

विडिओ आधी बघितला तरी चालेल
Hippo at Ranibaug. राणीबागेतला पाणघोडा.
https://www.youtube.com/watch?v=zyqQPwG2HOo

........................

एक काळ होता जेव्हा राणीबाग म्हणजे जणू आमच्यासाठी सोसायटीचे गार्डन होते. सुट्टीच्या दिवशी बिल्डींगच्या गल्लीत क्रिकेट खेळायचा वैताग आला की पंधरा मिनिटांची तंगडतोड करत राणीबाग लगतच्या मैदानावर क्रिकेट खेळायला जायचो. ऊन्हं डोक्यावर आली आणि क्रिकेटचा खेळ थांबला की कंपाऊंडवरून उडी मारायचो, ती थेट माकडांच्या जुन्या पिंजर्‍यासमोर पडायची. पिंजरे रिकामे असायचे. ते माकडांचे की मोरांचे यावरून नेहमी वाद व्हायचे. तो वाद घालत आम्ही तिथेच घटका दोन घटका रमायचो. कारण त्यानंतर आत गेले की प्राणी बघायला दूरदूरहून आलेल्या लोकांची नेहमीची वर्दळ. जी आम्हाला नकोशी वाटायची. आम्हाला प्राण्यांचे कौतुक होते, पण नवलाई नव्हती. कारण त्या वातावरणातील कण न कण आमचा पाठ झाला होता.

हो, खरेच. आज त्या प्राण्यांची नावेही मला आठवत नाही. पण तेव्हाचे वाघ, सिंह, हत्ती, गेंडे सर्वांची नावे पाठ होती आणि त्यांना नावानेच हाक मारली जायची. हरणांच्या बागेत किती हरणे होती हे ठाऊक होते. काळवीटे किती, नीलगाय किती, सांबर किती हे त्यांच्या वर्गीकरणासह माहीत होते. त्यातली किती ठिपक्यांची आणि किती बिनठिपक्यांची हे मोजून झाली होती. माकडांच्या पिंजर्‍यातील कोणत्या माकडामध्ये सर्वात जास्त किडे आहेत याची कल्पना होती.

मोराचा पिसारा फुलवायची वेळ माहीत होती, दर्शक ताटकळत असताना खुशाल झोपा काढणार्‍या अस्वलाच्या वामकुक्षीचा टाईम माहीत होता. वाघ केव्हा गर्जना करायचा, हत्तीला केव्हा पाण्यात मस्ती करायचा मूड यायचा, तळ्याकाठी साधू बनून पडलेल्या मगरींना कुठे खडा मारल्यावर त्या डोळ्या उघडतात हे सारे जाणून होतो.

अजगर खोडाच्या पोकळीत नेमका कुठे दडून बसलाय हे आम्हीच पब्लिकला दाखवायचो. पक्ष्यांना शिट्ट्या मारून त्यांचा रिस्पॉन्स मिळवायचो. माकडांशी शेंगांच्या कॅच कॅच खेळायचो. गेंड्याच्या कंपाऊंडवर चढून त्याला माज करून दाखवायचो. तेव्हा मोबाईल नव्हते, कॅमेरे नव्हते, सेल्फी काढायची पद्धत नव्हती. जे पाहू ते अनुभवले जायचे आणि आठवणीत कैद व्हायचे.

पण या आठवणीत एक आठवण अशी होती, जी या आठवणींचा भाग कधी झालीच नाही. या सर्व प्राण्यांमध्ये एक प्राणी असा होता, जो कसलाही माज न दाखवता आमचा माज उतरवायचा. जो आम्हाला भावच द्यायचा नाही.

तो पाण्यात डुंबत राहायचा. आणि आम्ही बघत राहायचो. पण तो पाण्याच्या बाहेर येऊन कधी दर्शन द्यायचा नाही. आताच्या पब्लिकला कदाचित माहीत नसेल, पण तेव्हा राणीबागेत हत्ती, घोडे, ऊंट या प्राण्यांवर तिकीट काढून स्वार होऊन राणीबागेत फिरता यायचे. पण या स्पेशल प्राण्याची सवारी मात्र फक्त कावळे मामांसाठी होती. तो मस्तपैकी पाण्यात पाठ तेवढी उघडी टाकून बुडालेला असायचा आणि कावळे त्याच्या पाठीवर निवांत बसलेले असायचे. ते पाहून वाटायचे की टाकावी भिंतीवरून एक उडी आणि शिरावे त्याच्या मैदानात. उतरावे त्याच्या छोट्याश्या तळ्यात आणि बसावे त्याच्या अंगावर. झोपावे, लोळावे त्याच्या अवाढव्य पाठीवर. तसेही एवढे दिवस जो आपल्याला दर्शन द्यायला उठला नाही तो आता काय उठणार... मग कसली भिती..

पण ही ईच्छा कायम ईच्छाच राहिली. ना तो पाण्यातून उठला, ना आमची कधी भिंत ओलांडायची हिंमत झाली. सारे बालपण त्याला पाण्यात डुंबताना बघण्यातच गेले. आणि मग आयुष्य पुढे सरकले तसे राणीबागेत हक्काने जाणे बंद झाले.

...........

आणि मग आयुष्याच्या दुसर्‍या टप्प्यावर एके दिवशी खास राणीबागेत जायचा प्लान बनवला. जिथे एके काळी वाट्टेल तेव्हा कंपांऊंडवरून उड्या मारून जायचो तिथे तिकीट काढून जायचा बेत ठरवला. पोरगी थोडी मोठी झाली होती. काऊ कब्बूंशी खेळू लागली होती. तिला चार पशूपक्षी दाखवूया म्हटले जे आजवर ती केवळ कार्टून्समध्ये बघत होती.

राणीबागेतल्या प्राण्यांची शान तशी जरा कमी झाली होती. पण आजही तो पाण्यात डुंबणारा पाणघोडा तसाच होता. म्हटले चला बघूया, आता तरी तो सुधारला का? तो तोच लहानपणीचा होता की त्याची पुढची पिढी आलेली कल्पना नाही. पण तो होता. तसाच पाण्यात डुंबत होता. पण यावेळी चमत्कार झाल्यासारखे तो उठला. नुसता उठलाच नाही तर त्याने मोठ्ठा ऑ करून जबडा वासला. मोठ्या ऐटीत पाण्याबाहेर आला. आणि आम्हाला सलामी देत आपल्या घरट्यात गेला. पाठोपाठ त्याचा जोडीदारही उठला, आणि तो ही त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत आत गेला.

माझ्यासाठी हा एकूणच अदभुत क्षण होता. जे बघण्यासाठी माझे अख्खे बालपण तरसले होते ते लेकीने तिच्या पहिल्याच भेटीत अनुभवले. सोबत बायकोही होते. तिनेही नशीब काढले. नशीबाने मोबाईल माझ्या हातात होता. त्याने पाण्यातून बाहेर येताना मोठ्ठा आं वासला तो निसटला, पण त्याच्या डौलदार चालीला कॅमेर्‍यात कैद करायचे भाग्य मला लाभले. पहिल्याला दुरून टिपले तर दुसर्‍याला छान झूम करून बघितले. त्याचे ते गोलाकार अवाढव्य शरीर, जणू मागून पाहता दुधाचा टँकर वाटावे अशी देहयष्टी, चार बारीकश्या पायांवर तोललेली बघून तो पाण्यातून सहसा ऊठायचा का नाही हे देखील समजले. आणि त्याच्यावरचा रागही गेला Happy

वरच्याच विडिओची लिंक पुन्हा एकदा देतो,
Hippo at Ranibaug. राणीबागेतला पाणघोडा.
https://www.youtube.com/watch?v=zyqQPwG2HOo

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ जेम्स बाँड, कावळे दादांबद्दल बोलत आहात का? राणीबागेतला सर्वात डेंजर जनावर. एक भयानक अनुभव आहे त्यांचा...

अच्छा हो कर्रेक्टाय.. पेंग्विनच बोलायचे असेल. त्याला राजकीय वलय सुद्धा आहे.
पण कावळे आणि राणीबाग हे समीकरण माझ्या मनात असे घट्ट बसलेय की त्यामुळे कावळाच पहिला आठवला.

हे पेंग्विन आले तेव्हा तिथेच होतो. वारंवार जाणेही व्हायचे. तरीही पेंग्विन बघायचा योग आला नाही. एकदा लेकीला घेऊन गेलेलो पण लाईन बघून नको म्हटले. राणीबागेत एखाद्या प्राण्याला लाईन लाऊन बघणे जीवावर आले.
वडील म्हणाले. लाईन कसली लावतोस. आपली ओळख आहे. एकजण पाठवतो तुझ्यासोबत. पण नको म्हटले. मला आवडत नाही, ऑकवर्ड वाटते असे ओळखीच्या जीवावर लाईनीत घुसणे. लोकं लालबागच्या राजाला ओळख काढून थेट चरणदर्शन घेऊन येतात. त्यानंतर हा मोठेपणा आणि बाप्पांची भक्ती एकत्रच मिरवतात याचे मला कौतुकच वाटते.

पेंग्विन बघायचा योग आला दोन वर्षांपूर्वी. पाच होते , दोन मोठे आणि तीन पिल्लं. पण रांगही नव्हती आणि तिकिटही नव्हते. का माहिती नाही. खूप वेगात पोहतात. आता आणखी अकरा नवीन आलेत असं ऐकलं.

ससे आणि मोठी बदकं हंस ( हॉटेलवाले,रिझोटवाले बाळगतात ती) पाहायला मजा वाटते.

----------------------

लहान मुलांना आवडेल अशी एक जागा -
दादरा गार्डन (बोटिंग), वनगंगा गार्डन, सिल्वासा गाल्डन. वापी स्टेशन पूर्वेस १०-१८ किमिटरांत.
दमण किनारा ( काळा आहे), किल्ला,चर्च - वापी स्टेशन पश्चिमेला १२ किमी.

बोटींग ईथे आमच्या वाशीला, मिनी सी शोअरलाही आहेत. त्या जागेबद्दल एक धागा बरेच दिवसांपासून काढायचा राहिलाय. लहान मोठे स्त्री पुरुष सर्वांनाच आवडेल अशी जागा आहे. पण बरेच मोठा पसारा आहे तो, थोडक्यात कसा मांडावा हे बघायला हवे.

हो तिकडे हावरक्राफ्ट होते. पण ती राईड विशेष आवडली नाही. सगळं बंदिस्त करून टाकायचे.
------
वापी गार्डन हे काकरिया तलावाची कापी छोटी आहे. मध्ये बेट आणि बाजूनी पाणी. वल्हवायच्या बोटी फक्त. शांत वातावरण.

हावरक्राफ्ट नाही.. दोन चार लोकांच्या पॅडल मारयाच्या बोट आहेत साध्या.. तुम्ही वेगळे मी वेगळे बोलत आहे बहुधा..

वापी गार्डन हे काकरिया तलावाची कापी छोटी आहे. मध्ये बेट आणि बाजूनी पाणी. वल्हवायच्या बोटी फक्त. शांत वातावरण.>>> आता बरीच वर्षे झाली जाऊन तिथे... खूप छान आणि शांत आहे तिथलं वातावरण.. बेत ठरवायला लागेल पुन्हा एकदा तिथे जायला..! माझ्या शाळेची सहल काढायचे तिथे..

srd, बहुतेक त्या तलावात जो पूल आहे त्याच्यावर फूल और कांटे सिनेमातले एक गाणे शूट झालेले आहे.. दिल ये कहता है कानो मे तेरे.. बहुतेक हे गाणं असावं ते...!

मुद्दाम या धाग्यावर दोनचार राणीबागेतल्या जनावरांचे अलीकडले फोटो टाकूया म्हणून माझे फेसबूक ते ऑर्कुट अकाऊंट ढुंढाळून पाहिले. पण फोटो असे काही विशेष सापडलेच नाही. लेकीचे राणीबागेत काढलेले फोटो चिक्कार आहेत. पण प्राण्यांचे मुद्दाम काढलेच नाहीत. बहुधा घर की मुर्गी दाल बराबर तसे त्या वन्य जीवांचे कौतुक वा नवलाई वाटत नसल्याने असे झाले असावे.
तरी अगदीच पोस्ट फोटोविना जाऊ नये म्हणून हा एका कोपच्यातून शोधला..

1245779589..jpg

तो पाण्यात डुंबत राहायचा. आणि आम्ही बघत राहायचो. पण तो पाण्याच्या बाहेर येऊन कधी दर्शन द्यायचा नाही>> आम्हालाही दर्शन नाही मिळाले .. मुली वाट बघून थकल्या पण तो कशाला मरायला उन्हाचा बाहेर पडतोय
150AF603-80B3-4024-A175-37CD3471315A.jpeg

बाग मात्र मस्तच केलीए .. उकाड्यात आणि लोकांच्या गर्दीतून टिपलेले काही फोटोज-
अस्वलाची एंट्री
E3587358-5AFD-4532-89BB-8A3D4E3DC47E.jpeg898DA4FD-0E86-41BE-B53B-C1944813E202.jpeg

ह्यांना काहीच पडलेलं नाही
F31C02EC-4E90-45AE-9A1D-595CDE0D313F.jpeg

आम्हालाही दर्शन नाही मिळाले .. मुली वाट बघून थकल्या पण तो कशाला मरायला उन्हाचा बाहेर पडतोय
>>>>>>

अरे... एकदा ऋन्मेऽऽऽष अशी हाक मारून बघायची ना.. मी कुठेय बघायला बाहेर आला असता

बाकी खालचे फोटो बघून प्रकर्षाने जाणवले की मी गेले काही काळ राणीबागेत गेलो नाही ... किती आठवण येत असेल त्यांना माझी Sad

बाकी खालचे फोटो बघून प्रकर्षाने जाणवले की मी गेले काही काळ राणीबागेत गेलो नाही ... किती आठवण येत असेल त्यांना माझी>>> हो.. तीथे एक नविन पिंजरा पण बनतोय Proud

म्हाळसा मस्त फोटो>> धन्स, मला वाटलेलं की मी बरेच फोटोज काढलेत..पण फक्त प्राण्यांचे असे इन मिन तीनच मिळाले.. बाकी इतर फोटोजमधे प्राण्यांसोबत आम्हीही आहोत Happy

हो.. तीथे एक नविन पिंजरा पण बनतोय Proud >>>> हो Proud म्हणूनच तिथे जायचे बंद केलेले. अजूनही तो रिकाम आहे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. आता अजून काही काळ थांबतो Proud

राणीबागेत घरचे गेलेले तेव्हा पोरीने काढलेले फोटो. मला कामामुळे जाता आले नाही. पाणघोडा मात्र तेव्हाही उठला नाहीच.

असो.
हा वाघ

IMG_20220514_183242.jpg
.
IMG_20220514_183228.jpg

हे आमचे झू...
Screenshot_20220514-085555_Gallery.jpg
कमोडो ड्रॅगन

*Screenshot_20220514-085252_WhatsApp.jpg*
माझ्याहातावर बसलेली फुलपाखरं
Screenshot_20220514-085141_Gallery.jpg

निमो आणि डोरी Happy
*Screenshot_20220514-085122_Gallery.jpg

*Screenshot_20220514-085107_Gallery.jpg

*Screenshot_20220514-085044_Gallery.jpg

*Screenshot_20220514-085009_Gallery.jpg
अस्वल
Screenshot_20220514-090750_Gallery.jpg
झेब्रा, जिराफ

Screenshot_20220514-090626_Gallery.jpg
हा रंगीत पक्षी, नाव आठवत नाही.

अस्मिता, छान आहे हे झू. अस्वलाचा वावर डॉनसारखा दिसतोय..
राणीबाग सुद्धा आता चांगले झालेय. स्टेटसला फोटो टाकल्यापासून चौकश्या सुरू झाल्यात लोकांच्या.. कुठेय कुठेय.. अजून बरेच जनतेला पत्ताच नाही या नूतनीकरणाचा..

@ सस्मित, हो बिबट्याच. वाघोबा विडिओत आहे बहुधा. नुकतेच फेबुवर टाकलाय तो विडिओ..

थँक्स srd व ऋ Happy
अस्वलाचा वावर डॉनसारखा दिसतोय..
>>उन्हाने व गर्दीने अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते,

ऋ, बिबट्यावरचा प्रतिसादही माझाच होता. Happy

एखाद्याचे काय नशीब असते, तेव्हा सतत पाण्यात डुंबणारा पाणघोडा बाहेर येताना दिसला होता...
आणि आज पाण्यात डुंबणारा वाघ बघून आलो Happy

स्वतंत्र धाग्यात लवकरच...
शेवटी राणीबागेचा राजा आहे तो Happy

Pages