मराठी भाषा दिवस २०२२ - खेळ: भाषेचे अलंकार - २८ फेब्रुवारी - आजचा अलंकार 'अतिशयोक्ती'

Submitted by संयोजक-मभादि on 27 February, 2022 - 20:55

दागिने किंवा अलंकार हे व्यक्तींच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे भाषेचे अलंकारदेखिल आहेत. आपल्यापैकी काहींनी ते शाळेत शिकलेही असतील. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या अलंकारांचे काही खेळ खेळू, म्हणजे ते अलंकार काय आहेत हे कळायला सोपे जाईल आणि जरा मजाही येईल. तसे भाषेचे अलंकार अनेक आहेत, परंतु तूर्तास आपण काही निवडक अलंकार खेळासाठी घेऊ या. २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात रोज एकेका अलंकाराचा खेळ खेळला जाईल.

तर आजचा अलंकार आहे 'अतिशयोक्ती'.

अतिशयोक्ती म्हणजे काय रे भाऊ?
जेव्हा कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेलजेव्हा, तेव्हा अतिशयोक्ती अलंकाराचा अनुभव येतो.

उदाहरणार्थ -
१. काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर । रामायण आधी मग झाला राम जानकीवर ।।
२. (ह्या अलंकारासाठी सर्व शिक्षकांचं आवडतं उदाहरण)
दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण झालं | मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली ||
उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला | वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला ||

आजचा खेळ काय आहे?
आज आपल्याला काहीच्या काही गोष्ट तयार करायची आहे. ही गोष्ट न संपणारी गोष्ट असणार आहे. खाली कथेची सुरुवात करून दिलेली आहे. आता एकेका प्रतिसादात १ किंवा २ वाक्ये लिहा आणि गोष्ट पुढे न्या. आपल्या प्रतिसादात अतिशयोक्ती असली पाहिजे हा मुख्य नियम. आधीच्या प्रतिसादावरून गोष्ट पुढे नेत रहायची आहे. बघूया ही गोष्ट काय मजेशीर वळणे घेत पुढे जाते ते. तर मग करायची सुरुवात?

सुरुवात -

मी पतंगाच्या मांजाला लटकून कळसूबाई शिखरावरून एव्हरेस्टकडे जाताना खाली पाहिले. दूरवरचा काळा ढग दिसताक्षणीच .....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पतंगाच्या मांजाला लटकून कळसूबाई शिखरावरून एव्हरेस्टकडे जाताना खाली पाहिले. दूरवरचा काळा ढग दिसताक्षणीच .....
मला हायसं वाटलं. थोड्याच वेळात तो ढग माझ्या पायाखालून जाऊ लागला, तत्क्षणी मी त्यावर अंग झोकून दिले. इतक्यावेळ चाललेली अंगाची लाही त्यातील थंडगार तुषारांनी शांत झाली. मनसोक्त आंघोळ करून ..

मनसोक्त अंघोळ करून मी माझे सौन्दर्य प्रसाधन उरकले .ग्लो अँड लव्हली लावल्यावर मी आरशात पाहिले तर काय .... समोर यामी गौतमच ,.......

गरकन गिरकी घेतली तर विजारीच्या पार्श्वभागावरची बंदुकही आरश्यात लख्ख दिसली. डोळ्यांवर विश्वास बिश्वास बसतोय का नाही करायला वेळच न्हवता. लगेच युट्युबवर कार्टुन लावुन दिलं आणि आता पुढच्या निगोशिएशनची अटीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला बोलवायचं का ट्रिड्यूला किस करायचं याचा विचार चालू केला.
(काय! हे अतिशयोक्ती नाही म्हणता!)

माझा विश्वासच बसेना. मी यामीइतकिच बरी दिसतेय. काय हे! चांदणचुरा फासुन, डोळाभर आकाशाची शाई रेखुन, ओठांवरती उषेचा गुलाबी रंग माखुनहि मी फक्त यामि दिसतेय? निराशेच्या गर्तेत मी कोसळले ते थेट स्वप्नातुन जागीच झाले.

स्वप्नातून जागी झाले तर काय, समोर साक्षात बायडन, कागदपत्र घेऊन…मला म्हणाले , मी इथे शेकडो वर्षांपासून तुम्ही स्वप्नातून जागे व्हायची वाट पहात एका पायावर उभा आहे.

माहेरच्या (बहुधा गेल्या -२०२० च्या दिवाळी अंकात) देवदत्त वाँबल यांची सिंधूआजीची गोष्ट आली होती. तसं काहीतरी अपेक्षित असावं संयोजकांना.
उदा : (हे त्यात होतं का आठवत नाही). सिंधूआजी शिडाच्या बोटीने भारतातून ऑस्ट्रेलियाला जायला निघते. वाटेत समुद्री चाचे आडवे येतात. त्यांना
चांगलाच इंगा दाखवते. इ.

उन्हाळा सुरू झल्याची वर्दी लागली होती. रात्री गार हवेचा आस्वाद घेण्यास गच्चीवर गेलो. पण तिथेही हवेची झुळुकही नव्हती. आकाशात अर्धा चंद्र दिसत होता. आणि डोक्यात एक युक्ती आली. मग काय खाली धाव ठोकून गरम रजई घेऊन आलो आणि मारली लगेच उडी चंद्रावर अंधाऱ्या भागात. तिथे तपमान उणे १७०. रजई अंगावर घेऊन मस्त ताणुन दिली.
इतकी गाढ झोप लागली होती. एवढ्यात धपदिशी आवाज आला. रजई किलकिली करून पाहिले तर रजनीकांत.
त्याच्या दोन्ही पायांना दोन भले मोठे स्प्रिंग होते ते काढत होता. (माझ्या भोवतीच्या मोठया तेजोवलयाचा प्रकाश शंभर फूट लांब पर्यँत पडतो.) त्याला म्हणालो "लेका तुला चंद्रावर यायलाही स्प्रिंग लागगात!"
तो वरमला. मग अचानक "अरे देवा!" असा ओरडला.
विचारलं काय झालं तर स्प्रिंगकडे बोट दाखवले त्याने. तुटला होता एक स्प्रिंग. म्हटलं काळजी करू नकोस. झोपायला आलास ना, झोप आता, मलाही झोपू दे. दोघेही झोपी गेलो.
परत कडकड अवाजाने जाग आली. लोकरी कपडे आणि वरून दोन रजया घेऊनही तो कुडकुडत होता.
मग माझी रजई त्याच्या अंगावर टाकली.
मग मात्र शांत झोप झाली. झोप झाल्यावर उठलो.
रजनीकांत म्हणाला स्प्रिंग तुटलाय एक कसा जाऊ.
त्याला आधी फेकलं पृथ्वीवर, मग मी उडी मारून आलो परत.

>>>>>>>>.स्वप्नातून जागी झाले तर काय, समोर साक्षात बायडन, कागदपत्र घेऊन…मला म्हणाले , मी इथे शेकडो वर्षांपासून तुम्ही स्वप्नातून जागे व्हायची वाट पहात एका पायावर उभा आहे.

मी बायडनला म्हटलं - तुझा जिगरी दोस्त ट्रंप कुठाय, चल त्याला भेटून येऊ. मग आम्ही ट्रंपकडे गेलो तर मेलनी आणि ट्रंप ,जिनपिंग बरोबर मस्त वाईन घेत बसलेले. बायडन येताच जिनपिंगने आनंदाने बायडनला मिठीच मारली. व दोघे एकेक पेग रिचवत मस्त मेहेदी हसन, जगजीत सिंगच्या गझला ऐकू लागले. मधेच सँक्श्न्स चा विषय निघाला आणि ट्रंप बायडनला म्हणाला - "लेका तुझी जिंदगी अशीच सँक्श्न्स काढण्या-घालण्यात जाणार बघ." यावर बायडन .....

भारी लिहीताय सगळे.

अतिशयोक्ती अलंकार म्हटलं की सगळे साऊथ इंडियन डबड पिक्चर आठवतात मला.

इतर सर्व अलंकारांच्या खेळात ह्या एका खेळाला कमी प्रतिसाद लाभलेला दिसतोय. बायडेन, यामी गौतम, ट्र्युडो वगैरे कथानक चालू असताना चंद्रावर मानवाने वस्ती केली - हा एक समांतर प्लॉट आल्यामुळे गोंधळ तर नाही ना उडाला? Wink

पन मानव मामा, तो प्लॉटही मजेशीर आहे. रजनीकांतला "लेका तुला चंद्रावर यायलाही स्प्रिंग लागगात!" म्हणणे ही अतिशयोक्ती भन्नाट आहे.