लता मंगेशकर यांच्या मुलाखती, आठवणी (संकलन)

Submitted by गजानन on 10 February, 2022 - 23:22

नुकतीच लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांची एक जुनी आधी न पाहिलेली दूरदर्शनवरील सुंदर मुलाखत/गप्पा ऐकल्या आणि अश्या अजूनही मुलाखती ऐकायला, पाहायला मिळाव्यात असे वाटले. त्या शेअर करण्याकरता हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://youtu.be/DZslgutm3NI

पाकिस्तानी पत्रकार कामरान शाहिदने घेतलेली लताबाईंची ही अप्रतिम मुलाखत बघा. भारतीय पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखतींपेक्षा ही मुलाखत अतिशय उच्च आहे. मी दुसरीकडेही लिंक दिली आहे पण इथेही देऊन ठेवलेली बरी.

लतादिदिंची आठवण
साधारण १९९७ साली मी डेक्कन क्विनने मुंबईहुन पुण्याला यायला निघालो होतो. पावसाळा होता. तेव्हा गाडी सुटायच्या आधी पाच मिनीटे साक्षात दीदी पलिकडच्या सिटवर येवुन बसल्या. त्यांच्याबरोबर एक मुलगी पण होती. माझी ट्युब पेटल्यावर मी त्यांच्याकडे बघुन हसलो. नंतर त्यांनी छान गप्पा मारल्या, मी कुठला वगैरे विचारपुस केली. मी वाचत असलेल्या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी पण घेतली. बरीच लोक येवुन त्यांचाशी बोलत होती. स्वाक्षरी घेत होती. माझ्यासाठी ही एक मर्मबंधातली ठेव आहे.
20200727_214742.jpg

छान धागा! अमृताचा घनु म्हणून ज्ञानेश्वरांच्या रचनांचा कार्यक्रम दूरदर्शन वर सादर झाला होता - शंकर वैद्य, पं. ह्रदयनाथ मंगेशकर आणि लतादीदी
भाग १ : https://youtu.be/LBUliGCFDBE
भाग २ : https://youtu.be/wHWowkns5zc

लताबाईची भक्ती केली आहे अनेक वर्षे.. युट्युब वरच्या जवळ जवळ सगळ्या मुलाखती ऐकल्यात. ज्ञानप्रबोधिनी, निगडीला बाईंचा लाईव्ह कार्यक्रम ऐकायला मिळाला (२००२/४?), अगदी धन्य वाटले. लाईव्ह पण इतकं अचूक कसे गाते ह्याचे खूप आश्चर्य वाटते. दूरदर्शनच्या अनेक फितींमधली लाईव्ह गाणी केवळ अफाट आहेत. प्रिया तें चा कार्यक्रम पण छान आहे. फारच वाईट वाटले/ वाटत आहे.. तिचे तुकाराम आणि ज्ञानेश्वर तर अनेक कठीण प्रसंगात खूप धीर देतात. मीरा भजने , राम श्याम गुन गान सुध्दा किती अवीट आहेत..आणि मुघल ए आजम मधली नात 'बेकस पे करम' सुद्धा..लता Sad

लाईव्ह पण इतकं अचूक कसे गाते ह्याचे खूप आश्चर्य वाटते. > >थोडे विषयांतर होईल पण ह्याबद्दल मी वाचलेले ते असे - प्रत्येक लाईव्ह शो साठी असणार्‍या गाण्यंची - त्यातल्या नोट्स, खाचाखोचा, प्जेस, चढ उतार वगैरे माहिती त्या लिहून ठेवत. त्यांना पूर्ण गाणे संपूर्ण कसे म्हणायचे हे माहित असले तरीही. गाणे हे फक्त गायकाचे नसून साथ लिहिणारे, लिहिणारा, संगित दिग्दर्शक, अ‍ॅरंजर इत्यादीस अगळ्या इन्वॉल्व्ड पार्टीज चे आहे त्यामागे त्यांचे कष्ट आहेत नि त्याचा मान राखाण्यासाठी गाणार्‍याने चूका होउन नयेत म्हणून एव्ह्ढी काळजी घेतलीच पाहिजे ही त्यामागची भूमिका. अचूकतेचे कारण हे असावे माझ्या मते.

तसे आहे असामी, त्या मोहीलेंनी त्यांच्या मुलाखतींमध्ये सांगितलं आहे तसेच. लाईव्ह मध्ये पण ती चुकूनही लाईटली गात नाही आणि रेकॉर्ड मध्ये गायली आहे तितकंच आणि तसेच गाते. तिचा रॉयल अलबर्ट हॉलमधील कार्यक्रम तर अफाट आहे केवळ. नन्तरचा मुकेश बरोबरचा यु एस मधला पण मस्त आहे. DD कडे तर खजिनाच आहे जुन्या आठवणींचा. इतर गायकांचे लाईव्ह ऐकले की लगेच हा फरक अधोरेखित होतो.

लता मंगेशकर यांच्या मुलाखतींचा माझा संग्रह:

अमृताचा घनू (सह्याद्री वाहिनी):
भाग १: https://www.youtube.com/watch?v=LBUliGCFDBE
भाग २: https://www.youtube.com/watch?v=wHWowkns5zc
भाग ३: https://www.youtube.com/watch?v=Kl0fKWICuv8

कल्पवृक्ष कन्येसाठी: दूरदर्शनवरची एक दुर्मिळ मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=2LTyZeJAPow

सह्याद्रीच्या पाऊलखुणा:
https://www.youtube.com/watch?v=M6kbHe2ubds

असेन मी नसेन मी: ह्रदयनाथ मंगेशकर यांनी घेतलेली मुलाखत:
https://www.youtube.com/watch?v=9J1hNgl7X20

माझ्या आजोळची गाणी | लता मंगेशकर
https://www.youtube.com/watch?v=eGTVAStUScM

Great Bhet : Lata Mangeshkar I
part 1: https://www.youtube.com/watch?v=s53x5naxIj4
part 2: https://www.youtube.com/watch?v=yyXTHOe7W1o
part 3: https://www.youtube.com/watch?v=aM-iytQU03w

GREAT BHET LATA MANGESHKAR II
PART 1: https://www.youtube.com/watch?v=pqBKH0OcW3w
PART 2: https://www.youtube.com/watch?v=nEwFhPe7JUo
PART 3: https://www.youtube.com/watch?v=unyAfpjCv2Q
PART 4: https://www.youtube.com/watch?v=t7E0DZpxL6c

जावेद अख्तर यांनी घेतलेली मुलाखत:
https://www.youtube.com/watch?v=lI1LCk7ibTo

लता मंगेशकर यांची मुलाखत (सुनील बर्वे यांनी घेतलेली ध्वनिमुद्रित मुलाखत):
https://www.youtube.com/watch?v=xpSouMlLxko

आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील, ज्येष्ठ पार्श्वगायिका 'लता मंगेशकर' यांची कवयित्री 'शांता शेळके' यांनी घेतलेली मुलाखत.
https://www.youtube.com/watch?v=AybOM0JErm8

NDTV वर सप्टेबर २००८ मध्ये:
https://www.youtube.com/watch?v=NjVZngQxLW4
https://www.youtube.com/watch?v=7m-AIrPcBsE

नूर जहा यांची आठवण सांगताना लता मंगेशकर:
https://www.youtube.com/watch?v=JrRHj_G4jrY

Rajat Sharma interviews Lata ji
https://youtu.be/yado7OKGQcA?t=14

Seedhi Baat: Interview with Prabhu Chawla:
https://www.youtube.com/watch?v=0uHGDUJQzpY

Interview with Pakistani Reporter Kamran Shahid
https://www.youtube.com/watch?v=DZslgutm3NI

Lata Mangeshkar Interview | Rajeev Masand
https://www.youtube.com/watch?v=x4olDfY-eyY

Talking Heads with Lata Mangeshkar (Aired: March 2000)
https://www.youtube.com/watch?v=5Q947FRJ97U

Lata Ji Talks About Mohammed Rafi Sahab
https://www.youtube.com/watch?v=0hdPKK89mKU

Lata Ji remembers her fight with Rafi Sahab
https://youtu.be/Ay8U8kqg6k4?t=22

Kya Kahoon Bhagwan Ke Aadmi They Rafi Sahab: Rare Interview of Lata Mangeshkar:
https://www.youtube.com/watch?v=7r_YyBOUkrM

Rare video Lata Mangeshkar live recording with Raj Kapoor and team
https://www.youtube.com/watch?v=aViBTVLtifQ

आताच लताजींची एक धमाल मुलाखत पाहीली. मुलाखतकाराने आपल्या मनातले पण बरेच प्रश्न त्यांना विचारले आहेत आणि त्यांची दीदींनी प्रांजळ उत्तरे पण दिली आहेत.
https://youtu.be/0uHGDUJQzpY

अतुल , खूप छान काम केले. हा डेटा एकत्र राहील.
यातल्या बर्‍याच मुलाखती पाहिल्या आहेत. पाहतोय. जावेद यांनी घेतलेली मुलाखत विशेष आवडली आहे.

खूप छान धागा आणि पोस्ट्स ! आळंदी ला एकदा साहित्य संमेलन झालं होतं. त्यात लता मंगेश्करांनी भाषण केलं होतं. त्याची काही माहिती,मुद्रण मिळालं तर जरूर शेअर करा.

मंदार, क्या बात है!

WHITEHAT, कामरान शाहिदने घेतलेली मुलाखत पाहिली. त्यात त्याने एक वाक्य म्हटलेय, तुमच्या तोंडून माझ्या नावाचा उच्चार हाच माझ्यासाठी उच्च भाग्याचा क्षण आहे!

जिज्ञासा, 'अमृताचा घनु' चा एक भाग पाहिला. अप्रतिम आहे.
शान्त माणूस, तो त्यांचा कुत्रा आहे का? पाहताना गलबलून आले.
सान्वी, अतुल. (तुम्ही तर खजिनाच शेअर केलात!), चाबुक, तुम्ही दिलेले दुवे पाहतो.

तुम्हा सगळ्यांना हे शेअर केल्याबद्दल अनेक धन्यवाद!

सगळे जण छान लिंक्स देत आहेत! लतादीदींना त्यांच्या काळातील इतर कलाकारांविषयी बोलताना फारसं ऐकलेलं नाही. गेल्या काही दिवसांत केवळ लतादिदींच्याच व्हिडीओजवर क्लिक करत राहिल्याने युट्युब अल्गोरिदम ने मला नवनवीन व्हिडीओ दाखवले! त्यातल्या एका व्हिडीओ मध्ये दिदी शांताबाई शेळके यांच्याबद्दल बोलल्या आहेत.
दुसरा व्हिडीओ श्रीनिवास खळे यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जेव्हा दिदींच्या हस्ते सत्कार झाला होता तेव्हाचा आहे. तेव्हा दीदींनी खळे काकांविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. मी इथे दिदींच्या भाषणाच्या आधी मंगला खाडिलकर यांनी करून दिलेल्या लतादिदींच्या ओळखीपासूनचा timestamp देतेय पण त्या आधी पाडगावकर देखील सुरेख बोलले आहेत आणि नंतर खळे काकांनी व्यक्त केलेलं मनोगत देखील ऐकावं असं आहे.
लता इन हर ओन व्हॉइस ही एक १९९० साली निघालेली VCD होती. माझ्याकडे हार्ड ड्राईव्ह वर त्याची एक कॉपी आहे पण कोणीतरी ती पुन्हा युट्युबवर अपलोड केली आहे. जवळपास अडीच तासांचा व्हिडीओ आहे ज्यात ३० मिनिटांचे ६ भाग आहेत. यात बरीच गाणी आहेत पण मुख्य म्हणजे अनेक जण दिदींबद्दल बोलले आहेत आणि लतादिदी आपल्या सहकलाकारांविषयी देखील बोलल्या आहेत. आज आपल्याला माहिती असलेल्या अनेक गोष्टी या व्हिडिओमध्ये आहेत! यातल्या गप्पा तर छान आहेतच पण यातला माझा अजून एक आवडीचा भाग म्हणजे प्रत्येक ३० मिनिटांच्या भागानंतर लतादीदींनी एका गाण्याच्या काही ओळी नुसत्या गुणगुणल्या आहेत. ते गुणगुणणं इतकं सुंदर आहे की दर वेळी ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी येतं! केवळ दैवी!
या शिवाय मला व्हाट्सऍप वर एक pdf मिळाली आहे. १९६७ साली लतादिदींना पार्श्वगायनाच्या क्षेत्रात २५ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने एक आठवणींचा संग्रह प्रकाशित केला होता. याचे संपादन शांताबाई शेळके, वृंदा लिमये आणि सरोजिनी वैद्य यांनी केले होते आणि याची कल्पना पु.लं.ची होती! यात त्या वेळच्या सगळ्या मान्यवर व्यक्तींनी लतादिदींविषयीच्या आठवणी लिहिल्या आहेत. संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे! पण इथे ती pdf देता येणार नाही.

जिज्ञासा, 2021च्या दिवाळी पुस्तक प्रदर्शनात (अत्रे सभागृह, पुणे) तुम्ही म्हणत आहात तो अंक होता 25 वर्षे वाला (स्वरप्रतिभा), मी घेतलाय. मला आवडला. त्यानंतर सुद्धा बाई खूप गायल्यात. बाळवर सुद्धा तसा अंक आहे , त्याच नावे. 'मोठी तिची सावली' पण घेतलं होतं 2020 च्या दिवाळीत, ते मात्र बोर झालं, नवीन काही हाती लागलं नाही , त्या मीनाने लिहूनसुध्दा. बाकीच्या लिंक्स अर्थात बघितल्यात, ऐकल्यात पूर्वी. शांताबाईंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे, 100 मान्यवर त्यांच्या बद्दल बोलणार आहेत , युट्युबवर अपलोड होत आहेत ते व्हिडीओ.

जिज्ञासा, फारच छान.
खळेकाकांच्या ८० व्या वाढदिवसाच्या त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. खरेच तो कार्यक्रम प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवण्यासारखा सुंदर होता. तिथे आलेल्या पाहुण्यांच्या मनातल्या खळेकाकांसारख्या महान व्यक्तीमत्वाबद्दलच्या आठवणी आणि रविंद्र साठे, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन, माधुरी करमरकर, साधना सरगम, शाहीर साबळे, हृयदनाथ मंगेशकर, उल्हास कशाळकर इ. महान कलाकारांच्या गायनाने आणि अर्थात मंगला खाडीलकरांच्या गोळीबंद निवेदनाने ती मैफल उत्तरोत्तर रंगत गेली होती. खळ्यांची गांणी प्रत्यक्ष त्यांच्या उपस्थितीत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहत होते. त्यातली आठवलेली काही गाणी -
कळीदार कपुरी पान,
काळ देहासी आला खाऊ,
या चिमण्यांनो परत फिरा रे,
श्रावणात घननीळा बरसला,
जाहल्या काही चुका,
एका तळ्यात होती,
शुक्रतारा मंदवारा,
बगळ्यांची माळ फुले,
लाजून हासणे,
गेले ते दिन गेले,
जय जय महाराष्ट्र माझा

ती लिंक शेअर केल्याबद्दल अनेक धन्यवाद! पुन्हा एकदा निवांतपणे बघता येईल.

जिज्ञासा म्हणताहेत ते पुस्तक होतं. मी कॉलेजात असताना वाचलं होतं. त्यातला कुमार गंधर्वांनी लिहिलेला लेख आम्हाला अकरावीत अभ्यासाला होता. आशाने लिहिलेल्या लेखाचं शीर्षक - 'आमचे छोटे बाबा'.
जिज्ञासा , पुस्तकाचं नाव सांगाल का? लायब्ररीत मिळतंय का पाहतो.

माधव गडकरींनी लताची दूरदर्शनसाठी मुलाखत घेतली होती. कल्पवृक्ष कन्येसाठी. मुली आपल्या वडिलांच्या आठवणी जागवताहेत, अशी ती मालिका होती. त्यातली पहिली अर्थात लताची. तुझ्या आवाजात गंधार आहे असं दीनानाथ तिला सांगायचे. वडील कोणतेतरी देवाचे नाव घेत, ते लताने त्यांच्या पद्धतीने घेऊन दाखवले होते.

मी बाळ ह्यांचं पुण्यातलं घर पाहिलंय. साधंच होतं. चहा दिला होता आम्हाला. त्यांचं देवघर पाहीलं होतं. त्यात त्यांच्या वडिलांच्या गुरूंचा फोटो होता. स्वै. घरात भाररतीताई स्वतःच भजी तळत होत्या.