'Living will' बद्दलची माहिती

Submitted by सुपरमॉम on 27 January, 2022 - 11:57

नमस्कार,

मधे एक Living will बद्दलचा लेख वाचण्यात आला. हे असणे खरेच जरुरीचे आहे का? कोणत्या वयोगटातील लोकांनी
करावे?
यावर माहितगारांची मते वाचायला आवडतील. मायबोलीवर मला काही सापडले नाही. आधीच यावर चर्चा झाली असेल तर लिन्क दिली तरी चालेल.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लेख मला आत्ता सापडत नाहीये. शोधून लिन्क देते सवडीने. पण माझ्या मते लिव्हिंग विल म्हणजे आसन्नमरण अवस्थेत असताना काय निर्णय घ्यावे याबद्दल त्या व्यक्तीने आधीच लिहून ठेवलेल्या सूचना. म्हणजे डॉक्टर्स वा घरच्या लोकांना ठरवणे सोपे जाईल.
भारतातले माहीत नाही पण इथे अमेरिकेत बरेचदा ऐकू येते याबद्दल.

इथे बरीच माहिती आहे https://livingwillforms.org/

ही तिथली व्याख्या :
A living will, also known as a ‘health care directive’, ‘advance directive’, or a ‘declaration’, is a form used for a person to give their rights as to how they would like to manage their end of life treatment. Mostly, the document is used to establish that if a person is to become in a vegetative state with death imminent that the individual would like to have food, water, and any artificial breathing be turned off and let them have a natural death.

राज्यानुसार कायदे वेगवेगळे आहेत. तुमच्या राज्यातले फॉर्म आणि डॉक्युमेंटेशन वाचून तुम्ही ठरवू शकता.

आमच्या राज्याप्रमाणे आमचे दोघांचे केलेले आहे. इथल्या सल्ल्यावर अवलंबून राहण्यापेक्षा तुमच्या प्रायमरी केअर फिझिशियनशी / वकिलाशी बोलणे चांगले. काही वेळा कंपनीच्या Employee Assistance Program (EAP) तर्फे सल्लागार पण असतात. त्यांच्याशी बोलू शकता

2022 कालनिर्णय च्या मागच्या पानावर या विषयावरील सविस्तर लेख आहे.

अवांतर- गेले काही दिवस आईबरोबर हॉस्पिटलमधे आहे. आणि आजूबाजूचे अतिजेष्ठ जर्जर रूग्ण, त्यांचे हाल, भांबावलेले जवळचे नातेवाईक इ. जवळून पाहतेय. त्यात विमा नसेल तर त्यांना येणारा ताण, काही केसेस मधे लढाई आधीच हरलेली असणे ... अशा वेळेस living will ची गरज पटतेय.

धन्यवाद सगळ्यांना. मेधा, हो, वकिलाशी बोलणे करणार आहेच . पण थोडी प्रिलिमिनरी माहिती गोळा करतेय आधी. होमवर्क Happy
माझ्या डोक्यात एक किडा आला होता त्याबद्दल. जरी अशा सूचना आधीपासून लिहून ठेवल्या असल्या तरी प्रत्येक परिस्थिती वेगळी असते ना. समजा एखाद्या व्यक्तीने लिहूनही ठेवले की माझा व्हेंटिलेटर काढून घ्यावा तशी व्हेजिटेटिव अवस्था आली तर- पण कुटुंबाला वाटतेय कदाचित थोड्या काळाने सुधारणा होईल. तर मग i think it will be heartbreaking for them if hospital decides to switch off the ventilator.

आत्ताच एक केस वाचली इथली- त्यात हॉस्पिटल ने जेव्हा लाईफ सपोर्ट काढायची तारीखही नक्की केली तेव्हा त्या व्यक्तीच्या बायकोला कोर्टात लढा देऊन ते थांबवावे लागले नि त्या पेशंटला दुसरीकडे हलवून वेगळी ट्रीट्मेंट दिल्यावर त्यात सुधार दिसू लागला. मला वाटते तो गेला काही काळानंतर- पण तो थोडेही जास्त दिवस जगला तरी कुटुंबासाठी ते महत्वाचे.

<<पण तो थोडेही जास्त दिवस जगला तरी कुटुंबासाठी ते महत्वाचे.>> यासाठीच लिव्हिंग विलची गरज असावी. त्याच्या इच्छेनुसार व्हावे, कुटुंबाच्या नाही.

अर्थात हे विल खूप आधी करून ठेवलं आणि एवढं वय / जीवघेणा गंभीर आजार नसताना सिरीयस अपघात / कोव्हीड सारखं इन्फेक्शन आणि ते खूप सिरीयस झालं, ई. तर त्यासाठी वापरत नसतील.

एकंदरीत विलचे drafting सोपे नसावे.

इकडे पण अरुणा शानबाग मॅडमच्या केसनंतर अलावूड आहे बहुदा लिव्हिंग विल, माननीय सु कोर्टाचा निकाल आहे. लॉ करत असताना एक प्रोजेक्ट केला होता ह्यावर, टेरी शियाव्हो (?) अशी काहीतरी यु एस केस पण अभ्यासली होती तेंव्हा..

<<पण तो थोडेही जास्त दिवस जगला तरी कुटुंबासाठी ते महत्वाचे.>> यासाठीच लिव्हिंग विलची गरज असावी. त्याच्या इच्छेनुसार व्हावे, कुटुंबाच्या नाही.-
बरोबर आहे मानव. पण प्रत्येकाच्याच मृत्यूच्या वेळची परिस्थिती वेगळी असू शकते. ती व्यक्ती जर व्हेजिटेटिव अवस्थेत असेल तर रॅशनल निर्णय घ्यायच्या अवस्थेत नसेलच. अशा वेळी जे भानावर आहेत त्यांनी घेतलेला निर्णय बरोबर असण्याची शक्यता जास्त नाही का?
तसेच इथे अमेरिकेत काही लोकांच्या मते अगदी वीस बावीस वर्षांच्या लोकांचेही हे विल असावे. त्याबद्दल मी बरीच साशंक आहे.

मग या विलचा नक्की उपयोग काय?
आपण त्या अवस्थेत निर्णय घेऊ शकणार नाही म्हणुन हे विल करून ठेवणार ना?

तरी तुम्ही दिलेले उदाहरण सोडून दुसरी वेगळी काही परिस्थिती येऊ शकते, ज्यावेळेस काय करावं याबाबत डॉक्टर-कुटुंबीय यांच्यात संभ्रम होऊ शकतो. अशा वेळेस अपल्यावतीने कोणी निर्णय घ्यायचा हे आपण विल मध्ये नमुद करून ठेवायचं.

अशा वेळी जे भानावर आहेत त्यांनी घेतलेला निर्णय बरोबर असण्याची शक्यता जास्त नाही का?>> नाही.
जर विल केलेलं असेल तर भानावरच्या मंडळींच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली पाहिजे. तरच काही अर्थ. कोर्टाने यात पडून नक्की काय झालं? मला केस माहित नाही, सो फार बोलण्यात अर्थ नाही. पण काही दिवस जास्त आयुष्य अ‍ॅट द कॉस्ट ऑफ??
भविष्यातील निर्णयांचा मेस आणखी वाढला असेल मला वाटतं.
जर लिहुन ठेवलं आहे, आणि घरच्यांना तो माणूस हवाय म्हणून त्याची सपोर्ट सिस्टिम काढणार नसतील तर त्याला अर्थ काय राहिला?

हा लेख पेवॉलच्या मागे असल्याने वाचता नाही येते. या महिन्याचे फ्रीबीज संपले बहुतेक.
वरचा प्रतिसाद लिहिला तेव्हा 'नंतर मत बदललं तर ?' हा विचार डोक्यात आलेला. पण नंतर मत बदललं तर विल बदलायचं. विल बदलायच्या परिस्थितीत मेंदू राहिला नाही, किंवा सगळं इतक्या पटकन झालं की विल बदलायची इच्छा होती, मानसिक स्थिती होती पण ते करणं झालं नाही. तर आय डोंट नो.. टू बॅड!
विल मध्ये बर्‍यापैकी डीटेल मध्ये डूज आणि डोंट्स असतील ना? दोलायमान स्थिती येणार असेल तर कुणाला (उदा. पार्टनर) तो निर्णय आयत्यावेळी व्हिटो करता येईल असं काही क्लॉज टाकता येतं का? तो पार्टनर राहिला नाही तर मग फॉल बॅक विल.
आता मरताना प्रॉपर्टीचं विल बदलावसं वाटलं पण बदललं नाही तर शेवटच्या विल नेच विल्हेवाट लागत असेल ना?
विल करताना सगळ्या शक्यतांचा विचार लॉयर/ डॉक्टर करायला सांगेलच ना? त्यातुन काही निसटलं तर नशिब. जीवन असंच असतं म्हणायच. त्यासाठी सगळं विलच हवेत भिरकवायचं का?

काही दिवस जास्त आयुष्य अ‍ॅट द कॉस्ट ऑफ??
भविष्यातील निर्णयांचा मेस आणखी वाढला असेल मला वाटतं.....
अमितव, थोडं अधिक सविस्तर लिहिणार का?
मी जरा जास्त इमोशनल होत असेन या बाबतीत - पण मला वाटतंय की अमुक एक व्यक्तीने आयुष्यात एक निर्णय घेतला तरी त्या त्या वेळची परिस्थिती वेगळी असू शकते. मला नीट एक्स्प्लेन करता येत नाहीय कदाचित.

<< अशा वेळी जे भानावर आहेत त्यांनी घेतलेला निर्णय बरोबर असण्याची शक्यता जास्त नाही का? >> नाही. ती व्यक्ती स्वतः भानावर असताना घेतलेला निर्णय आहे तो. त्या व्यक्तीचा स्वतःचा निर्णय डॉक्टर मानतात किमान अमेरिकेत तरी.

<< त्या त्या वेळची परिस्थिती वेगळी असू शकते. >> जर त्या व्यक्तीचा निर्णय झाला नसेल तर स्पाऊस किंवा इतर कुणाला नॉमिनेट करू शकता जे तुमच्या वतीने निर्णय घेतील.

एक कॉपी वकिलाकडे ठेवा, एक घरी, एक प्रायमरी केअर डॉकटरकडे ठेवा आणि कधी हॉस्पिटलमध्ये गेलात तर तिथे द्या.

मृत्यूच्या दारात असताना अनेकदा माणसाची जगण्याची इच्छा अनावर होते असा अनुभव एका क्रिटिकल केअर फिजिशिअनने त्या लेखात मांडला आहे.
मरणाच्या दारात असणार्‍याची स्वतःचीच इच्छा, इतरांची नव्हे.

>>> विल करताना सगळ्या शक्यतांचा विचार लॉयर/ डॉक्टर करायला सांगेलच ना? त्यातुन काही निसटलं तर नशिब. जीवन असंच असतं म्हणायच. त्यासाठी सगळं विलच हवेत भिरकवायचं का?
खरं आहे, याबद्दल माहिती नाही, मिळवायला हवी.

यात चूक/बरोबर ठरवणं अशक्य आहे, इतकंच. विशेषतः त्या निर्णयाचे परिणाम भोगत ज्या मागे राहिलेल्यांना जगायचं असतं त्यांच्यासाठी.

स्वाती, तुझा लेख पूर्ण वाचता नाही आला मला. पण असंच काहीसं. जरा विचार करून लिहिते सविस्तर.
सगळ्यांची मतं अगदी काळजीपूर्वक वाचतेय.

<< एका क्रिटिकल केअर फिजिशिअनने त्या लेखात मांडला आहे. >> कुठल्या?

या विषयातील इच्छुकांनी डॉ.अतुल गवांदे यांचे Being Mortal हे पुस्तक वाचावे अशी शिफारस करीन.

<< विशेषतः त्या निर्णयाचे परिणाम भोगत ज्या मागे राहिलेल्यांना जगायचं असतं त्यांच्यासाठी. >> मागे राहिलेल्याना निर्णय घेताना त्रास होऊ नये म्हणूनच विल करायचे असते. त्यांची इतकी काळजी वाटत असेल तर विल न करण्याचा पर्याय आहे.
Living will म्हणजे medical power of attorney (can be part of living will or a separate document) चा उद्देश हाच असतो की तुमचा उद्देश काय आहे, तुम्हाला स्वत:ला काय हवे आहे. उदा. मरणासन्न अवस्थेत तुम्हाला जगायचे आहे की नाही, तुम्ही पेनकीलर वापरणे पसंत कराल की नाही, क्रिमेशन करायचे आहे की नाही, अवयवदान करायचे आहे की नाही? वगैरे.

हो, कठीण असू शकतं.

उ.बो., मी वरती लिंक दिली आहे तो न्यूयॉर्क टाइम्समधला लेख.
'बीइंग मॉर्टल' वाचलं आहे - ते खरंच चिंतनीय होतं.

Good for you! Happy

लेख वाचला. अजुन प्रोसेस झाला नाही म्हणणार, पण चटकन डोक्यात आलेले विचार..
१. हे विल करण्याची वेळ लांबवावी. बर्‍यापैकी म्हातारपण आले की करावे. थोडक्यात फिजिकली धडधाकट असताना करू नये.
२. विल मध्ये फार स्पेसिफिक गोष्टी लिहाव्या. ब्लॅकेट स्टेटमेंट करू नये (मला वाटतं, डॉ/ वकिल असंच सांगत असतील)
३. मर्फीज लॉ प्रमाणे लिहिलेल्या गोष्टींच्या विपरित गोष्ट घडून हॉस्पिटल मध्ये जाण्याची आणि जवळच्यांवर निर्णय घ्यायची वेळ येईल. तर वय झालं की जवळचा खंबीर मनाच्या व्यक्तीला आपली फिलॉसॉफी सांगत रहावं. मला वाटतं डॉ. गवांद्यांच्या वडीलांनी असंच केलं होतं. (आत्ता एकदम त्यांचा शिरा खाण्याच्या प्रसंग आठवुन अंगावर काटा आला)
४. नळ्या घाला किंवा घालू नका या लेव्हलला जाऊन लिहिण्यापेक्षा आपल्याला आयुष्यात 'राम' आहे किंवा नाही हे कशाने वाटेल ते डिस्कस करावे. उदा. खाता, पिता येणार नसेल, पलंगावरुन आपले विधी करायला ही परस्वाधिनता येणार असेल तर राम नाही. मित्रांबरोबर गप्पा मारता येणार नसतील तर राम नाही. इ. आता हॉस्पिटल मधले डॉ म्हणाले की ह्या प्रोसेसने जीव वाचेल पण राम मिळण्याची शक्यता १० टक्क्याहुन कमी असेल तर काय तो निर्णय ती व्यक्ती घेईल. अशा वेळी कदाचित वर्षभर नळ्यालावुन रहावं लागेल पण नंतर सध्याच्या सॅटिस्टिक्स प्रमाणे राम मिळणार असेल तर जीव वाचवावा. यात नळ्या लावण्यावरची डिपेंडंसी जीवनानंदावर आली आणि निर्णय प्रक्रिया सुलभ झाली.
हे निर्णय कुणी घ्यावे हे मात्र जरुर लिहावे असं वाटतं. आप्तेष्टांवर उगाच बोच राहू शकते.
५. हे विल जर काम करत नसेल असं तज्ज्ञांचे मत असेल तर कायद्यातुन काढून टाकावे.

<< Good for you! > Absolutely. Cancelling NYT subscription is a nightmare. Read about it online yourself.

<< १. हे विल करण्याची वेळ लांबवावी. बर्‍यापैकी म्हातारपण आले की करावे. थोडक्यात फिजिकली धडधाकट असताना करू नये. >> चूक. विल बदलता येते. सर्व सज्ञान व्यक्तीने हे विल करावे. मग टेरी शायवोसारखी परिस्थिती येत नाही. खर्च परवडत नसेल तर जवळच्या लायब्ररीत जावे, ते फुकटात लीगल डॉक्युमेंटला access देतील.

५. हे विल जर काम करत नसेल असं तज्ज्ञांचे मत असेल तर कायद्यातुन काढून टाकावे.
>> Medical power of attorney काम करते. ती असेल तर तुमचा स्पाऊस, मुले, मित्र, शेजारी काय म्हणतात याला काही महत्त्व नाही, तुमची इच्छा महत्त्वाची ठरते.

थोडक्यात फिजिकली धडधाकट असताना करू नये. >>> का? उलट फिजिकली आणि मेन्टली शाबूत असतानाच असे निर्णय घ्यावेत.

लिव्हिंग विल आणि इस्टेट विल दोन्ही करून ठेवावित. वयाची आडकाठी किंवा अट काही नसते.

मेडीकल सायंस फार वेगात बदलतं. आज माहित नसलेल्या गोष्टी उद्या माहित होतात. मतं बदलतात. इआर मध्ये आल्यावर विल बदलणे (शुद्ध हरपल्याने इ.) शक्य नसते. आता मेडिकल रेकॉर्ड मध्ये आहे म्हणून २१ वर्षाच्या मुलाला कृत्रिम श्वासोच्छावास डॉ. ने नाकारणे... हो कायद्याने बरोबर आहे. पण माझ्या मनाला बरोबर वाटत नाही. इथे मी मला स्वतःला त्या २१ वर्षे मुलाच्या जागी कल्पतो आहे. माझा मुलगा इ. भावनिक होत नाही आहे. मी २१ वर्षी मला असलेल्या मच्युरिटीतून विल केलं असतं तर.. असा विचार आज केला तर पुलाखालुन बरंच पाणी गेल्याने हास्यास्पद वाटतो आहे. म्हणून म्हटलं जिवनेच्छा रसरशीत असताना विल करू नये. तेव्हा जगायचा प्रयत्न करावा. परिस्थितीवर उपाय निघतात. आपलं शरीर काहीच्या काही जुळवुन घेणारं बनलेलं आहे. ते परिस्थितीशी जुळवुन घेते.

सिंडी, फिजिकली नो, मेंटली येस.
२५ वर्षी धडधाकट असताना नळ्या घालू नका वाटते. पण २५ वर्षीच इआर मध्ये गेल्यावर घाला आणि वाचवा वाटू शकते. तेव्हा विल बदलायची परिस्थिती असेलच असे नाही.
ती परिस्थिती आल्यावर वि. ती परिस्थिरी कल्पून घेतलेले निर्णय ... मल वाटतं फार वेगळे असतील. अगेन हे मी कल्पुनच सांगतो आहे... Happy धडधाकट असताना इमॅजिनेशनने फ्रेल परिस्थिरी निर्माण करुन काय करावे हे लिहिणे... फार कठिण असेल. कठिण अशा अर्थी, की ते काळ्या दगडावरची रेघ आहे असं लिहिणे आहे समजलं तर फार कठिण असेल.
मला आता वरचा लेख पटतोय वाटू लागलं आहे.

हे विल करण्याची वेळ लांबवावी. बर्‍यापैकी म्हातारपण आले की करावे. थोडक्यात फिजिकली धडधाकट असताना करू नये. >> माझे मत असे की सज्ञान व्यक्तींनी करावे. मत बदलले तर विल बदलता येते. जवळच्या, विश्वासू व्यक्तींना कल्पना देऊन ठेवावी .
फ्लिप साइड - वेळ प्रसंगी आपल्या निकटवर्तीयांच्या इच्छांचा मान ठेवावा , तसे करू याची हमी देऊन ठेवावी . ज्येनांच्याच नव्हे तर पुढे मागे आपापल्या समवयस्क कुटूंबीयांसाठी अशी परस्थिती येऊ शकते. त्यासाठी मनाची तयारी हवी . त्यांचा चॉइस आपल्या चॉइसच्या विरुद्ध असू शकतो याची तयारी हवी.

<< माझ्या मनाला बरोबर वाटत नाही. >> एक्झॅक्टली म्हणूनच लिव्हिंग विल पाहिजे. इथे पेशंटला काय पाहिजे, तेच महत्त्वाचे आहे. दुसऱ्या कुणाला काय वाटते, काय पाहिजे ते महत्त्वाचे नाही.

मग त्या दुसऱ्या कुणीतरी त्याचे/तिचे स्वतः:चे विल बनवावे आणि निर्णय घेण्याचा हक्क हवा त्याला द्यावा.

>><< माझ्या मनाला बरोबर वाटत नाही. >> एक्झॅक्टली म्हणूनच लिव्हिंग विल पाहिजे. इथे पेशंटला काय पाहिजे, तेच महत्त्वाचे आहे. दुसऱ्या कुणाला काय वाटते, काय पाहिजे ते महत्त्वाचे नाही. >> इथे विल करणारा आणि इआर मधला 'मी' एकच आहे.

इथे विल करणारा आणि इआर मधला 'मी' एकच आहे. >> मग तुमची इच्छा असेल तर मला वाचवायचा आटोकाट प्रयत्न करावा, मी लुळापांगळा झालो, कोमात गेलो तरी जिवंत ठेवावा असे लिहा विलमध्ये. त्याला ना नाही. शेवटी पेशंटची स्वतः:ची इच्छा महत्त्वाची आणि तेच सांगतोय मी.

ती परिस्थिती आल्यावर वि. ती परिस्थिती कल्पून घेतलेले निर्णय ... मला वाटतं फार वेगळे असतील. .....
अमितव, मला हेच म्हणायचं आहे.

सुमॉ, समजलं.
>>मग तुमची इच्छा असेल तर मला वाचवायचा आटोकाट प्रयत्न करावा, मी लुळापांगळा झालो, कोमात गेलो तरी जिवंत ठेवावा असे लिहा विलमध्ये. >> नाही. तुम्हाला फरक समजला नाहीये का? परत एकदा प्रयत्न करतो.
धडधाकट असताना मला लुळंपांगळं जगायचं नाही असंच मला वाटतं. पण त्याच बरोबर मला लुळंपांगळं जगण्याचा शून्य अनुभव आहे. तो अनुभव घेतल्यावर जर मला वाटलं की मी प्रॉडक्टिवली जगू शकतो तर मला मरण्याची इच्छा अजिबात नाही. मी प्रॉडक्टिव्हली जगू शकतो का नाही हे आज कसं ठरवू? ते मला शक्य नाही. हे विल मध्ये लिहून बाय डिफॉल्ट होण्यापेक्षा मला जमलं तर मी, नाही जमलं तर माझ्या जवळची व्यक्ती हा निर्णय त्या प्रसंगात घेईल. तो कोणी घ्यावा हे मी लिहुन ठेवेन, पण काय घ्यावा हे फार ग्रॅनुलर होईल ला? तेव्हा नक्की काय होईल हे आज सांगता येत नाही. व्हेजिटेशन स्टेट आणि लुळी-पांगळी स्टेट सारखी नाही. त्याचा इकडे आणि तिकडे ही बरंच काही असेल.
मी रहातो त्या देशांत लुळंपांगळं झालं तर (आणि कंडिशन अप्लाय) इच्छामरणाचा मला हक्क आहे. व्हेजिटेशन मध्ये जगवू नका इतपत नक्की लिहेन, पण त्यापुढे काही लिहिणार नाही. म्हणजे जगवा हेच अध्याहृत असेल. आणखी चाळीस वर्षांनी आणखी स्पेसिफिक समजलं, मेडीकल ज्ञान वाढलं, जीवनेच्छा कमी झाली आणि विचार बदलला तर अर्थात बदल करेन. पण आज नाही. तरुणांनी ही करू नये असं सांगेन.

>>>>>>पण त्यापुढे काही लिहिणार नाही. म्हणजे जगवा हेच अध्याहृत असेल.
हे भयानक महत्वाचे आहे. बाय डिफॉल्ट 'जगवा' हेच्च्च्च्च्च्च्च हवे.

वील करण्याचा निर्णय हा संपुर्णपणे व्यावहारीक आहे. इमोश्न्स वर आधारीत नाही. "ती परिस्थिती आल्यावर वि. ती परिस्थिती कल्पून घेतलेले निर्णय " यासाठी वील नाही. हा प्रश्न मनात येत असेल तर वील करूच नये. इथली मेडीकल सिस्टीम ही संपुर्ण व्य्क्तीच्या वैयक्तीक व्हॅल्यु सिस्टीम आणि इथिक्सचा आदर करावा ह्याला सर्वोच्च महत्व देते. समजा तुमच्या व्हॅल्युज तुम्हाला , 'हा निर्णय इतरांनी त्यावेळी घ्यावा ' अस सांगते तर तो ऑप्शन निवडावा. पण मुख्य विचार हाच आहे कि अ‍ॅज अ व्य्क्ती म्हणुन पर्सनल चॉइसेस्चा सन्मान व्हावा.
माझ्या टेस्टचे रिझल्ट हे फक्त मलाच कळवावेत की नातेवाईकांनाही सांगावेत , फोनवर सांगावेत कि मी अवाईलेबल नसेन तर मेसेजवर ठेवावेत इतके बारीक सारीक निर्णय म्हणुनच HIPPA release form भरताना आपल्याकडून घेतले जातात.
एक व्यक्ती म्हणुन जीवंत असताना स्वतःचे मरण कसे असावे आणि त्याच बरोबर कोणत्या लायकीचे जगणे असावे हे त्या व्यक्तीलाच ठरवू द्यावे असे साधारण गृहितक. (म्हणुन बरिअल कसे करावे, फुल कोणत्या रंगाची असावीत, मेन्यु काय असावा हे बारकाईने नोंद करतात लोक. हे जस्ट उदा म्हणुन लिहिले. वीलशी संबधीत नाही.)

म्हणून म्हटलं जिवनेच्छा रसरशीत असताना विल करू नये. तेव्हा जगायचा प्रयत्न करावा. परिस्थितीवर उपाय निघतात. आपलं शरीर काहीच्या काही जुळवुन घेणारं बनलेलं आहे. ते परिस्थितीशी जुळवुन घेते.>>
ह्याचा विलशी काय संबध कळले नाही . हे लिगल डॉक्युमेंट आहे. जीवनेच्छा रसरशीत वगैरेचा काही संबध नाही इथे. वील म्हणजे मरणाचाच विचार नव्हे. आणि इमोशनल निर्णय पणे नव्हे. जर इमोशनल निर्णय घ्यायचाच असेल तर जे होऊल ते होवु द्यावे. वील करणे कंप्ल्सरी नाही.
वील हे स्वतःच्या इच्छांचा आयुष्या च्या शेवटापर्यंत आदर व्हावा या साठी आहे.

फिजीकली धडधाकट असताना आणि तुम्ही रॅशनली विचार असतानाच वील करावे. अगेन मरणाचा विचार भयावह वाटत असेल तर वील इज नॉट फॉर दोज पीपल. तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती असतील तर लवकरात लवकर करणे योग्य.

उपाशी बोका उत्तम आणि योग्य माहीती असलेल्या पोस्टस.

मी प्रॉडक्टिव्हली जगू शकतो का नाही हे आज कसं ठरवू? ते मला शक्य नाही. तेव्हा नक्की काय होईल हे आज सांगता येत नाही. >>
तुम्ही लिव्हिंग विल with medical power of attorney मध्ये लिहिता ते तुमच्या proxy/नातेवाईकांसाठी (तुमच्या इच्छा कळण्यासाठी) आहे, डॉक्टरसाठी नाही. तुम्ही लिव्हिंग विलमध्ये लिहिलं म्हणजे डॉक्टर लगेच DNR कोड टाकत नाही. त्यात स्टेट लॉज, लीगल complications, ethical dilemmas असतात, एकदा वकीलाशी बोलून बघा, इतकेच सांगेन.

धडधाकट असताना मला लुळंपांगळं जगायचं नाही असंच मला वाटतं. पण त्याच बरोबर मला लुळंपांगळं जगण्याचा शून्य अनुभव आहे. तो अनुभव घेतल्यावर जर मला वाटलं की मी प्रॉडक्टिवली जगू शकतो तर मला मरण्याची इच्छा अजिबात नाही.>>
लुळपांगळ वगैरे असताना मरणाचे क्लॉज मध्ये वील मध्ये नाहीत. हायरारकी असलेले २-३ सिंपल प्रश्न आहेत.
मी ब्रेन डेड असेन आणि मेडीकली जगण्याची शक्यता नसताना काय करावे आणि हे करण्यासाठी पेशंटने काय लिहिले आहेक्ते किंवा त्याच्या नातेवाईकांनी तो निर्णय घ्यावा का हा निर्णय वील मध्ये सीलेक्ट केला जातो.

त्यात स्टेट लॉज, लीगल complications, ethical dilemmas असतात, एकदा वकीलाशी बोलून बघा, इतकेच सांगेन.>>
एक्झॅटली. Happy तेच लिहायच होत.

छान चर्चा चालू आहे. सवडीने वाचते. पण काल अनिल अवचटांबद्दलची बातमी वाचत असताना त्यांनी असं लिहून ठेवलं होतं हे वाचलं. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीय आणि डॉक्टरांनी हा निर्णय घेतला. अर्थात बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच वेळेला डॉक्टर हे पेशंट आणि कुटुंबाबरोबर आधार मार्गदर्शनासाठी असतात. सो तोही मुद्दा महत्वाचा ठरावा. पण पेशंटनी लिहुन ठेवलं असेल तर निर्णय सोपा जाईल कदाचित.
अमितव म्हणाला तसं हा निर्णय लांबवलेला बरा किंवा लिहिताना वयाच्या 3 टप्प्यांसाठी वेगळ्या सूचना असाव्यात.
एक प्रश्न - अश्या लेखी सूचना असतील तर इन्शुरन्स कंपनी हि गोष्ट एन्फोर्स करू शकते का?

मला वाटते भारतात तरी असे लिविंग विल कायदेशीर नाही.

कुठलातरी जुना पेपर दाखवून नातेवाईक बोलले की हे बघा ह्याने लिहून ठेवले होते, ह्याला मरायचेच होते , आता उपचार बंद करा, तर डॉक्टर कायद्याच्या कचाट्यात अडकतील.

डॉकटर आणि हॉस्पिटल तर प्रत्येक एडमिशनला सगळे परत नव्याने लिहून घेतात, सह्या घेतात , एकाच कागदावर आधार कार्डसारखे सतत चालेल असे डॉक्युमेंट हॉस्पिटल ऍक्सेप्टच करणार नाही. तो कागद , त्यावरच्या सह्या व्हेरिफाय कोण करणार ?

https://timesofindia.indiatimes.com/india/why-registering-a-living-will-...

लिव्हिंग विल आणि इस्टेट विल दोन्ही करून ठेवावित. वयाची आडकाठी किंवा अट काही नसते. >>> इस्टेट विल बद्द्ल माहीत नाही (तुला ट्रस्ट तर म्हणायचे नाही?) पण लिव्हिंग विल बद्दल नक्कीच आणि धडधाकट असतानाच करावे. पुढे कितीही वेळा ते बदलता येते.

अनेक कंपन्यांच्या बेनिफिट्स मधे एक "लीगल बेनिफिट" असतो महिन्याला $१०-२० देउन. त्यात या बद्दलची कन्सल्टेशन्स फ्री असतात. विल व ट्रस्ट तर आजकाल बहुतांश ऑनलाइन करता येते व अशा सर्विसेस मधले लॉयर्स ते रिव्यू करतात.

अमित तुझा मुद्दा मला नीट समजला नाही. विल्/ट्रस्ट मधे सेसिफिक बाबी असतातच. त्या व्यतिरिक्त फ्री फॉर्म असे फारसे काही नसते.

या निमित्ताने आपल्या सर्व जवळच्या लोकांचा एक मेण्टल स्कॅन होतो एकदा - कोणाला आपण विल किंवा ट्रस्ट संबंधी जबाबदार्‍या देउ शकतो याबद्दल Happy

अमितव तुमचा मुद्दा लक्षात आला.
विल लौकर केले तर त्यात आपापल्या इच्छे/निर्धारानुसार, अपघात, अचानकपणे उद्धवलेल्या आजाराने अशी वेळ आली की पुढे डोक्यावर फरक आणि आयुष्यभर अंथरूणात पडून राहायचं आहे अथवा रिकव्हरी शक्यता अत्यंत कमी असलेल्या कोमात रहाणार आहोत तर सपोर्टवर मला जिवंत ठेऊ नये
असा/एवढ्याच अर्थाचा क्लॉज करुन करता येईल.

आता यात उद्या मेडिकल सायन्सच्या प्रगतीने असे पेशंट बरे होऊ शकतात, पण किती वेळ वाट पहाणार, तो पर्यन्त आपली आपली देखभाल करणार कोण, आपली आर्थिक परिस्थिती कशी इत्यादि बाबींवरून आपल्याला ठरवता येईल.

हा अर्थात वैयक्तिक प्रश्न आहे, एक शक्यता तेवढी मांडत आहे.
याला इतर कंगोरेही असू शकतील.

Death will साठी जर विल रजिस्टर्ड असेल आणि काही घोळ नसेल तर प्रोबेटची गरज नाही असं मला वकिलांनी सांगितलं.
लिव्हिंग विल बद्दलही काय नियम पहायला हवे.

पेन्सिल्व्हेनिया राज्यात ( आणि कदाचित इतर राज्यात देखील ) एखादी व्यक्ती स्वतःचे मेडिकल डिसिजन घेण्याच्या परिस्थितीत नसेल ( उदा कोमा ) तेंव्हाच लिव्हिंग विल मधल्या नोंदी विचारात घेतल्या जातात. पेशंटच्या फिझिशियनने तसे सर्टिफाय करावे लागते.
जोपर्यंत तुम्ही स्वतःचे निर्णय घेण्याच्या / कम्युनिकेट करण्याच्या परिस्थितीत आहात, तोवर लिव्हिंग विल विचारात घेत नाहीत.

शिवाय आमच्या इथे दोन ब्रॉड चॉइसेस आहेत
१. तुम्हाला काय हवे नको ते तुम्ही आताच नोंदवून ठेवा ( डायलिसिस, व्हेंटिलेटर इ )
२. तुम्ही डिसिजन मेकिंग कॅपसिटीत नसाल त्यावेळेस तुमच्या वतीने कोण डिसीजन घेईल त्यांचे नाव नोंदवून ठेवा. या व्यक्तीचे निर्णय डॉक्टर ग्राह्य मानतील .
त्यामुळे धडधाकट असताना जरी हे विल केले तर त्यात ऑप्शन दोन ला कोणाचे तरी नाव देऊन ठेवता येईल.

भावंडे / पार्टनर / मुले बाळे यांच्यातले वादविवाद थोडे तरी टळू शकतात

Pages