किरण माने प्रकरण का पेटले आहे ?

Submitted by गारंबीचा शारूक on 22 January, 2022 - 02:27

किरण माने प्रकरणाबद्द मला जे थोडेफार कानावर आहे ते असे की स्टार प्रवाह चॅनलवरच्या मुलगी झाली हो या मालिकेच्या शूटींगदरम्यान सेटवर काहीतरी घडले. त्यात महिला कलाकारांतर्फे प्रामुख्याने प्रामुख्याने श्रावणी पिल्ले , कविता म्हापसेकर आणि मूणाल देव यांच्या तक्रारींमुळे किरण माने यांना वाहीनीने काढून टाकले आहे. तर माने म्हणतात की त्यांनी सोशल मीडीयावर राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना काढून टाकले.

वरील माहीतीत काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा.

मी पण काम करता करता मायबोलीवर धागे काढतो. पण त्यामुळे मला एमएनसी कडून कधी नोटीस आलेली नाही. आमच्या एमएनसी मधे तुम्ही फावल्या वेळेत काय करता याला महत्व नाही. आमच्याकडे जे वर्क कल्चर आहे त्याप्रमाणे मी वेल ड्रेस्ड कामावर येतो. शूजचा टॉकटॉक आवाज करत कामे करत फिरतो तेव्हां लेडीज स्टाफ सुद्धा मला निरखून बघत असतो. पण मी ते काही मनावर घेत नाही. इतकं तर चालतंच. तर काय सांगत होतो, सकाळी सकाळी चकाकत्या फ्लोअरवरून मी टॉकटॉक आवाज करत माझ्या डेस्क कडे येतो आणि माझा ईमेल पाहतो तेव्हांच माझे निम्मे काम झालेले असते. मला आलेल्या इन्स्ट्रक्शन्स पाहून मी गालात हसतो आणि गालाला जीभ लावून विचार करतो. मग माझ्या अंडर असलेल्या सुंदर मुलींना बोलावून आजचा टास्क कसा करायचा हे ठरवून देतो. त्यानंतर दिवसभर मग फक्त त्यांच्याकडून मला काम करून घ्यायचे असते. या बाबतीत मी अत्यंत प्रोफेशनल असतो. कामाच्या दरम्यान एखादीला मला हात लावला किंवा टक लावून बघितले या गोष्टींना मी फाजील महत्व देत नाही. काम महत्वाचे असते. आजवर कधी विशाल कमिटीकडे तक्रार करायचेही मनात आलेले नाही. स्त्री पुरूष जवळ येणार, त्यात स्त्रियांना माझ्याबद्दल आकर्षण वाटणार हे नैसर्गिक आहे. आपणच समजून नाही घेतले तर मग स्त्रियांना काम करणे मुश्कील होऊन जाईल.

पण किरण मानेंबाबत हा विचार केला गेलेला दिसत नाही. असे का झाले ?? स्त्रियांचे डबल स्टँडर्ड असते का ?
आता तर त्या लढाईला ते जातीय रंग देण्यात येत आहे का याची कल्पना नाही. मालिकेला शूटींग न करू देण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. यात आता राजकीय पक्ष पण उतरले आहेत/ माझ्या फेसबूक फ्रेंडलिस्टमध्येही बरेच लोकं या प्रकरणाबद्दल लिहू लागले आहेत. त्यात काही तिरस्कारयुक्त प्रतिसाद बघून मन विषण्ण होतेय. आपल्या सर्वसमावेशक फ्रेंडलिस्टचा विचार न करता लोकं आपल्या वॉलवर भडकाऊ जातीयवादी पोस्ट कसे टाकू शकतात? की त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये ठराविक जातीधर्माच्या लोकांनाच प्रवेश असतो. असो, तो वेगळाच विषय झाला ..

तर हे प्रकरण अचानक चिघळण्याचे वा चिघळवण्याचे काय कारण आहे? कोण यात आपला फायदा शोधत आहे? कोण कोणाला भडकावत आहे? काय राजकारण यामागे खेळले जातेय? तेच ते, ईंग्रजांचेच का, डिवाईड अ‍ॅन्ड रूल ....

हे सारे प्रश्न यासाठीच की माझ्या फेसबूक वा व्हॉटसप फ्रेंडलिस्टमधील माझेच दोन कॉमन फ्रेंड मुर्खासारखे या प्रकरणावरून एकमेकांची जात काढत भांडताना गप्प बसून बघवत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या एमएनसी मधील सर इन्स्ट्रक्शन्स देतानाचे आणि काम करून घेतानाचे हे सीसीटीव्ही फुटेज आमच्या गुप्तहेरांच्या हाती लागले आहे.

Rofl Rofl

बिचार्‍या वर्जिनल ( आठवा नवरा माझा नवसाचा ) शाहरुखचे काही खरे नाही. ऋन्म्या शाहरुखची पाळे मुळे हलवुन सोडणार आणी शाहरुख त्याला बदड बदड बदडणार . Proud

ह्या विषयावर चर्चा करणे म्हणजे धूर्त राजकीय पक्षांच्या डाव पेचाला बळी पडणे.
कोण हा किरण .
जो व्यक्ती स्वतःचे खासगी वाद chavahtya वर मांडतो.
राजकीय पक्ष त्या मध्ये इंटरेस्ट घेतात
काही संघटना तोडफोड करतात.
ह्याचा अर्थ सरळ आहे .
लोक मूर्ख आहेत आम्ही त्यांना मूर्ख बनवू शकतो आणि जातीय वाद निर्माण करून राजकीय फायदा घेवू शकतो.
असा आत्म विश्वास सर्व राजकीय पक्ष ,सर्व सेना ,सर्व ब्रिगेड ह्यांना आहे.
आणि हे सर्व राजकीय नेत्यांचे प्यादे आहेत
ह्यांना स्वतःची अक्कल काय बुद्धी पण नाही.
लोकांनी स्वतः मूर्ख आहे ह्या वर शिक्का मोर्तब करण्यासाठी ह्या वादात पडूच नये
सर्व समस्या सुटतील म

ह्या विषयावर चर्चा करणे म्हणजे धूर्त राजकीय पक्षांच्या डाव पेचाला बळी पडणे. >>> राजकीय पक्षांचे धूर्त डावपेच अशा धाग्यांमुळे एक्स्पोज होतात. मला राजकारणात इंटरेस्ट नाही. पण राजकारणी फायदा घेत असतील तर आपल्यासारख्या जाणकारांनी न घाबरता मत मांडायला पाहीजे. जसे मी शाहरूख खानबद्दल मत मांडतो.

झोंबी विखारसरणीचे अनाजीपंतु जसे माबोवर आहेत तसेच ते सर्व सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या, फिल्मसिटी अन टिव्ही इंडस्ट्रीमधेही आहेत. आपल्या झोंबी विखारसरणीला न मानणारे, झोंबींच्या कृष्णकृत्यांना सर्वांसमोर आणु बघणारे, झोंबींचे विखारी मनसुबे धुळीस मिळवणारे लोक नेहमीच यांच्या अजेंड्यावर येतात अन मग कंपु करून अशा लोकांना त्रास दिला जातो हे सर्वशृत आहे.

किरण माने काही फार आघाडीचा अभिनेता नाही परंतु त्याने बर्‍याच चित्रपट अन मालिका केल्या आहेत. सडेतोड बोलणं हा त्याचा गुणधर्म असेल म्हणुन त्याने झोंबींना फटकावलं असेल. त्याचा राग मनात धरून झोंबींनी मालिकेत काम करणार्‍या इतर कणाहीन गांडुळांना वळवळायला भाग पाडून किरण मानेला बाहेर काढलं असावं. किरणच्या मूळ स्वभावामुळं त्याने याही प्रकाराला हाइप करून स्वतःची चांगलीच प्रसिद्धी करून घेतली आहे. किरण माने कोण आहे हे आता सर्वांनाच माहित झालं आहे. टिव्ही इंडस्ट्री मधे कशी का होईना प्रसिद्धी मिळाली की अजुनच चांगली कामे मिळतात. फार फार तर त्याला झोंबींच्या प्रॉडक्शन हाउसांमधे कामं मिळणार नाहीत. न का मिळेना, झोंबींव्यतिरिक्त इतर लोकांचीही प्रॉडक्शन हाउसं जोमात सुरू आहेत तसेच एकाला ५ मराठी वाहिन्यांवर सद्ध्या शेकड्यांनी मालिका सुरू आहेत.. त्यात त्याला कुठेही काम मिळेल.

आठवा नवरा माझा नवसाचा >>> पहिले सात ?>>>>>

नवरा माझा नवसा चा या सिनेमात अशोक सराफ सचीन ला सांगतो की आता आलेली गाडी वर्जिनल आहे.

कुठं होता वैनी?
कित्ती दिवसात आलाच नाहीत. मला काळजी वाटत होती वैनी कुठं असतील, कशा असतील, काय करत असतील.. इथे तुमचा रिप्लाय बघुन जीव की-बोर्डावर पडला..!!

Proud मी इथेच आहे डिजे. जाए तो जाए कहां, समझेगा कौन यहां, दर्दभरे दिल की जुबां !

काळजी बद्दल मंडळ आपले आभारी आहे.

इन्सान का इन्सानसे हो भाईचारा, यही पैगाम हमारा हे गाणे जो कोणी भसाड्या आवाजात गाईल त्याला / तिला मायबोली के हिमेश किंवा मायबोली की रानु मोंडल असा खिताब देण्यात येईल. मायबोलीचे प्रथम गायक हा पुरस्कार प्रदान करतील.

दोन्ही पार्ट्यांमधले हे प्रेम पाहून मानें विरोधक आणि समर्थक गटातल्या अभिनेत्र्यांचे गळाभेट सेशन टीव्हीवर दाखवतील. ते पाहून गहीवरलेले माने दोन्ही गटांना मुक्यानेच समर्थन देतील.

किरण माने काही फार आघाडीचा अभिनेता नाही परंतु त्याने बर्‍याच चित्रपट अन मालिका केल्या आहेत. >>>>>>> हो. मानबामध्ये राधिकाच्या भावाच पात्र केल होत त्याने. मुलगी झाली हो पण बघितलीये, तिथे पण छान काम केलय. सिरियल लाम्बवल्यामुळे बघायची सोडून दिली.

सध्या अनिता दाते त्याला सपोर्ट करत आहे.

झोंबी >>>>>>> झोम्बीज आठवल वाचून. चुकीच्या धाग्यावर आले की काय अस वाटल होत आधी.

खरे कोणालाच माहीत नाही.त्या मुळे कोणाचे समर्थन किंवा विरोध करण्याचे कारण नाही.
किरण माने ह्यांनी बीजेपी सरकार विरुद्ध पोस्ट केल्या म्हणून त्यांना मालिकेतून काढले?
२) मालिकेचे निर्माते bjp चे कट्टर समर्थक आहेत का की ते आर्थिक नुकसान सोसून फक्त पोस्ट करतो म्हणून त्यांना काढून टाकतील.
कोणता ही व्यावसायिक हा मूर्ख पना करणार नाही.
म्हणजे.
एक तर किरण माने हे कोणाचे तरी बाहुले आहेत त्यांचा उपयोग करून घेतला जात आहे .
किंवा मालिका निर्माते कोणाचे तरी बाहुले आहेत त्यांचा वापर करून घेतला जात आहे.
किंवा सर्व च ठरवून लिहलेले स्क्रिप्ट चे कलाकार आहेत लोकांना उल्लू बनवित आहेत.

औरंग्याचे पाय चाटनारा खुद्द स्वराज्यद्रोही अनाजिपंत होता हे त्याचा लाडका पणतू सोयीस्कर विसरला वाटतं>> ye दुःख/ दर्द खतम् ... वाळा लेख लिहिणारे तुम्हीच का असा प्रश्न कधी कधी पडतो.
इतका आंधळा द्वेष का? जर प्रवृत्तीचा द्वेष असेल तर आपली प्रवृत्ती द्वेष करता करता कशी होते असा विचार येतो का?

खरतर ह्या विषयावर लिहायला नकोच वाटत, पण त्या लेखात संवेदनाशील वाटणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या टोकाला पाहिलं तर अस्वस्थ वाटत म्हणून लिहिलं.
जर चुकलं असेल माझं मत किंवा आवडल नाही तर एडवांस मध्ये सॉरी

Dj ला स्वप्नी मनी अनाजी पंत दिसत असावा !
जास्त नकारात्मक सुद्धा नावडत्या व्यक्तीकडे आकर्षित करते बरं का ?
नाही म्हणजे या धाग्यावर पण तुम्ही विनाकारण अनाजी पंतु बद्दल उकरून काढलं .

नानबा, तुम्ही बरोबर ओळखलंत. अनाजी पंतुकड्या विखारी प्रवृत्तीबद्दलच लिहिलं आहे मी. इतर कोणताही हेतू नाही. अन् मला किंवा इतरांना सॉरी म्हणायचं काहीच कारण नाही. प्रत्येकाची मते असतात ती बिनधास्त मांडावीत.
कृतघ्न, विखारी, प्रतिगामी, बुरसटलेल्या, कारस्थानी प्रवृत्तींचा जमेल तेवढा प्रतिकार करावा... असं कोणी असेल तर इतरांना सोदाहरण दाखवावे म्हणजे एकेक करत प्रवृत्ती कमी होत जातात... हं.... आता एखादं चिवट कोडगं असतं म्हणा..!!

हा किरण माने उद्या bjp किंवा राष्ट्रवादी मध्ये सामील झाला तर आश्चर्य वाटून घेवू नका.
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए.

माध्यमिक शिक्षणाशी थोडीफार तोंडओळख असणार्‍या स्मृती इराणी देखील टिव्हीतून राजकारणात आल्या अन इतक्या वर्षांनंतरही ठाण मांडून बसल्या आहेत... उच्च विद्याविभुषित डॉ.अमोल कोल्हे देखील टिव्हीतून राजकारणात गेले. अन स्थिरावले.. मग समजा किरण माने आले तर एवढं विचित्र वाटण्यासारखं काही कारण असावं असं वाटत नाही.

Pages