किरण माने प्रकरण का पेटले आहे ?

Submitted by गारंबीचा शारूक on 22 January, 2022 - 02:27

किरण माने प्रकरणाबद्द मला जे थोडेफार कानावर आहे ते असे की स्टार प्रवाह चॅनलवरच्या मुलगी झाली हो या मालिकेच्या शूटींगदरम्यान सेटवर काहीतरी घडले. त्यात महिला कलाकारांतर्फे प्रामुख्याने प्रामुख्याने श्रावणी पिल्ले , कविता म्हापसेकर आणि मूणाल देव यांच्या तक्रारींमुळे किरण माने यांना वाहीनीने काढून टाकले आहे. तर माने म्हणतात की त्यांनी सोशल मीडीयावर राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना काढून टाकले.

वरील माहीतीत काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा.

मी पण काम करता करता मायबोलीवर धागे काढतो. पण त्यामुळे मला एमएनसी कडून कधी नोटीस आलेली नाही. आमच्या एमएनसी मधे तुम्ही फावल्या वेळेत काय करता याला महत्व नाही. आमच्याकडे जे वर्क कल्चर आहे त्याप्रमाणे मी वेल ड्रेस्ड कामावर येतो. शूजचा टॉकटॉक आवाज करत कामे करत फिरतो तेव्हां लेडीज स्टाफ सुद्धा मला निरखून बघत असतो. पण मी ते काही मनावर घेत नाही. इतकं तर चालतंच. तर काय सांगत होतो, सकाळी सकाळी चकाकत्या फ्लोअरवरून मी टॉकटॉक आवाज करत माझ्या डेस्क कडे येतो आणि माझा ईमेल पाहतो तेव्हांच माझे निम्मे काम झालेले असते. मला आलेल्या इन्स्ट्रक्शन्स पाहून मी गालात हसतो आणि गालाला जीभ लावून विचार करतो. मग माझ्या अंडर असलेल्या सुंदर मुलींना बोलावून आजचा टास्क कसा करायचा हे ठरवून देतो. त्यानंतर दिवसभर मग फक्त त्यांच्याकडून मला काम करून घ्यायचे असते. या बाबतीत मी अत्यंत प्रोफेशनल असतो. कामाच्या दरम्यान एखादीला मला हात लावला किंवा टक लावून बघितले या गोष्टींना मी फाजील महत्व देत नाही. काम महत्वाचे असते. आजवर कधी विशाल कमिटीकडे तक्रार करायचेही मनात आलेले नाही. स्त्री पुरूष जवळ येणार, त्यात स्त्रियांना माझ्याबद्दल आकर्षण वाटणार हे नैसर्गिक आहे. आपणच समजून नाही घेतले तर मग स्त्रियांना काम करणे मुश्कील होऊन जाईल.

पण किरण मानेंबाबत हा विचार केला गेलेला दिसत नाही. असे का झाले ?? स्त्रियांचे डबल स्टँडर्ड असते का ?
आता तर त्या लढाईला ते जातीय रंग देण्यात येत आहे का याची कल्पना नाही. मालिकेला शूटींग न करू देण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. यात आता राजकीय पक्ष पण उतरले आहेत/ माझ्या फेसबूक फ्रेंडलिस्टमध्येही बरेच लोकं या प्रकरणाबद्दल लिहू लागले आहेत. त्यात काही तिरस्कारयुक्त प्रतिसाद बघून मन विषण्ण होतेय. आपल्या सर्वसमावेशक फ्रेंडलिस्टचा विचार न करता लोकं आपल्या वॉलवर भडकाऊ जातीयवादी पोस्ट कसे टाकू शकतात? की त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये ठराविक जातीधर्माच्या लोकांनाच प्रवेश असतो. असो, तो वेगळाच विषय झाला ..

तर हे प्रकरण अचानक चिघळण्याचे वा चिघळवण्याचे काय कारण आहे? कोण यात आपला फायदा शोधत आहे? कोण कोणाला भडकावत आहे? काय राजकारण यामागे खेळले जातेय? तेच ते, ईंग्रजांचेच का, डिवाईड अ‍ॅन्ड रूल ....

हे सारे प्रश्न यासाठीच की माझ्या फेसबूक वा व्हॉटसप फ्रेंडलिस्टमधील माझेच दोन कॉमन फ्रेंड मुर्खासारखे या प्रकरणावरून एकमेकांची जात काढत भांडताना गप्प बसून बघवत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीच नाही.
आक्षेप त्यांनी राजकारणात यावे ह्याला बिलकुल नाही.
फक्त लोकांच्या भावना चेतावून त्यांना मूर्ख समजू नये .
हा आक्षेप आहे.
आणि तो सर्व विचारधारा असणाऱ्या प्रेतेक व्यक्ती ला आहे

काहीच नाही.
आक्षेप त्यांनी राजकारणात यावे ह्याला बिलकुल नाही.
फक्त लोकांच्या भावना चेतावून त्यांना मूर्ख समजू नये .
हा आक्षेप आहे.
आणि तो सर्व विचारधारा असणाऱ्या प्रेतेक व्यक्ती ला आहे>>>>>>> सौ टके की बात .

फक्त लोकांच्या भावना चेतावून त्यांना मूर्ख समजू नये .
हा आक्षेप आहे.>>

दिल्लीच्या जंतरमंतरवर एका मराठी सोंगाड्याने लोकांच्या भावना चेतवून सिंग साहेबा सारख्या पापभिरू, मीतभाषी, लोककल्याणकारी निर्णय घेणार्‍या, सर्व सामान्य जनतेच्या रोजी-रोटीची काळजी वाहणार्‍या माणसाला बाजुला सारून तसेच सलग १५ वर्षं जिने पदर खोचून, कंबर कसून दिल्लीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहर बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला त्या दिक्षीत बाईंसारख्या कष्टाळू स्त्रीला बाजुला करून केजरीवाल सारखा हुशार कोल्हा व मोदी सारखा लबाड लांडगा महामुर्ख जनतेच्या उरावर बसवला अन देशाच्या राजकारणाचा पुरता तमाशा केला त्या मराठी सोंगाड्याला आपण विसरता कामा नये.

किरण माने तसे किस झाड की पत्ती असं सकृतदर्शनी तरी वाटतंय. शिवाय त्यांचा आवाका तो केवढा असणार..??

किरण माने तसे नसावेत असं सकृतदर्शनी तरी वाटतंय. शिवाय त्यांचा आवाका तो केवढा असणार..??>>>>> आतापर्यंत हिंदी / मराठी बर्‍याच कलाकारांना त्यांच्या सिरीयल मधून काढण्यात आले आहे. त्यांनी त्या त्या वेळी निर्मात्यांशी बोलुन प्रश्न सोडवलाय. कांगावा करत राजकारण्याकडे नाही गेले. माने यांचा उद्देश स्पष्ट आहे. ते कलाकार म्हणून् मला ठीक वाटले, कॉन्फिडंट वाटले. पण आधी निर्मात्यांशी चर्चा न करता डायरेक्ट माजी संरक्षण मंत्र्यांना हाक मारतात याचाच गोंधळ आहे. तापल्या तव्यावर पोळी भाजणे बहुतेक.

आतापर्यंत हिंदी / मराठी बर्‍याच कलाकारांना त्यांच्या सिरीयल मधून काढण्यात आले आहे. त्यांनी त्या त्या वेळी निर्मात्यांशी बोलुन प्रश्न सोडवलाय. >> पाठीचा कणा हा अवयवच नसणार्‍या गांडुळांनी त्य त्या वेळी अन्याय सहन केला म्हणुन किरण मानेंना देखील कणाहिन समजणं ही त्या प्रॉडक्षन हाउस मधल्या अनाजी पंतुकड्यांची पहिली चूक असावी.
कदाचित किरण मानेंना त्या शिरेलीच्या प्रॉडक्शन हाऊस मधील अनाजी पंतुकड्यांची कारस्थाने चव्हाट्यावर ठेवाविशी वाटली असतील म्हणुन त्यांनी योग्य त्या प्लॅटफॉर्मची मदत घेतली असावी.
सध्या मराठी टि.व्ही. इंडस्ट्रीत ५-५ चॅनेल्स असताना अन त्यावर शेकडो मराठी शिरेल्स्/कार्यक्रम अव्याहतपणे सुरू असताना किरण मानेंची गळचेपी होईल अन ते शांत बसतील अशा भ्रमात राहिलेल्या पणतुंना आता बिंग फुटण्याची भिती वाटू लागली असावी.

Dj तुम्ही योग्य च बोलत आहात .
तुमच्या विचारला विरोध नाही
पण लोकांना फक्त भावनिक प्रश्न आणि काल्पनिक भीती ह्या मध्ये अडकून ठेवून स्वार्थ साधणाऱ्या लोकांना विरोध हवाच
असे माझे मत आहे.

स्वार्थ कशात नाही हेमंतजी..? पैसे घेऊन परमार्थ दाखवणार्‍या किर्तनकारापासून ते देव भेटेल म्हणुन दक्षिणा मागणार्‍यांपर्यंत ठायी-ठायी स्वार्थ ठासून भरला आहे. फक्त आपण एवढंच करू शकतो की डोकं जाग्यावर ठेऊन विचार करून कुणाचा स्वार्थ लोक कल्याणाचा आहे अन कुणाचा स्वार्थ आपल्या घरच्यांचे, कंपुचे, चेल्या-चपाट्यांचे हीत जपण्यासाठी आहे हे ओळखून त्यातल्या त्यात खर्‍या माणसांच्या मागे उभे रहावे. अडचणित सापडलेल्यांच्या मागे उभे रहावे.

मुजोर, कारस्थानी, आतल्या गाठीच्या, विखारी विचारधारेची माणसे ही पिकांवर पडणार्‍या कीडीसारखी असतात. दिवसभर पिकांच्या कोवळ्यालुस्स पानांखाली दडून सुर्यप्रकाशापासून ती बचाव करतात अन रात्र झाली की त्याच कोवळ्यालुस्स पानांतून जीवनरस शोषून स्वतः टम्म फुगून विखारी पैदास वाढवत रहातात. वेळीच लक्ष दिले नाही तर संपूर्ण पिकाचा सर्वनाश होतो अन त्या पिकाबरोबर अन्नरस न मिळाल्याने कीडही मरून जाते.

आपणाला पिकाची काळजी घ्यायची आहे.. कीडीची नव्हे..! त्यामुळे लख्ख सूर्यप्रकाशात पिकांची पाने उलटी करून ही कीड इतरांना दाखवून त्यांना सावध करणे गरजेचे आहे.

पीक म्हणजे समाज अन कीड म्हणजे समाजद्रोही अनाजीपणतू यावरून काय ते लक्षात येईलच..!!!

स्वार्थ कशात नाही हेमंतजी..? पैसे घेऊन परमार्थ दाखवणार्‍या किर्तनकारापासून ते देव भेटेल म्हणुन दक्षिणा मागणार्‍यांपर्यंत ठायी-ठायी स्वार्थ ठासून भरला आहे. फक्त आपण एवढंच करू शकतो की डोकं जाग्यावर ठेऊन विचार करून कुणाचा स्वार्थ लोक कल्याणाचा आहे अन कुणाचा स्वार्थ आपल्या घरच्यांचे, कंपुचे, चेल्या-चपाट्यांचे हीत जपण्यासाठी आहे हे ओळखून त्यातल्या त्यात खर्‍या माणसांच्या मागे उभे रहावे. अडचणित सापडलेल्यांच्या मागे उभे रहावे.

मुजोर, कारस्थानी, आतल्या गाठीच्या, विखारी विचारधारेची माणसे ही पिकांवर पडणार्‍या कीडीसारखी असतात. दिवसभर पिकांच्या कोवळ्यालुस्स पानांखाली दडून सुर्यप्रकाशापासून ती बचाव करतात अन रात्र झाली की त्याच कोवळ्यालुस्स पानांतून जीवनरस शोषून स्वतः टम्म फुगून विखारी पैदास वाढवत रहातात. वेळीच लक्ष दिले नाही तर संपूर्ण पिकाचा सर्वनाश होतो अन त्या पिकाबरोबर अन्नरस न मिळाल्याने कीडही मरून जाते.

आपणाला पिकाची काळजी घ्यायची आहे.. कीडीची नव्हे..! त्यामुळे लख्ख सूर्यप्रकाशात पिकांची पाने उलटी करून ही कीड इतरांना दाखवून त्यांना सावध करणे गरजेचे आहे.

पीक म्हणजे समाज अन कीड म्हणजे समाजद्रोही अनाजीपणतू यावरून काय ते लक्षात येईलच..!!>>>>> Proud शेवटी गाडी जातिय द्वेषाच्या योग्य ट्रॅकवर विखारावर आली. Proud

ज्यांनी मानेंचे ट्विट बघीतले आहे / वाचले आहे कदाचीत त्यांना तो फरक कळेल. आपण कलाकार आहोत, धर्मनिरपेक्ष असावे लागेल याचा विसर पडल्याने असे झाले असावे. Happy

वैनी, मी एका अक्षरानेही ज्ञातीबद्दल लिहिलेलं नाही. किरण मानेंची ज्ञाती देखील मला ठाऊक नाही. तुम्हाला मात्र ती नक्कीच ठाऊक असेल. नाशकात तुमची एखादी मैत्रीण किंवा गेला बाजार शेजार-पाजार देखील त्याच ज्ञातीचे असू शकतात. त्यातून एखादी सुरस कथाही तुम्ही सर्वांना ऐकवालच अशी आशा नक्की करेन मी परंतू माझ्या लेखी ज्ञाती वगैरे घालू नका एवढंच विनम्रपणे सांगून मी थांबतो.

तुमच्या मनातील रोष कळून येतोय.. पण प्रत्येक दुसरा प्रतिसाद असाच देत राहिलात तर सिरियसनेस निघून जातो...
आणि प्रत्येक वेळी तुम्हाला उत्तर देणारे पण आहेत त्यामुळे त्यांचाही मुद्दा सिरियसली घेत नाही कोणी... सगळे स्किप करतात... मी देखील इग्नोर करतो.. वाचतही नाही...
प्रत्येक धाग्यावर हेच सुरु असते... बघा तुम्ही दोघेही विचार करून... अर्थात इग्नोर करायचा ऑप्शन तुम्हाला दोघांनाही आहेच....

वैनी, मी एका अक्षरानेही ज्ञातीबद्दल लिहिलेलं नाही. किरण मानेंची ज्ञाती देखील मला ठाऊक नाही. तुम्हाला मात्र ती नक्कीच ठाऊक असेल. नाशकात तुमची एखादी मैत्रीण किंवा गेला बाजार शेजार-पाजार देखील त्याच ज्ञातीचे असू शकतात. त्यातून एखादी सुरस कथाही तुम्ही सर्वांना ऐकवालच अशी आशा नक्की करेन मी परंतू माझ्या लेखी ज्ञाती वगैरे घालू नका एवढंच विनम्रपणे सांगून मी थांबतो.>>>>> डिजे, देवाने तुम्हाला खरोखर चांगली अशी विनोद बुद्धी पण दिलीय. तुमची लेखन शैली उत्तम आहे, उस्फुर्त आहे, तुमची तळमळ पण समजते. पण जसे सामान्य ब्रिगेडी ज्या भाषेत बोलतात तीच तुम्ही वापरता. किरण मानेंची जात काय आहे ते मला माहीत नाही आणी करुन पण घ्यायची नाही.

राष्ट्रवादी जेव्हापासुन सत्तेत आलीय तेव्हापासुन जातियवाद वाढलाय हे राज ठाकरे उगाच नाही बोलले. कोणी तरी एक ब्राह्मण चूक करतो, अख्ख्या ब्राह्मण समाजाला वेठीस धरले जाते, कोणी एक ब्राह्मण मुख्यमंत्री होतो लगेच त्याची आई बहीण काढली जाते, कोणी एक ब्राह्मण मुर्ख पणा करतो, अख्ख्या ब्राह्मण समाजाला शिव्या घालुन नकोसे केले जाते. पण याच ब्राह्मणांपैकी कोणी एकाने महाराणी येसुबाईंना औरंग्याच्या कैदेतुन सोडवले होते, नंतर महाराणी येसुबाईंनी सगळ्या स्वराज्य द्रोहींना सजा दिली. याच ब्राह्मणांपैकी कोणी तरी महात्मा फुलेंना आपली जागा दिली, त्याचे नाव नाही निघत. नाव फक्त महात्मांना त्रास देणार्‍याचे निघते. आगरकर, गोखले, चाफेकर, कान्हेरे, टिळक, राजगुरु असे अनेक फासावर गेले, समाजसुधारक झाले त्याचे नाव नाही निघत.

शेवटी तात्पर्य काय तर सोनोपंत डबीर हे महाराजांचे ( आता महाराज कोण हे कृपया विचारु नये ) वकिल लक्षात रहात नाहीत, पण कृष्णाजी भास्कर आणी अनाजीच लक्षात रहातो. खंडो बल्लाळ लक्षात रहात नाही, पण अनाजीच लक्षात रहातो. मुरारबाजी लक्षात रहात नाही पण अनाजीच लक्षात रहातो. चालू द्या.

डिजे, देवाने तुम्हाला खरोखर चांगली अशी विनोद बुद्धी पण दिलीय. तुमची लेखन शैली उत्तम आहे, उस्फुर्त आहे, तुमची तळमळ पण समजते.>> कसचं कसचं... तरिपण धन्स वैनी..!! Bw

पण जसे सामान्य ब्रिगेडी ज्या भाषेत बोलतात तीच तुम्ही वापरता. >> आता मराठी भाषा प्रांतवार बदलते.. नाशकातली, पुण्यातली, नागपुरातली, सिंधुदूर्गातली, सातारी, कोल्हापुरी, सोलापुरी सगळीकडची भाषा मराठी असली तरी त्यांचीही एक खासियत असते.. आता तुम्हाला ज्या ब्रिगेडी माणासांची भाषा अन माझी भाषा सारखी वाटत आहे कदाचित आम्ही एका प्रांतातले असू शकतो.

राष्ट्रवादी जेव्हापासुन सत्तेत आलीय तेव्हापासुन जातियवाद वाढलाय हे राज ठाकरे उगाच नाही बोलले.>> तरीच त्यांच्यासोबत भाजप्यांनी साडेतीन दिवसाचे सरकार स्थापायला पहाटेचा मुहुर्त काढला होता.. त्याच भाजप सोबत राज ठाकरेंना युती करण्याचे स्वप्नरंजन करण्याची सवय लागली आहे.

कोणी तरी एक ब्राह्मण चूक करतो, अख्ख्या ब्राह्मण समाजाला वेठीस धरले जाते, कोणी एक ब्राह्मण मुख्यमंत्री होतो लगेच त्याची आई बहीण काढली जाते, कोणी एक ब्राह्मण मुर्ख पणा करतो, अख्ख्या ब्राह्मण समाजाला शिव्या घालुन नकोसे केले जाते. पण याच ब्राह्मणांपैकी कोणी एकाने महाराणी येसुबाईंना औरंग्याच्या कैदेतुन सोडवले होते, नंतर महाराणी येसुबाईंनी सगळ्या स्वराज्य द्रोहींना सजा दिली. याच ब्राह्मणांपैकी कोणी तरी महात्मा फुलेंना आपली जागा दिली, त्याचे नाव नाही निघत. नाव फक्त महात्मांना त्रास देणार्‍याचे निघते.>> असं कसं म्हणता वैनी? अहो संत ज्ञानेश्वरांना तर किती यातना दिल्या परंतू त्यांचे नाव निघत नाही का..? दाभोळकर, कलबुर्गी यांना तर ठार मारले तरी अजुनही नाव निघतेच...

आगरकर, गोखले, चाफेकर, कान्हेरे, टिळक, राजगुरु असे अनेक फासावर गेले>> (पॉइंट टु बी नोटेड मिलॉर्ड..!!)

शेवटी तात्पर्य काय तर सोनोपंत डबीर हे महाराजांचे ( आता महाराज कोण हे कृपया विचारु नये ) वकिल लक्षात रहात नाहीत, पण कृष्णाजी भास्कर आणी अनाजीच लक्षात रहातो. खंडो बल्लाळ लक्षात रहात नाही, पण अनाजीच लक्षात रहातो. मुरारबाजी लक्षात रहात नाही पण अनाजीच लक्षात रहातो. चालू द्या.>> यावरून अनाजी, कृष्णाजी किती महाभयंकर कपटी, कारस्थानी, अन्नात विष कालवणारे, खाल्ल्या घराचे वासे मोजणारे, गोतास काळ ठरणारे कुर्‍हाडीचे दांडे होते हेच सिद्ध होते..!! दॅटस ऑल माय लॉर्ड..!!!
Submitted by रश्मी. on 27 January, 2022 - 06:36

देशपांडे हे ब्राह्मण, सिकेपी आणी सारस्वतांमध्ये आहे. ज्या समाजाची काळी बाजू राजकारणी जनतेला सतत दाखवतात, तशी आपल्या समाजाची का नाही? आपल्या विरोधी समाजाची पांढरी बाजू पण कधी तरी दाखवा की. का जनतेत फुट पाडतात? दरवेळेस अनाजी तुम्ही दाखवता तसे खंडो बल्लाळला पण लक्षात ठेवा. मान्य आहे आणी केले पण आहे की सत्तेच्या नशेत ब्राह्मणांनी खूप कर्मठपना दाखवुन संत ज्ञानेश्वरांपासुन पार सामान्य जनतेला पण पिडले. महान घोडचूका होत्या त्या. पण आज त्या चूका कोणी करतेय का? नाही ना? आणी जे करतात त्यांना जागा दाखवुन द्या.

<<<<यावरून अनाजी, कृष्णाजी किती महाभयंकर कपटी, कारस्थानी, अन्नात विष कालवणारे, खाल्ल्या घराचे वासे मोजणारे, गोतास काळ ठरणारे कुर्‍हाडीचे दांडे होते हेच सिद्ध होते..!! दॅटस ऑल माय लॉर्ड..!!!>>>>>>> फक्त अनाजीच? गणोजी, मल्हारराव शिर्के, मंबाजी, सुर्याजी हे कोण होते मग? महाराजांचे हितचिंतक?

आणी जे करतात त्यांना जागा दाखवुन द्या>>>
मला वाटतं डीजे तेच करत आहेत
सर्व ब्राह्मण दोषी आणि अनाजी चे पणतू नाहीयेत हे आहेच ना
मग कशाला आपण आपल्याला लावून घ्यायचं
मीही देशस्थ ब्राह्मण आहे पण डीजे ची टीका मला नाही खुपत
त्यांची भाषा टोकेरी विषारी असेलही पण मेबी त्याचेही काही कारण असेल

आणि हा वाद कधीच संपणार नाहीये हेही माहिती आहे, फेसबुकवर फक्त विजयस्तंभ आणि 1 जानेवारी घटनेवरून होणारी हाणामारी वाचा, इथली भाषा खूपच सौम्य वाटेल

सगळ्यांनी सलोख्याने राहावं हा आदर्शवाद झाला, आपण ते काय घडवून आणू शकत नाही, पण आपण अपल्यापुरता बदल घडवून आणू शकतो नी मला खात्री आहे वैयक्तिक आयुष्यात तुम्हीही तसा बदल घडवून आणला असणारच
तुमची कळकळ समजू शकतो आणि डीजे यांची टीका ही
आणि दोघेही आपल्या जागी बरोबर आहेत असं वाटतं

हुश्श Happy

समाजद्रोह्यांना भिंग लाऊन बघण्यात स्वारस्य नाही.
जिथे कुठे हे असे अनाजीपंतुकड्या विखारी विचारधारेचे पणतु दिसतील तिथल्या इतर जनतेला त्यांच्यापासून वेळीच सावध करणे अन समाजस्वास्थ्य जपणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्यच आहे. तेच कर्तव्य कदाचित किरण मानेंनी केलं असावं. एखाद्याला टार्गेट करून त्याच्या मागे कुचाळक्या करून, वरिष्ठांचे पाय चाटून आपली अंडी-पिल्ली ठेचायला निघालेल्या माणासास कपट-कारस्थानाने बाहेरचा रस्ता दाखवला जातो हेच यानिमित्ताने किरण मानेंना अधोरेखित करायचे असावे.

ह्म्म.... मग तुम्हाला नाही लवकर लक्षात येणार. त्यात किरण माने हे हिरवीणीच्या भावाच्या रोल मधे होते. Bw

किरण माने ह्यांचा वैयतीक अनुभव अगदी खरा असेल असे समजुया ..
त्याची भरपाई म्हणून त्यांना त्याच मालिकेत काम मिळावे.
इथ पर्यंत ठीक आहे.
पण त्यांनी जाती च आधार घेवून स्व स्वार्थासाठी समाजात विष पेरू नये
अन्याय झाल्यावर च जात आठवते,धर्म आठवतो,भाषा आठवते.
जो पर्यंत फायदा होत आहे .
तो पर्यंत जाती विषयी आपले काही कर्तव्य आहे,धर्म विषयी आपले काही कर्तव्य आहे,ह्या मराठी राज्या विषयी आपले काही कर्तव्य आहे

हे का ह्या लोकांना आठवत नाहीं

जाती च आधार घेवून स्व स्वार्थासाठी समाजात विष पेरू नये>> ज्ञातीचा आधार घेऊन कंपूगिरी करून इतरांना भयंकर त्रास देणाऱ्या, त्रास निमुटपणे न सोसणाऱ्या इतरांच्या पोटावर पाय आणणाऱ्या कपटी, कारस्थानी, आतल्या गाठीच्या, अणाजी पंतूकड्या विखारी विचारसरणीच्या लोकांना काय समाजात अमृत शिंपडणारे म्हणावं का?

Dj.
तुम्ही म्हणता तशा लोकांना काही ही दयामाया न दाखवता ठेचलेच पाहिजे हे माझे पण मत आहे.
पण समाजात उभी फट पडू नये असे पण मनापासून वाटतें

पण समाजात उभी फट पडू नये असे पण मनापासून वाटतें>>+++++१११११

तेच तर हवंय हेमंत सर.
समाजात फुट पाडणार्‍यांचे हेतू केवळ अन केवळ स्वतःचा उदो-उदो करणं, स्वतःचं वर्चस्व वाढवणं, स्वतः कडेच संपत्ती खेचणं हे असतं... ते करताना इतरांवर अन्याय झाला, त्यांच्या पोटावर पाय आला, जीवही गेला तरी ते फूट पाडणार्‍यांसाठी बेहत्तर असतं.

Pages