ईज्जत द्या

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 January, 2022 - 12:41

मंगळवारी बायकोला लक्षणे दिसली.
बुधवारी तिची टेस्ट केली.
गुरुवारी तिचा रिपोर्ट आला.
कोविड पोजिटीव्ह!

बुधवारी मला लक्षणे दिसली.
गुरुवारी माझी टेस्ट केली.
शुक्रवारी माझा रिपोर्ट आला.
कोविड पोजिटीव्ह!

महेशच्या डॅम ईट स्टाईलमध्ये आपल्याच हातावर मूठ मारली आणि आनंदाने म्हणालो, येस्स!
त्याच उत्साहात बिग बॉसला फोन लावला. आता चार दिवस आराम करतोय, तू आणि तुझी कंपनी गेली तेल लावत हे सांगायला. अर्थात हे मनातल्या मनात. खरे तर कधी नव्हे ते त्याकडून थोडेसे आंजारून गोंजारून घ्यायचे होते. तर लावला फोन...

ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग..
हॅलो सर.. आमच्याकडे कोरोना आलाय.. न्यूज कन्फर्म आहे.. हातात रिपोर्ट आहे.
बर्र.. मग आता पंधरा दिवस घरूनच काम कर.
अहो सर, ते तर गेले दोन वर्षे करतच आहे. आता जरा आराम करतो.
हम्मम ठिक आहे.. बरे वाटेल तसे ये ऑनलाईन. होम क्वारंटाईनमध्ये तसाही दोन दिवसांनी कंटाळाच येतो. तेवढेच काम होईल. काम खूप आहे आपल्याकडे..... (अजूनही पाचदहा मिनिटे बोलले काहीबाही. वर्कलोड, डेडलाईन, डेडीकेशन, सॅक्रीफाईज, वगैरे नेहमीचे हुकुमी शब्द तेवढे ऐकू आले.)

पुढे मग एक मेसेज सोसायटीच्या व्हॉटसपग्रूपवर सोडला. तिथे आधीच गेल्या महिन्याभरात चार कुटुंबात कोरोना शिरलेला. त्यात आमचे पाचवे जोडले.

हेल्लो ऑल.. वुई हॅव बीन टेस्टेड कोविड पॉजिटीव्ह.. आई हॅव क्वारंटाईन माय फॅमिली... वुई आर अ‍ॅण्ड वुई विल टेक ऑल नेसेसरी प्रीकॉशन्स.... वगैरे वगैरे ईन्फॉर्मेशन कम शपथग्रहणाचा कार्यक्रम झाला. माझे कुटुंब माझी जबाबदारी तसेच आपली सोसायटीही माझीच जबाबदारी हे सांगून झाले. तसे धडाधड मेसेज येऊ लागले.

- थॅन्क्स फॉर इन्फॉर्मिंग
- सात दिन बच्चों को नीचे खेलने मत भेजना.
- सात दिन के बाद आपका फ्लोअर सॅनिटाईज करवा के लेना.
- सोलर से गरम पाणी नही आता है. टाईम चेंज करो. (अरे याचे काय मध्येच)
- सॅनिटाईजेशन करवाने वालेका का नंबर सेक्रेटरीसे ले लेना
- भेज दिया भाय, बोलने के पहले ही भेज दिया. अपना काम ऐसेही रहता है - ईति सेक्रेटरी

वैतागून मोबाईल बाजूला ठेवला. पण ईतक्यात रिंग वाजली. नगरपालिकेचा फोन आला.
म्हटलं वाह. मायबाप सरकारलाच आपली काळजी.

नाव गाव फळ फूल विचारून झाले. काही विशेष होत नाही ना विचारले.
मी म्हणालो विशेष नाही. पण जरा थंडी, ताप, घश्याला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, नाही म्हणायला सकाळपासना थोडं......
बर्र बर्र.. (पाल्हाळ पुरे) घरीच होम क्वारंटाईन व्हाल ना. अ‍ॅडमिट नाही होणार ना..
नाही, तितके काही झाले नाही. पण तुम्ही औषधांच्या गोळ्या देता ना.. (कोणीतरी सांगितलेले मला हे)
ते फक्त अ‍ॅडमिट झालेल्यांना. अ‍ॅडमिट व्हायचे असेल तर तसे सांगा - फोन कट

पुढचे काही तास पुन्हा एकलकोंडेपणात गेले. ईंडिया मॅच सुद्धा हरली. निराशेत निराशा.

संध्याकाळी पुन्हा मोबाईल खणखणला.. बचना ए हसीनोss लो मै आ गयाss (माझी रिंगटोन)
सोसायटीतील चौदाव्या मजल्यावरील मिस्टर देवरुखकर यांचा फोन. म्हटलं चला शेवटी देवांक काळजी..

ह्यँ ह्यँ ह्यँ ... कसं झालं? कसे आहात आता?
बरा आहे तसा. (मगासच्या अनुभवावरून पाल्हाळ लावू नये हे आता कळले होते)
काही नाही ओ कोरोना वगैरे. पहिल्यासारखे घाबरायचे त्यात काही राहिले नाही. दोन दिवसात व्हाल बरे. तुम्हाला कळलं कधी झालेल्याचे?
अं.., मला बुधवारी आणि हिला मंगळवारी..
सोमवारी काही नव्हते?
मला तरी नाही.. आणि हिलाही तसे नाहीच.. मंगळवारीच आम्ही डॉक्टरकडे गेलो. का काय झाले?
काही नाही हो. बरा होतोय चार दिवसात. काळजी घ्या. - फोन कट

देवरुखकरांचा फोन का? सोमवारी मी त्यांच्या बायकोशी पॅसेजमध्ये बोलत उभी होती बराच वेळ. म्हणून कन्फर्म केले असेल काळजीने - ईति माझी बायको

म्हणजे देवांक सुद्धा आपल्याच कुटुंबाची काळजी होती तर..

छ्या, शेवटी मित्र ते मित्रच म्हणत मी पुन्हा मोबाईल उचलला. पुन्हा व्हॉटसप ओपन केले. कॉलेजच्या खास मित्रांचा ग्रूप ओपन केला. आणि मेसेज टाकला...

या संडेचे गेटटूगेदर कॅन्सल रे.. आमच्या घरात कोरोना शिरलाय.. मी आणि बायको दोघे पॉजिटीव्ह

- तुझ्या नानाची टांग. तू दरवे़ळीसारखी टांग दे आम्हाला
- तू चु नको बनवूस ऋ
- रिपोर्ट टाक पहिला साल्या तू
- तू कसा येत नाही बघतो आम्ही

मरा साल्यांनो.. घाला आपली ईथेच.. क्वारंटाईन पिरीअड संपल्यावर बोलू.. - मी ग्रूपमधून लेफ्ट

--------------------------------------

नाही म्हणायला दुपारी नगरपालिकेचे कर्मचारी आले. घरभर सॅनिटायझर शिंपडून गेले. बोलले काहीच नाही. तरीही कृतीतून काळजी दर्शवून गेले. मला तर तेवढ्यानेही गहिवरून आले. असे वाटले त्यांना मुन्नाभाईसारखे जादूची झप्पी द्यावी. कोरोनाने ते ही शक्य नव्हते, जसे आले तसे ते गेले.

पण या सगळ्या अनुभवांनंतर मनाशी पक्के ठरवले,
आता कितीही वाटले तरी मायबोलीवर कुठल्याही धाग्यावर याची बिलकुल वाच्यता करायची नाही.

पण मी काय म्हणतो,
कोरोना झालेल्यांना सहानुभुती नको लोकहो..
पण निदान त्या कोरोनाला तरी ईज्जत द्या _/\_
- ईति ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळजी घ्या सगळ्यांनी

आम्ही पण आहोत, रिपोर्ट उद्या येईल.
बरोब्बर एक वर्षाने कोरोनाने पुन्हा गाठलंय वाटते आम्हाला. बघू नक्की काय आहे ते उद्या कळलेच

अजून कोण कोण ?
काळजी घ्या मृणाली, व्हीबी. लवकर बरे व्हां.

आम्ही पण सकुसप सापडलो लाटेत.
आधी सासू सासरे
मग आई बाबा
मग मी आणि मुलगा
मग नवरा आणि बहीण.
सगळे 2 2 दिवसांच्या अंतरावर.

नवरा नावापुरताच +ve आलाय. त्याचं बूस्टर डोस झाल्याने त्याला अगदी काही म्हणजे काही होत नाहीये.
मुलाचा 18 ला वादि, आधी वाटलेलं आता साजरा नाही करता येणार पण आम्ही सगळेच +ve आहोत त्यामुळे करणार दणक्यात घरातल्या घरात.

ऋ आणि परीचे ग्रीटिंग्ज फार सुंदर आहेत. इथे बघून मीमाझ्या मुलासाठी बनवलं तर त्याने ते फाडून टाकलं Proud

आशु, माझे सासरे 7 दिवसांनंतर पण +ve च होते बरं. त्यामुळे सरकार काही पण सांगो, लक्षणे असतील तर विलगीकरण बेटर.

सांभाळून! लक्षणे नसली तरी विश्रांती जरूरी. थोडी घरातली पार्टी हवीच Happy पण फार दगदग नको वाढदिवसाची.
हळूहळू कोव्हीड पॉझिटीव्ह नाही म्हणजे भलतेच माणूसघाणे दिसतात असे म्हणायची वेळ येणार आहे.

मला लक्षणे काहीच नाहीत शनिवारी रविवारी ताप होता तोही माईल्ड
पण डॉ म्हणाले म्हणून टेस्ट केली ती पॉझिटिव्ह अली
म्हणून मग सात दिवस आयसोलेशन मध्ये राहिलो
आमच्या घरी वर आणि खाली आशा खोल्या आहेत वरच्या खोल्यानं स्वतंत्र टॉयलेट बाथरूम त्यामुळे मला वरच्या मजल्यावर अडकवून घरचे सगळे निवांत राहिले
जेवण चहा कॉफ़ी आणून देत होते
भांडी आणि कपडे वरच्याच बाथरूम मध्ये धुवून टाकत होतो
त्यामुळे कोणाला व्याप नाही, फक्त वर खाली करून घरचे दमले इतकेच

पण आता दोन दिवस झाले पोराला ताप आहे, त्याला डॉ कडे नेले तर ते म्हणाले सिजनल आहे काळजीचे कारण नाही

मी अजूनही घरात असताना पूर्ण वेळ मास्क लावूनच असतो (म्हणजे खाली असताना)

मी विचारलं परत टेस्ट करू का तर नको म्हणून सांगितले

मला सहा दिवस झाले ताप सर्दीखोकला काहीही नाही, अशक्तपणा आहे थोडा पण तितकाच

आज दोन किमी चालून आलो मोकळ्या हवेत

पण फार दगदग नको वाढदिवसाची.
>>>
हो गं. Bbq मधून पार्सल मागवणार, केक कापणार , गिफ्ट्स देणार एवढंच सेलिब्रेशन खरंतर पण सगळे सोबत आहेत याचा आनंद (?) वाटतोय

सगळे लवकर बरे व्हा. लक्षणे सौम्य असली तरी शक्य तितकी विश्रांती घ्या. शुभेच्छा!
ग्रिटिंग्ज फार सुंदर आहेत.

काळजी घ्या सर्वांनी. आणखी केसेस नकोत _/\_ घरातले सारे एकत्र डाऊन होणे फार त्रासदायक असते.

तरी अश्यात वाढदिवस येत असेल तर छान साजरा करा. कुठलाही आनंद आणि उत्साहाने केलेला समारंभ घरात छान सकारात्मक उर्जा भरतो. या काळात तर याची जास्तच गरज. रीया तुझ्या मुलाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.

माझ्याही वडिलांचा आज बड्डे आहे. आय मीन सुरू झालाय. (१८ तारखेलाच - म्हणजे रीया तुझा नातू माझ्यासारखा होण्याची दाट शक्यता आहे Proud )
आमच्यासोबत ते बड्डेला बरेचदा नसतात कारण मुंबईला त्यांचे मित्र नेहमी दणक्यात साजरा करतात. आताच फोन झाला त्यात समजले की ईथे त्यांची सर्व फॅमिली डाऊन असल्याने त्यांनी सुद्धा मित्रांना साजरा करू नका सांगितलेय. ते ही बरोबरच आहे म्हणा. पण आता उद्या सकाळी मुलांनाच फोन करून त्यांना सांगावे लागेल की होऊ द्या खर्चा, कोरोना तर आहे घरचा Happy

मदन मोहन यांच्या आवाजातले हे दुर्मिळ गाणे ऐका आणि क्वारंटाईन पीरियड सुसह्य करा.
माही वे, मै कैसे कहूं प्रीत अपने जिया की
https://www.youtube.com/watch?v=eQ3NJMaZR9Y

काळजी घ्या.
ते धाग्याच्या नावात 'इज्जत' असा बदल करणार का?
चार पानं झाली तरी कोणी हे सांगितले नाही....पूर्वीची माबो राहिली नाही. Sad पूर्वी आधी दहा प्रतिसाद 'इज्जत'' वरच आले असते, मग 'लवकर बरे व्हा' वगैरे. Wink

सरांचा धागा आहे. ईज्जत काय नी इज्जत काय, सरांसाठी सगळे सारखेच. सरांनी ठरवलं तर तिसऱ्या प्रकारे पण लिहुन दाखवतील.

काळजी घ्या सगळे.

प्राची>> आहे का आता - ईज्जत द्या म्हणाल्यावर इज्जत का फालुदा द्यायचा .... काही बदलली नाही मायबोली Wink Light 1

Pages