ईज्जत द्या

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 January, 2022 - 12:41

मंगळवारी बायकोला लक्षणे दिसली.
बुधवारी तिची टेस्ट केली.
गुरुवारी तिचा रिपोर्ट आला.
कोविड पोजिटीव्ह!

बुधवारी मला लक्षणे दिसली.
गुरुवारी माझी टेस्ट केली.
शुक्रवारी माझा रिपोर्ट आला.
कोविड पोजिटीव्ह!

महेशच्या डॅम ईट स्टाईलमध्ये आपल्याच हातावर मूठ मारली आणि आनंदाने म्हणालो, येस्स!
त्याच उत्साहात बिग बॉसला फोन लावला. आता चार दिवस आराम करतोय, तू आणि तुझी कंपनी गेली तेल लावत हे सांगायला. अर्थात हे मनातल्या मनात. खरे तर कधी नव्हे ते त्याकडून थोडेसे आंजारून गोंजारून घ्यायचे होते. तर लावला फोन...

ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग..
हॅलो सर.. आमच्याकडे कोरोना आलाय.. न्यूज कन्फर्म आहे.. हातात रिपोर्ट आहे.
बर्र.. मग आता पंधरा दिवस घरूनच काम कर.
अहो सर, ते तर गेले दोन वर्षे करतच आहे. आता जरा आराम करतो.
हम्मम ठिक आहे.. बरे वाटेल तसे ये ऑनलाईन. होम क्वारंटाईनमध्ये तसाही दोन दिवसांनी कंटाळाच येतो. तेवढेच काम होईल. काम खूप आहे आपल्याकडे..... (अजूनही पाचदहा मिनिटे बोलले काहीबाही. वर्कलोड, डेडलाईन, डेडीकेशन, सॅक्रीफाईज, वगैरे नेहमीचे हुकुमी शब्द तेवढे ऐकू आले.)

पुढे मग एक मेसेज सोसायटीच्या व्हॉटसपग्रूपवर सोडला. तिथे आधीच गेल्या महिन्याभरात चार कुटुंबात कोरोना शिरलेला. त्यात आमचे पाचवे जोडले.

हेल्लो ऑल.. वुई हॅव बीन टेस्टेड कोविड पॉजिटीव्ह.. आई हॅव क्वारंटाईन माय फॅमिली... वुई आर अ‍ॅण्ड वुई विल टेक ऑल नेसेसरी प्रीकॉशन्स.... वगैरे वगैरे ईन्फॉर्मेशन कम शपथग्रहणाचा कार्यक्रम झाला. माझे कुटुंब माझी जबाबदारी तसेच आपली सोसायटीही माझीच जबाबदारी हे सांगून झाले. तसे धडाधड मेसेज येऊ लागले.

- थॅन्क्स फॉर इन्फॉर्मिंग
- सात दिन बच्चों को नीचे खेलने मत भेजना.
- सात दिन के बाद आपका फ्लोअर सॅनिटाईज करवा के लेना.
- सोलर से गरम पाणी नही आता है. टाईम चेंज करो. (अरे याचे काय मध्येच)
- सॅनिटाईजेशन करवाने वालेका का नंबर सेक्रेटरीसे ले लेना
- भेज दिया भाय, बोलने के पहले ही भेज दिया. अपना काम ऐसेही रहता है - ईति सेक्रेटरी

वैतागून मोबाईल बाजूला ठेवला. पण ईतक्यात रिंग वाजली. नगरपालिकेचा फोन आला.
म्हटलं वाह. मायबाप सरकारलाच आपली काळजी.

नाव गाव फळ फूल विचारून झाले. काही विशेष होत नाही ना विचारले.
मी म्हणालो विशेष नाही. पण जरा थंडी, ताप, घश्याला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, नाही म्हणायला सकाळपासना थोडं......
बर्र बर्र.. (पाल्हाळ पुरे) घरीच होम क्वारंटाईन व्हाल ना. अ‍ॅडमिट नाही होणार ना..
नाही, तितके काही झाले नाही. पण तुम्ही औषधांच्या गोळ्या देता ना.. (कोणीतरी सांगितलेले मला हे)
ते फक्त अ‍ॅडमिट झालेल्यांना. अ‍ॅडमिट व्हायचे असेल तर तसे सांगा - फोन कट

पुढचे काही तास पुन्हा एकलकोंडेपणात गेले. ईंडिया मॅच सुद्धा हरली. निराशेत निराशा.

संध्याकाळी पुन्हा मोबाईल खणखणला.. बचना ए हसीनोss लो मै आ गयाss (माझी रिंगटोन)
सोसायटीतील चौदाव्या मजल्यावरील मिस्टर देवरुखकर यांचा फोन. म्हटलं चला शेवटी देवांक काळजी..

ह्यँ ह्यँ ह्यँ ... कसं झालं? कसे आहात आता?
बरा आहे तसा. (मगासच्या अनुभवावरून पाल्हाळ लावू नये हे आता कळले होते)
काही नाही ओ कोरोना वगैरे. पहिल्यासारखे घाबरायचे त्यात काही राहिले नाही. दोन दिवसात व्हाल बरे. तुम्हाला कळलं कधी झालेल्याचे?
अं.., मला बुधवारी आणि हिला मंगळवारी..
सोमवारी काही नव्हते?
मला तरी नाही.. आणि हिलाही तसे नाहीच.. मंगळवारीच आम्ही डॉक्टरकडे गेलो. का काय झाले?
काही नाही हो. बरा होतोय चार दिवसात. काळजी घ्या. - फोन कट

देवरुखकरांचा फोन का? सोमवारी मी त्यांच्या बायकोशी पॅसेजमध्ये बोलत उभी होती बराच वेळ. म्हणून कन्फर्म केले असेल काळजीने - ईति माझी बायको

म्हणजे देवांक सुद्धा आपल्याच कुटुंबाची काळजी होती तर..

छ्या, शेवटी मित्र ते मित्रच म्हणत मी पुन्हा मोबाईल उचलला. पुन्हा व्हॉटसप ओपन केले. कॉलेजच्या खास मित्रांचा ग्रूप ओपन केला. आणि मेसेज टाकला...

या संडेचे गेटटूगेदर कॅन्सल रे.. आमच्या घरात कोरोना शिरलाय.. मी आणि बायको दोघे पॉजिटीव्ह

- तुझ्या नानाची टांग. तू दरवे़ळीसारखी टांग दे आम्हाला
- तू चु नको बनवूस ऋ
- रिपोर्ट टाक पहिला साल्या तू
- तू कसा येत नाही बघतो आम्ही

मरा साल्यांनो.. घाला आपली ईथेच.. क्वारंटाईन पिरीअड संपल्यावर बोलू.. - मी ग्रूपमधून लेफ्ट

--------------------------------------

नाही म्हणायला दुपारी नगरपालिकेचे कर्मचारी आले. घरभर सॅनिटायझर शिंपडून गेले. बोलले काहीच नाही. तरीही कृतीतून काळजी दर्शवून गेले. मला तर तेवढ्यानेही गहिवरून आले. असे वाटले त्यांना मुन्नाभाईसारखे जादूची झप्पी द्यावी. कोरोनाने ते ही शक्य नव्हते, जसे आले तसे ते गेले.

पण या सगळ्या अनुभवांनंतर मनाशी पक्के ठरवले,
आता कितीही वाटले तरी मायबोलीवर कुठल्याही धाग्यावर याची बिलकुल वाच्यता करायची नाही.

पण मी काय म्हणतो,
कोरोना झालेल्यांना सहानुभुती नको लोकहो..
पण निदान त्या कोरोनाला तरी ईज्जत द्या _/\_
- ईति ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर काळजी घ्या सध्या. बरे झाल्यावर मग डोंगर पर्वतकडे जाळायचा उद्योग सुरू करा. आराम करा !

अशावेळी आपल्याला लक्षात येतं की लोकांच्या priorities मध्ये आपण कुठे असतो ते! चालायचंच!
काळजी घ्या. भरपूर विश्रांती, व्यवस्थित आहार, आणि मनाला प्रसन्न ठेवणे हे महत्त्वाचे! तुम्हाला दोघांना लवकर बरं वाटू दे.

टेक केअर! भारतात आयसोलेशन फार अवघड असते पण जमेल तितके करा.

सध्या तुला कोणताही बाफ काढायला आडकाठी करू नये असा माबोकरांसमोर प्रस्ताव ठेवतो Happy पण त्यापेक्षा मूळ आयडीने क्रिकेट वर चांगले काहीतरी लिही.

मनपाचे संसर्ग झालेल्या घरात सॅनिटायझर शिंपडण्याचे लॉजिक कळले नाही. घरातीलच इतरांचा संसर्ग कमी करण्याकरता का?

मूळ आयडी >> मला गीताई आठवली...
खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला ।
(आता शाखा म्हणजे काय विचारू नका.)

लवकर बरे व्हा सर्व ऋ.
आणि प्रोटीन आणि व्हिटामिन डॉ च्या सल्ल्याने व्यवस्थित घ्या.

मनपा एकदा कधीतरी घरात सॅनिटायझर(म्हणजे सोडियम हायपोक्लोरेट चा फवारा मारायला येते असे पाहिले आहे आजूबाजूला.(म्हणजे 14 व्या दिवशी नाही, त्याच्या आधीच येते)

टेक केअर सर !

पण त्यापेक्षा मूळ आयडीने क्रिकेट वर चांगले काहीतरी लिही. > >अरे सरांना नि मायबोलीकरांना पण आराम करू दे रे. Wink

खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । > सी 'उर्ध्वमूलं अधोशाखां' असे काही म्हणून घे. उगाच सरांच्या डोक्याला ह्या वेळी त्रास कशाला देतेस. सर असले तरी त्यांनाही मर्यादा आहेत. Wink

<<<<सर असले तरी त्यांनाही मर्यादा आहेत. Wink

नवीन Submitted by असामी on 14 January, 2022 - 22:47>>>

डोन्ट अंडरएस्टिमेट द पाॅवर ऑफ सर....

सर्वांचे _/\_

अशावेळी आपल्याला लक्षात येतं की लोकांच्या priorities मध्ये आपण कुठे असतो ते!
>>>
हो, खरेय. याची कल्पनाही आहे आणि ते स्विकारलेही आहेच. त्यामुळे मुद्दाम अपेक्षा अश्या ठेवत नाही. किंबहुना ईथले रात्रभरात आलेले मेसेज बघूनही मला गहिवरून आलेय Happy

भारतात आयसोलेशन फार अवघड असते पण जमेल तितके करा.
>>>

भारतात काय अवघड आणि अमेरीकेत काय सोपे हे कश्याच्या संदर्भात म्हटलेय नेमके कळले नाही.

पण येस्स. बायकोत लक्षणे दिसली तेव्हा तिच्याकडून मला पास झाला आहे की नाही याची खात्री नव्हती. दोन बीएचकेमध्ये बायको, मी आणि पोरांसह त्यांची आज्जी असे तीन वेगळे गट बनवणे अवघड वाटले. बायकोसोबत राहतो तर हमखास होणारच. पोरं आणि आईसोबत राहायचे तर आधीच माझ्यात संक्रमित झाला असल्यास माझ्याकडून त्यांना पास व्हायची भिती होती. म्हणून मग बायकोसोबतच राहायचे डिसीजन घ्यावे लागले Happy

क्रिकेट वर चांगले काहीतरी लिही. >>> हे मात्र जमू शकते Happy

@ मनपाचे सॅनिटायझर - लॉजिक आणि सायन्स मलाही फारसे कळत नाही. कदाचित आयसोलेट होण्याआधी वा होताना आम्ही घरभर जे वायरस शिंपडले असतील तेच मारत असतील ईतरांच्या सुरक्षिततेसाठी.

मुले आणि आई ठीक आहेत ना? >> मनमोहन हो, तुर्तास ठिक आहेत. मुले आमच्या ईंन्स्ट्रक्शन फॉलो करत आहेत. पण सुरुवातीचे कौतुक ओसरल्यावर कुठवर त्यांचा संयम राहतोय हे बघायचेय Happy

@ शाखाची संस्कृत वाक्ये डोक्यावरून गेली हे सांगायला नकोच.. पण धन्यवाद, काहीतरी चांगलेच बोलले असाल Proud

ओह! काळजी घे ऋन्मेष.
लौकर बरे होतच आहेत लोक या लाटेत, तुम्हीही व्हाल, शुभेच्छा.

ओह! काळजी घ्या व लवकर बरे व्हा.
आजकाल फारच फोफावलाय कोरोना.
बाय द वे तुम्ही दोघांनी दोन्ही डोस घेतले होते का? दोन्ही डोस घेऊनही कोरोना झाल्याची उदाहरणे आहेत पण त्याविषयी अधिकृतपणे कोणत्याही माध्यमात बातमी नाही.

अतुल - लस घेतली तरी ओमिक्रोन किंवा डेल्टा होउ शकतो... माझ्या मित्रपरिवारात बुस्टर घेतलेल्यानाही झालेला आहे...

Pages