नवीन घरासाठी लागणारी भांडी - यादी

Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 12 January, 2022 - 03:09

नवीन घरात राहायला जाणार असाल तर कोणती भांडी असायला हवीत?
Basic यादी देते आहे.
जुन्या घरातून नवीन घरात जाताना किंवा नवीन संसार थाटणाऱ्यांना उपयोग होईल.

.
देवपूजेचे साहित्य
ताम्हण, पळी, कलश इत्यादी
पिण्याचे पाणी भरून ठेवण्यासाठी हंडे, कळशी
स्टील च्या बादल्या इत्यादी
..

फराळाचे चमचे, स्वयंपाकाचे मोठे चमचे (पळी, उलथणं इत्यादी)
विळी
चाकू
सालकाढणी
स्टीलची कढई
परात
पोळपाट लाटणे
पातेली 4
चहासाठी कप बशा, गाळणी
कडची
किसणी
Lighter
तिखटमीठाचा डब्बा
तेलाचा कावळा
मीठाची बरणी
कढई
पातेली

.
Cooker, डब्बे
मिक्सर
Induction / गॅस स्टोव्ह, सिलिंडर
Induction वर चालणारे cookware
कात्री
.
पाण्याची रिफील, dispensar
.
ताटे 6
वाट्या 6 (लहान, मोठ्या )
पेले 6
तांबे 6
तवा
फराळाच्या प्लेट्स (खड्डे असणाऱ्या )
(Dinner set असेलतर )
.
सरबताचे पेले
चहा/ कॉफी /दूध पिण्यासाठी कप/मग
ट्रे
.
अजून काही आठवलं तर भर घालूया

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

2 मोठ्या आणि 2 छोट्या बॅग्स आणि भारतात परत गेलेल्या एकानी ठेवलेला प्रेशर कुकर आणि पॅन वर सुरु झालेला संसार आता वाढता वाढता वाढे करत 1700 स्क्वेअर फुटाच्या घरात पण मावत नाहीये. 22 वर्षांपूर्वीची काही भांडी अजुन वापरात आहेत. थोडक्यात काय, हे मायाजाल आहे आणि घ्याल तितकं कमी आहे. त्यातुन इमोशनल असाल तर बघायला नको. जपण्याकडे कल असतो. सो लागेल तस घेत चला. आता सगळीकडे सगळं मिळत आणि अडीअडचणीला शेजारी पण असतात. सो पर्याय मिळतातच. नवीन घरात सेट होऊन मग जागेचा अंदाज आला कि बाकीच्या हौसेच्या गोष्टी घ्या.
रच्याकने, ह्या पुणेवारीत साबांकडे नारळ फोडायची एक प्लास्टिकची ताटली बघितली, त्याला मध्ये एक टोकदार लोखंडी टोकदार तुकडा होता. पोह्याच्या प्लेट इतकी मोठी होती ती ताटली. त्या लोखंडी तुकड्यावर फोडायचा म्हणे नारळ. पुण्यात असाल तर बघा हे मिळतंय का.

नारळाचा कीस हवा असेल तर नारळ फोडून तो करणे यासाठी नारळ बीरळ फोडू नये साठी सहमत.
आमच्याकडे ताजा नारळाचा कीसच मिळतो विकत, रोजच्या रोज काढलेला. स्वयंपाकात तोच वापरतो आम्ही.

पण नारळाचं पाणी (शहाळं नव्हे, नारळाच्या पाण्याची मजा शहाळात नाही.) आणि खोबरं नुसतं खायला नारळ आणतोच.
खास करून मला ऍसिड रिफ्लक्सचा त्रास, दुपारी स्वयंपाकाला /कामामुळे जेवायला उशीर होत असेल तर ओल्या खोबऱ्याचा मोठा तुकडा वेळ निभावून नेतो.

मध्ये युट्युबवर पाहून नारळाचे डोळे कोरून पाणी काढणे, आणि अख्खा अर्ध्या /पूर्ण खोबराचा डौल बाहेर काढणे वगैरे करून पाहिले होते. पण ते कॉम्प्लिकेशन आहे.

तर सांगायचा मुद्दा हा, की जर तुम्हाला नारळाचं पाणी आणि सोबत ओलं खोबरं खायची आवड असेल तर नारळ उचलून फोडुन पाणी पिणे आणि वाटेल तेव्हा स्क्रू ड्रायव्हरने पटकन तुकडा उपसून तोंडात टाकणे सोपे आहे तसे.

तुमच्याकडे शहाळीवाले दारोदार फिरत नाहीत का? किंवा नाक्यावर त्यांचा स्टॉल नसतो? ते शहाळं सोलून, फोडून, स्ट्रॉ घालून देतात. पॅकेज्ड कोकोनट वॉटरही मिळतं.

ओके. नारळाच्या पाण्याची मजा शहाळ्यात नाही हे आता वाचलं. यावर पास. आपली बोलती बंद. एक म्हण आठवली. पण लिहीत नाही.

शहाळ्याचं पाणी आणि नारळाचं पाणी यांच्या चवीत फरक असतो ना. तसाच फरक नारळाचं ओलं खोबरं आणि शहाळ्याची मलई यातही पडतो. मलापण नारळाचं ओलं खोबरंही नुसतं खायला आवडतं. (मलईपण आवडतेच)
हो, नारळाचं पाणीही शहाळ्यापेक्षा वेगळंच आणि छानच लागतं. Proud

नुसतं पाणी प्यायला आणि खोबरं खायला आमच्यात नारळ नाही, शहाळंच लागतं.
नारळ फोडल्यावर त्यातलं पाणी पितोच. खवणल्यावर सगळ्यात वरचा चवही थोडा खातो.

म्हण लिहायला हरकत नव्हती भरत.
मला शहाळाच्या पाण्यापेक्षा नारळाचं पाणी आवडतं. शहाळाचं पाणी पीत नाही असं नाही. ते तर ठिकठिकाणी मिळतं इथे. पण आवर्जून मात्र नारळाचं पितो नारळ घरी आणून फोडून. आणि शहाळाची मलई विशेष आवडत नाही. एकटा शहाळाचं पाणी पितो तेव्हा ती काढून द्यायला सांगत नाही, सोबत कुणी आहे, त्यांनी मलई काढून घेतली तर थोडीशी खातो.

चैला!

घरासाठी भांड्यांचा धागा आहे की नारळाचा?

:बुचकळ्यात पडलेला आरारा:

हा धागा वाचून एक नक्की- म्हाळसा यांच्या शेजारचे घर नक्कीच घेऊ नये... जे शेजारी आहेत त्यांच्या घरातील अर्ध्या वस्तू म्हाळसा यांच्याकडेच......

ओके.
विषयानुरुप प्रतिसाद.

"नवीन घरासाठी" = नव्या नवरीच्या नव्या संसारासाठी असं गृहित धरून लिहितोय. (थोडाफार स्वयंपाक करता येतो, म्हणून त्यातलं थोडंफार कळतं अशी समजूत आहे)

१. इंडक्शन प्लेट. (ग्यास कनेक्शन आयतं असल्यास शेगडी, पण सिलिंडर हवे असल्यास ते मिळेपर्यंत इंडक्शनला पर्याय नाही. तसेच आजकाल गॅसपेक्शा वीज स्वस्त पडते आहे) मेट्रो मधे ओके आहे, छोट्या गावात नेमके स्वयंपाकाच्या वेळी लाईट जाणे होऊ शकते.

२. मायक्रोवेव्ह. हा प्लेन मावे किंवा मावे प्लस ओव्हन असा मिळतो. नुसता मावे पुरतो. हा घ्यायलाच पाहिजे असं ही नाही, अन घेतल्याशिवाय होईल असंही नाही.

३. मिक्सर/ग्राइंडर. ते संजीव कपूर वालं पुरतं.

४. छोटा-मोठा फ्रीज. घर व खिसा यावर अवलंबून.

५. एक चांगली करवती सुरी. नाईफसेट घेतला तरी चालेल. सुरीच्या पात्याची मूठ अ‍ॅक्चुअल मुठीत जातेय का ते पहा. सोबत लाकडी चॉपिंग बोर्ड हवाच. हे सगळे विळीची सवय नसेल तर. या शिवाय विळी घेतलीली छानच.

६. कात्री. मजबूत, धारदार, बारीक, न गंजणारी उर्फ आजकालच्या चायना अ‍ल्मुनियम. सगळे गुण हवे. म्हणजे कोथिंबीर कापण्यापासून अ‍ॅसॉर्टेड पॅकेट कापता यायला हवे. मासेखाऊ असाल तर फिन्स कापता यायला हवेत.

(७. अ‍ॅल्युमिनियम फॉइल, ८. क्लिंग रॅप. भांडी नव्हेत पण एसेन्शिअल आहेत.)

९. मावे सेफ काचेचे बाउल सेट. लहान (अर्धा लिटर) मध्यम, व मोठा साईज. येरा.

१०. साल काढायचं यंत्र. ११. छोटी किसणी १२. मोठी किसणी.

१३. स्टील्/दगडी छोटा खलबत्ता.

१४. एक मोठा अन एक छोटा कुकर. मोठा कुकर भांडी वाला. हे दोन्ही इंडक्शन प्लेटवर चालणारे उर्फ फ्लॅट बॉटम. प्लस, हार्ड अ‍ॅनोडाइज्ड अ‍ॅल्युमिनियम. मी सांगितलेल्या भांड्यांपैकी शक्यतो सगळी याच प्रकारची घ्याय्ची रेकमेंडेड आहेत.

१५. तवा : एक मिनिमम पॅन स्टाईल. यात पोळ्या, डोसे, ऑम्लेट, थोडं-फार पॅन फ्राईड भाजी/बुर्जी इ. होईल असा. इंडक्शन कॉम्पॅटिबल.

१६. भांडी. / पातेली. स्टील/हार्ड अ‍ॅनोडाईज्ड. तुमच्या इंडक्शन प्लेटनुसार. (सर्व भांडी बेसिकली २-३ लोकांसाठी स्वयंपाक आहे यासाठीच्या साईजने घ्या.
चहा.
भाजी.
दूध तापवणे. हे थोडे मोठे घ्यावे. १ लिटर दूध तापवता येइलसे.

१७. फ्राइंग पॅन. यात तळण करता येते. थोडी जास्त खोलगट पॅन. डीप/शॅलो फ्राय दोहोंसाठी उपयोगी.

१८. मिसळणाचा डबा. (तोच तो ज्यात तिखट/हळद/मोहोरी/जिरं/गरम मसाला/इ. ची पाळी असतात)

१९. उलथने/कलथे इ. : एक छोटे, फ्लॅट टिप. एक भात्या. १-२ डाव उर्फ पळी उर्फ वरण वगैरे पातळ पदार्थ वाढायला/ढवळायला वापरतो ते.

२०. झारा. : उर्फ भोकाचे/जाळिचे तळलेली भजी आपल्या तळणाच्या भांड्यातून बाहेर काढता येतील असे.

२१. चमचे. काटे. सुर्‍या. टीस्पून,टेस्पू,काटे,सुरी असा सेट मिळतो.

२२. जेवण्याची भांडी. ही शक्यतो चिनी मातीची घ्या. धुवायला सोपी, अन पटकन पदार्थ मावे मधे घालून गरम करता येतो.
यात मोठी प्लेट, छोटी प्लेट, मोठा बाऊल, छोटा बाऊल. बास. बाकी काय नाय लागत.

२३. चहा कॉफीचे सामान. भांडं वरती झालं. एक गाळणं. कप-बशी सेट. मग्ज.

२४. मावे सेफ, फ्रीज सेफ झाकणवाले कंटेनर्स. उरसूर फ्रीजात ढकलायला, अन हवं तेव्हा गरम करून खायला> हे ऑप्शनल.

मला वाटते इतक्यात संसार सुरू करता यायला हवा.

निगुतीने, डीमार्ट वगैरे शॉपिंग केले तर हे सगळे ७-८ हजारात बसायला हरकत नाही.

संपूर्ण प्रतिसाद फक्त स्वयंपाकाच्या भांड्यांसाठी आहे.

बादल्या/कळश्या/साठवणीचे डबे/मग्गे इ. गृहित धरलेले नाहीत.

हार्ड अ‍ॅनोडाइज्ड भांडी चांगली असतात, पण डिशवॉशरमधे धुता येत नाहीत. हल्ली स्टीलची डिशवॉशर सेफ असलेली चांगली भांडी (कढयासुद्धा) मिळतात.

मागे एकदा कुठल्या तरी धाग्यावर मी सँडविच बॉटमच्या स्टीलच्या पातेल्याबद्दल लिहिलं होतं. फोटो टाकते म्हटलं होतं आणि मग विसरले.
IMG-20220117-WA0009.jpg

हे विनोद या कंपनीचं आहे. डिशवॉशर सेफ आहे. इंडक्शन बॉटम आहे. मी गेली सातआठ वर्षे वापरतेय. एकदम छान आहे. रसभाज्या, कोरड्या भाज्या, उपमा, शिरा वगैरे करायला एकदम उपयुक्त आहे. सहजासहजी तळाशी करपत नाहीत पदार्थ. जाड तळ असल्यामुळे.

माझा बॅचलर संसार
कढई, फ्राय पॅन, एक छोटं पातेलं, चहा भांडं, कुकर, खलबत्ता.
कप, ताट, वाट्या, मटण प्लेट- प्रत्येकी 2

मेलामाइन चा प्लेट चा से ट>> बिग नो नो ह्याला.
प्लॅस्टिक आणि नॉन स्टिक भांडी हद्दपार करून लोखंडी आणि हार्ड अ‍ॅनोडाईझ्ड भाण्ड्यानी आता ती जागा घेतली आहे.
जेवायचा ताट वाटी, प्लेटस सेट सेरामिक चे आहेत.
बाकी इतर प्रतिसादांतून अलमोस्ट सगळी भांडी आली आहेत Happy नवीन घरासाठी शुभेच्छा!

कुंचा
केरसूप
केराची बादली
सिंकच्या आतली छोटी जाळी
ड्रेनेक्स

हार्ड आओनिडाइज्ड आणि अँलुमिनियम मधे काय फरक आहे? स्टील पेक्षा हा ओ चांगले असते का?

Pages