Submitted by शांत माणूस on 10 September, 2021 - 01:44
मी डी मार्ट मधे खरेदीला जाणार आहे. तरी खरेदी लवकरात लवकर आटोपून नंबर लवकर लागणे व बिल कमी येणे यासाठी काय काय करावे याची जाणकारांकडून माहिती हवी आहे. अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी उपयुक्त टीप मिळाल्या तर उत्तमच. पार्किंगला पैसे द्यावेत कि न द्यावेत ? बाहेर आल्यावर आईस्क्रीम / सॉफ्टी खावी कि न खावी ?
डी मार्ट मधे मस्ट असा कोणता आयटेम घेतला पाहीजे ? कोणता टाळला पाहीजे ?
कृपया माहिती द्यावी ही नम्र विनंती.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय सांगता..? १₹ अर्धा किलो
काय सांगता..? १₹ अर्धा किलो डाळ/साखर/रवा..? खाली सांडलेले झाडूने गोळा करून, चाळून, निवडून देत असावेत.
नाही हो ! नॉर्मल मिळत तेच
नाही हो ! नॉर्मल मिळत तेच असत. म्हणजे स्कीम प्रमाणे एकच काहीतरी मिळत त्या वारी आणि ते ही अर्धा किलोच मिळतं .जास्त नाही.
कर्वेनगरला कुठे? - JAV Mall -
कर्वेनगरला कुठे? - JAV Mall - Opp to Kakde City Warje naka
निल्या thank you...Lavkar च
निल्या thank you...Lavkar च जाऊन येईन
नाही हो ! नॉर्मल मिळत तेच असत
नाही हो ! नॉर्मल मिळत तेच असत. म्हणजे स्कीम प्रमाणे एकच काहीतरी मिळत त्या वारी आणि ते ही अर्धा किलोच मिळतं .जास्त नाही.>> बघायला हवं. संक्रांतीच्या वाणाला बरं पडेल. बायको पण खुश होईल. एक रुपयात रवा, साखर, डाळ पॅक करून मिळेल. फक्त त्या स्किम च्या दिवशी डी-मार्ट मधे शंभर वेळेला आत-बाहेर करावं लगेल. १०० रुपयांत १०० पुडे..! (समजा ५० च वाण वाटले तरी २५ किलो आपणाला वापरता येईल..!)
फक्त त्या स्किम च्या दिवशी डी
फक्त त्या स्किम च्या दिवशी डी-मार्ट मधे शंभर वेळेला आत-बाहेर करावं लगेल. १०० रुपयांत १०० पुडे.. >> दुकानातलं माहीत नाही , स्कीम असते की नसते ते , मी online मगवते तेव्हा मिळत आठवड्याला एक काही तरी अर्धा किलो एक रुपयात.
अर्धा किलोच असत त्यामुळे घरात असलं तरी ही मी अर्थातच ते घेतेच घेते
मी online मगवते तेव्हा मिळत
मी online मगवते तेव्हा मिळत आठवड्याला एक काही तरी अर्धा किलो एक रुपयात.>> तरीच मला कधी मिळालं नाही. मी डायरेक्ट आउटलेटला जाउनच घेत होतो. तुम्ही म्ह्णताय तसं एकदा लॉकडाऊन मधे ऑनलाईन मागवलं होतं पण डी मार्ट वाल्यांनी असा घोळ घातला की मी यांच्याकडून पुन्हा कधीच ऑनलाईन मागवणार नाही अशी प्रतिज्ञा केली. काजु अन बदाम अर्धा अर्धा किलो मागवले तर शाण्यांनी दोन वेगवेगळ्या ब्रँड चे बदामच दिले. एक फरशी पुसायला लायझॉल अन टॉयलेट क्लिनिंग साठी हार्पिक मागवलं तर शाण्यांनी एक मोठ्ठ लायझॉल अन त्यासोबत एक लहान लायझॉल दिलं.
(No subject)
online मगवते तेव्हा मिळत
online मगवते तेव्हा मिळत आठवड्याला एक काही ...... इथे वाचून दी mart pahile तर डिलिव्हरी चार्जेस 49 होते.मग कॅन्सल करून बिग बस्केटवरून मागवले.
फ्लीप कार्ट वर मात्र एकेक रुपयाच्या 4 वस्तू मिळतात.मायकडे गेल्या काही महिन्यांत बेसन साखर शेंगदाणे आणि काजू बेदाणे बरेच झाले होते.काजू बेदाणे मात्र थोडेच असतात.70- 60 ग्रॅम.
आमी नाय ज्जा.... डी मार्ट
आमी नाय ज्जा.... डी मार्ट च्या धाग्यावर बिग बास्केट नक्को..!!!
Ho की.ते ऑनलाईनपध्दतीमुळे आले
Ho की.ते ऑनलाईनपध्दतीमुळे आले बरं.काढू का पोस्ट?
असु द्या... असु द्या..
असु द्या... असु द्या..
शांत माणूस- राहायला कात्रज
शांत माणूस- राहायला कात्रज परिसरात आहात का?
भारती विद्यापीठ मागे Dmart ready zale आहे एक.
थोडं अवांतर.
थोडं अवांतर.
डी मार्ट बद्दल माझा अनुभव विशेष चांगला नाहीये.
आई बाबा डी मार्ट मधून किराणा भरायचे. आम्ही आमच्या लोकल किराणा वाल्याकडून किराणा भरायचो.(तेव्हा आम्ही एकाच शहरात राहायचो) आईकडे गेलं आणि चहा केला कि तीच चहा पावडर,तेच प्रमाण घेऊनही चहा नेहमीसारखा व्हायचा नाही.पार्ले,मारी बिस्किटाच्या चवीत तर जाणवण्या पर्यंत फरक असायचा.
MRP ला घेतलेली वस्तू विरुद्ध डी मार्ट मध्ये ऑफरमध्ये घेतलेली वस्तू,यांच्या गुणवत्तेत फरक असणार.चहा/बिस्किटाच्या चवीत नक्की फरक असतो. डाळी,कडधान्य ई. बद्दल नाही सांगू शकणार.(रिसर्च,प्रयोग करायला हवेत)
आम्ही बिस्किटे वगैरे दोन्ही
आम्ही बिस्किटे वगैरे दोन्ही कडून आणतो पण मला असं कधी जाणवलं नाही. मात्र तोच तोच चहा जास्त दिवस वापरला तर वीट येऊन प्यावसा वाटत नाही हे मात्र खरं. डी मार्टातून चहा पावडर घेताना स्वस्त पडते म्हणून १ किलो घेतली की २-३ महिने तीच चाहापत्ती वापरल्याने हमखास वीट येतो... अन् चहा पाणचट लागतो. आम्ही हे अनुभव नवीन गॅस जोडणीसोबत एक किलो टाटा टी मिळाला तेव्हाही घेतला होता अन् दिमार्त मध्ये स्वस्त पडते म्हणून एक किलो पॅक घेतला तेव्हाही
MRP ला घेतलेली वस्तू विरुद्ध
MRP ला घेतलेली वस्तू विरुद्ध डी मार्ट मध्ये ऑफरमध्ये घेतलेली वस्तू,यांच्या गुणवत्तेत फरक असणार.चहा/बिस्किटाच्या चवीत नक्की फरक असतो....
मला नाही वाटत तसे. म्हणजे कंपन्या खास डी-मार्टसाठी (स्वस्त आणि तुलनेने कमी दर्जाचे) उत्पादन काढणार नाहीत. कारण असे करण्यात डी-मार्टपेक्षा त्या चहा/बिस्किटाच्या कंपनीचेच नाव खराब होण्याची जास्त शक्यता आहे.
तुम्ही ज्या चहा पावडर / बिस्किटांची तुलना करत आहात त्यांचे batch number, manufacturing plant सारखेच आहेत का ते पहा. त्यामुळेही कदाचित चवीत फरक पडू शकतो. एकट्या पारले-जी चे देशभरात १०-१२ प्लांट्स आहेत. कधीकधी तर असेही होते की, ५ रुपयेवाला पार्ले-जी एका प्लांट मधून आलेला असतो, १० रु वाला दुसऱ्याच प्लांट मधून!!!
माझ्या पाहण्यात तर असे आहे की काही अगदी छोटे दुकानदार (चाळीत एखादे जनरल स्टोअर्स असणारे किंवा घरच्याच एखाद्या कोपऱ्यात दुकान थाटलेले) डी-मार्ट मधून bulk खरेदी करून नेतात आणि आपल्या दुकानात MRP ला विकतात. (कधी एखादे product ४०-५० च्या संख्येत घेऊन बघा, counter वरील व्यक्ती आधी त्याच्या supervisor ला विचारून घेते, "एवढे देऊ शकतो का?" म्हणून!!!)
Vi. मु, बरोबर आहे तुमचे!
Vi. मु, बरोबर आहे तुमचे!
खरंतर डी मार्ट म्हणजे
खरंतर डी मार्ट म्हणजे ग्राहकाला जे काही हवं ते सगळं एकाच ठिकाणी देणारे दुकान. एकेका गोष्टीसाठी १० दुकाने फिरण्यात जाणा वेळ अन पैसा यांची गोळाबेरीज केली तर डीमार्ट मधे महिन्यातून एकाच फेरीत सर्व काही आणता येतं. शिवाय दर्जा पण चांगलाच असतो. बेकरी प्रॉडक्ट्स, शीतपेयं, किराणा, गृहपयोगी वस्तू, कपडे, पादत्राणे, बॅगा, बेडशिटं, पडदे, उशा, अभ्रे, इलेक्ट्रिक साहित्य, भांडी, स्टेशनरी सगळं एकाच ठिकाणी एकाच फेरीत मिळाल्यामुळे कितीतरी वेळ अन पैसा वाचतो.
छोट्या गावातून शहरात आठवडा
छोट्या गावातून शहरात महिना खरेदीला जायचं आहे (उदा: युरोप /अमेरिका सारख्या ठिकाणी ) तिथे हे चांगलं उपयोगी आहे. ठिकठिकाणी किराणा दुकान, बेकऱ्या, सुपर मार्केट असणाऱ्या आपल्या देशातील गावा शहरात असे सगळे साहित्य एकावेळी आणायला जाणारे विरळाच.
कधी किराणा, ब्रेड, केक्स, भाजी सोबत गाळणी, चाकू, एक दोन भांडी , स्टेशनरी घ्यायचे असते ते सुपरमार्केट मध्ये मिळतं.
गेल्या १० वर्षांत चुक्कुन कधी
गेल्या १० वर्षांत चुक्कुन कधी काही आधीच संपलं तर आणि तरच असं कुठेत्री सुपर्मार्केटची पायरी चढणं होतं... अगदी कधीतरी पावभाजी केली जाते त्यावेळी नाही म्हणायला पाव आणायला सुपरमार्केट नाहितर कध्धीच जाणं होत नाही. महिन्यातुन एकदा अन फारच गरज पडली तर दोनदा डीमार्ट वारी ठरलेली असते.. तिही सहकुटुंब सह परिवार.
Pages