Submitted by म्हाळसा on 2 July, 2020 - 23:17
मी सध्या नाॅर्थ कॅरोलीना मध्ये रहात आहे आणि गेल्या ४ महिन्यांपासून घर खरेदीच्या प्रयत्नात आहे.. आधी वाटलेलं घराच्या किंमती कमी होतील पण तस काहीच झालेलं दिसत नाहीए. फक्त इंटरेस्ट रेट कमी झालाय पण रिस्क फॅक्टरही वाढला आहे.. एखादे घर बघून आले की निर्णय घेईस्तोवर विकलं जात आहे.. त्यामुळे घर घ्यावे का थोडं हे वर्ष जाऊ द्यावं हा विचार करतेय. कोणी सध्याच्या परीस्थितीत घर घेतलय का? जाणून घ्यायला आवडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लपेटुन नाहि ठेवलय, बान्धकाम
लपेटुन नाहि ठेवलय, बान्धकाम चालू आहे>>>> ओह! धन्यवाद.
नविन बान्धकाम असणार्या घरात जायला मिळतय, मजा आहे की>>>>+१.
म्हाळसा, किल्ली तुमचं अभिनंदन
म्हाळसा, किल्ली तुमचं अभिनंदन!
म्हाळसा, घर मस्त वाटतंय.
लपेटुन नाहि ठेवलय, बान्धकाम
लपेटुन नाहि ठेवलय, बान्धकाम चालू आहे >>> हो आत बांधकाम अजून सुरू आहे आणि खिडक्यांना काचा वगैरे नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी, स्नो वगैरे आत जाउ नये म्हणून. पण त्यातला एक भाग (हाउसरॅप) नंतरही बाहेरचे "साइडिंग" असते त्याच्या आत तसाच ठेवतात इन्सुलेशनकरता.
अभिनंदन पुन्हा एकदा. सहसा तीन महिन्यांत पूर्ण होते. यावेळेस मटेरियल किती वेळेवर मिळेल त्यावर आहे कारण एकूणच शिपिंग मधे खूप वेळ लागतोय बहुतांश गोष्टींना. लेनार वाल्यांचे त्यावर किती अवलंबून आहे माहीत नाही. पण तीन महिने सांगितले असेल तर ते सगळे धरूनच सांगितले असेल. मधे स्नो पडल्यामुळे काय काम थांबेल तितकेच.
पुन्हा एकदा सर्वांचे मन
पुन्हा एकदा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद
@प्राजक्ता - हो, Costco मधे deals चेक करतच आहे.. चांगलं काही मिळालं की घेऊ तिथूनही.
@च्रप्स- पॉटरी बार्न आहे आमच्याजवळ.. ते लिस्टमधे नव्हतं कारण सगळंच जरा महाग असतं आणि तसंही मुली लहान आहेत.. महागड्या गोष्टी किती टिकतील आमच्याकडे ह्याची गॅरेंटी कमीच
@किल्ली - मीही same phase>> अरे वा, अभिनंदन.
@सावली- समोरचं लॉन वगैरे करून देतात की ते आपलं आपण करायचं?>> हो लॅान तेच करून देणार..आमच्याकडे तर रोजचा झाडू मारायचीही पंचायत
@शां.मा.- घर आलिशान दिसतंय >> फक्त बाहेरूनच.. आत साधं आणि लहानच आहे.
@फारएण्ड - सहसा तीन महिन्यांत पूर्ण होते>> हो, आम्हाला डिसेंबर मधे मिळणार होते..आता फेब सांगत आहेत..त्याहूनही उशिरा मिळू शकतं.. काही गोष्टींचे मटेरिअल वेळेवर मिळत नाहीए
अभिनंदन घराबद्दल. माझ्या
अभिनंदन घराबद्दल. माझ्या अनुभवानुसार आता फक्त फिरत बसायचं लोव्ज, होमडिपो, होमडिकॉर, पियरवन वगैरे वगैरे. आम्ही तर अक्खा शनिवार , रविवार अश्या दुकानातून फिरायचो व ठरवायचो काय करायचे ते. बर्याच साईट्स बघत डिसाईन पसंत करायचो. पहिले ३ महिने वेळ दिला व उगाच घाईत काहीच खरेदी केले नाहि. जुने फर्निचर काढूनच टाकायचे झालेले, ते मग काढले ३ महिन्यानंतर. अर्धे अधिक सामान मूव होण्याच्या आअधीच फेकले जे नकोच होते. मग हळू हळू बॉक्सेस(सामानाचे) लावून झाले, कॉर्नर कळले प्रत्येक रूमचे, फ्रेम्स ,पेंटीम्ग्ज कुठे लावायचे ठरले मगच खरेदी केली. जवळपास सांगून ठेवले(मनाला व खिशाला) एक वर्ष तरी जाईल घर सजवायला. मग एक वर्षाने सर्वांना पार्टी दिली.
-------
बे अरीयाम मध्ये घराबाबात म्हणाल तर, लोकं कॅश मध्ये चौपट किंमत देवून घर घेताहेत अगदी पँडेमिक मध्ये सुद्धा पाहिलेय. अगदी सांगितलेल्या किंमतीच्या वर पटकन ऑफर देवून घर घेतलीत हे पाहिलेय. अगदी अलीकडे, एकाने( चायनीज कलीगने) ९३८ के चा कॉन्डो १०४० के ला घेतला. फक्त १३४० अरिया.
देवीका- आमच्या नवीन घरापासून
देवीका- आमच्या नवीन घरापासून ५ मि. वरच ॲपलचं कॅंपस येणार आहे. त्यामुळे गेल्या ४-५ महिन्यात घरांच्या किंमती कायच्याकाय वाढल्या आहेत..त्यात कॅलिफोर्निया आणि न्यूयॅार्कमधून इथे येणाऱयांची संख्या वाढत चाललीए.. घरांच्या किंमती कमी होतील असं वाटत नाही
हार्दिक अभिनंदन! बे एरियात
हार्दिक अभिनंदन! बे एरियात मिल्यन डॉलरचं घर घ्या किंवा केरी, नॉर्थ कॅरलायनात हाफ मिल्यनचं, इट्स वॅल्यु (पर्पज) फ्रॉम योर स्टँडपॉइंट इज सेम. स्टार्ट/रेज ए फॅमलि. अमेरिकन ड्रीमची हि दुसरी पायरी.. स्टे ऑन द कोर्स...
अरे व्वा घराचे फोटो पण टाकलेत
अरे व्वा घराचे फोटो पण टाकलेत. भारी दिसतंय घर. भारतात कोणी घर घेतलं की माझं मन लगेच इमॅजिन करतं इथे सासू सुनेचं वाजणार आणि नवरा हताश होऊन सगळं बघणार. डेली सोपचा इफेक्ट. तसं अमेरिकेतली घरं बघितली की मला वाटत इथे नक्की भूत असणार. अमेरिकन हॉरर फिल्म्स इफेक्ट. त्यात बोनस म्हणून असं पण वाटत की खिडकीतून बाहेर बघितलं की कधीही एलियन्स दिसतील.
Pages