
अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
मजेशिर किस्से!
मजेशिर किस्से!
मजेदार!
मजेदार!
ओडीनचा आजचा किस्सा
ओडीनचा आजचा किस्सा
त्याला पॉटी आली की आम्ही त्याला मेन गेट उघडून बाहेर नेतो, आमच्या कुंपणालाच लागून एक छोटे झाड आहे, तिथे साहेब तंगडी वर करून अभिषेक करतात आणि परत येतात, की आम्ही गेट लावून घेतो. पण आजकाल त्याला लवकर आत यायचे नसते. इकडे वास घे, तिकडे वास घे करत हिंडत राहतो, आणि रस्त्यावरून लोकं जात असतात, वाहने फुल स्पीडमध्ये असतात त्यामुळे त्याला लवकर आत कोंबण्याचा आमचा प्रयत्न असतो.
मला थोडी तरी दाद देतो, पण बायको किंवा आई यांना अजिबात जुमानत नाही, खुशाल काही न ऐकू आल्यासारखा उनाडक्या करत राहतो. मग त्यांना सांगितले की काठी दाखवा त्याला, तो काठी बघीतली की सुतासारखा सरळ येतो.
तर आज आई घेऊन गेली होती आणि साहेब नेहमीप्रमाणे उनाडक्या करत होते. तर आईने त्याला काठी दाखवली तर तिकडून एक कॉलेजवयीन मुलगी चालली होती. ती एकदम अस्वस्थ झाली. ती आईला म्हणे, अहो तो काही करत नाहीये, वास घेतोय फक्त, तो येईल आत. त्याला मारू नका काठीने.
आई अचंबित, ती म्हणे, छे हो मारते कशाला, ही त्याला फक्त दाखवायला, नैतर तो ऐकत नाही
तर म्हणे, ऐकतात अहो, किती इनोसंट आहे, प्लिज त्याला मारत जाऊ नका
आई म्हणे, मला म्हणजे कैद्यांवर पहारा ठेवणाऱ्या जेलरसारखा वाटतं होतं.
तिला म्हणाली, त्याला मार कसला बोट पण लावत, नुसता लाडोबा झालाय, काठीला घाबरतो म्हणून फक्त आपली धरलीय.
खरेच लाडोबा झालाय.
खरेच लाडोबा झालाय.
मस्त किस्सा. सगळ्यात
मस्त किस्सा. सगळ्यात लाडोबे हेच्च.
आमच्या तिथे माउ ने जिन्यात पिल्ले दिली आहेत म्हणून स्वीटीला त्यांच्या पासून दुरून नेतो. ह्या माउ मम्मा ची काळजी शेजारी घेत आहेत. त्यामुळे
मधल्या जागेत एक पेडिग्री एक व्हिस्का पाकीट ठेवुन दिले आहे. बाळं अजून दूधच पितात. व अगदी उत्सुक चौकस आहेत. त्यांना आता इकडे तिकडे फिरायचे आहे.
तर म्हणे, ऐकतात अहो, किती
तर म्हणे, ऐकतात अहो, किती इनोसंट आहे, प्लिज त्याला मारत जाऊ नका

तुमचं लग्न झालं नसेल*** तर विचार करुन बघा. ओड्याला प्रेमळ मालकिण भेटेल.
***झालय हे मला माहित आहे.
बॉण्ड नावाला साजेसे विचार
बॉण्ड नावाला साजेसे विचार

आणखी काही वर्षात लेकाचे लग्न होईल माझ्या
मी कुठं आता प्रेमळ मालकीण शोधू
आहे तीच पुरेशी प्रेमळ आहे
ओड्याला प्रेमळ मालकिण भेटेल.
ओड्याला प्रेमळ मालकिण भेटेल. >>
मला एकदम १०१ डाल्मॅशिअन्स सिनेमा आठवला 
अन तसेही आम्ही तिथे भेटून काय करणार. माउई ने विचारपूस केली तर ठीक आहे. पण त्याची प्रेमळ विचारपूस म्हणजे उडीच घेईल त्या एस च्या अंगावर . काय करावे म्हंता
तसे त्याच्या पेरेन्ट्स ना टेक्स्ट करून चैकशी,टेक केअर वगैरे म्हणुन झाले पण काहीतरी राहून गेल्यासारखे वाटतेय 
मला एक म्हटलं तर जेन्युइन म्हटलं तर विनोदी प्रश्न पडला आहे. माउई चा लाडका मित्र एस उर्फ 'एसु बाबा' ची सर्जरी झाली आहे. काहीतरी गिळले होते ते काढावे लागले. बिचारा एस. आता घरी आलाय. पण आता आम्ही काय करावे? प्रोटोकॉल काय असावा? त्याला घरी भेटायला जावे का? घरी जायचे तर त्याच्या फॅमिलीशी आमची तशी फार ओळख नाही पण माउई ला तो अन त्याला एसु फार आवडतात. तसेही कुत्र्यांना काय कळणार, की बॉ आपल्याला भेटायला आलेत.
त्याना कळते की आपल्याला
त्याना कळते की आपल्याला भेटायला आलेत म्हणून
मध्ये ओडी आजारी होता तर त्याला भेटायला यायचे तर जाम खुश व्हायचा
अर्थात शस्त्रक्रिया झाली असेल तर माऊई ला न नेता नुसतेच भेटून या, भुभिज शहाणे नसतात, मस्ती करायची नाही म्हणत तरी ऐकत नाहीत
अरे हो का! चांगलंय मग. मग
अरे हो का! चांगलंय मग. मग भेटुन येईन मी मुलीला घेऊन.
पण त्याची प्रेमळ विचारपूस
पण त्याची प्रेमळ विचारपूस म्हणजे उडीच घेईल त्या एस च्या अंगावर >>> हो हे नक्किच होणार , तेव्हा खट्याळ बाळाला घरिच ठेवा.
Happy three day weekend. We
Happy three day weekend. We got baby blanket from Amazon for this lady. Now recovered from major surgery.
ओड्याच्या मज्जा म्हणजे बऱ्याच
ओड्याच्या मज्जा म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याला कळत नाहीत
मला सर्दी आणि कफ झालेला म्हणून कोमट पाण्याने गुळण्या करत होतो तर इतका अजब रिएक्शन दिली
आधी त्याला वाटलं मला काहीतरी त्रास होतोय
मग त्याला कळेना हा कसला त्रास मग भुंकून घर डोक्यावर घेतले, आणि नुसता इकडून तिकडे पळत सुटला
मला इतकं फिस्कन हसू आलं की सगळं पाणी सांडलं
आवाज थांबला तसा परत माझ्याकडे येऊन तपासून गेला की सगळं ठीक आहे ना
अमा.. तिची लवकर होऊ दे
अमा.. तिची लवकर होऊ दे रिकव्हरी.. स्किन किती तुकतुकीत वाटतेय तिची.
आईग्गं कसं ते गोंडस बाळ ओडीन! दृष्ट काढा त्याची एकदा !
मागे एकदा माझ्या बिगलची दगड
मागे एकदा माझ्या बिगलची दगड गिळल्यामुळे ठरलेली सर्जरी टळली होती. खुप त्रासांनंतर ऐन सर्जरीच्या पहाटे दगड पॉटीमधुन बाहेर आला. पण यावेळी तो तेवढा लकी नव्हता. पोट आणि आत इंटेस्टाइनला एक कट देऊन दगड काढावा लागला.
तर सांगायचा मुद्दा असा की त्याला भेटायला त्याचे बरेच मित्रमंडळी येऊन गेले. टेकडीवर वेड्यासारखे पळणारे आणि खेळ म्हणजे एकमेकांना पार उलटेपालटे करून लोळवणारे, लाडात पण एकमेकांना चावे घेणारे सगळे फार सभ्य वागले. मला वाटतं त्यांना समोरचा डॉग आजारी असेल तर ते कळतं. एक हस्की मात्र त्याच्या कोन लावलेल्या रुपाला प्रचंड घाबरली. तिने जवळ यायला आणि वास घ्यायला नकार दिला. एक रॉट इतर वेळी फार खडूस आहे पण तोही याचा चेहरा चाटत राहिला. भेटायला येणार्यांनी आईस्क्रीम, ट्रीट्स, बॉल अशा गिफ्ट्स दिल्या (हे सांगते आहे म्हणजे मैत्रेयीला कल्पना देण्यासाठी). माझा बिगल इतरवेळी त्रस्त असायचा किंवा उदास पडुन रहायचा. पण त्याचे एकेक मित्रमैत्रिणी येऊन गेले की त्याच्यात फार पॉझिटीव्ह बदल जाणवायचा. मला वाटतं माऊई बेस्ट फ्रेंड असेल तर त्यांनी भेटावं. आधी थोडी रिऍक्शन पहाताना लिश घट्ट धरून ठेवली की झालं.
हल्ली मंकी सॅमी पैकी नक्की
हल्ली मंकी सॅमी पैकी नक्की कोण माहित नाही पण छोटी खारूताई, लहानशी चिमणी आणायला लागले आहेत घरात. त्यांचे वेगळे हिस्सिंग आवाज आणि जोरात म्यांव करायला लागले की कळतं काहीतरी आणलंय ! अजून तरी मारलं नाहीये आत्तापर्यंत पण काय करावं तेही समजत नाहीये. आम्हाला ते बाहेर घालवायचं एक काम होऊन बसलंय. त्यांचे नॅचरल इंस्टिक्ट मुळे ते शिकार करायला बघतात का? १ वर्षाचे झालेत आता.
ओडीन ला आज एक हॉस्टेल ला
ओडीन ला आज एक हॉस्टेल ला ठेवलं आहे
जवळच आहे एक बाई घरगुती डॉग केअर चालवतात
घरीच बाकी भुभुज सोबत सगळे राहतात
मला बाळांना पाळणाघरात ठेवताना जे फिलिंग येत ते होत म्हणूनमी गेलोच नाही
बाबा आणि दादू ठेऊन आले
नंतर त्यांना फोन केला तर म्हणाल्या थोडी मस्ती केली पण थोडा आवाज चढवला तर गुपचूप बसलाय
त्रास काहीच दिला नाहीये
गुणी बाळ आहे
मला सारखाच फोन करून कसा आहे विचारावं वाटत आहे पण त्याबाई वैतागून घेऊन जा त्याला म्हणतील
आता दिवाळीत ४ पायांच्या बच्चे
आता दिवाळीत ४ पायांच्या बच्चे कंपनीची घाबरून वाट लागणार.वाईट वाटते,ती मंडळी घाबरली की.
हो आमची cashew (त्याच त्या
हो आमची cashew (त्याच त्या फॉरेनच्या पाटलीन बाई) खूप घाबरते, बेड खालीच जाऊन बसते आणी खूप केविलवाणी बघते
मग तिला घसा कोरडा होई तोवर गोड गोड बोलून काढावं लागत, अगदी ट्रीट दाखविली तरी येत नाही बाहेर
काही उपाय आहे का पिल्ल घाबरु
काही उपाय आहे का पिल्ल घाबरु नये म्हणून
ओडीन ला अजून फटाके माहितीच
ओडीन ला अजून फटाके माहितीच नाहीयेत
गेल्या दिवाळीत आम्ही अलिबाग ला गेलो होतो तिकडे अगदीच नगण्य स्वरूपात फटाके होते
आता पहिल्यांदाच तो पुण्यातली गडगडाटी दिवाळी अनुभवेल आणि नेमके आमच्या पैकी कोणी सोबतनसणारे
तो एकदाच आवाजाला घाबरला होता आता पावसाळ्यात गडगडाटी आवाज आला तेव्हा, कोपऱ्यात भिंतीकडे तोंड करून एकदम गिल्टी फेस करून बसला होता
बिचाऱ्या पिल्लाला कळतच नव्हतं काय सुरू आहे ते
त्याला मग कुशीत घेऊनथोपटून शांत केले
पण विजांचा गडगडाट, दिवाळीत
पण विजांचा गडगडाट, दिवाळीत फटाके हे आवाज प्राण्यांना ऐकून माहीत झालेले असणार न,मग दरवर्षी भुभु का घाबरत असतील ????
डॉग्ज च्या जन्माच्या वेळेस्चे
डॉग्ज च्या जन्माच्या वेळेस्चे २-३ महिने जर पावसा -वादळाचे असतील तर त्यांना नंतर पण सवय असते आवाजाची. पण लहानपणी ते आवाज ऐकले नसतील तर नंतर घाबरतात दर वेळी. माउई इथल्या स्प्रिंग मधे जन्मलेला असल्यामुळे त्याला विजांच्या अन ढगांच्या गडगडाटाच्या वाजाचे काहीच वाटत नाही.
ओड्या अजून दोन वर्षांचा
ओड्या अजून दोन वर्षांचा व्हायचा आहे
त्याला नाहीये सवय अजून
आणि सवय होईल असे वाटत नाही
हा कसला आवाज आहे हे त्यांना कळत असेल असे वाटत नाही
आणि भुभिज ना बारीक आवाज पण amplify होऊन ऐकू येत असावा
त्यामुळे आपल्यापेक्षा त्यांना जास्त त्रास होतो
मला सारखाच फोन करून कसा आहे
मला सारखाच फोन करून कसा आहे विचारावं वाटत आहे पण त्याबाई वैतागून घेऊन जा त्याला म्हणतील>> आशुचॅम्प ! तुम्ही कुठे राहता? माझ्या मित्राचे डॉग केनेल आहे त्याने ६ वर्शापुर्वी सुरु केलेय आता दुप्पट जागा घेवुन खुप मस्त रन करतोय खाली फेसबुक पेजवर रिव्ह्युज वाचु शकता, तो पिकप आणी ड्रोप ऑफ पण करतो आणी सतत फोनवर अपडेट असतात. मी अजिबात पेट पर्सन नाही पण त्याच्या सर्व्हिस क्वालिटीची गॅरेन्टी नक्की देवु शकेल.
https://www.facebook.com/unleashwithsam
मी पण दिवाळीत आवा जाचा त्रास
मी पण दिवाळीत आवा जाचा त्रास होउ नये म्हणून कुत्र्या जवळच राहते. स्ट्रे डॉगज पण इथे तिथे पळताना गरम फटाके फुलबाजीच्या तारा ह्यांवर पाय देउन भाजुन घेउ शकतात.
तुमच्या घरा/ बिल्डिन्ग बाहेर पाणयचे डिस्पोजेबल बोल ठेवा जमल्यास. व मुले फटाके उचलतात तेव्हा पण एक भरलेली बादली असूद्या. दारू काम झाले की ही बादली ओतून द्या म्हणजे प्राण्यांचे पाय भाजणार नाही.
माझा अपडे ट( पपडेट) : इथल्या एका कुत्र्याला स्किन इन्फेक्षन झाले होते. हे दुर्लक्ष केले तर अंग भर पसरते. अशी कुत्री पाहिली आहेत.
ही माझ्या टचला जरा सरावलेली आहे. म्हणून मी वुंडॉक्स म्हणोन एक पाव् डर मिळते ती त्या जखमांवर लावली. तोंडा पाशी कानामागे अश्याच होत्या छोट्या छोट्या . इन्फेक्षन पसरू नये म्हणून पावडर संपल्यावर नवे आणा यला वेळ नव्हता तर चक्क डबीत हळद नेली व ठोपली जखमांमध्ये आता त्या हील झाल्या आहेत व खपल्या धरल्या आहेत. हे बावळ ट आपण च खाजवून पसर रव तात.
आता रोज वॉकला जाताना हळ द डब्बी व पाण्याची बाटली नेत आहे. उन्हे झाल्या पासून पाण्याचे दुर्भिक्ष झाले आहे.
एका पपी कुत्रीचे बाळ त पण झाले पण पपीज कुठे दिसले नाहीत. ती ट्रीट घ्यायला मात्र येते. पोरे निसर्गावर सोडून दिली असावीत.
इथे वाचून नवी दृष्टी येते
इथे वाचून नवी दृष्टी येते.आवाजाने त्रास होतो हे माहिती होतं पण हे पाय भाजण्याचं आताच लक्षात आलं.
आम्ही गेली अनेक वर्षं फटाके लावत नाही(अर्थात यात पर्यवरण भीती आणि आळस हे तिन्ही मिश्र प्रमाणात आहे.)
पुण्यात भुभु सेफ फराळ मिळतो
पुण्यात भुभु सेफ फराळ मिळतो असं इथेच कोणीतरी लिहिलं होतं ना ? कुठे मिळतो असा फराळ कोणी सांगू शकेल का ?
औंध येथील शासकीय पशू ( vet )
औंध येथील शासकीय पशू ( vet ) रुग्णालयाचा नंबर आहे का कोणाकडे ? नेटवर सर्च केल्यावर मिळाला नाही..
तसेच तिथला काही अनुभव आहे का ?
पुण्यात भुभु सेफ फराळ मिळतो
पुण्यात भुभु सेफ फराळ मिळतो असं इथेच कोणीतरी लिहिलं होतं ना ? कुठे मिळतो असा फराळ कोणी सांगू शकेल का ? >>>>> मी लिहिलं होतं. अजुनही कोणी लिहिलं असेल तर ते ही रिस्पॉन्ड करतील.
मी ज्या व्यक्तीबद्दल लिहिलं होतं, तो गोव्याला शिफ्ट झाला आहे असं त्याच्या फेसबुक पेजवर वाचलं होतं. पण ऑर्डर केल्यास ते पुण्याला कुरिअर करतील असाही उल्लेख होता.
नाव - अनिष भट 87669 51985
Pages