बडबडगीत

Submitted by Rudraa on 1 October, 2021 - 21:26

उठ उठ,उठ उठ आईची बडबड,
गार गार गारठ्याला भलतीच चड ।।
भिर भिर, भिर भिर पक्षांची भरारी ,
चिवचिव चिमण्याची तांदळाची न्याहरी ।।१।।

सुई सुई, सुई सुई करतो वारा ,
सळसळ पानांचा आवाज निराळा ।।
खड खड,खड खड रस्ता लई भारी ,
रोज रोज बैलगाडीची मौजच न्यारी ।।२।।

सर सर, सर सर पळतात ढग ,
मऊ मऊ गालिच्छे निळे निळे नभ ।।
रिपरिप, रिपरिप पावसांच्या सरी ,
खळखळ पाण्यात माशांची स्वारी ।।३।।

गड गड, गड गड ढगांचा ढोल ,
कडकड कडाड गेला विजेचा तोल ।।
काळी काळी काळी अंधारातली माडी ,
धड धड काळजात धसकन् करी ।।४।।

-रुद्रा -

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users