नामस्मरण:सल्ला हवा आहे.

Submitted by सचिन पगारे on 24 October, 2021 - 02:42

माझ्या एका मित्राबद्दल सल्ला हवा होता. मायबोलीकरांनी सल्ले द्यावीत ही विनंती.
कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाणे तसे
वाईटच आमच्या मित्राचे तेच झालेय तो नामस्मरणाच्या आहारी गेलाय. 'आता हे तर ग्रेट काम आहे यात कसलं आलाय आहारी जाणे?' असा प्रश्न बऱ्याच जणांना पडेल.ते कस हे मी थोडक्यात स्पष्ट करतो. हा मित्र पाहिल्या पासूनच स्थूल प्रकृतीचा उंची साधारण पण वजन ८० ते ८५ किलो च्या आसपास. खाण्याची प्रचंड आवड, धावपळ भरपूर करायचा. सदा हसमुख
पण गेल्या ६ महिन्यापासून त्याने एका प्रसिद्ध बुवांचा फोटो आणलाय.सध्याचा त्याचा दिनक्रम पुढीलप्रमाणे.
रोज सकाळी ४ वाजता उठतो. सर्व मुखमार्जनादी विधी आटपून ५ वाजता बुवांच्या फोटोसमोर नामस्मरण करत बसतो ते थेट ७ वाजताच फोटोसमरून उठतो. नंतर नाश्ता करून दुकानावर बसतो. दुपारी दोन तासाकरिता घरी येतो.तासभरात जेवण करून विश्रांती घेतो. नंतर पुन्हा दुकान नंतर घरी जाऊन जेवण वैगरे करून पुंन्हा नामस्मरणाला बसतो ते थेट अकरा वाजेपर्यंत. त्याच्यातला सामाजिक पणा जवळपास नाहीसाच झालाय. पण सततच्या बैठ्या दिन क्रमामुळे त्याचे वजन प्रचंड वाढले आहे. त्याला मागच्याच महिन्यात मधुमेह झालाय. डॉक्टरांनी त्याला पहाटे वॉक् घ्यायला लावलाय पण नामस्मरणामुळे त्याला पहाटे वेळ नाही. त्याच्या वडिलांनी मानसोपचारतज्ञाची मदत घ्यायचा प्रयत्न केला पण मित्राने तो साफ धुडकवून लावला.

तरी मायबोलीकरांनी ह्यावर काय उपाय करावा याचा सल्ला द्यावा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>>>>>>आता हे तर ग्रेट काम आहे यात कसलं आलाय आहारी जाणे?' असा प्रश्न बऱ्याच जणांना पडेल.
असं काही नाही. गृहस्थाश्रमात आहात तर प्रपंच व परमार्थ यांचा तोल सांभाळलाच पाहीजे आणि सर्व संतांनी तेच सांगीतले आहे. अगदी गोंदवलेकर महाराजांनीही.
तुमच्या मित्राला 'ऑबसेशन' ची व्याधी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वा! काश मला असं नामस्मरणाचं व्यसन जडलं असतं...! आमच्या सारख्या पामरांना आठवडाभर रोज 1 तास नामस्मरण केलं तरी फार मोठं काही तरी आचिव केल्यासारखं वाटतं. ते असो!

दुकान व्यवस्थित चालवतोय म्हणजे कधी नामस्मरण करावं कधी नाही ते समजण्याची अक्कल आहे.. एकंदरच तुमचा मित्र कमी सोशल आणि बैठे काम आवडणाऱ्या प्रकारातला आहे. उगाच त्याचा दोष नामस्मरणाला का द्या ? मुळातच नामस्मरण हे बसूनच करावे असा नेम नाही. संत तुकारामांची गोष्ट माहीत आहे ना? ते संडासला जायचे तेंव्हा देखील नाम देत असल्याचे. गेला बाजार जनाबाईंची गौऱ्या थापाताना नाम घेण्याची गोष्ट ही माहीतच असेल.

त्या बुवांचा फोटो अणण्याआधी तुमच्या मित्राची दिनचर्या काय होती? हे लॉकडाउन झाल्यापासून तसे तर सगळेच बसे झाले आहेत. जे बसे नाही झाले ते अति ऍक्टिव्ह झाले आहेत.

आता तुमच्या या मित्रासारखाच माझा एक मित्र अति व्यायाम फ्रिक झालाय. जेवण सुद्धा प्रत्येक कॅलरी मोजून खातो, मिळेल त्याक्षणी काही तरी व्यायाम किंवा योगा करत असतो.
आता रूढार्थाने त्याने त्याची सामाजिक देवाण घेवाण बंद केली नाहीये पण तो सतत एवढंच बोलत असतो आणि तेच करत असतो म्हणून आम्हीच त्याला आमच्यात बोलवायला टाळतो. तो देखील तोंडावर म्हणतो की तसंही तुम्ही भेटून जंक खाता त्यामुळे मला ते आवडत नाहीच. आता त्याचं रुटीन घर ते जिम आणि जिम ते घर एवढंच आहे. किमान 5 महिने झाले.

सांगायचा मुद्दा हा की हा 'व्यायामाचा', 'नामस्मरणाचा', 'जिम ट्रेनरचा' अथवा कुठल्याही 'बुवा'चा दोष नसून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा दोष आहे, अति करणे हा... त्यामुळे तुम्हाला केस हाता बाहेर गेलीये असं वाटत असेल तर सामो म्हणाल्या तसं योग्य डॉक्टर कडे घेऊन जा.

वा वा!
नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे
हाची सुबोध गुरूंचा नामापरते न सत्य मानावे.
पगारे तुम्ही पण नाम:स्मरण करायला लागा बघू.

आता तुमच्या या मित्रासारखाच माझा एक मित्र अति व्यायाम फ्रिक झालाय. जेवण सुद्धा प्रत्येक कॅलरी मोजून खातो, मिळेल त्याक्षणी काही तरी व्यायाम किंवा योगा करत असतो.

>>>inspiring

जे बसे नाही झाले ते अति ऍक्टिव्ह झाले आहेत. >>> +123456789

inspiring >>> डोंबलाचं इंस्पायरिंग. असं कॅलरी मोजून खाणाऱ्या ला घरी जे कोणी बनवून देतंय त्याची पुरती वाट. सगळ्यांसाठी नॉर्मल जेवण, या विभूती साठी स्पेशल शेजारी काटा ठेवून मोजून. पुन्हा यांच्यासमोर आपलं नॉर्मल जेवण खायचं म्हणजे आहारतज्ज्ञ रोल मध्ये जाऊन लेक्चर ची हमी. भात / पोळी खाताय बाबौ . पापु बिपु तर विसराच.
तंगड्या पसरून वेबसिरीज / टीव्ही/ मोबाईल बघताय , मग ऐका किती कॅलरी बर्न केल्या द्या हिशोब नाहीतर पुनः लेक्चर ची हमी.

एकटं स्वतःच स्वतः बनवून खात असेल त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. दोस्त मंडळी टाळू शकतात घरच्या मेम्बरांनी कसं टाळायचं

मला नाही वाटलं inspiring , मला पगारेंचा मित्र inspiring वाटला. प्रेफ्रन्स की बात है ये!

माझं म्हणणं आहे तुम्ही कॅलरीज खा नाही तर पाण्यावर जगा. स्वतःपुरतं ठेवा ना. म्हणजे 100 लोकं जमले आहेत तिथे तुम्ही आलात , ते समोसा खातायेत तर तुम्ही म्हणणार शी शी, किती कार्ब्स, आता तुम्ही एवढ्या कॅलरीज खाल्या, आता एवढं कोलेस्ट्रॉल वाढणार, मग तुम्ही एक दिवस असे मरणार, तुम्हाला असा अटॅक येणार ब्ला ब्ला ब्ला.
एक कानाखाली वाजवावीशी वाटते मला तर. मित्र आहे म्हणून अजून वाजवली नाही.

हेच सेम जर कोणी मला असं नामस्मरण कर नाही तर तुझं आयुष्य असं व्यर्थ आहे, तुझ्या आयुष्यात यांव होणार आणि त्यांव होणार असली फालतू बडबड केली तर त्याला पण एक कानाखाली वाजवेन मी आणि म्हणेन नामस्मरणाचा तुला लोकांना माफ करता येण्या इतका फायदा झालाय का ते बघत होते.

अति तिथे माती हेच खरं. अशी ऑब्सेसिव्ह माणसं ऐकत नाहीत कुणाचं. प्लस विरोध करणार्या दुसर्या माणसाला एकतर खुळ्यात तरी काढणार किंवा आपल्यात सामिल तरी करून घेणार.

डॉक्टरांनी त्याला पहाटे वॉक् घ्यायला लावलाय पण नामस्मरणामुळे त्याला पहाटे वेळ नाही >> पहाटेच केला पाहिजे असे का? त्यांनी एक चांगली वेळ सजेस्ट केली. ती जमत नसेल तर दुकानाला जात असताना आणि/किंवा दुकानातून परतत असताना मोठा वॉक करून जाऊ/येऊ शकतो.
घरी सुद्धा बसून करण्यापेक्षा चिपळ्या वगैरे घेऊन नाचत नामस्मरण करू शकतो.

नामाला कसलीच उपाधीची गरज नाही हो! सकाळी फिरायला जातांना काउंटर हातात ठेवून नामस्मरण करू शकता!
खाता पिता, बसता उठता , गाडीत, बस-ट्रेनमध्ये , अगदी जिमवर्क करतांना करू शकता!

चालतां बोलतां धंदा करितां | खातां जेवितां सुखीहोतां | नाना उपभोग भोगितां | नाम विसरों नये || ७ ||

नारदमुनी - श्रेष्ठ भक्त कोण ? - शेतकरी - नारदमुनी 24 तास नामस्मरण - शेतकरी रात्री एकदाच

मुद्द्यावरून गोष्ट लिहा
सगळं लिहायचा कंटाळा आलाय

नारदमुनी 24 तास नामस्मरण - -देवलोकात उठबस. पलक झपकी की ठेसनात हजर

शेतकरी रात्री एकदाच - - मर्त्य लोकांत उठबस, पेट्रोल,डिझेल रांगेत उभे राहा आणि खड्ड्यातुन ठेसनात पोचा

असं मी नाही वरचे सपांचे मित्रवर्य म्हणतील.

ती गोष्ट मी लहानपणी अशी ऐकलेली, एकदा नारदमुनींनी श्रेष्ठ भक्त कोण विचारलं तेव्हा विष्णूंनी दिवसातून फक्त तीन वेळा नाम घेणारा शेतकरी सांगितलं होतं. तर कसा तो, मी तर सतत तुमचं नाव घेतो. तेव्हा विष्णुंनी त्याला वाटीभर तेल दिलं आणि न सांडता कुठला तरी लोक फिरून यायला पाठवले (त्रिलोक का पृथ्वीलोक आठवत नाही).

नारदमुनिनी न सांडता ती परीक्षा पूर्ण केली, पण एकदाही नारायण नाव घेतलं नाही फक्त तेल सांडू नये इथे लक्ष दिलं. त्यामुळे नारायण म्हणाले की काम करताना तू मला विसरलास. तो शेतकरी त्याचं कर्म करताना तीनदा तरी माझे नाव घेतो.

त्यावरून आपलं कर्म प्रामाणिकपणे करावे, ते करता करता देवाचे नाम घ्यावं मग भले ते एकदा असो, अशी शिकवण मी घेतलेली.

तसंही नाम:स्मरण येता जाता करावे आपल्याला जमेल तसे आणि करायची इच्छा असेल तर या मताची मी आहे.

इथे पर्सनल वगैरे सांगायचं नाहीये पण वरती ब्लॅककॅट यांनी उल्लेख केलेली कथा ऐकलेली आठवली आणि मी घेतलेली शिकवण आठवली.

अहो पाहण्याचा कोन चुकलाय. त्या मित्राला दुकानात बसण्याचा नाद लागला आहे. पूर्ण आहारी गेला आहे. तिथे बसल्याने क्यालरिज खर्च होत नाहीत. गल्ल्यावर बसून क्याश ड्रावरातली नाणी हाताने चोळत राहण्याने काय होणार? दुकानासमोरून मॉलसकडे जाणारी गिऱ्हाइकं पाहून मानसिक ताण वाढतो.

नामस्मरण करतात हे चांगलंच आहे. जास्त नामस्मरण करतात त्यांच्यात आकाशात उडण्याची ताकद येते आणि ते केव्हाही स्वर्गलोकी जाऊ शकतात. तुमच्या मित्राशी मैत्री वाढवा. तुम्हाला जिवंतपणी स्वर्ग पाहायला मिळेल.

एक कानाखाली वाजवावीशी वाटते मला तर. मित्र आहे म्हणून अजून वाजवली नाही.>> भारीच बाई आक्रमक मैत्रीण.

पहिले म्हणजे तुम्ही त्यात लक्ष घालणे थांबवा. त्यांना उप योग होतो आहे ना. इ ट इज हिज लाइफ. व्हॉटेव्हर रॉक्स हिज बोट.

आजकाल माबो करणी एकदम कानाखाली वाजव /फाट्यावर मार लेव्हलला चर्चा का करतात? इज इट हार्मोन ल ? पूर्वी असे नव्हते शाब्दिक अपमानांवर भागत असे.

धागा काढा कोन्तरी.

पहिले म्हणजे तुम्ही त्यात लक्ष घालणे थांबवा. त्यांना उप योग होतो आहे ना. इ ट इज हिज लाइफ. व्हॉटेव्हर रॉक्स हिज बोट.
>>>> हे धागा कर्त्यांसा ठी आहे हो. तुम्ही लोड घेउ नका.

हे नामस्मरण आणि कानाखाली आवाज एवढे मिक्स होऊन गेलंय की भाचा खूपच खोड्या करत होता त्याला मी "गप बस नाही तर कानाखाली नामस्मरण काढीन" असं म्हणालो.

Pages