नामस्मरण:सल्ला हवा आहे.

Submitted by सचिन पगारे on 24 October, 2021 - 02:42

माझ्या एका मित्राबद्दल सल्ला हवा होता. मायबोलीकरांनी सल्ले द्यावीत ही विनंती.
कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाणे तसे
वाईटच आमच्या मित्राचे तेच झालेय तो नामस्मरणाच्या आहारी गेलाय. 'आता हे तर ग्रेट काम आहे यात कसलं आलाय आहारी जाणे?' असा प्रश्न बऱ्याच जणांना पडेल.ते कस हे मी थोडक्यात स्पष्ट करतो. हा मित्र पाहिल्या पासूनच स्थूल प्रकृतीचा उंची साधारण पण वजन ८० ते ८५ किलो च्या आसपास. खाण्याची प्रचंड आवड, धावपळ भरपूर करायचा. सदा हसमुख
पण गेल्या ६ महिन्यापासून त्याने एका प्रसिद्ध बुवांचा फोटो आणलाय.सध्याचा त्याचा दिनक्रम पुढीलप्रमाणे.
रोज सकाळी ४ वाजता उठतो. सर्व मुखमार्जनादी विधी आटपून ५ वाजता बुवांच्या फोटोसमोर नामस्मरण करत बसतो ते थेट ७ वाजताच फोटोसमरून उठतो. नंतर नाश्ता करून दुकानावर बसतो. दुपारी दोन तासाकरिता घरी येतो.तासभरात जेवण करून विश्रांती घेतो. नंतर पुन्हा दुकान नंतर घरी जाऊन जेवण वैगरे करून पुंन्हा नामस्मरणाला बसतो ते थेट अकरा वाजेपर्यंत. त्याच्यातला सामाजिक पणा जवळपास नाहीसाच झालाय. पण सततच्या बैठ्या दिन क्रमामुळे त्याचे वजन प्रचंड वाढले आहे. त्याला मागच्याच महिन्यात मधुमेह झालाय. डॉक्टरांनी त्याला पहाटे वॉक् घ्यायला लावलाय पण नामस्मरणामुळे त्याला पहाटे वेळ नाही. त्याच्या वडिलांनी मानसोपचारतज्ञाची मदत घ्यायचा प्रयत्न केला पण मित्राने तो साफ धुडकवून लावला.

तरी मायबोलीकरांनी ह्यावर काय उपाय करावा याचा सल्ला द्यावा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ओके अमा, तुम्ही आधी मला उद्देशून एक वाक्य लिहिलं म्हणून पुढचं कॅन्टीन्यूशन मध्ये मला माझ्यासाठी वाटलं.

मी कुणाचेही (बाबा , स्वामी, महाराज.... राम , बजरंग बली... ) नामस्मरण करत नाही. वेळ असेल तर छान गाणे एकतो. कुणी नामस्मरण करत असेल आणि त्या नामस्मरणाचा इतरांना काडीचाही त्रास होत नसेल तर खुशाल करु द्यावे या मताचा आहे.

त्यांना चालता चालता नामस्मरण करायला सांगा. नेहमीपेक्षा डबल चालले तरी कळणार नाही. सिरीयसली सांगतोय. ही ट्रीक मला लाँग वॉकची प्रॅक्टीस करत असताना लक्षात आली. Happy

आजकाल नामस्मरणाची टेप किंवा युट्युब वर व्हिडीओ मिळतो. दुकानात गल्ल्याव्र बसल्यावर ते चालू ठेवता येइल.

मी हल्ली सचिन वाझे आणि समीर वानखेडे महाराजांचा जप करतो. नबाब मलिकांचाही जप करतो.
बागेतल्या वडेवाल्याचा जोशी वडेवालाप्रमाणे उद्योगीपती म्हणून प्रमोट झालो कि मग मला नमोदेऊळ, सोनियादेऊळ बांधून मोठ्ठा जप करता येईल. आमच्या देवळात दान पेटी असेल. त्यात पैसे टाकायला सर्व मायबोलीकरांचे स्वागत असेल.

त्याला पण एक कानाखाली वाजवेन मी आणि म्हणेन नामस्मरणाचा तुला लोकांना माफ करता येण्या इतका फायदा झालाय का ते बघत होते.>>> हाहाहा खूप हसले.

मानव Rofl

घरी एक मांजर पाळायला द्या, किंवा बोका
आणि त्याचे नाव त्या बुवांचे ठेवा
सतत हाक मारूनही तो ढिम्म बघणार नाही
त्याच्यासाठी ठेवलेले खाणे नेवैद्य समजून खाईल आणि कृपादृष्टी न टाकताच निघून जाईल
घरात देव च वस्तीला आल्याचा फिलिंग येईल
Happy

>>>>त्याच्यासाठी ठेवलेले खाणे नेवैद्य समजून खाईल आणि कृपादृष्टी न टाकताच निघून जाईल
घरात देव च वस्तीला आल्याचा फिलिंग येईल
Happy

वाह!! कविताच झालीये ही Happy

आमच्या देवळात दान पेटी असेल. त्यात पैसे टाकायला सर्व मायबोलीकरांचे स्वागत असेल.>> आणि प्रसाद म्हणुन वडे भेटतील का?

Pages