Submitted by मेधावि on 9 October, 2021 - 11:28
भातखंडे स्वरलिपीतल्या काही बंदीशी टाईप करायच्या आहेत. त्याची जी चिन्हे असतात ती कशी टाईप करायची?
हे काम बाहेरून करून घ्यायचे तरी कुठे करून मिळेल?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Submitted by shantanuo >>>>>
Submitted by shantanuo >>>>>
तुम्ही हे सगळे मेधाविंना सुचवताय ना? पूर्ण राग युनिकोडमध्येच कुठे लिहायचा? वर्ड फाईलमध्ये नव्हे ना?
पायथॉन स्क्रिप्टमध्ये प्रोग्राम लिहून run execute केले की भातखंडे लिपीतील पूर्ण राग दिसू लागेल, असे म्हणताय ना?
मला प्रोग्रमिंग आणि भातखंडे लिपी दोन्ही येत नाही.
मी फक्त वर्ड फाईलम्ध्ये insert symbol वापरून त्यांना हवे असलेले दृश्य परिणाम मिळतात का पाहिले. सोप्या रीतीने मिळतात कळल्यावर लिहून टाकले. बाकी त्यांना पुढे HTML स्वरूपात वेबपेजवर वगैरे टाकायचे असेल तर तुमची पद्धत सोयीची ठरेल बहुतेक.
Submitted by हरचंद पालव >>>>>
स्मार्टफोन नसेल तरी वर्ड फाईलमध्ये आपला लॅपटॉपचा कीबोर्ड वापरून ०९४D AltX ने स्वरासहित अक्षराचा पाय मोडता येतो.
शी् असा.
Submitted by BLACKCAT on 11 October, 2021 - 17:15 >>>>
अधोरेखन चंद्रकोरीचे मात्रांचे वाटप / गणित कळले. पण या चिन्हांनुसार गायक गाताना काय फरक करत असावेत त्याची कल्पना मला करता येत नाहीये.
आणि मुळात भातखंडे लिपीतील ही चंद्रकोरीची अधोरेखा / उर्ध्वरेखा + पोटात स्वरसमूह हे लिखीत बंदिशीत टाईप कसे करायची हे कळत नव्हते. कोणाला मिळाले का काही कळफलक शॉर्टकट?
@ मेधावि --- नावे घेऊन काय कळले नाही ते विचारा म्हणजे जो तो पाहून सांगेल. माझे काही स्पष्टीकरण हवेय का?
एक्स्टिंशन
एक्स्टिंशन
ही इतकी लांबलचक वेलांटी कशी मारली shantanuo?
याच्या खाली आडवी रेघ मारून त्यात या वेलांटी चे प्रतिबिंब घेता आले तर अधोरेखित चंद्रकोर झाली की तयार !
नी् - जमले वर्डमध्ये. धन्यवाद
नी् - जमले वर्डमध्ये. धन्यवाद कारवी. (संगीतमय धाग्यावर शी् लिहायला नको वाटते
)
>> एक्स्टिंशन : ही इतकी
>> एक्स्टिंशन : ही इतकी लांबलचक वेलांटी कशी मारली?
तुम्ही जेव्हा मायबोलीवर तो शब्द लिहिता तेव्हा तुम्हाला अर्धीच वेलांटी मिळते का? लांब वेलांटीच मिळत असावी कारण मला वाटते मायबोली डायनॅमिक फाँट वापरते.
०९५२ ने जशी अक्षराखाली एक रेघ येते तशीच ०९५७ ने दोन रेघा येतात.
भॗातॗ॑
हे अपेक्षित नसेल तर शोध जारी ठेवावा लागेल. देवनागरी बरोबरच कन्नड, तमिळ वगैरे भाषात किंवा त्यापुढे जाऊन रशियन / चायनीज भाषेत असे चिन्ह मिळते का ते पहावे लागेल. विकिपीडियावरील युनिकोड लेखात सर्व चिन्हे पहायला मिळतील.
जर हवे असलेले चिन्ह मिळाले नाही तर काय? हा एक वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल. पण थोडक्यात…
१) युनिकोड कंसोर्टियमला विनंतीः- जी मान्य होण्याची शक्यता ०% इतकी आहे.
२) भातखंडे लिपीतच सुधारणाः- युनिकोडमध्ये उपलब्ध असलेले चिन्ह स्वीकारण्याची संगीतकारांची तयारी आहे का ते पहावे लागेल.
३) नवीन फाँटः- युनिकोडचा नाद सोडून हा फाँट वापरा.
https://omenad.github.io/fonts/ome-bhatkhande-hindi/
४) यानेही समाधान झाले नाही तर नवीन फाँट बनवावा लागेल. हे काम अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ आहे.
माझे वैयक्तिक मत असे आहे की वर दिलेल्या पर्याय २ चा स्वीकार करावा. युनिकोडच्या मुख्य प्रवाहात राहण्याचे काही दीर्घकालीन फायदे आहेत. ते शक्य नसेल तर मग पर्याय ३ वापरावा.
भातखंडे पद्धत अनेक संगीतकार
भातखंडे पद्धत अनेक संगीतकार वापरतात. पण ते सर्व काही युनिकोड वापरत नाहीत, किंवा संगणकावर स्वररचना लिहित नाहीत. त्यामुळे इतर कुणाला तरी टंकन करताना सोयीचे पडावे म्हणून कुणी भातखंडे लिपीत बदल स्वीकारेल असे वाटत नाही. पर्याय २ हा सगळ्यात शेवटी पकडावा. (अनेक जण सुचवतील की तुम्हाला अमुक एका प्रकारे भातखंडे लिपी नीट लिहिता येत नसेल, तर तुमचं लिहिण्याचं साधन बदला. तेवढ्यासाठी मूळ लिपी बदलणं हे कुणाला पटणार नाही. घोड्याला नाल बसत नाहीये, त्यामुळे घोडा बदला - असं म्हणण्यापैकी आहे ते.)
नवीन Submitted by हरचंद पालव
नवीन Submitted by हरचंद पालव on 14 October, 2021 - 05:20 >>>>
माझ्याकडे होत्या त्याच वर्ड फाईलमध्ये प्रयत्न केला पाय मोडायचा. बाकी अक्षरांना इतर चिन्हे होती. हेच एक शिल्लक होते. मग त्याचा मोडला. लक्षात नाही आले.
नवीन Submitted by shantanuo >>>>>>
हे अपेक्षित नसेल तर शोध जारी ठेवावा लागेल. >>>
मी मेधाविंना तेच विचारले, की अपेक्षित चिन्हे काय काय आहेत. उपलब्ध आहेत त्या चिन्हात बहुतेक सर्व बसेलच. वर्डच्या सिंम्बॉल लिस्टमध्येही पंजाबी, बंगाली, गुजराथी, तमिळ, अशा बर्याच भाषांच्या लिपी आहेत त्यात काही मिळेल. तर काही डेकोरेटिव्ह / कॅलिग्रफी सिंबॉल्समध्येही मिळेल. फॉन्ट लिस्ट्मधील वेगळे फॉन्ट बघावे लागतील.
तुम्ही दिलेली युनिकोड चिन्हे आणि वैदिक एक्स्टेंशनही पाहिली.
नसलेली चिन्हे >>>> स्वतः बनवता येतील.
२-३ चिन्हेच उपलब्ध फाँटमध्ये नसतील तर अशी बनवता येतील. थोडा हात बसावा लागेल.......पण शक्य आहे.
Windows 10 मध्ये eudcedit शोधा. त्यात Private Character Editor वापरून आपण कोड ठरवू शकतो. मग आपल्याला हवे ते चिन्ह तयार करायचे ( draw). सेव्ह करायचे.
नेहमीप्रमाणे वर्ड फाईलची इन्सर्ट सिंबॉल लिस्ट ---- त्यामध्ये All fonts (private character) फाँट निवडून आपले चिन्ह सिलेक्ट-कॉपी करता येते.
wikihow वर Create and Install Symbols on Microsoft Word मध्ये सगळ्या स्टेप्स दिल्या आहेत.
फक्त आपल्याला बाकी अक्षरांच्या तुलनेत चिन्ह कुठे द्यायचे आहे ( डावी/उजवी बाजू, वर/खाली); किती लहाने/मोठे हवे त्याप्रमाणे ड्रॉईंग ग्रिडवर आपल्याला जागा ठरवावी लागते आणि साईझही. वर्ड फाईलमध्येही चिन्ह रिसाईझ करता येते. रिलोकेट मात्र नाही. ती जागा ग्रिडवरच ठरवावी लागते.
मी चंद्र्कोरीसाठी प्रयत्न केला होता. पण चित्रकला यथातथा असल्याने फार नेटकी कोर नाही आली. पेंटब्रशमध्ये मात्र जमलेय. पहिली चौकोनी कोर private character; दुसरी बरी पेंटब्रशची.

चंद्रकोर रिसाईझ केली की २/३/४ अक्षरांना पुरेशी होते.
काल मेधावि कळत नाही एक्स्प्लेन करा लिहून गेल्या....त्यांच्या नवीन रिप्लायची वाट पाहू.
कारवी,
कारवी,
मी रविवारी तुम्ही सुचवलेले सर्व प्रयोग करून एक बंदिश लिहीन आणि मग विचारीन.
बंदिश ही सही, स्वर ही लिखाने
बंदिश ही सही, स्वर ही लिखाने के लिए आ
भातखंडे - लिपी - कोड दिखाने के लिए आ
ह्यावर काहीतरी यमनकल्याणवर आधारित होऊ शकेल
शंतनू, छान पोस्ट आणि चार
शंतनू, छान पोस्ट आणि चार पर्याय. कुठेना कुठे हवे ते चिन्ह मिळावे.
आणि चिन्हे युनिकोड मध्येच असावेशी पूर्ण सहमत, कारण पोर्टेबिलिटी. वेगळा फाँट हा पर्याय अजिबात वापरू नये, कारण तो काळाच्या ओघात टिकणार नाही. पहिल्या किंवा दुसर्या पर्यायाचाच पाठपुरावा करावा. मोस्टली सगळी चिन्हे मिळाली आणि एखादे मिळाले नाही, तर त्याला रिप्लेस करायला काही वापरता आलं तर बघावे. बरोबर ते युनिकोड मध्ये आणण्याचे प्रयत्न चालू ठेवावे.
मी काही प्रयत्न करुन बघितला नाही, पण नोटेशन लिहिताना स्पेसिंगचा गोंधळ उडत नाही का वर्ड प्रोसेसर मध्ये?
माना के युनीकोड मे हुई बेसुरी
माना के युनीकोड मे हुई बेसुरी बंदीश
गंजकी बिजागिर ना सही, वाङगेके लिए आ ||
मग गंधर्ववाले पुस्तके कशी
मग गंधर्ववाले पुस्तके कशी छापतात ? साकलकोस्टाईलने का ?
सायक्लोस्टाईल तंत्र आहे अजून की त्याची भैरवी झाली ?
यातलं काहीएक कळत नाही, पण
यातलं काहीएक कळत नाही, पण शंतनू, कारवी आणि हरचंद पालव यांचे प्रतिसाद आवडले. हे मुद्दाम स्पष्ट करण्यासाठी हा प्रतिसाद.
इतक्या उत्साहाने ते प्रयत्न करत आहेत, याचं खरंच कौतुक आहे. _/\_
उबोंशी सहमत.. मराठी भाषेच्या
उबोंशी सहमत.. मराठी भाषेच्या अभ्यासाचा आदर व कौतुक वाटते व प्रामाणिक कळकळही जाणवते. _/\_
वाङगेके लिए आ >> अमित
वाङगेके लिए आ >> अमित

सायक्लोस्टाईल तंत्र आहे अजून
सायक्लोस्टाईल तंत्र आहे अजून की त्याची भैरवी झाली ?>>
माना के युनीकोड मे हुई बेसुरी बंदीश
गंजकी बिजागिर ना सही, वाङगेके लिए आ ||>>
हरचंद, अमित...कारवी, उबो..
हरचंद, अमित...कारवी, उबो..
एकदम उपेक्षित धाग्याला चार चांद लावलेत.
कारवी,
मी ट्राय करते आहे आणि जमतंय जमतंय...
धागा उपेक्षित असला तरी विषय
धागा उपेक्षित असला तरी विषय जुना आहे. किरण भावे (किरण या नॉन-युनिकोड फॉंटचे जनक) यांनी युनिकोड तंत्राच्या उपयोगितेची चर्चा करतानादेखील हा मुद्दा मांडला होता. त्यांचा ७.c हा भाग वाचा येथे...
https://www.maayboli.com/node/16886
अस्तंगत झालेल्या मोडी लिपीपासून अस्तित्वात नसलेल्या मोहन्जोंदरो येथील लिपी युनिकोडमध्ये आणायचा विचार करणाऱ्या युनिकोड कंसोर्टियमला भातखंडे लिपीची काय ऍलर्जी आहे कुणास ठाऊक?
कारवी, शंतनु, हरचंद छान
कारवी, शंतनु, हरचंद छान माहिती व प्रयत्न.
अमितव चा शेर
आय आय टी खडगपूरच्या लोकांनी
आय आय टी खडगपूरच्या लोकांनी एका कॉन्फरन्स पेपरमध्ये भातखंडे, पलुसकर - दोन्ही पद्धती विचारात घेऊन संगणकीय टंकनाला जास्त सोयीची अशी एक नवी पद्धत सुचवली आहे (मला व्यक्तिशः ती पटली नाही, कारण इकडची चिन्हे तिकडे वेगळ्या अर्थाने वापरली आहेत - त्याने संदिग्धता अजूनच वाढेल; परंतु एक स्तुत्य प्रयत्न आहे). ह्यात युनिकोडाबद्दल चर्चा आहे. ज्यांना इच्छा आहे, त्यांनी नक्की डोळ्याखालून घाला: http://tenor2016.tenor-conference.org/papers/05_Misra_tenor2016.pdf
शिवाय त्यात दोन्ही (तिन्ही) पद्धतीत वापरली जाणारी सर्व चिन्हे एका तक्त्यात दिली आहेत. ज्यांना केवळ ती माहिती हवी आहे, त्यांनाही उपयोगी.
एकदम उपेक्षित धाग्याला चार
एकदम उपेक्षित धाग्याला चार चांद लावलेत. >>> उपेक्षित वगैरे नाही हो.... कोण जाणे काय आहे ?! म्हणून बिचकायला होते धाग्याच्या नावाने. पण आलेले सगळे काही उपयोगी लिहूनच गेलेत.
मी ट्राय करते आहे आणि जमतंय जमतंय... >>>>
तुमच्यासाठी जास्त सोपे आहे, जमेल नक्की. Insert symbol मध्ये थोडे वरखाली शोधले की मिळेल सगळे.
आता पालवनी दिलेल्या पीडीएफ मध्ये अजून स्पष्ट कळले की तुम्हाला काय हवे आहे.
अजून एक करता येईल,
कोर्या वर्ड फाईल ऐवजी टेबल फॉर्मॅट मध्ये टाईप करता येईल. २ गोष्टी साध्य होतील ---
१ अक्षरांच्या वरच्या / खालच्या ओळीत जी चिन्हे येतात, त्याची alignment सोपी + स्थिर रहाण्यासाठी; फार टॅब / स्पेस देत बसावे लागणार नाही. ती चिन्हे अक्षराच्या जास्त जवळ / दूर हवी त्याप्रमाणे त्या टेबल cell पुरते vertical alignment of text करायचे.
२ फक्त कॉलम दर्शवणार्या उभ्या रेघा ठेवायच्या, ज्या आपल्याला separation साठी हव्या आहेत. बाकी टेबल ग्रीड invisible करायचे.
* * * * * * * * * * * *
युनिकोड कंसोर्टियमला भातखंडे लिपीची काय ऍलर्जी आहे कुणास ठाऊक? >>>> कदाचित जितका वेळ / पैसा / बुद्धी खर्च करणार त्या तुलनेत वापरणारे किती? असा व्यावहारिक विचार असेल का? आणि ज्यांना ही लिपी लागते त्यांचा मोठ्या संख्येने किंवा सातत्याने फार आग्रह / रेटा नसेल.
मोहन्जोंदरो लिपी इतके ग्लॅमर किंवा archival value भातखंडे लिपीला नाही असे काही कारण.
किरण यांच्या लेखासाठी धन्यवाद. माहितीच नव्हता. युनिकोड, लिपी, फाँट, विविध भाषांची गरज यामागे इतका विचार / काम / तांत्रिकता असते याची सामान्य वापरकर्ता म्हणून कल्पनाही नव्हती. आहे ते वापरायचे, नसेल ते चालवून घ्यायचे, ज्यावाचून खूपच अडेल ते उपलब्ध असलेल्यातच काही खटपटी करून जमवायचे अशी सवय.
हरचंद, पीडिएफ चाळली.
हरचंद, पीडिएफ चाळली. कोणालातरी इतक्या कळकळीने यावर वेळ आणि ऊर्जा खर्च कराविशी वाटली आहे, हे बघून बरे वाटले.
हरचंदजी यांनी शेअर केलेल्या
हरचंदजी यांनी शेअर केलेल्या पीडीएफचा लेखक चंदन मिश्र यांच्यातर्फे युनिकोडला काही सिंबॉल ॲड करण्याविषयी एक विनंती 8-१० वर्षांपूर्वीच केली गेली आहे.
https://unicode.org/L2/L2013/13157-akarmatrik-music.pdf
हे प्रपोजल मान्य झाले की सरकारी खाक्याप्रमाणे धूळ खात पडले आहे याची मला काही कल्पना नाही. त्यांनी आकारमात्रिक पद्धतीची लिपी सुचविली आहे. भातखंडे / पलुस्कर पद्धतीपेक्षा ती अधिक परिपूर्ण आहे असा त्यांचा अभ्यास आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर...
Akarmatrik notation was found to be the most robust and well-content notation system for presenting different components present in Indic music.
युनिकोड हा या धाग्याचा विषय नाही याची मला कल्पना आहे. पण संगीत लिपीबद्ध करताना युनिकोड की नॉन युनिकोड असा पर्याय उभा राहिला तर युनिकोडला प्राधान्य द्यावे असे मला वाटते.
युनिकोडला प्राधान्य द्यावे
युनिकोडला प्राधान्य द्यावे असे मला वाटते >> +१
फक्त त्यासाठी नवीन लिपी निर्माण करू नये. युनिकोडमध्ये चिन्हे नसतील तर ती निर्माण करावीत.
Pages