Submitted by शांत माणूस on 10 September, 2021 - 01:44
मी डी मार्ट मधे खरेदीला जाणार आहे. तरी खरेदी लवकरात लवकर आटोपून नंबर लवकर लागणे व बिल कमी येणे यासाठी काय काय करावे याची जाणकारांकडून माहिती हवी आहे. अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी उपयुक्त टीप मिळाल्या तर उत्तमच. पार्किंगला पैसे द्यावेत कि न द्यावेत ? बाहेर आल्यावर आईस्क्रीम / सॉफ्टी खावी कि न खावी ?
डी मार्ट मधे मस्ट असा कोणता आयटेम घेतला पाहीजे ? कोणता टाळला पाहीजे ?
कृपया माहिती द्यावी ही नम्र विनंती.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
महाबळेश्वरहुन मॅप्रोचे जेली
महाबळेश्वरहुन मॅप्रोचे जेली चॉकलेट आणले होते. D Mart ला तेच एक वर एक फ्री होते. आता बोला.
मॅप्रोची सगळी प्रोडक्ट मॅप्रो गार्डन पेक्षा D Mart मध्ये स्वस्त मिळतात.
मॅप्रोची सगळी प्रोडक्ट मॅप्रो
मॅप्रोची सगळी प्रोडक्ट मॅप्रो गार्डन पेक्षा D Mart मध्ये स्वस्त मिळतात....
October heat किंवा उन्हाळ्यात Mapro Rose Sharbat हमखास out of stock असते D-Mart मध्ये! त्यामुळे ज्यांना आवडते त्यांनी उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच घेऊन ठेवणे उत्तम!
अवांतर :
सर्वात मोठे D-mart कोणते आहे? कारण आम्हाला जवळ पडणारे D-Mart Versova हे आतापर्यंत पाहिलेले सर्वात लहान D-Mart आहे. (तो Pick-up point नाही.) परंतु ऐरोली, पनवेल चे D-Mart पाहिले जे २-३ मजली आहे. बदलापूरचे D-Mart देखील ट्रेनमधून पाहिले आहे जे चांगले लांबलचक वाटले. अगदी अंधेरी पूर्वेचे विजयनगर सोसायटीजवळचे D-Mart देखील Ground + 1st flr स्वरुपात आहे. केवळ D-Mart Versova एकाच मजल्याचे (केवळ तळमजला) आहे, त्यामुळे तिथे विशेषतः कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू यात वैविध्य मिळत नाही, खूप कमी पर्याय असतात!
बाकीची पाहिली नाहीत,पण
बाकीची पाहिली नाहीत,पण चिंचवडचे dmart मस्त विस्तीर्ण आहे.
खारघरच DMart खूप मोठं आहे.
खारघरच DMart पनवेल, जुईनगर, सीवूड्सच्या DMart पेक्षा खूप मोठं आहे.
मग मी ब्रश केल्यावर पेप्सीने
मग मी ब्रश केल्यावर पेप्सीने चूळ भरली, थम्प्सने गुळण्या केल्या, कोकाकोलाने तोंड धुतले, आणि स्प्राईटने खिडक्यांच्या काचा पुसुन घेतल्या..>>

एक राहिलंच की..>>

If you have a small family of
If you have a small family of 2/3 people., it is better to order online rather than wasting time in dmart. It is best for bulk purchases.
निरु
निरु

D Mart App डाऊनलोड केलं.
D Mart App डाऊनलोड केलं. गर्दी टाळण्यासाठी चांगले आहे. पण संतूर साबण नाही सापडला.
एक राहिलंच की.. >> त्याजागीच
एक राहिलंच की.. >> त्याजागीच खिडक्यांच्या काचा आल्या
(No subject)
डी मार्ट मधे मस्ट असा कोणता
>>>>डी मार्ट मधे मस्ट असा कोणता आयटेम घेतला पाहीजे ?>>>
ओवा....
वडे, मिसळ खाल्यावर थोडा ओवा खावा ....पोट दुखत नाही.
माझ्या मते खारघर चं डी-मार्ट
माझ्या मते खारघर चं डी-मार्ट सगळ्यांत मोठं आहे पूर्ण मुंबईत.
पुण्यात, चिंचवड स्टेशन च्या विरुद्ध बाजुला असलेलं डी-मार्ट सगळ्यांत मोठं. याला अंडरग्राउंड पार्किंग पण आहे.
माझ्या मते खारघर चं डी-मार्ट
माझ्या मते खारघर चं डी-मार्ट सगळ्यांत मोठं आहे पूर्ण मुंबईत.
पुण्यात, चिंचवड स्टेशन च्या विरुद्ध बाजुला असलेलं डी-मार्ट सगळ्यांत मोठं. याला अंडरग्राउंड पार्किंग पण आहे....
खारघर D-Mart ला भेट द्यावी लागेल.
अंडरग्राउंड पार्किंग तर D-Mart Versova ला पण आहे.
वाचतेय. खारघर डीमार्ट चं नाव
वाचतेय. खारघर डीमार्ट चं नाव आलं म्हणुन लिहिते आजिबात जाऊ नका. काही घ्ययचं नाहीये. काही घेणार नाही म्हणत गेलात तरी कमीत कमी 1000 रु. होतातच.
आई च्या कॉलनीच्या लागुनच आहे. आधी आईकडे गेलो की एखाद्या पर्यटन जागेवर जावं असं जायचोच. मुलं पण हट्ट,करायची. आता टाळते. मागे दोनदा आईकडे गेलो तर कोविडमुले डीमार्ट बंद आहे असं सांगितलं मुलांना. नशीब मुंब ईत आमच्याकडे असं डीमार्ट नाहीते
एखाद्या पर्यटन जागेवर जावं
एखाद्या पर्यटन जागेवर जावं असं जायचोच
>>>
हा हा.. मी सुद्धा लहानपणी पोरीसोबत असेच जायचो. त्या ट्रॉलीत बसून ती येणाऱ्या जाणाऱ्यांना साईड साईड करत माल भरत सुटायची. मी धक्का देत तिला वरखाली तिन्ही मजले फिरवायचो. ट्रॉली भरल्याशिवाय तिचे समाधान नाही व्हायचे. पण अर्थात त्यातल्या नको त्या वा न परवडणाऱ्या वस्तू मी जमेल तसे बिलींगला जायच्या आधी तिच्याशी मांडवली करून कमी करायचो. तिच्या मतलबच्या चिक्कार वस्तू तिथे मिळत असल्याने शॉपिंगचा पूरेपूर आनंद लुटला जायचा. पण येस्स पैश्याचा फटका होताच.
आता नवीन घर त्याच डी मार्ट शेजारी घेतलेय. पण कोरोनानंतर तिथे जायचेच नाही म्हणून ती सवयच मोडून टाकलीय. त्यामुळे डीमार्ट शेजारी असूनही फायदा शून्य आहे
आज कात्रज - आंबेगाव हायवेच्या
आज कात्रज - आंबेगाव हायवेच्या डीमार्टात गेलो होतो. तर बाहेर चार वेटोळ्यांची रांग होती. आत गेल्यावर पुन्हा चेकींग साठी रांग आणि शेवटी बिलींगला रांग. झुंबड उडाली होती. काय करावं या विचारात असताना बायकोने जिओ मार्ट चे दर पाहीले. डी मार्ट एडीचे पण पाहीले. डीमार्टचा नाद सोडून मग स्मार्ट पॉईण्टला आलो. तर गर्दीही नाही. आणि आवश्यक सर्व जिन्नसांवर हेवी डिस्काऊंट्स किंवा स्कीम्स चालल्या होत्या. कामच झालं.
डीमार्ट मधे जायचं असेल तर
डीमार्ट मधे जायचं असेल तर वीकडेज मधे जायला हवं. ग्रोसरीवरअजुनच ऑफर दिसतात. मी रविवारी जाऊन पाहिलं तर सगळी गोडेतेलं ज्या किमतीला होती (धारा सुर्यफूल तेल -१५५) ते मंगळवारी १४९ झालेलं. इतरही तेलं ५-५ प्रति पाउच उतरलेली दिसली. ग्रोसरी आयटम मधे बर्याच ठिकाणी हा किमतींचा उतार बघायला मिळाला.
डी मार्ट मधे कपडे कसे असतात ?
डी मार्ट मधे कपडे कसे असतात ?
पुरुष शर्ट quality खास नसते
पुरुष शर्ट quality खास नसते,पण t-shirt खूप छान निघतात
कसेही,कितीही वापरले तरी शिवण उसवत नाही अन कापडाला गोळे ही येत नाहीत
पॅन्ट बद्दल काही कल्पना नाही
रुमाल/सॉक्स अगदी छान निघतात(ब्रँडेड नसूनही)
स्त्रियांचे कपडे एकंदर थोडे महाग वाटतात,(ऑनलाइन पेक्षा)so फारसे घेतले नाहीत कधी
स्पोर्ट्स वेअर मात्र खूप वापरुन शिवण मजबूत असते असा (स्वतःच्या मुलीमुळे )चांगला अनुभव आहे
एकंदर व्यवस्थित पाहून घेतले तर पस्तावायची वेळ येणार नाही एवढं नक्की
चप्पल,बूट मात्र घेऊ नयेत असा आगाऊ सल्ला(शिवण मजबूत नसते)
लहान मुलांचे रोजच्या वापराचे
लहान मुलांचे रोजच्या वापराचे बरे असतात स्वस्त असतात..पाच वर्षाखालील मुलांसाठी.. पैन्ट्स,टिशर्ट्स
मी घेते नेहमी मुलांसाठी.
मी रोजच्या वापारातले कपडे
मी रोजच्या वापारातले कपडे घेते - मस्त टिकतात .
मुलासाठी शॉर्ट्स , स्लीवलेस टीज घेतलेल्या - खूप चालतात .
आणि माझ्यासाठी आणि टीनएजर भाचीसाठी टॉप्स घेते फार महागातले नाही . वर्शभर चांगले चालतात.
मी पण गेल्या रविवारी ५००
मी पण गेल्या रविवारी ५०० रुपयांची मिल्ट्री कलर जोगिंग पँट घेतली जिची किंमत वीकडेज मधे ४४९ होती
पण छान आहे त्यामुळे ५० रुपयांचा फटका बसला तरी एवढं वाईत नाही वाटलं.
ईथे आजूबाजूला कपड्यांच्या
ईथे आजूबाजूला कपड्यांच्या खरेदीचे बरेच पर्याय असल्याने आणि आता ऑनलाईन खरेदीही वाढल्याने कपड्यांसाठी डीमार्टची पायरी चढणे झाले नाही.
पण डीमार्टमध्ये ईतर खरेदी करताना कपड्यांवर नजर पडतेच. ऑफिसवेअर फॉर्मल कपड्यांमध्ये फार काही चांगले तिथे मला दिसले नाही. घरच्या नेहमीच्या वापराचे वा खाली नाक्यावर वगैरे भटकायचे कपडे मात्र घ्यायला हरकत नाही. किंमतीबाबत फसायला होत नाही. एकदा सहज माझी नजर एका शॉर्ट पँटवर पडलेली. ती आवडलेली. ईतर मॉलच्या मानाने स्वस्त होती पण क्वालिटी चांगली आणि टिकली देखील खूप. हा एकच कपडेखरेदीचा अनुभव. आणि हो, आम्ही भाड्याच्या घरात राहायला गेलेलो तेव्हा छोटीमोठी खरेदी करायला डी मार्टमध्येच घुसलेलो. तिथे खिडक्यांचे पडदे घेतलेले. तेव्हा पडद्यांवर फार खर्च करायचा नव्हता. पण किंमतीच्या मानाने छान मिळालेले.
हो. किमतीच्या मनाने अगदी
हो. किमतीच्या मनाने अगदी दर्जेदार वस्तू मिळतात तिथं कपडे खरंच चांगले असतात. शिवाय घरी गेल्यावर आवडलं नाहीतरी का कू न करता लगेच बदलून त्याचे पैसे देतात. किराणा तर ए वन क्वालिटी असतो.
आज चिंचवड डी मार्टला गेले
आज चिंचवड डी मार्टला गेले होते. कोविड vaccine चे दोन्ही डोस घेतल्याचे certificate बघूनच आत प्रवेश देत होते.
D Mart बद्दल वाचून ..ऐकून आज
D Mart बद्दल वाचून ..ऐकून आज सकाळीच - ७.३० वाजता कर्वेनगर ला नुकताच सुरु झालेल्या D Mart ला गेलो होतो.. गर्दी अजिबात नव्हती .. रोज नवीन offers / rates असावेत कारण आज सकाळी आम्ही गेलो तेव्हा ते प्रत्येक rack ला price sheet update karat होते..
ऑफर कडे बघून नको असलेले पण खरेदी करण्याचा मोह आवरला नाही .. बऱ्यापैकी saving होते हे नक्की
आपण जे आणायसाठी गेलो आहे
आपण जे आणायसाठी गेलो आहे तेवढेच किंवा काही विसरलो असेल यादीत घ्यायला ते दिसले तर तेवढेच घेतले तर होते बचत.
हा धागा वर काढू नका.. त्रास
हा धागा वर काढू नका.. त्रास होतो.
गेले दोन वर्षे डीमार्टला खरेदीला गेलो नाहीये
कर्वेनगरला कुठे?
कर्वेनगरला कुठे?
दर बुधवारी ऑफर असते एक रुपयात
दर बुधवारी ऑफर असते एक रुपयात कधी डाळ कधी रवा कधी दाणे कधी साखर अर्धा किलो अशी.
Pages