Submitted by पुरंदरे शशांक on 3 October, 2021 - 22:24
भाद्रपदाचे कवतिक
रंगपिसारा उघडून देई
श्रावण वेडा अवखळ भारी
हाती येता रंग ढगांचे
भाद्रपदाची खुलते स्वारी
मधेच ओली उन्हे तळपती
सर सर थिरके थेंबघुंगरु
क्षणात लपते उन सोनेरी
पानाकाठी जरा झुरमुरु
कडेकपारी रंग उमलले
माळरान झोकात सळसळे
भिरभिरती रंगांचे अवघे
थवे चमकती रेशिमकवळे
उन्हे तापूनी जरा विसावी
गर्द तरुच्या तळात थोडी
मेघ अडविती किरणांना त्या
डोंगरातुनी येत गडबडी
सरता पाऊस बघे मागुता
पापणकाठी हळवे पाणी
पुन्हा उचलूनी टाके पाऊल
पायवाटीची झुळझुळ गाणी
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहाहा! मस्त नाद आहे या
अहाहा! मस्त नाद आहे या कवितेला
सुंदर रचना..!!
सुंदर रचना..!!
केवळ अप्रतिमच....
केवळ अप्रतिमच....
वा फारच सुन्दर !
वा फारच सुन्दर !
शब्दचित्र आवडलं!
शब्दचित्र आवडलं!
उत्तम वर्णन आणि शब्दांचा
उत्तम वर्णन आणि शब्दांचा योग्य वापराने काव्य अतिशय समर्पक झालंय... खूप छान लिहिता! लिहित रहा!
भद्र भाद्रपद. सुंदर कविता !
भद्र भाद्रपद. सुंदर कविता !
सुरेख.
सुरेख.
कविता जमलीय.
कविता जमलीय.
अतिशय सुंदर..!!
अतिशय सुंदर..!!
थेंबघुंगरु तर खासच..