पालेभाजीपासून बनविलेला पदार्थ
.,.......................................................................
साहित्य :
१जुडी पालक,
(निवडून, देठे काढून स्वच्छ धुतलेली पाने )
गव्हाचे पीठ - ४ वाट्या,
लसणीच्या पाकळ्या - तीन ते चार,
मुगडाळ - २ टे स्पून,
बडीशेप - एक टी स्पून,
गरम मसाला, लाल तिखट, मीठ, हळद - चवीनुसार / आवडीनुसार,
ओवाजीरे भाजून त्याची पूड - चिमूटभर,
अद्रक - छोटासा तुकडा, ठेचून किंवा पेस्ट करून
तळण्यासाठी तेल,
पिण्यायोग्य शुद्ध स्वच्छ पाणी,
चालू स्थिती तील गॅस शेगडी / induction / चूल / स्टोव्ह इत्यादी पैकी काहीही एक,
आवश्यक भांडी व उपकरणे,
संयम व चिकाटी,
अंगभूत खादाडपणा (#foodie )
क्रमवार पाककृती:
१. मुगडाळ पाणी घालून (2तास) भिजवत ठेवा.
२. एका कढईत पालकची पाने (20-25 निघतात एका जुडी मध्ये) थोडेसे चमचाभर तेल घालून वाफवून घ्या. पाणी अजिबात घालायचे नाही
३. पूर्ण वाफवल्यानंतर थंड करून मिक्सर मधून फिरवून पेस्ट बनवून घ्या.
४. ह्या पेस्ट मध्ये चवीनुसार तिखट, मीठ, ओवाजीरे पूड व एक चमचा तेल घालून व्यवस्थित मिसळून घ्या.
५. गव्हाच्या पिठात हिरवी पालक पेस्ट घालून चांगले मळून कणकेचा गोळा करून घ्या.
पाणी घालण्याची गरज नाही.
६. आता हिरवा कणकेचा गोळा झाकून ठेऊन सारण करायला घ्या.
७.सारणासाठी आधी फोडणी करावी लागेल. एका छोट्या कढईमध्ये 2 चमचे तेल घाला. ते तापलं की जिरे, जिरे फुलले की बडीशेप, अद्रक लसूण पेस्ट, तिखट, मीठ, हळद व गरम मसाला घालून परतून घ्या.
८. ह्यात भिजलेली मुगडाळ घालून अर्धी वाटी पाणी घाला. पाण्याला उकळी आली की 4 चमचे चणाडाळीचे पीठ / बेसन घालून व्यवस्थित हटवून घ्या (पिठलं हटवतो तसे )
९. हे मिश्रण हटवल्यानंतर ते चांगले घट्ट होईल.
सारण तयार झाले.
ओळखीचे वाटत आहे का?
(हे कशाचे सारण आहे ओळखणाऱ्यांना बावधन गाव इनाम )
१०. आता समोसे करायला घ्या. पारी तयार करण्यासाठी हिरव्या कणकेच्या गोळ्याचा एक उंडा घ्या. पोळी लाटून घ्या.
११. गोल पोळीचे मधोमध कापून दोन अर्धचंद्राकार तुकडे करा. एक तुकडा उचलून त्यात चमचाभर सारण भरा
१२. पारी दुमडून टोक बंद करत समोशाचा आकार द्या.
अशाच प्रकारे इतर सर्व समोसे बनवून घ्या
१३. तळण्यासाठी कढईत तेल घ्या. गॅस शेगडी चालू करा. तेल जरासे गरम/कोमट (आठवा : बालुशाही तळताना झालेली तेलाच्या तापमानाची चर्चा, same प्रकारे तळायचं आहे ) होताच त्यात समोसे सोडा.
गॅसची आच मध्यम असू द्यात.
१४. तळून झाले की हे समोसे गरमा गरम किंवा थंड गार करून(संयम असेल तर) किंवा चिंचगुळाच्या चटणीसोबत किंवा नुसतेच कसेही फस्त करा.
मळलेल्या कणकेचा गोळा
लाटलेली पारी
सारण
कच्चे समोसे
तळलेले समोसे
टीप : कणकेत आवश्यक वाटल्यास दही किंवा ताक घालू शकता.
छान रेसिपी. सारण शेगाव कचोरी
छान रेसिपी. सारण शेगाव कचोरी च आहे का?
छान
छान
छान आहे रेसिपी
छान आहे रेसिपी
धन्यवाद वावे, देवकी, ऋ,
धन्यवाद वावे, देवकी, ऋ, मनिमोहोर, बोकलत, मानव, सोनाली, सी, मीरा, सुनिधी, रुपाली, अमा, अंजु, धनुडी, मी अनु, farend, blackcat, srd, किशोर मुंढे, chraps
धन्यवाद जाई, सेव्हेरस स्नेप
धन्यवाद जाई, सेव्हेरस स्नेप
सेव्हेरस स्नेप : सारण अचूक ओळखलंत
तुम्हाला बावधन गाव इनाम
किल्लीताई
किल्लीताई
आभारप्रदर्शनात माझं नाव राहिलंय
अर्रर्रर्र खरंच की!
अर्रर्रर्र खरंच की!
धन्यवाद मृणाली
असु दे गं
असु दे गं
आणि माझे दोनदा आभार मानले
आणि माझे दोनदा आभार मानले
मस्त आहेत सामोसे
मस्त आहेत सामोसे
मस्तच दिसताहेत.
मस्तच दिसताहेत.
स्पर्धा अजून सुरू आहे का ?
स्पर्धा अजून सुरू आहे का ?
धन्यवाद लंपन, अस्मिता
धन्यवाद लंपन, अस्मिता
Blackcat आज last date आहे
मानव मजा आहे
मस्त आहेत.
मस्त आहेत.
धन्यवाद अमुपरी
धन्यवाद अमुपरी
मस्त आहे रेसिपी. उगाच समोसे
मस्त आहे रेसिपी. उगाच समोसे खाताना अपराधी भावना वाटायला नको आता. पालेभाजी आहे.. तेवढीच पोटात जाईल, असं सांगत खाता येईल.
मस्त दिसत आहेत सामोसे!
मस्त दिसत आहेत सामोसे!
चव बहुतेक छानच असेल!
धन्यवाद प्राची
धन्यवाद प्राची, कृष्णा
हो फक्त deep फ्राईड आहेत तेवढं guilt आहे
पण चवीसाठी चालतंय
Air fryer मध्ये तळता येतील का? कल्पना नाही
बेक करता येतील का? माहिती नाही
YUMMY
YUMMY
हि इकडून तिकडे पळणारी दंगा
हि इकडून तिकडे पळणारी दंगा करणारी स्मायली कशी आणतात? लय आवडते मला
लई मेहनत. मजा येईल खायला.
लई मेहनत. मजा येईल खायला. आयता द्या कुणी हिरबा सामोसा
मस्त आहे रेसिपी
मस्त आहे रेसिपी
रेसिपी आवडली. पौष्टिक आहे.
रेसिपी आवडली. पौष्टिक आहे.
छान आहे रेसिपी. सामोसे मस्त
छान आहे रेसिपी. सामोसे मस्त दिसतायत.
धन्यवाद sanjeev b, साजणी,
धन्यवाद sanjeev b, साजणी, माऊमैया, सामो, मामी
धनुडी, ती image डालो करायची
धनुडी, ती image डालो करायची
Mag नंतर नेहमीप्रमाणे imagr इन्सर्ट करायची
Gif आहे
******* अभिनंदन किल्ली
******* अभिनंदन किल्ली *******
Wow, abhinanadan!
Wow, abhinanadan!
थँक्यू संयोजक आणि माबो
थँक्यू संयोजक आणि माबो
मत देणाऱ्यांचे विशेष आभार
अभिनंदन किल्ली!
अभिनंदन किल्ली!
Pages