शशक पूर्ण करा - अमेरिकन थेरं - मेधा

Submitted by मेधा on 13 September, 2021 - 08:30

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो>>

पाण्याचा आवाज नाहीये. सलाइन ड्रिप आहे - अद्वैत लाइफ सपोर्टवर आहे कालपासून.

धापा टाकत ऋषभ आत येतो. ऋषभ माझ्या मित्राचा मुलगा , माझ्या मुलाचा ब्रदर फ्रॉम अदर मदर .
"अंकल , आय कॉल्ड द कॉप्स ऑन आजी! मी आणि अ‍ॅडी .. अद्वैत मोशन सेंसर अलार्म टेस्टिंग करत होतो घरी" . हरणं आली की डिटेक्ट करुन हॉर्न वाजेल आणि हरणं पळून जातील अशी आयडिया होती. टेस्ट म्हणून घरात बरेच कॅमेरे सेटप केले होते. "आजी डिड इट अंकल."

काही न बोलता तो फोन दाखवतो - ऋषभच्या आईने अद्वैतसाठी वेगळ्या ठेवलेल्या पातेल्यात दाण्याच्या कुटाची भाजी मिसळताना दिसतेय आजी. ' नसती अमेरिकन थेरं! आज कळू दे सगळ्यांना अ‍ॅलर्जीची नाटकं.'

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह्ह... Sad
काटा आला शेवटचं वाचताना! छान जमली आहे.

मस्त.

याबद्धल वेगळा धागा हवा खरेतर पण ही ऍलर्जी अमेरिकेतील भारतीय मुलांना इतकी का असते?
भारतात असा प्रकार फार रेयर..

बापरे, भारतीय आजीच काय, इतरांनाही ग्लुटेन, लॅक्टोज इनटॅालरन्स, नट ॲलर्जी व. कळत नाही, नखरे वाटतात.. Sad

बाप रे!

अशी अ‍ॅलर्जी असते आणि ती एवढी गंभीर असते याबाबत अजिबात कल्पना नव्हती. कदाचित घरात लहानपणापासून पाणी आणि श्वासासोबत शेंगदाणाही अनिवार्य असल्याने असेल.

तेंव्हा त्याबद्दल आधी धन्यवाद, मेधा.

कथा एकदम भारी झालीय! 'दि क्रूकेड हाऊस' ची आठवण झाली.

आपल्याला ते शेंगदाणे खाल्ल्याने पित्त होते ती अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शनच असते का? कोणाला इथे माहीत आहे का?

मस्त कथा.
प्रसंग ऋषभ च्या घरी घडला ना? म्हणजे ऋषभच्या आजीने तिच्या नात्यागोत्यातल्या नसलेल्या अद्वैतच्या भाजीत दाण्याचा कूट टाकला.. असे?

संयोजकांनी सुरूवात देतांना पहिली ४ वाक्ये प्रथमपुरूषी आणि ५वे वाक्य त्रुतीयपुरूषी असे लिहिल्याने, कथा लिहिणार्‍यांची कसरत होत आहे.

ओह!

काटच आला वाचताना Sad

बापरे, भारतीय आजीच काय, इतरांनाही ग्लुटेन, लॅक्टोज इनटॅालरन्स, नट ॲलर्जी व. कळत नाही, नखरे वाटतात.. >> +१००

अशी अ‍ॅलर्जी असते आणि ती एवढी गंभीर असते याबाबत अजिबात कल्पना नव्हती. >> गजानन, अ‍ॅलर्गीची सिव्हीयरिटि बदलती असू शकते. किती प्रमाणात एक्ष्पोजर झाले आहे ? किती वर्षांपासून झाले आहे ? वय ? तेंव्हाची कंडीशन असे हजारो घटक आहेत ज्यांनी बदल होउ शकतो. मित्राच्या मुलाला दुधाची अ‍ॅलर्जी होती नि दोनदा तीनदा मिल्क पावडर असलेले पदार्थ खाण्यात आल्यामूळे वर लिहिलेला प्रसंग येऊन गेला आहे.

Pages