शशक पूर्ण करा - अमेरिकन थेरं - मेधा

Submitted by मेधा on 13 September, 2021 - 08:30

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो>>

पाण्याचा आवाज नाहीये. सलाइन ड्रिप आहे - अद्वैत लाइफ सपोर्टवर आहे कालपासून.

धापा टाकत ऋषभ आत येतो. ऋषभ माझ्या मित्राचा मुलगा , माझ्या मुलाचा ब्रदर फ्रॉम अदर मदर .
"अंकल , आय कॉल्ड द कॉप्स ऑन आजी! मी आणि अ‍ॅडी .. अद्वैत मोशन सेंसर अलार्म टेस्टिंग करत होतो घरी" . हरणं आली की डिटेक्ट करुन हॉर्न वाजेल आणि हरणं पळून जातील अशी आयडिया होती. टेस्ट म्हणून घरात बरेच कॅमेरे सेटप केले होते. "आजी डिड इट अंकल."

काही न बोलता तो फोन दाखवतो - ऋषभच्या आईने अद्वैतसाठी वेगळ्या ठेवलेल्या पातेल्यात दाण्याच्या कुटाची भाजी मिसळताना दिसतेय आजी. ' नसती अमेरिकन थेरं! आज कळू दे सगळ्यांना अ‍ॅलर्जीची नाटकं.'

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काय प्रकार असतो हा पिनट ॲलर्जी? आणि अमेरीकेशीच का याचा संबंध? आज्जींना ईतकाही दोष देऊ नका. मलाही माहीत नाही. कोणी व्यवस्थित सांगेल का?

अमेरिकेत* बर्‍याच जणांना एकदम तीव्र अ‍ॅलर्जी असते वेगवेगळ्या अन्न पदार्थांची. साधारणपणे इथले पालक त्याबाबतीत फार जागरूक असतात - अगदी आपले पाल्य नसले तरीही. पण काही लोकांना हे सर्व थोतांड आहे असे वाटते, आमच्यावेळी नव्हतं असं काही पासून थोडंसंच खाल्लं तर काही होत नाही असे विचार असतात. भारतीय आणि अमेरिकन लोक पण असा विचार करणारे पाहिलेत. ही पूर्णपणे काल्पनिक गोष्ट आहे .

* भारतात किंवा इतर देशात पण असतील. माझा अनुभव अमेरिकेतल्या लोकांच्या बाबतीत आहे

खत्तर्र्नाक!

परदेशात स्थलांतर केलेल्या कुटुंबांत स्थलांतरोत्तर दुसर्‍या/तिसर्‍या पिढ्यांत हे प्रकार जास्त आढळून येतात हे ऐकून आहे. कदाचित शरीराला ज्या प्रकारच्या हवामानाचे, मातीचे, किड्या-मकोड्यांचे एक्स्पोजर मिळते, त्यानुसार शरीरातील बायोम व पर्यायाने प्रतिकारशक्ती तयार होत असावी. अति स्वच्छता, माती/ प्राणी/ किडे आणि त्यांच्यावरील जीवाणू ह्यांच्याशी संपर्क न येणे - हे एक कारण असल्याचे काही जण सांगतात. तज्ज्ञांनी खुलासा करावा.

धन्यवाद मेधा
हरचंद पालव यांच्या प्रतिकार शक्ती च्या पोस्टवरूनही काय कारण असावे याचा क्ल्यू लागला

माहीत नाही. नुसते नट्स दुरून बघितल्याने/ एका खोलीत असल्याने स्पर्श ही न करता फ्लेअर अप झालेल्या केसेस बघितल्या आहेत.

छान संकल्पना.

फक्त सीसी टिव्ही कॅमेरावर आजीचं वाक्य रेकॉर्ड होणार नाही. त्यामुळे तिने नक्की कोणत्या विचारानं दाकु मिसळलं हे नाही कळणार. त्यामुळे शिक्षेतून सुटका मिळणार.

ऑडिओ रेकॉर्ड करणारे सीसीटीव्ही कॅमेरेही असतात, त्यामुळे आपण त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट देऊया.

फक्त सीसी टिव्ही कॅमेरावर आजीचं वाक्य रेकॉर्ड होणार नाही.>> आजी म्हणते " चंपेस्ता!!! "

आमच्या कडे लेकीची एक मैत्रीण आली होती. अमेरिकेत जन्मलेली व वाढलेली सिटिझनच असलेली तिला आहे नट अ‍ॅलर्जी. पोह्यात शेंगदाणे घातले नव्हते तेव्हा. तिला इतरही काँप्ले क्सेस होते. म्हणजे पक्ष्यांची अवाजवी भीति - फोबिया!!- ती घरी राहून नीट सुखरूप परत गेल्यावर मी
सुटकेचा निंश्वास सोडला.

म्हणजे ह्यांच्या पोरांना असल्या अ‍ॅलर्जी प्रचंड काळजी घेणे वगैरे. आणि युद्धात लोकांच्या पोरांना नेपाम!! कर्म कधी तरी घरी येणार च.

डिटेक्टिव्ह मामी Wink
मुद्दा बरोबर आहे, सुचला नव्हता.
आता तू रेज केला म्हणुन: मोशन डिटेक्ट होते की नाही, हॉर्न वाजतो की नाही, आणि हरणं पळतात की नाही हे चेक करायला व्हिडीओ सोबत ऑडिओ रेकॉर्ड करणारा कॅमेरे लावले होते. ते पातेलं नेमकं एका कॅमेरात ऑडिओ नीट ऐकू जाईल एवढ्या जवळ होतं.

अति स्वच्छतेचा नट्स ऍलर्जीशी संबंध असेल?
स्पर्श न करता फ्लेअर अप झालं, म्हणजे मनोकायीक रीऍक्शन असेल?

बीबीसीचं म्हणणं आहे की ह्या अ‍ॅलर्जीच्या कारणांवर अजून संशोधन चालूच आहे. बरीच वेगवेगळी कारणं असू शकतात. शरीरात शिरकाव करणार्‍या परजीवींवर प्रतिक्रिया देणारी जी आपली यंत्रणा असते, तीच अ‍ॅलर्जेन्सवरही काम करते. परजीवींचे प्रमाण कमी असल्यास ती यंत्रणा काही (दाणे इत्यादी) निरुपद्रवी पदार्थांवर उलटते.

केवळ वास/बघण्यावरून अंगावर फोड/रॅशेस उठणे - हे फक्त मनोकायिकच असेल असं नाही. त्या पदार्थाच्या आजूबाजूच्या वातावरणात उडालेल्या (पदार्थाच्या) तथानुभूत अ‍ॅलर्जेन्सरूपी सूक्ष्म कणांमुळेही असू शकेल. दाण्यांची चित्रे बघून किंवा व्हिडिओ बघूनही हे होते का - ते मनोकायिक असू शकेल.

हो, ज्यांना बिब्बा ऊततो त्यांना वासाने ही त्रास झालेला बघितला आहे. माझ्या चुलत भावाला बिब्बा ऊततो. तर त्याला आयोडेक्सच्या वासाचा पण खुप त्रास व्हायचा. अंगावर उठायचं

थेही दुध प्यायले की पोटात ढवळणारे खुप लोक आहेत.. आया धपाटे देऊन त्याना जबरदस्ती दुध पाजतात >> Biggrin

माझ्या भाच्याला कडधान्य आणि डाळींची अ‍ॅलर्जी आहे . अगदी लहान असताना सगळं खायचा .
नंतर नंतर साधा वरण भात खाल्ला तरी ओकुन टाकायला लागला . त्याच्या आजीलाही वाटलं , खाताना मुद्दाम नखरे करतोय , म्हणून जबरस्तीने भरवायला जायची . बर्याच टेस्टस नंतर हे अ‍ॅलर्जी प्रकरण समजलं .
बाजूच्या घरात चकल्या तळल्या तरी त्याला त्रास व्हायचा . बेसनाची पूडी वाण्याकडून घेउन आला तरी त्याच्या हातावर पूरळ उठायचं.
आता तो २२ वर्शाचा आहे . काही काही डाळी आणि कडधान्य खातो . चणे , मटार आणि बेसन मात्र अजूनही चालत नाही . चुकुन जरी पोटात गेल तरी उलट्या , पोटदूखी , अंगावर पूरळ असले प्रकार होतात . त्याच्यासाठी स्वयंपाक करायचा म्हणजे फार टेन्शन्च काम.. माझ्या कलिगला पण बेसनाची अ‍ॅलर्जी होती - पण तिचा फक्त घसा खवखवायचा चुकुन खाल्लं तरं .

माझा एक मित्र १२-१५ वर्षापूर्वी कॅनडाला स्थायिक झाला , मुलं तिकडेच जन्मली आणि वाढतायेत . दोन्ही मुलाना ग्लूटेन अ‍ॅलर्जी आहे .

जास्त फॉर्म्युला दिल्याने हे होत असेल का??
माझी एक मैत्रीण असे म्हणते.. तिच्या पहिल्या मुलाला नट ऍलर्जी आहे... कोणताही नट.. पिस्ता, शेंगदाणा, हाझेल.. ती पंजाबी आहे... काजू बदाम वगैरे नॉर्मल आहे आहारात, आता खूप काळजी घ्यावी लागते... नऊशे अकरा दोन वेळा बोलवावा लागलाय...
दुसऱ्या बाळाला फॉर्म्युला खूप कमी दिला तिने, त्याला कसलीही ऍलर्जी नाहीय...

बापरे.कथा वाचून घाबरायला झालं.
नट किंवा लॅकटोज ऍलर्जी असलेल्या(आणि सामान्य मध्यमवर्गीय घर/वातावरणात असलेल्यानं भारतात जगणे जरा कठीण आहे.ज्यांना अगदी जवळच्याना माहीत असेल तर ठीक.कोणत्याही भाजीच्या ग्रेव्ही मध्ये थिकनेस साठी दाणेकुट/बदाम पावडर/भाजी लुसलुशीत व्हायला कपातले उरलेले दूध/दही ढकललेले असू शकते.
आमच्या सोसायटीत एक मुलगी युके ला जन्मली आहे.तिला चॉकोलेट ऍलर्जी आहे.त्यामुळे आईबाबांना नीट विचारून, वाढदिवस पार्टीला तिला बोलावताना व्हाईट फॉरेस्ट केक ऑर्डर केला होता(आता तो कसा चालतो आणि ब्राऊन चोको का नाही हे मेडिकल तपशील मला माहित नाहीत)

कथा कुठे आहे? येवढीचं फक्त???

Pages