डी मार्ट मधे खरेदी कशी करावी ?

Submitted by शांत माणूस on 10 September, 2021 - 01:44

मी डी मार्ट मधे खरेदीला जाणार आहे. तरी खरेदी लवकरात लवकर आटोपून नंबर लवकर लागणे व बिल कमी येणे यासाठी काय काय करावे याची जाणकारांकडून माहिती हवी आहे. अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी उपयुक्त टीप मिळाल्या तर उत्तमच. पार्किंगला पैसे द्यावेत कि न द्यावेत ? बाहेर आल्यावर आईस्क्रीम / सॉफ्टी खावी कि न खावी ?
डी मार्ट मधे मस्ट असा कोणता आयटेम घेतला पाहीजे ? कोणता टाळला पाहीजे ?
कृपया माहिती द्यावी ही नम्र विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पार्किंग फुकट आहे
लिस्ट करून जे आवश्यक आहेत तेच आणि पॅकेज वाले ज्याला डिस्काउंट आहेत तेच खरेदी करावे
बाहेरच्या आईस्क्रीम ला आईस्क्रीम का म्हणतात देव जाणे

खजूर घ्या APIS ब्रांडचा. १००/- किलो. बी काढलेला आणि घट्ट प्रेस केलेला.
बाहेरच्या खजुरात बिया असतात आणि त्याला लिक्विड ग्लुकोज लावलेले असते असा दाट संशय आहे.
( भटकंतीसाठी घेतो. चावून खावा लागतो आणि फाइबर असते म्हणून)

आमच्या बिल्डींगच्या शेजारीच दोनचार बिल्डींग सोडून डीमार्ट आहे...
पण हा धागा मला सुचला नाही Sad

असो, वाचतोय. प्रतिसादांचा फायदा मलाही होईल.
ईथे आल्यापासून जवळपास गेले वर्षभर गर्दीत जाणे नको म्हणून त्या डीमार्टला गेलो नाही.

प्रिकांडिशन - सामानाची लिस्ट बनवा. लिस्ट व्यतिरिक्त एक जरी आयटम जास्त खरेदी केला तर एक वेळचे जेवण मिळणार नाही अशी शिक्षा ठेवा.

१. खरेदीसाठी लिस्ट बनवून ठेवा अन् त्याचा फोटो सोबत येणाऱ्याच्या व्हॉट्सॲप वर पाठवा.
२. खरेदीसाठी कमीत कमी २ जण सोबत जा
३.डी मार्ट सकाळी १० ला ओपन होते तेव्हा १० मिनिट आधी पोचा अन् गाडी पार्क करा.
४. जाताना स्वतच्या पिशव्या घेऊन जा अन् बाहेरील काऊंटर वर त्या बांधून घेऊन १० च्या ठोक्याला मार्ट मध्ये घुसा.
५. दोघा जणांनी दोन ट्रोल्या घेऊन एकाने ग्राउंड फ्लोअर तर एकाने फस्ट फ्लोअर गाठा. (एकत्र फिरून वेळ वाया घालवू नका)
६. लिस्ट मधील समान आपापल्या फ्लोर मिळेल तसे पटकन ट्रॉली मध्ये भरून घ्या.
७. ज्याचे समान पहिल्यांदा भरून होईल त्याने पटकन बिलिंग लाईन मध्ये जाऊन उभे रहा अन् सोबत्याला फोन करून ताबडतोब बोलावून घ्या. त्याच्या ट्रॉली मधील समान आपल्या ट्रॉली मध्ये घेऊन एकत्र बिलिंग करा अन् पटकन बाहेर निघा.
८. बाहेर निघाल्यावर आईसक्रीम, पॉप कॉर्न असल्या वासाने विचलित न होता एकाने गेट वर समान घेऊन उभे रहा तोपर्यंत दुसऱ्याने पार्किंग मध्ये जाऊन गाडी आणा
९. घरी जाऊन समान लिस्ट नुसार आले आहे याची खात्री करा. एक जरी वस्तू लिस्ट पेक्षा जास्त आली असेल तर शिक्षा भोगण्यासाठी तयार रहा.

1, डी मार्ट सकाळी 7 ला उघडते तेव्हा जावे
फायदा- शून्य गर्दी, निवांत ट्रॉली फिरवता येते, प्रत्येक रॅक मधील सामान नीट लावलेले/ जागेवर असते, बिलिंग लगेच होते

2. डी मार्ट जवळ असेल,किंवा घरात उत्साही मंडळी असतील,आणि दर आठवड्याला सामान घेणे तुमच्या तत्वात बसत असेल तर दर आठवड्याला जा
फायदा- सतत नवीन ऑफर असतात त्याचा फायदा होतो, बिस्किटे/ फरसाण/जूस/मिठाई/मध/मॅगी 1 वर 1 फ्री ह्या ऑफर महिन्यातल्या एकाच दिवशी नसतात. वेगवेगळ्या आठवड्यात वेगळे प्रोडक्ट घेतले तर फायदा होतो
10-20 rs पर्यंत ची छोटी वस्तू 500 च्या वर बिल असेल तर शेवटी स्टॅम्प काउंटर वर फ्री देतात(महिन्यातून 2 दा)

3, 1 वर 1 फ्री असलेला प्रोडक्ट 1च घेतला तरी चालतो, ,निम्मी किंमत मोजावी लागते( हे अनेकांना माहीत नसते)

4. सूप, मसाले,उदबत्ती, बासमती तांदूळ पॅक, मॅगी,शाम्पू, डियो , अंगाचा साबण, ह्या गोष्टी डी मार्ट मध्ये कायमच एकावर एक फ्री असतात so स्वस्त पडतात

5, कोपऱ्यावरच्या वाण्याकडे mrp द्यावी लागते, डी मार्ट मध्ये श्रीखंड,तूप,दूध,दही,चीझ,कोल्ड ड्रिंक यात किमान 10 rs ची सूट असतेच असते

6, दुसर्यांना द्यायला गिफ्ट म्हणून बेडशीट/ब्लेंकेट / बाउल सेट,/वॉटर बॉटल,टिफिन खूप स्वस्त पडतात

7, आपला कपड्याचा size नक्की माहीत नसेल ,किंवा नवीन प्रकार बिनधास्त ट्राय करता येतो, घरी घेऊन आलो तरी 7 दिवसात रिटर्न करून लगेच पैसे हातात मिळतात

तेजो यांनी एकदम भारी सल्ले दिले आहेत.
फक्त 7 वा सल्ला खरेदी आधी D mart staff शी बोलून घ्यावा. करोनाकाळापासून कपडे trial rooms बंद आहेत आणि कपडे return and exchange होत नाहीत असे मला तिथल्या कर्मचारी ने सांगितले.
D mart मधे चांगल्या brands च्या वस्तू खूपच स्वस्त मिळतात.

डी मार्ट मध्ये ट्रायल अर्थातच करोना नसताना, पण सध्या घरी कपडे नेऊन एक्सचेंज करता येतं, नुकताच अनुभव घेतला आहे, 20 दिवस झाले असतील

मी गेल्या दीड दोन वर्शात अ‍ॅक्चुअल सुपरमार्केट मध्येच गेलेले नाही. बिग बास्केट व सुपर डेली झिंदाबाद. व त्यात किचन आणी घर नीट चालले आहे. सुटे हवे असतील तर नाक्यावरच्या गुज्जु वाण्या कडे सर्व मिळते. वाण्याची मुलगी मोठी हुषार व चटपटीत आहे व सर्व नोकर वर्ग अगदी तत्पर आहे. पण हे ही महिन्यातून एकदा.

डीमार्ट हे बहुतेक मेजर संसारी पब्लिक साठी आहे. नवरा बायको मुले अशी चित्रे खरेदी करत असतात. लिमिटेड बजेट वर व ती सोडेक्सो कुपन्स असतात अशे कपल्स दिसतात. इथे तुम्ही बल्क खरेदी केलीत तर फायद्यात जाते. तिथे ज्या वस्तू मिळतात त्या माझ्या गरजाच नाही आहेत. त्यामुळॅ मला डी मार्ट मध्ये जायचे दडपणच येते. परवा डॉक्ट र कडे जाताना बघितले तर भयानक गर्दी होती. गणपती उत्स वा साठी खरेदी साठी गर्दी आहे असे आटो वाला म्हटला.

आता बिग स्टोअर्स रूल्ड आउटच आहेत. एस्प. बायका पोरांना मुळीच नेउ नका. कोविड इन्फेक्षन चा धोका आहे.

मी गेले तर दोन एक महिन्यानी नेचर बास्केट मध्ये जाते पन ते ही ऑनलाइन अ‍ॅप आहे प्लस मीटिगो लिशिअस अ‍ॅप्स आहेत ऑन लाइन ला स्विचओव्हर करा. मी तर बिग बास्केट वरून स्टेशनरी वह्या बल्ब पण मागवले आहेत. अजून काही हत्यारे पात्यारे हवी असतील तर अमॅझोन आहेच.

भाजी पाला फळे तर नाक्यावरच्या भाजीवाल्याकडे जास्त ताजा व स्वच्छ मिळतो. बिग बास्क्ट वर तोंडली व भेंडी ही निब्बर मिळतात. ती मी स्वतः भाजीवाल्या कडे शोधून घेते. बिग बास्क्ट वर ब्रॉकोली सध्या मिळत नव्हते पण भाजी वाल्याकडे मिळाले. किन्वा व सीड्स प्रोटीन मिक्स गुजराती वाण्या कडे मिळून गेले.

तस्मात ऑनलाइन ला स्विच व्हा. अवोइड बिग स्टोअर्स.

गेल्या वर्षी रिलायन्सने कोविड काळात सर्व हॉस्पिटल कर्मचाऱयांना 1000 रुचे कुपन दिले होते, पण तेंव्हा मॉल बंद होते आणि कुपनची एक्सपायरी 1 महिन्यात होती, Proud

शेवटी चुनाभट्टीत एक त्यांचे स्टोअर पार्ट टाइम ओपन असल्याचे समजले , तिथे गेलो तर बोलले फक्त 30 ग्राहकांना सेवा देतात, मग गयावया केली , डॉकटर असल्याचे सांगितले, म्हणून आत घेतले , 200 रुचे अप्पेपात्र घेतले आणि उरल्याचे काजू बदाम घेतले

200 रु रिक्षाचे गेले , 1000 रु चा माल आणला

त्यानंतर अजून कुठे मॉलला गेलो नाही,

सध्या भाजीपाला फळे रमाबाई घाटकोपर रस्त्यावर घेतो, तिकडच्या सर्व भाज्या फळे वेगळी वाटतात , भाजीवाला बोलला इकडे नाशिकचा माल येतो, हारबर लाईनला वाशीवरून इतर महाराष्ट्राचा माल येतो, वेस्टर्न लाईनला तिकडून डहाणूकडून माल येत असणार,

मुंबईत प्रत्येक लाईनच्या भाजीपाल्याची व फळाची चव वेगळी आहे

तेजो, छान माहिती.

माझं वैयक्तीक मत (जे घरीही कुणी मनावर घेत नाही):
जिथे असे स्वस्त, एकावर एक, इतर सेल वगैरे असतात तिथे खरेदीला त्यांनीच जावं जे काय गरज आहे काय खरेदी करावं या बाबतीत कडक शिस्त पाळतात, बजेट व्यवस्थित पाळतात.
किंवा त्यांनी ज्यांच्या घरी वस्तू ठेवायला अमाप जागा आहे, बजेटची काही चिंता नाही.

मुंबईत प्रत्येक लाईनच्या भाजीपाल्याची व फळाची चव वेगळी आहे

बरोबर.

घेणाऱ्या गिऱ्हाइकाची खरेदीकुवत प्रत्येक लाईनला वेगळी असते. पुन्हा ती कशी मांडून ठेवली आहे - हातगाडीवर, टबात, केळीच्या पानांवर, फुटपाथवरच फटकूर टाकून यावरही भाव चढतो उतरतो.

इथेच जिओमार्टची जाहिरात - काळा जामचा टिन ५०% पाहून app वर नोंदणी करायला गेलो. वाढदिवस दोन दिवसांवर होता आणि डिलीवरी ३-७ दिवसांत दिसल्याने थेट जिओमार्ट गाठले. तिथे टिन नव्हता. "माल इथूनच जातो" ही थाप होती हे नंतर कळले.

पण आणखी एक मार्ट आहे तिकडे गेलो नाही. मग परत app वर ओर्डर टाकली आणि म्हटलं येऊ दे केव्हा यायचे तेव्हा. वाढदिवसादिवशीच सकाळी dispatched and track मध्ये दुसऱ्या मार्टचा पत्ता होता. म्हणजे या जिओचे franchisee असावेत ,जिओ काही करत असेल तर रबाले ,नवी मुंबई किंवा बोरिवली डेपोतून स्टॉक पाठवत असावेत त्यांना.

संध्याकाळी केकवरच्या मेणबत्त्या फुंकल्या आणि दाराची बेल वाजली. टिन आला.
काळा जाम च़ागला होता पण मिठाईवाल्यांंकडे जरा चांगले असतात सुकामेवा भरलेले. हे पाकातलेच होते. १२०/- ला ठीक होते. रव्याचे.
पण यानंतर जिओमार्टची जाहिरात माझ्या ब्राउजरला पाकाने चिकटलीच आहे.

किंवा त्यांनी ज्यांच्या घरी वस्तू ठेवायला अमाप जागा आहे, बजेटची काही चिंता नाही.》》》》 असली लोकं डी मार्ट ला जात नाहीत Happy

D-mart मध्ये दसऱ्यांतर तेल,तूप,साबण, उदबत्ती ह्यावर फारशी सूट नसते, गर्दीही फार असते
अश्या लागणाऱ्या वस्तू आत्ताच आणून ठेवाव्यात किंवा दिवाळीपर्यंत फिरकू नये

एक निरीक्षण-
सातारा रोड ,पुणे,डी- मार्ट ला हल्दीराम रेडी टू इट पाव-भाजी pack एकावर एक फ्री होतं- mrp-90/-rs
तिथेच 200 पावलांवर हल्दीराम चं आउटलेट आहे, तिथे तीच पाव-भाजी 85/-rs ला होती
अगदी रसगुल्ले, काजूकतली, शेव बाबतीत पण हेच
(कारण काहीही असो, 2/3 item मागे सहज 100 रुपये वाचतात)

तेजो, या नव्या टीप बद्दल धन्यवाद..!!>>> __/\__

कारण काहीही असो, 2/3 item मागे सहज 100 रुपये वाचतात)
>>>
हा अनुभव चितळेंच्या गुलाबजाम मिक्स, दह्याबद्दल ही आला होता. त्यांच्या दुकानात फुल्ल mrp ला असायचे. डी मार्ट मध्ये मात्र ५/१० रु कमी.

पतंजलीच्या वस्तू पण MRP पेक्षा D-mart मधे स्वस्त असतात. स्पेशल पतंजलीच्या दुकानात पण MRP ला च मिळतात वस्तू.

डी मार्ट घाऊक प्रमाणात खरेदी करून विकते. त्यामुळे हा फरक असतोच.
तसेच आमच्याईथे सहकार भंडारमध्ये एक्स्पायरी डेट जवळ आलेले कोल्ड्रींक निम्या किंमतीत मिळायचे.
एकदा मी शहानपणा करून एकावर एक फ्री बघून दोन-दोन लीटरच्या चार मोठ्या बाटल्या आणल्या आणि आईला कौतुकाने दाखवल्या.
आई एक्सपिरींन्स खेळाडू. मला डेट बघायला लावली. तर दोन चार दिवसात बाद होणारे होते. मग मी ब्रश केल्यावर पेप्सीने चूळ भरली, थम्प्सने गुळण्या केल्या, कोकाकोलाने तोंड धुतले, आणि स्प्राईटने खिडक्यांच्या काचा पुसुन घेतल्या..

Pages