ग्रहण - १९८४ च्या शीखविरोधी दंग्यांवर आधारीत वेबमालिका

Submitted by सहजराव on 2 July, 2021 - 23:47

डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ग्रहण ही वेबमालिका प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झालेली आहे.
जरी ही मालिका एका कादंबरीवर आधारीत असल्याचे सांगण्यात येत असले तरीही १९८४ साली झालेल्या शीख विरोधी दंग्यांची पार्श्वभूमी या मालिकेला आहे. १९८४ मधे दिल्ली, कानपूर आणि बोकारो इथे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत लहान मुले, बायका, वृद् आणि तरूण पुरूष या सर्वांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

देशात सर्वत्र दंगली उसळल्या तरीही दिल्ली, कानपूर आणि बोकारो इथे रस्ते शीखांच्या रक्ताने लाल झाले होते. सर्वात जास्त झळ या शहरांना बसली. यातील बोकारो हत्याकांडांवर कादंबरी गाजली होती. या कादंबरीवर आधारीत ग्रहण ही मालिका आहे.

मालिकेत प्रेमकहानी पळवत पाहिल्यास मूळ कथा विना अडथळा पाहता येते. बरेच बदल केले असले तरीही त्या दंगलींची दाहकता लक्षात येते. काही काही दृश्यात तर रडू येते. इतका नृशंस नरसंहार करणारे आजही उजळ माथ्याने वावरत असल्याचे पाहून संतापाने मुठी आवळल्या जातात.
दिल्ली येथील दंगलींच्या खटल्यात तर सज्जनकुमार, आर के शर्मा , जगदीश टायटलर, एच के एक भगत यांना दिल्ली कोर्टाने जबाबदार धरले. पुढे हायकोर्टातही यांच्या दंगलीतल्या जबाबदा-या सिद्ध झाल्या. पाच जणांवरचे आरोप शाबीत झाले. इतके होऊनही यांना कॉंग्रेसने पदाधिकारी म्हणून कायम ठेवले. त्यांना शिक्षा होऊ दिली नाही. हा देशाच्या कायदा सुव्यवस्थेवर लागलेला काळा डाग आहे.

या मालिकेच्या विरोधात शिरोमणी दलाच्या बीबी जागीर सिंह यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले आहे. कारण पीडीतांची बाजू नीट मांडलेली नाही असे त्यांचे मत आहे. तर काहींचे मत आहे कि या निमित्ताने का होईना १९८४ च्या दंगलींना वाचा फुटेल. पुन्हा चर्चा होऊन खून्यांना शिक्षा होईल.
ते काहीही असो. या मालिकेने दंगलींचे राजकारण उघड करून दाखवले आहे. ते प्रभावी आहे.

कृपया या धाग्यावर या मालिकेच्या संदर्भातच लिहावे. मालिका ज्या विषयावर आहे त्याच विषयावर लिहावे ही विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे हि मालिका. प्रेम कहाणी पण खूप छान आणि रीअ‍ॅलीस्टिक आहे, उगाच जूळवलेली नाही. म्युझिक अप्रतिम आहे.
पीडीतांची बाजू नीट मांडलेली नाही असे त्यांचे मत आहे.>>> खरे तर त्यांचीच बाजू मांडलीये, सर्वात शेवटी (सो कॉल्ड) दंगेखोराची प्रतिक्रिया येते आणि तो शिक्षा पण भोगायला जातो की.

ही पाहिली होती सेरीज.
फार आवडली.
दंगलीची दाहकता नीटच पोहचते.
सगळे ऍक्टर कमाल आहेत.

येस्स.
ही सिरीज खूप आवडली होती. (शेवट जरा फिल्मी होता, आणि सुरुवातीला त्या तपास अधिकार्‍याचा एक लव सीन टाकून प्रेक्षकांचा ट्रॅक उगीचच जरा वेळ बदलला होता, पण त्याने फार बिघडलं नाही, हे नशीब.)

वामिका गब्बी तेव्हापासून फेवरेट झाली. (ज्युबिलीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब झालं.)
अंशुमन पुष्करचा आवाज काय भारी आहे.

यातली गाणीही आवडली होती - चोरी चोरी मुआ सुबहा तडके आयेगा - या गाण्याचे शब्द खूप छान आहेत. - जैसे सरकारी कागजात सब आ ही जातें हैं जी हां सही पते
तेव्हा रिपीट मोडमध्ये ऐकलं होतं हे गाणं.