यंदा गणेशोत्सव १० सप्टेंबरला सुरु होत आहे. मायबोली गणेश उत्सवाचे हे २२ वे वर्ष.
या गणेशोत्सवात मायबोलीला २५ वर्षे पूर्ण होतील. आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळे गेली २५ वर्षे मराठीतली पहिली वेबसाईट सुरु आहे.
मायबोली गणेशोत्सव २०२१ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.
पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
विषयांतर खूप होतंय. कृपया मूळ
विषयांतर खूप होतंय. कृपया मूळ विनंतीकडे लक्ष द्या.
पूर्ण पणे सहभाग शक्य नाही पण
संयोजनामधे पूर्ण पणे सहभाग शक्य होइल असे वाटत नाही पण काही मदत होऊ शकत असेल तर विना संकोच कळवा.
जमली का टीम.. होतोय ना
जमली का टीम.. होतोय ना गणेशोत्सव.. वाट पाहतोय घोषणेची...
Pages