पुण्यात फ्लॅट घ्यावा का नाशिकमधेच थांबावे ?

Submitted by रेव्यु on 31 July, 2021 - 04:38

गेल्या 14 वर्षांपासून आम्ही नाशिक मध्ये स्थायिक झालो. येथे प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट आहे. सुंदर सूर्यप्रकाश आणि वारा आहे. सर्व खोल्यांसमोर प्रचंड मोठी बाग, जुनी झाडे, हिरवळ आहे आणि प्रसन्न सकाळ आमचे स्वागत करते. जेव्हा हा फ्लॅट विकत घेतला तेव्हा मी नोकरीत होतो आणि धाकटी कन्या इथेच नोकरीस होती. आम्ही मूळचे बेळगावचे त्यामुळे तिथे स्थायिक होणे स्वाभाविक असते परंतु धाकटी कन्या लग्नानंतर असेल तिथे जाऊन येऊन करायचा विचार होता. परंतु थोरल्या कन्येप्रमाणेच ती देखील विवाहानंतर अमेरिकेत गेली. आता आम्ही 70 व 68 वर्षांचे आहोत . प्रकृती चांगल्या आहेत. नाशकात सांस्कृतिक बाबतीत आम्ही बरेच सक्रिय व सुखात आहोत. येथील अत्यंत निष्णात डॉक्टर्स सदा मदतीला आहेत आणि मुख्य म्हणजे ते अगदी त्याच दिवशी नुसत्या एसएमएस वर उपलब्ध असतात. या झाल्या जमेच्या बाजू.
परंतु इथे आम्हाला कठीण प्रसंगात मदत करतील किंवा आजारपणात आधार काय आहे याचा भरवसा नाही. तसे परगाव आहे असे आम्हाला वाटते. आमचे बरेच नातेवाईक पुण्यात आहेत, मुलीचे सासर तिथेच आहे, माझे मेव्हणे सुध्दा तिथे आहेत म्ह्णून मुली आग्रह करत आहेत की आम्ही तिथे नविन फ्लॅट घेऊन सेटल व्हावे.
आम्हाला भिती वाटते तिथल्या वाहतूकीची, मी इथे अजूनही कारमध्ये आरामात हिंडतो. सर्व अंतरे 20 मिनिटांच्या अंतरात आहेत. दुसरे असे की खरोखरच पुण्यात नातेवाईक मदत करू शकतील का? त्या पेक्षा येथेच सामाजिक आधार व्यवस्था विकसित करावी का? अत्यंत संभ्रमात आहोत.
दुसरे म्हणजे पुण्यात फ्लॅटच्या शोधात संलग्न बाबी म्हणजे कायदेशीर रीत्या आपल्या नावावर होईल का, मी व ही सहजपणे हिंडू शकू का?
काही उमजत नाहीये.... चर्चा करता येईल का.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरंच दूर आहे वाघोली डेक्कन पासून.
नगर रोड म्हणजे traffic असं माझ्या डोक्यात तरी बसलंय.
पण तो पुण्याचा सध्याचा fast developing भाग आहे.

सगळी चर्चा वाचली नाही पण नाशकातच रहा!
महात्मानगर म्हणजे बेस्ट!

उतारवयात पुण्यापेक्षा नाशिकमध्ये रहाणे सोयीचे हे मा वै म!

मी मुंबईत नाही , नाशिक/ पुणे इथेही नाही.
तुमची काळजी समजू शकतो.

आपल्याकडून कुणी अपेक्षा ठेवतोय म्हटले की सगळे टांग देतात.

तुमच्या वयाच्या नातेवाईक/ मित्रांचीही हीच अवस्था असणार आणि निर्णय घेण्याची क्षमताही त्यांच्या नातवंडांकडे गेली असणार.

बाकी तुमचे आयुष्य निर्विघ्न जावो ही इच्छा.
काही वर्षांत मलाही हाच धागा वर काढावा लागणार.
( खानदेशकडची म्हण - एकपुति रडे आणि सातपुतिही रडे.)

माझी आई पण 82 पर्यंत आहे आता पर्यंत शरीराने उत्तम साथ दिली .लांब पर्यंत चालत जाणे दहा वर्ष पूर्वी च बंद झाले होते.पण घर आणि घराच्या परिसरात चालणे होते.कोणतेच मोठे दुखणे नाही.
Bp, मधुमेह,अन्न पचन,मूत्र विसर्ग,संडास,झोप न येणे, गुडघे दुःखी,असेल कोणतेच प्रकार नसल्या मुळे मस्त आयुष्य चालले होते.
पण गेल्या दहा वर्षापासून एका माणसाची गरज हो लागलीच होती.घर सोडून बाकी बाहेरची सर्व काम करण्यासाठी 100 % दुसऱ्या व्यक्ती वर अवलंबून .
आता तिची अवस्था अशी आहे की सगळेच दुसऱ्या वर अवलंबून आहे .दुसऱ्या च्या मदती शिवाय काहीच करू शकत नाही.
आम्ही जवळ असल्या मुळे तशी समस्या नाही.
पण कोणीच जवळ नसेल तसे वृध्द व्यक्ती एक दिवस पण स्वतः जगू शकणार नाही.
पगारी माणसं भावना हिन असतात त्यांना पगार शी matlab असतो.
एकाच घरात पुढची पिढी पण राहत असेल तर पगारी व्यक्ती दबाव खाली वृध्द व्यक्ती ची उत्तम काळजी घेतील.
पण जवळ कोण च नसेल तर पगारी व्यक्ती कोणतेच काम व्यवस्थित करणार नाही .
ही समस्या अजुन दहा वीस वर्षात अत्यंत गंभीर होणार आहे.पैसे असून सुद्धा जगणे मुश्कील होवू शकते.
जुन्या लोकांचे विचार अत्यंत योग्य होते असेच आता वाटत आहे.
20 व्या वर्षी लग्न आणि दोन चार मुल जन्माला घालणे .
एक पिढी वृध्द अवस्थे कडे जाई पर्यंत पुढच्या दोन पिढ्या तरुण अवस्थेत असतं.
म्हातारपण नको बाबा असेच मला तर वाटतं म्हाताऱ्या लोकांचे हाल बघून.
म्हातारपणी असे काही विकार काही लोकांना जडतात शारीरिक त्रास देणारे की सहन करणे अवघड होते.
आधुनिक वैद्यक शास्त्र पण काहीच करू शकत नाही.
फक्त केविलवाणे प्रयत्न डॉक्टर करत असतात.
त्यांच्या बुध्दी च्या पलीकडले असते सर्व.

Srd. +1
फक्त एक छोटी सुधारणा :
"निर्णय घेण्याची क्षमताही त्यांच्या नातवंडांकडे गेली असणार."
ह्यात भर : निर्णय घेण्याची क्षमता आणि अधिकारही त्यांच्या नातवंडांकडे गेला असणार .

मित्र,नातेवाईक,हितचिंतक हे सर्व ठराविक वयापर्यंत च साथ देतात जो पर्यंत तुम्ही निर्णय घेण्याच्या आणि तो निर्णय अमलात आणायचा वयात असतात.किंवा तुम्ही अधिकार पदावर असता.
जसे की वयस्कर नेते मंडळी,वयस्कर उद्योगपती .ह्यांच्या कडे अधिकार असतात उतार वयात पण त्या मुळे त्यांना मित्र, नातेवाईक,हितचिंतक, असतात.
पण सामान्य लोकांनी 70 री पार केली की तो व्यक्ती कसल्याच कामाचा नसतो त्या मुळे जवळ पण कोणी नसते.
हे सत्य आहे.
उपकार म्हणून च मदत केली जाते,प्रेम ,कर्तव्य म्हणून नाही.

नाशिक / पुणे पैकी नाशिकची निवड झाली - चांगला निर्णय घेतला आहे. शुभेच्छा.
या धाग्यावरचे सर्वांचेच प्रतिसाद आवडले.

म्हातारपण सुखात जाणे हे एकेकाचं नशीबच असतं.>> ही विचार सरणी थोडी बहुत बदलता येते का ते बघा. आत्ता लेट पन्नास ते मिड साठीत असलेल्या मध्यमवर्गीय पिढीने सल ग, कमीत कमी अडचणी असलेल्या नोकर्‍या केल्या, मुलांची शिक्षणे, रिटायर मेंट साठी तरतूद, घर गाडी हे करता आले. पुढील पिढीला हे स्थैर्य मिळवा यला जास्त मेहनत आहे. त्यांच्या पुढे अस्थिरता, पर्यावरण खराब होत राहणे. कधी ही नोकरी जाउ शकणे, अशी चॅलेंजेस आहेत. त्यात आपण आपल्याला बघायचे चॅलेंज एक स्वतःवर घेतले तर त्यांचे त्रासेस कमी होतील.

मुले उत्तम संस्कार करून उत्तम शिक्षण देउन वाढ्वली आता ती सुटवंग झाली कमावती झाली त्यांची लग्ने होउन जीवने सुरू झाली आता आपण लक्ष काढूनच घ्यायला हवे. पालकत्व इज अ टाइम बाउंड चॅलेंज. मग स्वतःवर फोकस करायलाच हवे. हेच हेल्दी आहे. जरी आपल्याला दु:ख झाले तरी मोठे म्हणून तो निर्णय आपण च घ्यायला लागतो. मुला नातवंडांचे चेहरे बघून आपले पाय डळमळीत होतात. पण काही तरी बाउंड्री सेट करायला हवी.

त्यांनी मागितले म्हणजे मदत करायची, सल्ले द्यायचे पण बाकी अलिप्त राहायचे. प्रेम तर कायमच राहणार आहे. ही विचार सरणी अनेक रुपांनी व्यक्त होते पण ती समजून अंगिकारली तर कमी त्रास होतो. अनेक सुजाण पालक असे राहातही आहेत.

नशीबावर सोडू नका. आपली सिचुएशन आपल्यालाच माहीत असते. त्या अनुसार निर्णय घ्यावेत. ग्रह तार्‍यांनी इतकी वर्शे काही मदत केली नाही आता का बरे करतील. लीव्ह देम अलोन.

अमा पोस्ट आवडली.
मुले एकदा ग्रोन अप झाली की त्यांचे त्यांच्यावर सोडून द्यायचे, आपण हवे तेव्हा मदत करायची. त्यांच्या निर्णय घेण्यात काही चुका होतील, त्यातून शिकतील, काही चुकले तर लेक्चर, टोमणे, किंवा कसेही बोलून दाखवणे टाळावे.

ग्रह तारे आणि म्हातारपण हे विषय कृपया या धाग्यावर तरी नकोत. आतापर्यंत हा धागा अतिशय सयुक्तिक ( logical चे मराठी ??) पणे चालू आहे. 40-50 पुढील वयोगटातील लोकांना नक्की मार्गदर्शक अशा प्रतिक्रिया इथे संकलित झाल्या आहेत. त्यात ग्रह तारे नकोच .

काही चुकले तर लेक्चर, टोमणे, किंवा कसेही बोलून दाखवणे टाळावे.>> व्ह्य व्ह्य. ह्याला फार च पेशन्स लागतो. अगदी मला इन्स्टंट कॉफी आवडते आणि मुलग्याला ब्रू केलेली फ्रेंच प्रेस वाली. परत ते प्रोसेस प्रमाणे जाणार. आपण जुगाडू वृत्त्तीनेच तरलो इतकी वर्श. अंदाज पंचे कारभार त्यांची इन्डिव्हिजुअलिटी रिस्पेक्ट करावी. तर इन रिटर्न आदर मिळेल. एक प्रॉजेक्ट संपला यशस्वी पणे असे समजून पुढे निघूनच जावे.

अमा, ते मौन व्रत असतं ना.
ते नक्की कोणत्या उद्देशाने जनरली लोक करतात माहीत नाही. पण काही जण ते करताना तोंड न उघडता, उं म्हणुन लक्ष वेधुन, किंवा हस्तस्पर्शाने लक्ष वेधून मग हात वारे करून किंवा लिहून जे काय दटावायचे आहे, असं नको तसं कर सांगायचे आहे ते करताना पाहिले आहे. किंवा आज नाही बोलू शकत उद्या बघतो/ते म्हणुन दुसऱ्या दिवशी क्लास घेताना.

सायकॉलॉजीच्या दृष्टीकोनातून मौन व्रत पाळायचे. कुठे एकटे राहून नाही तर नेहमीच्या लोकात राहूनच.
आपण काही बोललो नाही तरी काहीही फरक पडत नाही याचा पडताळा घेण्यास.
महिन्यातून एक दिवस पासून सुरवात करायची. उद्देश क्लिअर असल्याने अत्यावश्यक तिथेच (म्हणजे घरात साप शिरलेला दिसला किंवा कुणाला इजा होणार आहे दिसले वगैरे) निदर्शनास आणुन देण्या इतपत तोंड उघडावे.
आपण न सांगताही लोक, जरा/जास्त उशिराने, त्यांच्या सोयीने सगळं व्यवस्थीत करतात, आपण न बोलल्याने पहाड काय पहाडाचं पिल्लूही कोसळत नाही हे लक्षात येत जातं. कधी आपण न बोलल्याने कामे अधिक चांगली झालीत असेही लक्षात येत जाते.

आपण न सांगताही लोक, जरा/जास्त उशिराने, त्यांच्या सोयीने सगळं व्यवस्थीत करतात, आपण न बोलल्याने पहाड काय पहाडाचं पिल्लूही कोसळत नाही हे लक्षात येत जातं. कधी आपण न बोलल्याने कामे अधिक चांगली झालीत असेही लक्षात येत जाते.>> हो. अगदी खरं आहे. Lol आणि आपली मनःशांती टिकून राहते ते वेगळंच.

अमा+१
मानव +१
बाकी प्रतिसाद ही छान आहेत. हा उपयुक्त धागा आहे.

अमा, मानव पोस्ट आवडल्या.
मौनव्रत : १) शब्द/वाणी २) देहबोली पहिलं सोपं आहे पण दुसरं अवघड आहे पेक्षा पहिल्याचं दृष्यरूप दुसरं आहे.
एक उदाहरण देते . माझ्या मैत्रीणीच्या सासूबाई शांत स्वभावाच्या व सासरेही वरवर पाहता शांतच. तीन तरूण मूलं घरात. पोळ्यांना बाई. मुलांचा काही नेम नसतो आवडलं कालवण तर कमी पडायला नको म्हणून दोन जास्तीच्या पोळ्या करून घ्यायच्या. सासरे लवकर जेवून झोपायचे. सकाळी पोळ्यांचा डबा जिथे ठेवलेला असायचा रात्री तो सकाळी भलतीकडेच. डबा इकडून तिकडे झालेला काय सांगतो सुनांना बरोबर कळायचं. शिळ्या पोळ्या आपल्या ताटात वाढून घेणं वै प्रकार व्हायचे ...... हा त्या आजोबांचा रोजचा दिनक्रम होता.

आजचे प्रतिसाद मलाही उपयोगाचे आहेत.
अगतिक होऊ लागलेला चाचपडू लागतो आणि कुठून तरी मदत मिळते का पाहतो. ( ज्योतिष, तोडगे, बाबाबुवा, महाराज इत्यादी. त्याचा उल्लेख केला. पण धागा भलतीकडेच वाहतो हे उदयने सांगितले. अडमिननी वेळीच ते प्रतिसादशुद्धिकरण केले. आता संपादनही गेले होते.)

बाकी ठीक होवो.

माझे जुने सहकारी म्हणतात " मी आई,वडील, भाऊ बहिण एकूण पाच जणांची *** धुतली. आता माझे कोण धुणार?
मुलगा एक नाशिकला ( एरपोर्ट जवळ.) दुसरा परदेशी. मुलगा व्यवस्थित पाहतो पण मला नाही थंडी सहन होत नाशिकची. जाऊन येऊन तीन वर्षं काढली. पण आता तिकडेच भाड्याने राहिलोय. थंडी आली की गुडुप. "

इथे प्रतिसाद देणारे लोकांचे शारीरिक कार्य उत्तम चालत आहे अशा अवस्थेत सर्व आहेत.
पण जेव्हा शरीर काम करणे सोडून देते तेव्हा सर्व ज्ञान मातीमोल असते.
काही ही उपयोग होत नाही.
कोणी तरी असेल जवळ तर च जीवन जगता येईल अन्यथा नाही हे सत्य आहे.
तरुण पणी व्यक्ती स्वतंत्र सारख्या बकवास विचाराच्या नादी लागून.
दारू,सिगारेट,प्रक्रिया केलेले अन्न,व्यायामाचा अभाव,पोष्टिक आहार चा अभाव.
रात्र डिस्को मध्ये झोप नाही.
ह्या मुळे शरीराची पूर्ण वाट लागलेली असते.
जगात असा एक पण डॉक्टर नाही तो अशा लोकांचे शरीर ठीक करू शकेल.
ह्या सर्व प्रताप मुळे,फालतू ऐश करण्या मुळे.
पन्नाशी ओलांडली की शरीर साथ देणे सोडून देते.
ह्या काळात जे आता २० ते ५० वर्षाचे आहेत त्यांचे म्हातारपण अतिशय खडतर जाणार आहे.
किडनी,लिव्हर,अन्न पचन, हार्ट ,दात ,गुडघे,, डोळे हे सर्व अवयव किती महत्वाचे आहेत आणि आपण मेंदू गहाण ठेवून ह्यांची कशी वाट लावली हे त्यांना आठवणार आहे.
निरोगी ,स्वस्थ म्हातारपण ह्याची स्वप्न ह्या वर्गातील लोकांनी बघू च नयेत.

अवांतर - ज्योतिष कमेंट्स इथे अनाठायी असल्या तरी थेट उडवून लावायचीही काही गरज नव्हती कारण पॉईंट वाझ नोटेड. अशी प्रतिसादशुद्धीची गरज बरेच धाग्यांवर असते तशी. मागेही इथे ब्लॅककॅट यांच्या धाग्यावर काही वादविवाद किंवा देशविघातक(?) कमेंट्स नसताना तो धागा बंद केला गेला होता. मी काय अलविदा नाय करणार पण इथूनपुढे शक्यतो रोमातच राहील लॉगिन करेल तेव्हा. सगळ्या धाग्यांवर शीर्षकाशी निगडीतच चर्चा वाचायला मिळेल ही अपेक्षा करून टाटा बायबाय!!!

माणूस जन्म घेतो तेव्हाच पुढे ह्याचे आयुष्य कसे असेल हे स्पष्ट असते.
मग त्याला गुणसूत्र नाव ध्या,किंवा भविष्य नाव ध्या किंवा काही ही नाव ध्या.
स्वभाव निर्माण करता येत नाही.
हुशारी माणूस स्व प्रयत्नाने निर्माण करू शकत नाही ती जन्मजात असते.
धडाडी जन्मजात असते.
स्वतः प्रयत्न करून काहीच निर्माण होत नाही
ते जन्म जात असते.
चार तास व्यायाम करणाऱ्या व्यक्ती पेक्षा काहीच व्यायाम न करणारे ताकत वान असतात.
२४ तास अभ्यास करणाऱ्या लोकांपेक्षा २ तास अभ्यास करणारे हुशार असतात.
माणसाच्या हातात काही नाही खेळणे आहे तो.
भविष्य शास्त्र त्या वर च आधारित आहे.

प्रतिसाद उडवण्यापेक्षा " धाग्यावर भविष्याचे अवांतर नको, यापुढचे असे प्रतिसाद उडवले जातील." अशी सूचना टाकली असती तरी लोकांनी घ्यायचा तो बोध घेतला असता. तो आधीच घेतला होता म्हणा.

Pages