Submitted by समीक्षा on 9 August, 2021 - 15:08
माझ्या नऊ महिन्याच्या मुलीच्या डोळ्यात तिरळेपणा दिसू लागलाय, ती कसा ठीक होऊ शकतो , खूप लहान आहे तर काही घरगुती उपाय होऊ शकतात का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरगुती उपायांनी तिरळेपणा
घरगुती उपायांनी तिरळेपणा नाहीसा होत नाही.तुमची मुलगी फक्त 9 महिन्यांची आहे.तिच्या एकंदरीत vadhi वर लक्ष द्या.तिच्या पुढ्यात हा विषय काढू नका किंवा इतर जणांना काढू देऊ नका.
माझा एक कझन लहानपणापासून तिरla होता.18 -२० वर्षांनंतर माहीत नाही त्याचे operation केले किंवा काय ते.पण डोळे सरळ झाले.त्याच्या आईवडिलांनी सांगितले नाही,आम्ही विचारले नाही.
लवकरात लवकर लहान मुलांच्या
लवकरात लवकर लहान मुलांच्या डीळ्यांच्या विशेषज्ञ डॉक्टरांना दाखवा. (Pediatric ophthalmologist and strabismologist). तिरळे डोळे खरच आहेत की तसं दिसतय (Pseudo squint), हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. Pseudo squint असेल तर काळजी नाही, पण खरा squint असेल तर त्याचे उपचार (चष्मा/ ऑपरेशन) जो डाॅक्टर सांगतील तो करून घ्या. तिरळेपणाच्या प्रकारावर त्याचे उपचार अवलंबून असतात. आणि ते लवकरात लवकर सुरू केले तरच बाळाच्या stereopsis (3D दृष्टी) चा विकास होतो. उशीर केल्यास सतत क्रॉस होणारा डोळा कमजोर बनतो (Lazy eye/ Amblyopia). काळजी करू नका. काळजी घ्या. Squint चा उपचार शक्य आहे, तो करा. दुर्लक्ष करू नका.
लवकरात लवकर लहान मुलांच्या
लवकरात लवकर लहान मुलांच्या डोळ्यांच्या विशेषज्ञ डॉक्टरांना दाखवा. +११
डोळ्यांच्या चांगल्या अनुभवी
डोळ्यांच्या चांगल्या अनुभवी डॉक्टरना भेटा. नक्की उपाय होईल.
माझ्या अगदी ओळखीतल्या एका मुलीचे तिरळे डोळे डोक्टरांनी चांगले केलेले मी स्वतः पाहिलं आहे. त्या तिरळेपणाचा बाऊ करण्याचे कारण नाही. मुलगी खुप लहान आहे तुमची. थोडी मोठी होऊ द्या. कधी कधी तिरळेपणा वाढत्या वयासोबत जातो देखिल. परंतु तुम्ही डोळ्यांच्या डोक्टरांना भेटा. आंतरजालावर डॉ. तात्याराव लहाने यांच्या काही क्लिप्स असतील तर बघा. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला तर बघा.
लवकरात लवकर लहान मुलांच्या
लवकरात लवकर लहान मुलांच्या डोळ्यांच्या विशेषज्ञ डॉक्टरांना दाखवा.+११११११
घरगुती उपायांनी तिरळेपणा
घरगुती उपायांनी तिरळेपणा नाहीसा होत नाही.>> देवकी +१
लवकरात लवकर लहान मुलांच्या डीळ्यांच्या विशेषज्ञ डॉक्टरांना दाखवा. (Pediatric ophthalmologist and strabismologist). तिरळे डोळे खरच आहेत की तसं दिसतय (Pseudo squint), हे डॉक्टरांकडून तपासून घ्या.>>>+१११११
ठाण्यामध्ये डॉ. मिहीर कोठारी
ठाण्यामध्ये डॉ. मिहीर कोठारी आहेत कोलबाड /खोपट भागामध्ये जे पेडिऍट्रिक ऑप्थलमॉलॉजिस्ट आहेत. ३M चा patch मिळतो तो दिवसाला २ तास लावायला सांगतात डॉक. मुलाला सांगितले होते, बराच फरक पडला त्यामुळे.
ठाण्यामध्ये डॉ. मिहीर कोठारी
ठाण्यामध्ये डॉ. मिहीर कोठारी आहेत कोलबाड /खोपट भागामध्ये जे पेडिऍट्रिक ऑप्थलमॉलॉजिस्ट आहेत.
>> हे खूप चांगले डॉक्टर आहेत.
नवीन Submitted by सई पारिजात
नवीन Submitted by सई पारिजात on 10 August, 2021 - 06:59 .
<<
✓
योग्य व बरोबर.
आता अजून डिट्टेलवार :
***

१. अजून बाळ लहान आहे. अजून डिस्जंक्टिव्ह मूव्ह्मेंट्स पूर्ण गेलेल्या नसू शकतात. घरी कन्फर्म करायला सोपा मार्ग असा:
चित्राचा वरचा भाग अन खालचा. पहा, अन मग पुढचे वाचा.
डोळ्याच्या बाहुलीवर फ्लॅश चमकलेला आहे. बरोबर?
खालच्या चित्रात फ्लॅश 'सिमेट्रिकल' आहे. हा तिरळेपणा नाही. वरच्या चित्रात फ्लॅश सिमेट्रिकल नाही. तिथे तिरळेपणा आहे.
मूल तिरळे पहाते आहे असे तुम्हाला वाटेल त्यावेळी फ्लॅश लावून कॅमेर्याकडे पहाताना फोटो काढा, फ्लॅश सिमेट्रिकल असेल तर तिरळेपणा नाही. जुने फोटोही झूम करून पहा.
हा झाला घरच्याघरी संशय मोडण्याचा फुकट उपाय.
तरीही,
कुणा गरीब डोळ्याच्या डॉक्टरला दक्षिणा देण्याचे पुण्य करा. तिथे जाताना सोबत मी वर सांगितलं तसा बाळाचा फोटो काढून न्या.
२. "बाळ लहान आहे, मोठे झाल्यावर तिरळेपणा जाईल" << ही जुनी व चुकीची समजूत आहे. शक्य तितक्या लवकर डॉक्टरला दाखवा.
या वयातही चष्मा आहे असे साम्गितले तर चष्मा लावून घ्या. वाटलेच तर डॉक्टर पेडिअॅट्रिक एक्स्टेंडेड वियर काँटेक्ट लेन्स सांगतील, ती योग्य प्रकारे वापरा.
३. 'स्युडो स्क्विंट' उर्फ खोटा तिरळेपणा.

इथे बाळ सरळ सरळ चकणे पहाते आहे असे दिसतेय. पण नीट पाहिलेत तर काचेवर चमकलेला फ्लॅश दोन्ही डोळ्यांत पर्फेक्टली सेंटरला आहे. हा झाला स्युडो-तिरळेपणा. मुलांचं नाक बसकं असतं त्यामुळे दोन डोळ्यांतलं अंतर नीट नसल्यासारखं वाटतं, मग तिरळेपणा वाटतो.
४. तिरळेपणा नुसत्या चष्म्याच्या नंबरमुळे येऊ शकतो, किंवा काहींदा डोळे हलवणारे स्नायू (आईच्या पोटात असताना) कमकुवत तयार झाल्याने किंवा मेंदूत गडबड असल्याने पॅरालिसिस होऊनही असू शकतो. फायनल निदान डोळ्यांच्या डॉक्टरनेच करायचे आहे, (तिथे वर सांगितले तसे दक्षिणा देण्याचे पुण्य घ्या..) शक्यतो आजकाल नवी निघालेली स्पेशालिटी "पेडिअॅट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजी" यात पारंगत असलेल्या डॉक्टरला दाखवा, किंवा तुमच्या नेहेमीच्या डोळ्यांच्या डॉक्टरला. नॉर्मली ते स्वतःच एकादा पेडि-ऑप्फ्थ सुचवतील. किंवा स्वतः ट्रीटमेंट करतील. डोन्ट वरी, ही/शी इज कॉम्पीटंट इनफ.
५. नुसत्या चष्म्याच्या वापराने तिरळपणा बहुतेकदा जाऊ शकतो, पण त्यासाठी डॉक्टरांनी दिलेला चष्मा अन डोळ्याचे 'व्यायाम' (पॅचिंग) तुम्ही स्वतः वापरायचे असतात.
लोक अजिब्बात व्यायाम करत नाहीत.
एकदा मडकं पक्कं झालं की मग डॉक्टर काही करू शकत नाही. ऑपरेशन म्हणजे कंपनीत डिफेक्टिव्ह बनलेली गाडी माझ्यासारख्या मेकॅनिकने रिपेयर करण्याचा प्रयत्न, इतकेच असते. तेव्हा ओली माती असताना तिला आकार देण्याचे व्यायाम कृपया नीट करा.
***
सारांश.
घाबरू नका.
तिरळेपणा हा जीवघेणा आजार नाही, पण योग्य वेळी ट्रीटमेंट न केल्यास एका डोळ्याची नजर कायमसाठी अधू राहू शकते, म्हणून लवकर उपचार करण्याचा आजार आहे.
तेव्हा दुर्लक्ष करू नका. " बाळ मोठं झाल्यावर पाहू", असं अगदी लहान मुलांच्या डॉक्टरने जरी सांगितलं तरी ऐकू नका, डोळेवाल्याला दाखवा.
सगळ्यात महत्वाचे:
गूगल/मायबोली इ. ही वैद्यकीय सल्ला घेण्याची ठिकाणे नाहीत. त्यासाठी माझ्यासारखे गरीब लोक डिग्र्या घेऊन, गल्लोगल्ली दुकाने उघडून बसलो आहोत, तिथे येऊन सल्ला विकत घ्या.
ता. क.
ता. क.
"इथे बाळ सरळ सरळ चकणे पहाते आहे असे दिसतेय."
हा वरच्या प्रतिसादातला विनोद तसाच ठेवतोय.
त्यांच्याशी संपर्क होऊ शकला
त्यांच्याशी संपर्क होऊ शकला तर बघा.
<<
मास्तर स्क्विंट करत नाहीत. प्लस नुकतेच डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च म्हणुन रिटायर झालेत. नका त्रास देऊ त्यान्ना.
३M चा patch मिळतो तो दिवसाला
३M चा patch मिळतो तो दिवसाला २ तास लावायला सांगतात डॉक. मुलाला सांगितले होते, बराच फरक पडला त्यामुळे.
Submitted by नरेन. on 10 August, 2021 - 13:19
<<
बराच फरक पडला त्यामुळे. हे कितीही खरे असले, तरी,
नुस्ता पॅच लावून बरे होत नाही.
पॅचिंगची घंटा माहिती नसताना "पॅच लावा" हा सल्ला कृपया देऊ नये, असे सविनय सांगू इच्छितो. अर्धवट "वैद्यकीय" सल्ला कधीच देऊ नका ही विनंती.
आ.रा.रा. तुम्ही भक्ताडांचे
आ.रा.रा. तुम्ही भक्ताडांचे डॉक्टर आहात हे माहित होते
पण आज तुमची सविस्तर प्रतिक्रिया वाचल्यावर तुम्ही खरेच डोळ्याचे डॉक्टर असणार यावर माझा पक्का विश्वास बसला 
मास्तर स्क्विंट करत नाहीत. प्लस नुकतेच डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च म्हणुन रिटायर झालेत. नका त्रास देऊ त्यान्ना. >> नाहे म्हणजे मी त्यांच्या मुलाखती वाचल्या-बघितल्या त्यात त्यांनी बर्याच अंधांवर ऑपरेशन केल्यावर दृष्टी आली असे अनुभव होते. ते बघुन्/वाचून त्यांच्याबद्दल निष्णात डोळेवाले डॉक्टर आहेत असे वाटले. ते जे.जे. मेडिकल चे डीन, डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च तसेच महाराष्ट्र राज्य कोविड-१९ प्टास्क फोर्स समितीचे देखील अध्यक्ष होते हे फार नंतर म्हणजे आता आताच कळाले.
आ.रा.रा. तुमचं बरोबर आहे. राज्यासाठी एवढं काम केल्यानंतर त्यांना आराम करु देणेच श्रेयस्कर आहे.
बी.जे. मेडिकल चे डीन
बी.जे. मेडिकल चे डीन
<<
जे. जे. मुंबई.
तिरळेपणा म्हणजे अंधत्व नव्हे.
गुरुजी निष्णात आहेतच. तिरळेपणात नाही. त्यांनी केलेली एकही स्क्विंट सर्जरी पाहण्या/ऐकिवात नाही.
हो
सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. चुक दुरुस्त केली.
आ.रा.रा. यांच्या पोस्टला 100%
आ.रा.रा. यांच्या पोस्टला 100% अनुमोदन.
धन्यवाद सर्वांचे,
धन्यवाद सर्वांचे,
सई पारिजात तुम्ही डॉक्टर आहे हे माहीत होते, विशेष आभार
आरारा तुमचे पण विशेष आभार,
आरारा तुमचा लेख वाचून मी अजून तिला काजळ घालत नाही त्यामुळे असे होतेय असे बोलतायत साबा साबू. तिचे डोळे नेहमी तिरले दिसत नाही. झोपेतून उठल्यावर किंवा ठराविक हसते किंवा कधीतरी अचानक बघते तेव्हा डावा डोळ्याचं बुबुळ थोडे वर किंवा बाजूला गेल्यासारखे विचित्र दिसते.
आम्ही जिकडे राहतो तिथून ठाण्यात जाणे वेळ आणि आर्थिकदृष्ट्या झेपेल की नाही प्रश्न आहे. इकडे लहान मुलांचे असे स्पेशालिस्ट डोळ्यांचे डॉक्टर नाहीयेत तर मी साध्या डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवून काही फायदा होईल का?
ती फोटो काढू देत नाहीये फ्लॅश पडला डोळ्यात की. तसेच ती जेवायला कुरकुर करायची म्हणून लॅपटॉपवर गाणी लावून अगदी जवळ बसवून भरवायचे मी तिला त्यामुळे असे होऊ शकते का आणि आता हे थांबिवले आहे तर फरक पडू शकतो का सांगा प्लिज.
माहितीपूर्ण आणि ह्युमरपूर्ण
माहितीपूर्ण आणि ह्युमरपूर्ण पोस्ट आरारा.
आता अजून डिट्टेलवार : हे वाचून तुमची पोस्ट आहे असा दाट संशय आला.
कुणा गरीब डोळ्याच्या डॉक्टरला दक्षिणा देण्याचे पुण्य करा. : याने १११% शिक्कामोर्तब केले.
---
संग्राह्य पोस्ट आहे.
आ.रा.रांची पोस्ट मस्त परखड पण
आ.रा.रांची पोस्ट मस्त परखड पण उपयुक्त!
अवांतर..गरीब डोळ्यांचा डॉक्टर कुni पहिलाय का?
असो. धागाकर्तीला त्यांच्या पोस्टचा उपयोग होवो.
आ रा रा यांची पोस्ट अत्यंत
आ रा रा यांची पोस्ट अत्यंत उपयुक्त. विशेषत: बॅटरी मारून करायची टेस्ट.
मलाही बाळाबद्दल हीच शंका होती तेव्हा पिडीट्रिशिअनने हीच टेस्ट करून तिरळेपणा नाही हे सांगितले व ते बरोबर ठरले.
आम्ही जिकडे राहतो तिथून
आम्ही जिकडे राहतो तिथून ठाण्यात जाणे वेळ आणि आर्थिकदृष्ट्या झेपेल की नाही प्रश्न आहे. इकडे लहान मुलांचे असे स्पेशालिस्ट डोळ्यांचे डॉक्टर नाहीयेत तर मी साध्या डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवून काही फायदा होईल का?
>> लहान मुलांच्या डोळ्यांची तपासणी करणं अवघड असतं. त्यासाठी अशी तपासणी करण्याची सवय असणाऱ्या, त्यतलं लेटेस्ट ज्ञान माहीत असणाऱ्या डॉक्टरांना दाखवलेलं कधीही चांगलं. पण ते अगदीच अशक्य असेल तर काहीच न करण्यापेक्षा साध्या डोळ्यांच्या डॉक्टरना दाखवा. काजळाचा आणि तिरळेपणाचा काहीच संबंध नाही. काजळ न लावणेच जास्त चांगले डोळ्यात infection, allergy होऊ नये यासाठी. लॅपटॉप बघितल्याने, जेवणासाठी शॉर्टकट म्हणून स्क्रीन दिल्याने डोळ्यांपेक्षा जास्त बौद्धिक/ मानसिक परिणाम, स्क्रीन ॲडिक्शन होऊ शकते. म्हणून ते टाळायचं. Squint tendency चे कारण स्क्रीन / लॅपटॉप हे नसते.
तिचं लवकर निदान आणि उपचार करून घ्या. विकास होत असणाऱ्या वयात वेळ फार महत्वाची असते. एकदा ती निघून गेली की डोळे तर ऑपरेशन नी(कधीही/ तिच्या लग्नाच्या एक महिना आधीही) सरळ होतील पण दृष्टी कमजोर राहू शकते. हे खूप कळकळीने यासाठी सांगतेय की वीस वर्षाच्या मुलीला पालक 'लग्न जुळत नाही' म्हणून ऑपरेशनला घेऊन येतात. डोळे तर दिसायला छान दिसतात ऑपरेशन नंतर, पण दृष्टी कमजोर झालेली, त्यासाठी या वयात काहीच करता येत नाही. याच पालकांनी त्या मुलाला/मुलीला तिरळेपणा आहे हे समजताच आणलं असतं तर दृष्टी वाचवता आली असती, असं वाईट वाटतं..
सई तुमच्यापण पोस्ट, सल्ला छान
सई तुमच्यापण पोस्ट, सल्ला छान आहेत.
पॅचिंगची घंटा माहिती नसताना
पॅचिंगची घंटा माहिती नसताना "पॅच लावा" हा सल्ला कृपया देऊ नये, असे सविनय सांगू इच्छितो. अर्धवट "वैद्यकीय" सल्ला कधीच देऊ नका ही विनंती.>> अर्धवट माहितीवर टीका करू नये हि विनंती.
३M चा patch मिळतो तो दिवसाला २ तास लावायला सांगतात डॉक. मुलाला सांगितले होते, बराच फरक पडला त्यामुळे. >> कळले नसेल तर विचारायचे होते, यात सरळ सरळ लिहिले आहे डॉक च्या सांगण्यावरून तो पॅच लावत असू.
सई तुमच्यापण पोस्ट, सल्ला छान
सई तुमच्यापण पोस्ट, सल्ला छान आहेत.>>> +१.
नरेन तुमचा मुलगा किती वर्षाचा
नरेन तुमचा मुलगा किती वर्षाचा होता जेव्हा ट्रीटमेंट चालू केली, किती वेळ लागला ठीक व्हायला, खर्च किती आला , तो कसा आहे सांगाल प्लिज
इकडे नाही तर विपु केली तरी चालेल
माझी मुलगी असल्याने जास्त काळजी वाटतेय
समीक्षा, विपू केली आहे.
समीक्षा, विपू केली आहे.
आ.रा.रा. परफेक्ट पोस्टस
आ.रा.रा. परफेक्ट पोस्टस सगळ्या. आणि स.पा. तुमच्या पण. व्यवस्थित माहिती मिळाली धन्यवाद डॉ.!!
माझ्या बहिणीच्या मुलाला हे असचं झालयंं.त्याची पण अश्याच स्टेजेस ने ट्रिटमेंट चालू आहे.. सद्ध्या पँचिंग + exercise चालू आहे.. ६ आठवड्याने आता चेकिंग आहे परत. चष्मा दिलाय तो लावून पण घेतो आणि. लहान असताना च लवकर उपचार करणे योग्य. तो आता २ वर्षाचा आहे.
बाळाला घेउन जाणे अवघड
बाळाला घेउन जाणे अवघड असल्यास गुगल प्ले स्टोअर वरून प्राक्टो अॅप डाउनलोड करा व स्पेशालिस्ट शी व्हिडिओ चॅट करू शकता.
पण हे एकटीने करू नका घरातील अजून को णी मेंबर बरोबर असूद्या. २५० रु साधारण फी असते एका कन्सल्ट ची.
अमाजींनी भारी अॅप सांगितलं
अमाजींनी भारी अॅप सांगितलं आज. बरंय.. कोरोना काळात डॉक्टर कडे जाण्यापेक्षा हे अॅप वापरून कंसल्ट करु शकतो आपण.
गेल्या आठवड्यात डॉ मिहिर
गेल्या आठवड्यात डॉ मिहिर कोठारीला दाखवुन आले, त्यांनी गर्भात असताना सहाव्या आठवड्यात जे डोक्यात सर्किट बनते ते कमकुवत बनली आहे म्हणुन ऑपरेशन करावे लागेल. सध्या त्यांनी काही दिवस थांबुन निर्णय घ्यायला सांगीतले आहे. पण मला ते डॉक्टर खुप रुक्ष वाटले, काय करु दुसर्या कुठल्या डोक्टर माहित असतील तर सांगा. ते डॉक्टर असेही बोल्ले की ऑपरेशन फेल होवु शकते किमान १५% लोकांचे तसे होते, काय करावे कळत नाही, ह्या ऑपरेशन ने काही साईड ईफेक्ट होवु शकतो का, हिची दॄश्टी सध्या उत्तम आहे असेही बोल्ले ते.
Pages