लहान मुलांचा तिरळेपणा कमी।करायचे उपाय

Submitted by समीक्षा राव on 9 August, 2021 - 15:08

माझ्या नऊ महिन्याच्या मुलीच्या डोळ्यात तिरळेपणा दिसू लागलाय, ती कसा ठीक होऊ शकतो , खूप लहान आहे तर काही घरगुती उपाय होऊ शकतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनात शंका असेल तर सर्जरीआधी सेकंड ओपिनियन जरूर घ्या ~~ +111
हल्ली बरे चसे डॉ पेशंट ला दोन्ही बाजूंची (success rate, संभाव्य धोका, इतर स्टँटिस्टीक ई.) माहिती देऊन ठेवतात..त्याची जास्त काळजी करू नका . पण मनापासून समाधान वाटले नसेल तर नक्कीच अजून विशेषतज्ञांनाचा सल्ला नक्की घ्या. योग्य ट्रिटमेंट ने पटकन नीट होईल..

डॉक्टर मिहीर कोठारीकडे ऑपेशन करू पुढच्या दोन महिन्यात त्यासाठी पैश्याची जुळवाजुळव करतोय.

सई पारिजात आणि आरारा प्लिज सांगा याचे काही भविष्यात साईड इफेक्ट किंवा तिच्या वाढीला काही त्रास तर होत नाही ना

डॉक्टर मिहीर कोठारीकडे ऑपेशन करू पुढच्या दोन महिन्यात त्यासाठी पैश्याची जुळवाजुळव करतोय.

<<

तुम्ही सांगितलेली हिस्ट्री अन वर आणि बाजूला फिरतोय म्हटल्यावर duane's retraction syndrome किंवा तत्सम प्रकार वाटतो आहे.

हे इमर्जन्सि ऑपरेशन नाही. महिना दोन महिने उशीर झाला म्हणून आभाळ कोसळणार नाही.

प्रायमरी गेझमधे म्हणजे समोर पाहताना नजर योग्य काम करते, अम्ब्लायोपिया/लेझि आय्/नजरेचा कमकुवत पणा सहसा नसतो. गर्भाशयात तयार होणारे सर्किट सांगितले म्हणजे मी विचार करतोय तसा प्रकार असणार आहे. ऑफकोर्स, न तपासता ऑनलाईन डायग्नोसिस करणे मूर्खपणाचे आहे, त्यामुळे त्याविषयि जास्त लिहित नाही.

पैश्याची जुळवाजुळव हा प्रॉब्लेम असतोच. हैद्राबादची एल.व्हीपीईआय, किंवा चेन्नै चे शन्कर नेत्रालय व तत्सम ठिकाणी चॅरिटेबल्/जनरल ऑप्शन आहे. अतीशय उत्तम उपचार होतात, चॅरिटेबल आहे म्हणून वाईट असे नाही.

डॉ. मिहीर कोठारी हे या विषयातले तज्ज्ञ आहेत. रिझल्ट्सही उत्तम आहेत. त्यांच्याकडे करणार असलात तर उत्तमच आहे.

***

बरेच दिवस हा धागा दिसला नाही म्हणून प्रतिसादास उशीर झाला. क्शमस्व.

ता.क.

"पॅचिंग" नामक प्रकाराचा व या प्रकारच्या तिरळेपणाचा काडीचाही संबंध नाही. 'घरगुती' इलाज म्हणून करून पाहू नका.

सर्जरीमुळे वाढीला काही त्रास होणार नाही. सर्जरीचे काही संभाव्य साइड इफेक्ट (Possible complications) असू शकतात ते तुम्हाला सांगितले असतील. पण जेंव्हा सर्जरी न करण्याचे परिणाम जास्त गंभीर असतात तेंव्हा या संभाव्य पण कमी गंभीर साईड इफेक्ट चा धोका पत्करणं योग्य आहे. तुमचं जर समाधान झालं नसेल तर तुम्ही सेकंड ओपिनियन जरूर घ्या. पण ते ओपिनियन दुसर्या लहान मुलांच्या डोळ्याच्या तज्ञ डॉक्टरकडूनच घ्या.

डॉ. मिहीर कोठारी हे या विषयातले तज्ज्ञ आहेत. रिझल्ट्सही उत्तम आहेत. त्यांच्याकडे करणार असलात तर उत्तमच आहे.
>> +1

पैश्यांअभावी अजुन जमले नाही ऑपरेशनचे पण आता करु बोनस आलाय त्यात. पण सारखे ते ठाणे जमणार नाही प्लिज मला कुणी पुण्यातले चांगले डॉक्टर सुचवा

माझ्या एका ENT doctor मैत्रिणीने Dr Sanjay shah औंध यांचे नाव सुचवले आहे .मला वैयक्तिक काही अनुभव नाही त्यांचा .

डॉ. जुई केळकर, आणि डाॅ. आदित्य केळकर - एन. आय ओ.
यांचे नाव एका मैत्रिणीकडून पण ऐकून आहे.
औंध येथील Breman चौकात NIO ची दुसरी शाखा आहे. ते सोईस्कर आहे तर बघा.
Dr. Aditya won a very prestigious award in ophthalmology.

धन्यवाद !

एन आय ओ मधिल डॉ केळकर लहान मुलांचे ऑपरेशन करतात का, हि अजुन फक्त एक वर्षाची होईल

डॉ आदित्य केळकरांचा contact no मिळेल का?

गुगलवर खुप शोधुन मिळत नाहीये, जे सापडताहेत ते बंद आहेत.

तसेच गुगलवर कोणी आदित्य केळकर आत्महत्या येतेय ते हेच तर नाहीत ना?

प्लिज कोणीतरी त्यांचा नंबर / पत्ता / अनुभव सांगा.

तसेच पुण्यातील दुसरे एखादे तज्ञ डॉक्टर सुचवा प्लिज

संजय शाह, औंध यांचा अनुभव चांगला नाही आमचा. रेग्युलर पेशंट असून, नियमीत चेकप करुनही एक सुधारणा न होऊ शकणारी, वाढत जाणारी कंडीशन त्यांनी सांगितलीच नाही जवळच्या नातेवाइकांना. उपचार नव्हतेच पण कल्पना दिली असती तर किमान डोळ्यावर ताण येणार्या गोष्टी टाळता आल्या असत्या. शिवाय पेशंटची मानसिक तयारी करून घेता आली असती. डोळ्यासारख्या महत्वाच्या अवयवाच्या बाबतीत फार कॅजुअल अप्रोच दाखवला त्यांनी.

डॉक्टर आदित्य केळकर साठी NIO Pune असा सर्च करा Google वर.

NATIONAL INSTITUTE OF OPHTHALMOLOGY
SHIVAJINAGAR BRANCH
Address:1187/30, Off Ghole Road, Near Mahatma Phule Museum, Shivaji Nagar, Pune, Maharashtra 411005
Tel No.:020 4901 4901 / 020 41460100

AUNDH BRANCH
Address : 376 Sindh Society, Bremen Square, Ganeshkhind Road, Aundh, Pune, Maharashtra 411007
Tel. No : 8600005522 / 020 49014901
Email: nioaundh@nioeyes.com
Website: www.nioeyes.com

थँक्स

Squint साठी डॉ जाई केळकर आणि डॉ अर्चना निंबाळकर पैकी कोण जास्त चांगले कोणी पुणेकर सांगु शकता का?
मि दोघींची अपॉईंट्मेंट घेतली आहे पण कोणाकडे उपचार घ्यावेत कळत नाहीये. चेकपसाठी डोळ्यात एक औषध टाकतात ते टाळण्यासाठी एकीकडेच जायचे आहे.

समीक्षा,pl.ghabaru नका.कोणत्याही डॉक्टरकडे गेलात तरी डोळ्यात ड्रॉप्स घातले जाणारच.
जास्त वेळ न काढता निर्णय घ्या.

डॉ अर्चना निंबाळकरना दाखवून आले काल त्यानंतर कन्फ्युझन जास्त वाढलंय. त्यांच्यामते तिरळेपणा सध्या कमी आहे आणि अश्या प्रकारच्या तिरळेपणात लेझी आय चे चान्सेस कमी असतात व operation सुद्धा मूल 4 वर्षाचे होई पर्यंत करत नाहीत कारण त्यात सक्सेस रेट कमी असतो.
डॉ मिहीर कोठारीची फाईल दाखवली ज्यात त्यांनी लगेच operation सांगितले आहे तरी त्यांचे म्हणणे आहे की सहा महिन्यानंतर परत दाखवा मग बघू, घाई करायची गरज नाही वाटल्यास सेकंड ओपिनियन घ्या दुसरीकडे.

मलाही वाटतेय की डॉ जाई केळकरला दाखवावे, पण चेकपसाठी जे ड्रॉप्स डोळ्यात घालतात त्याने तिला खूप त्रास होतो, शिवाय दोन चेकपमध्ये किती गॅप असावा माहिती नाही. इतरांनीही प्लिज सुचवा

डॉ आरारा, डॉ सई पारिजात प्लिज मदत करा निर्णय घ्यायला.

समीक्षा, मुलगी समोर बघत असताना सुद्धा तिरळेपण दिसतो की फक्त एका बाजूला डोळे फिरवले तरच दिसतो? ती लक्ष देऊन बघताना मान तिरकी करून बघते का?
डॉ. मिहिर यांनी सांगितलं होतं की तिच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी चांगली आहे. आणि डॉ. अर्चना नी सांगितलं की लेझी आय होण्याची शक्यता कमी आहे तर तुम्ही सहा महिन्यांनी फॉलो अप करा. जर लेझी आयची सुरुवात होतेय असं वाटलं तर तेंव्हा सर्जरीचा निर्णय घ्या. या वयात लेझी आय लगेच दुरुस्त होऊ शकतो.

सई पारिजात खुप खुप धन्यवाद, सॉरी, नाही लिहु शकली ईकडे लगेच

मुलगी सरळ बघताना पण तिरळे बघते. सकाळी उठल्यावर किंवा जेव्हा जास्त खात पित नाही तेव्हा तिरळेपणा जास्त जाणवतो, नाहीतर बरेचदा जाणवत पण नाही. तरी माझ्या मुलीला मला वे़ळीच बरे व्हावे असे वाटतेय.

<<< मलाही वाटतेय की डॉ जाई केळकरला दाखवावे, पण चेकपसाठी जे ड्रॉप्स डोळ्यात घालतात त्याने तिला खूप त्रास होतो, शिवाय दोन चेकपमध्ये किती गॅप असावा माहिती नाही. <<< याबद्दलपण सांगा प्लिज

Pages