पुण्यात फ्लॅट घ्यावा का नाशिकमधेच थांबावे ?

Submitted by रेव्यु on 31 July, 2021 - 04:38

गेल्या 14 वर्षांपासून आम्ही नाशिक मध्ये स्थायिक झालो. येथे प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट आहे. सुंदर सूर्यप्रकाश आणि वारा आहे. सर्व खोल्यांसमोर प्रचंड मोठी बाग, जुनी झाडे, हिरवळ आहे आणि प्रसन्न सकाळ आमचे स्वागत करते. जेव्हा हा फ्लॅट विकत घेतला तेव्हा मी नोकरीत होतो आणि धाकटी कन्या इथेच नोकरीस होती. आम्ही मूळचे बेळगावचे त्यामुळे तिथे स्थायिक होणे स्वाभाविक असते परंतु धाकटी कन्या लग्नानंतर असेल तिथे जाऊन येऊन करायचा विचार होता. परंतु थोरल्या कन्येप्रमाणेच ती देखील विवाहानंतर अमेरिकेत गेली. आता आम्ही 70 व 68 वर्षांचे आहोत . प्रकृती चांगल्या आहेत. नाशकात सांस्कृतिक बाबतीत आम्ही बरेच सक्रिय व सुखात आहोत. येथील अत्यंत निष्णात डॉक्टर्स सदा मदतीला आहेत आणि मुख्य म्हणजे ते अगदी त्याच दिवशी नुसत्या एसएमएस वर उपलब्ध असतात. या झाल्या जमेच्या बाजू.
परंतु इथे आम्हाला कठीण प्रसंगात मदत करतील किंवा आजारपणात आधार काय आहे याचा भरवसा नाही. तसे परगाव आहे असे आम्हाला वाटते. आमचे बरेच नातेवाईक पुण्यात आहेत, मुलीचे सासर तिथेच आहे, माझे मेव्हणे सुध्दा तिथे आहेत म्ह्णून मुली आग्रह करत आहेत की आम्ही तिथे नविन फ्लॅट घेऊन सेटल व्हावे.
आम्हाला भिती वाटते तिथल्या वाहतूकीची, मी इथे अजूनही कारमध्ये आरामात हिंडतो. सर्व अंतरे 20 मिनिटांच्या अंतरात आहेत. दुसरे असे की खरोखरच पुण्यात नातेवाईक मदत करू शकतील का? त्या पेक्षा येथेच सामाजिक आधार व्यवस्था विकसित करावी का? अत्यंत संभ्रमात आहोत.
दुसरे म्हणजे पुण्यात फ्लॅटच्या शोधात संलग्न बाबी म्हणजे कायदेशीर रीत्या आपल्या नावावर होईल का, मी व ही सहजपणे हिंडू शकू का?
काही उमजत नाहीये.... चर्चा करता येईल का.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेव्यु,
आपला दोघांचा नाशिक रहिवास व्यवस्थित आणि सुखकारक होईल आणि होवो. >>+१

+१.
आपले नाशिकमधले वास्तव्य सुख, स्वास्थ्य आणि आनंददायी ठरो.

+१.
आपले नाशिकमधले वास्तव्य सुख, स्वास्थ्य आणि आनंददायी ठरो.
असेच घडो.

रेव्यु, एक निर्णय झाला की बरे वाटते, द्विधा मनःस्थिती वाईट.
तुम्हाला स्वस्थ, आनंददायी वास्तव्यास शुभेच्छा.

रेव्यु,
एका चांगल्या निर्णयाबाबत अभिनंदन!
करोना काळात तसेच एकूणच 65 पार केल्यानंतर मनुष्याला डिप्रेशन अधून मधून येते.तो भर ओसरला की आपल्या घराचीही आपल्याला सोबत असते.बेस्ट लक.

+१

good decision!
wish u happy times ahead

रेव्यु, एक निर्णय झाला की बरे वाटते, द्विधा मनःस्थिती वाईट.
तुम्हाला स्वस्थ, आनंददायी वास्तव्यास शुभेच्छा.>>+१

रेव्यु, किती छान proactively विचार करून तुम्ही निर्णय घेतला आहे! नाशिक मस्तच आहे. तुम्हाला तिथल्या पुढच्या वास्तव्यासाठी शुभेच्छा!

म्हातारपण हे दुसरं बालपण असतं असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्यात थोड्याबहुत परावलंबित्वाच्या जोडीला निरपेक्ष प्रेमही आध्यारूत असावे असे मला वाटते. म्हणजे गरज भासल्सास पगारी मदतनीस असणे उत्तमच आहे पण जोडीला प्रेमाने, आपुलकीने चौकशी करणारे कोणीतरी आपले माणूस देखील असावे. ती व्यक्ती सख्खी रक्ताची नातेवाईकच असली पाहिजे असे नाही. कासव सिनेमामध्ये आजच्या काळातल्या कुटुंबाची फार छान व्याख्या केली आहे. आपण अशा extended कुटुंबाचा भाग असलो तरी खूप मदत होऊ शकते.

सगळ्यांचेच प्रतिसाद माहितीपुर्ण आहेत.
तुमच्या आरोग्यदायी आणि आनंददायी पुढील वास्तव्यास शुभेच्छा सर!!

निर्णय झाला हे फार छान झालं आता जरा निश्चींतही वाटत असेल विचारचक्राने उगीचच दमायला होतं.....
शुभेच्छा! तब्येतीची काळजी घ्या.

उत्तम निर्णय.
कोणावर अवलंबून रहाणे कठिणच आहे, कारण प्रत्येकाचे व्याप असतात जसे आधीच म्हटल्याप्रंमाणे.

तुम्हाला शुभेच्छा!

आपल्याला उदंड आणि निरामय आयुष्य लाभो. नाशिकातील आपले वास्तव्य आनंदी व स्वस्थ जावो. सर्व काही नीट होइल.

निर्णय इथे व्यक्त केलात हे बरे केलेत. अन्यथा या सर्व चर्चेचा शेवट अधांतरी राहिला असता. ( बरेच धागाकर्ते सल्ला मागतात पण त्यांनी त्या सल्ल्यांचा काय उपयोग केला हे मात्र इथे सांगत नाहीत )
पुणे खरेच उतारवयात मुद्दाम येऊन रहावे असे आता राहिले नाही. खूप गदारोळ गर्दी आणि वसवस आहे इथे.
आता नाशिकमध्ये support system develop कशी करणार आहात यावर लिहा Happy
सध्या सुपात असणाऱ्या माझ्यासारख्यांना मार्गदर्शन होईल.
शुभेच्छा. ...

तुम्ही खूपच चांगला निर्णय पूर्ण विचारांती घेतलात आणि तो माझ्या विचारांशी जुळला (जे मी वर लिहिले आहे) याचा आनंद झाला. शेवटी great minds think alike हेच खरं. तुमच्या नाशिक वास्तव्यासाठी आणि निरामय आरोग्यपूर्ण उत्तरार्धासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. मला पण पुणे सोडून रहायचे असेल तर नाशिकच डोळ्यासमोर आहे. बाकी दोन म्हणजे भोपाळ (अप्रतिम शहर, पण आमचे कोणी नाही, पण उगाचच. प्रेमात पडावे असे शहर आहे ते. ) आणि आमची वाई, (आमचीच, कधिही जा, हक्काने रहा, स्वागत आहे. ). Happy

रेव्यु, किती छान proactively विचार करून तुम्ही निर्णय घेतला आहे! नाशिक मस्तच आहे. तुम्हाला तिथल्या पुढच्या वास्तव्यासाठी शुभेच्छा!>>> छान निर्णय! आपल नाशिक भारिच आहे हो.

Pages