पुण्यात फ्लॅट घ्यावा का नाशिकमधेच थांबावे ?

Submitted by रेव्यु on 31 July, 2021 - 04:38

गेल्या 14 वर्षांपासून आम्ही नाशिक मध्ये स्थायिक झालो. येथे प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट आहे. सुंदर सूर्यप्रकाश आणि वारा आहे. सर्व खोल्यांसमोर प्रचंड मोठी बाग, जुनी झाडे, हिरवळ आहे आणि प्रसन्न सकाळ आमचे स्वागत करते. जेव्हा हा फ्लॅट विकत घेतला तेव्हा मी नोकरीत होतो आणि धाकटी कन्या इथेच नोकरीस होती. आम्ही मूळचे बेळगावचे त्यामुळे तिथे स्थायिक होणे स्वाभाविक असते परंतु धाकटी कन्या लग्नानंतर असेल तिथे जाऊन येऊन करायचा विचार होता. परंतु थोरल्या कन्येप्रमाणेच ती देखील विवाहानंतर अमेरिकेत गेली. आता आम्ही 70 व 68 वर्षांचे आहोत . प्रकृती चांगल्या आहेत. नाशकात सांस्कृतिक बाबतीत आम्ही बरेच सक्रिय व सुखात आहोत. येथील अत्यंत निष्णात डॉक्टर्स सदा मदतीला आहेत आणि मुख्य म्हणजे ते अगदी त्याच दिवशी नुसत्या एसएमएस वर उपलब्ध असतात. या झाल्या जमेच्या बाजू.
परंतु इथे आम्हाला कठीण प्रसंगात मदत करतील किंवा आजारपणात आधार काय आहे याचा भरवसा नाही. तसे परगाव आहे असे आम्हाला वाटते. आमचे बरेच नातेवाईक पुण्यात आहेत, मुलीचे सासर तिथेच आहे, माझे मेव्हणे सुध्दा तिथे आहेत म्ह्णून मुली आग्रह करत आहेत की आम्ही तिथे नविन फ्लॅट घेऊन सेटल व्हावे.
आम्हाला भिती वाटते तिथल्या वाहतूकीची, मी इथे अजूनही कारमध्ये आरामात हिंडतो. सर्व अंतरे 20 मिनिटांच्या अंतरात आहेत. दुसरे असे की खरोखरच पुण्यात नातेवाईक मदत करू शकतील का? त्या पेक्षा येथेच सामाजिक आधार व्यवस्था विकसित करावी का? अत्यंत संभ्रमात आहोत.
दुसरे म्हणजे पुण्यात फ्लॅटच्या शोधात संलग्न बाबी म्हणजे कायदेशीर रीत्या आपल्या नावावर होईल का, मी व ही सहजपणे हिंडू शकू का?
काही उमजत नाहीये.... चर्चा करता येईल का.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतेय. चान्गली चर्चा होतेय.

मेडिकल मदत हा कळीचा मुद्दा आहे. मी सध्या ज्या गावात आहे तिथे गम्भिर आजारासाठी कमीत कमी॑ १०० किमी दुर शहरात जावे लागते. अचानक काय झाले तर ..... ही टान्गती तल्वार आहे. अर्थात गावात बाकीचे राहतातच की.. आपण राहायचे तसेच हा विचार सर्व चान्गले असताना बरा वाटतो. पण प्रसन्ग आला तर काय हा प्रश्न द्डोक्यात येतोच.

अमितव यांचा विचार अगदीच पटला आहे. बरेचसे सल्ले थोडे काळजी / नको असे वाटले. कदाचित करोनामुळे असतील कारण आजकाल बरीच गणितं नव्याने मांडुन बघायला लागत आहेत. माझ्या सासुसासर्यांचे अनुभव. त्यांनी पुण्यातल्या पुण्यात दोनदा राहती घरे बदलली. परंतु त्यांना चांगले अनुभव आले. बावधनचे घर लांब होते पण तिथेही समवयस्क आणि समविचारी लोक त्यांना भेटली. आत्ताच्या कोथरूडच्या घरी सुद्धा त्यांचा छान ग्रुप झाला आहे. त्यामुळे मला असं वाटतं कि तुम्हाला आणि तुमच्या सौना काय आवडेल, झेपेल ह्याचा विचार करून निर्णय घ्या. हळुहळु सवय होते. होईल. सर्व सुविधा असलेल्या संकुलात रिसेलचा फ्लॅट मिळाल्यास बघा. आमची बिल्डिंग 10 वर्ष जुनी होती पण आम्हाला सोसायटीच्या कोणत्याही कामामध्ये काहीही प्रॉब्लेम आला नाही. व्याह्यांच्या जवळपास राहणे किंवा दोन्ही घरे विकुन चांगल्या एरियामध्ये जवळ जवळ 2 स्वतंत्र फ्लॅट घेणे हि शक्यता पण बघा.
सीमंतिनी ह्यांचा विचार पण पटला आहे. कितीही वाटलं तरी 15/20 दिवसांच्या सुट्टीत प्रवास, जेटलॅग आणि 2/3 वेगवेगळ्या शहरात जाणे हे खरंच दमवणारे असते.
अमितव नि मांडलेला दुसरा मुद्दा पण विचारात घ्या. आम्ही ज्यांचा फ्लॅट घेतला ते काका काकू सुद्धा पुण्यातील सगळं आवरून कायमचे अमेरिकेला मुलींकडे गेले. आधी 5 वर्ष तिथे राहुन कितपत आवडतं आहे त्याची तयारी झाल्यावर इकडचं आवरून मोठ्या मुलीजवळ कायमचे राहायला गेले. इतक्यात अश्या 2 केसेस माझ्या बघण्यात आल्या आहेत. 5/6 वर्षांनी असं काही करायचा विचार असेल किंवा शक्यता असेल तर आत्ता नाशिक सोडू नका.
2/4 वर्षांनी नाशिक सोडुन पुण्याला येणारच असाल तर लवकरात लवकर पुण्याला शिफ्ट व्हा. फक्त एरिया बघून फ्लॅट घ्या.
शुभेच्छा !

पुण्यात सध्या करोनामुळे डॉक भेटणे हे कठीण झाले आहे. पण तरी दीनानाथच्या सोयीला आणि डॉक्टरांच्या एक्सपेर्टीजला पर्याय नाही.

मेडिकल मदत हा कळीचा मुद्दा आहे. >> मी तेच लिहायला आले. तुमचे फॅमिली डॉक्टर रोजचे ओळखीचे डॉक्टर ह्यांच्याशी ओळख नाते संबंध डेव्हलप होणे ह्या पेक्षा आपल्याला आवश्यक त्या स्पेशालिस्ट ची उपलब्धता व ट्रीटमेंट ची उपलब्धता असणे हे चेक करा. साध्या डॉक्टर पेक्षा
आपल्य काय क्रॉनिक व अक्युट डिसीजेस च्या गरजा आहेत त्या प्रमाणे जिथे राहायचे तो निर्णय घ्यावा.

मला जिथे महिन्यातून एकदा जावे लागते ते पाउण तासांच्या अंतरावर आहे घाटकोपर मध्ये. प्लस त्यांचा असा नियम आहे कि एकट्याने ट्रिटमेंट घेउ देत नाहीत. सोबत कोनीतरी हवेच. आता ज्यांचे कोणी नाही त्यांनी हा नियम कसा पाळायचा. हा प्रश्न मला नेहमी पडतो. इथे कायम भर्पूरच गर्दी असते व एका पेशंट बरोबर कधी कधी पाच फॅमिली मेंबर असतात तेव्हा खूपच कौतूक वाट्ते. काही पेशंट अगदी बॅगा पिशव्या घेउन बाहेर गावाहून येतात.

डॉक्टर बरोबर पर्सनल रिलेशन शिप चांगली असण्या पेक्षा त्यांचा प्रोफेशनल कंपिटन्स बघूनच सिलेक्ट करावे हे माझे वैयक्तिक मत. कारण हे लोक जितके जास्त प्रोफेशनली बेस्ट असतात तितकेच ते बिझी असतात प्रत्येक पेशंट बरोबर त्यांना नाते साधण्या इतका वेळ नसतो. म्हणून ती अपेक्षा ठेवू नये जसे आपल्या अडी नडीला ते उभे राहिले तसेच इतरांनाही त्यांची गरज असते.

माझ्या पहिल्या सर्जन बरोबर प्रायमरी कन्सल्ट २० मिनिटे, मग एक प्रोसीजर, त्यातही त्यांना सारखे फोन्स येत होते व ते पाच मिनिट मे आताहू दस मिनिट मे आता हू करत होते. व मग स्कॅन बघून त्यांनी मला दुसर्‍यांच्या ताब्यात दिले. त्यांच्या बरोबर प्रथम डिस्क शन अर्धा तास. मग एक महिन्याने एक फॉलो अप मीटिन्ग व आतता सहा महिन्यांनी स्कॅन बघून एक १५ मिनिटे डिस्कशन व चेक अप. इतकेच. पण मला जेव्हा गरज होती तेव्हा हे दोघे उपलब्ध होते हेच मी माझे सुदैव समजते.

पन आजार पन सोडून पाच मिनिट स्मॉल टॉक करतानाही आपल्याला त्यांच्यावरचे वेळाचे प्रेशर जाणावते.

प्रोफेशनल गरजा जसे वकील सीए डॉक्ट र ह्या जिथे सेट झाल्या आहेत त्या बदलून नवे सेटिन्ग करणे ह्या वयात अवघड आहे.

किती टाइम होरायझ न ची अपेक्षा आहे ते ही विचार करून बघा. मला म्हणजे पाच - ते सात वरशे डोक्यावरून पाणी . ह्या हिशेबानेच इतर निर्णय घ्या.

माझे वडील ७५ आई ७० असताना त्यांना हैद्राबादला आमच्या घरी शिफ्ट केले. १९५० साला पासून पुण्यात राहिलेले ते दोघे !! पुणे व सर्व नातेवाईक विद्यार्थि ओळखीचे लोक सोडून जाणे हे त्यांना फार जड गेले . र्‍हुदयद्रावकच प्रसंग होता तो. काही लोक तेवा त्यांना भेटायल आले पण ते तितकेच. जाई परेन्त त्यांच्या कडे एक क्षण ही दुरलक्ष झाले नाही पण मानसिक बाबीत कमी राहिलीच. ती काही मी भरून काढू शकले नाही.

मानसिक समाधानाकडे दुर्लक्ष आजिबात करू नका. मुली नातेवाईक सर्व बाजूला ठेवुन स्वतःचा व मिसेस च्या सुखाचा व आनंदाचा विचार करा.

दुसरे म्हणजे पुण्या मुंबई कडे एकटया राहणार्‍या वयस्कर लोकांचा विश्वास संपादन करून मग त्यांना लुबाडायचे प्रकार मजबूत घडतात. तुमच्या सुरक्षिततेचा विचार जरूर करा.

तिथेही समवयस्क आणि समविचारी लोक त्यांना भेटली. >> +१००

चौदा वर्षे राहूनही सध्या नाशिकमध्ये सामाजिक आधार व्यवस्था का नाही हा विचार खोलवर करणे गरजेचे आहे. उदा: तुम्हाला व सौ ला प्रभात फेरी (मॉर्निंग वॉक) आवडत असेल पण आजू-बाजूला लोक "नातवंडांचं आवरून द्यावं लागतं, आम्हाला नाही बाई असलं मोकळं भटकायला वेळ" अशी असली तर सूर जुळणे अवघड. ह्यात कुणाची चूक नाही पण जीवनशैलीतील फरक महत्त्वाचा आहे. खरंच माणूसकी म्हणा किंवा "ह्यांच्या मुली तिकडे असतात, काकूंना शुगर कमी झाली तर मीच लाडू दिला" अशी लुडबुडीची आवड ह्यामुळे म्हणा अडीअडचणीला लोकं येतील पण दीर्घकाळासाठी सोय लावायची वेळ आली तर चांगली प्रोफेशनल 'पेड हेल्प' तरी उपलब्ध हवी.
एन.आर.आय पालक असणे आणि मुले भारतातच/शहरातच इतरत्र असणे ह्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. "करोनामुळे आम्हीही मुलांना भेटत नाही" असे भारतातील पालक आज म्हणाले तरी करोना वर्षात संपल्यावर ते त्यांच्या त्यांच्या मुला-नातवंडात गुरफटणार. एन.आर.आय पालकांचा ग्रूप नाशिक मध्ये आहे की नाही ते माहिती नाही पण पुण्यात आहे. करोनामुळे सध्या जरा शांतता आहे पण त्यांच्याशी ही बोलून बघा एवढेच सुचवेन.
http://www.nripopune.yolasite.com/

>>>>दुसरे म्हणजे पुण्या मुंबई कडे एकटया राहणार्‍या वयस्कर लोकांचा विश्वास संपादन करून मग त्यांना लुबाडायचे प्रकार मजबूत घडतात.

बाप रे!!

अमितव व आभा यांनी अमेरिकेत जाण्याचा लिहिलेला मुद्दा (अर्थात शक्य असल्यासच) कालच मनात आला होता परंतु मूळ लेखात त्याबद्दल काहीच लिहिलेले दिसले नाही म्हणून लिहिले नाही.
म्हातारपणात (स्वतः करणे होईनासे) झाल्यावर खरे म्हणजे मुलाबाळांसमवेत रहावे शक्य असल्यास असे मावैम. परदेश किंवा भारत कुठे मुले असतील तिथे..त्यासाठी अ‍ॅडजस्टमेंट करावी लागली तरी ती करावी. नवीन शहरात जाऊन राहण्याच्या खटाटोपात कराव्या लागणार्‍या असंख्य तडजोडींपेक्षा त्या कमी असाव्यात. अर्थात मुलांची इच्छा असणे, त्यांचे घर तितके मोठे असणे इ. गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण जर हे जमण्यासारखे असेल तर याचा नक्की विचार करावा. ओळखीत अमे रिकेत कायमचे मुलीकडे किंवा ठाण्या-पुण्याला मुलांसमवेत आनंदाने राहणारी जोडपी माहिती आहेत. आणि हो तुम्ही करत असाल असे मला अजिबात म्हणायचे नाही पण मुलींचे आईबाबा 'मुलगी-जावयाच्या घरी कायमचं कसं रहायला जायचं' असा विचार करत असतात तर तसा करु नये. याचा अगदीच स्वानुभव आहे म्हणून लिहिले.

हे घडतच नाही असा नाहीये पण अतीप्रमाणात निदान पुण्यात ऐकलं नाहीये. पुण्याच्या काही भागात तरी अजूनही माणुसकी खुप शिल्लक आहे. टिंगल करणारे कायप्पा मेसेज सोडून द्या.
आत्ता इतक्यात बिल्डिंग मध्ये अनेकांना कोरोना झाला तेंव्हा त्यांना जेवण देणे, इतर सामान आणून देणे वगैरे काम सोसायटीने वाटुन घेतली होती. मुंबई बद्दल kalpana नाही पण म्हणुन खुप नवीन भागात न जाता वसलेल्या भागात घर बघा (जाणार असाल तर).

या सगळ्यातून धागाकर्त्याना योग्य मार्ग मिळावा.
अजून 1-2 महिन्यांनी सेटल झाल्यावर आपण काय निर्णय घेतला ते नक्की कळवा.

आहे तिथेच सुखाने राहावे असं मला वाटतं. नाशिकची तुम्हाला सवय लागली आहे असं तुमच्या दिलेल्या माहितनुसार जाणवले. जर तुमची पाळे मुळे नाशिक मध्ये घट्ट रुजली असतील तर या वयात तिथून उपटून पुण्यात रुजयाचा प्रयत्न करू नका. पुण्यात रहायला आल्यावर पुणे भयंकर आहे असा अनुभव येईल आणि परतीचे दोर आधीच कापलेले असतील हे जाणवल्या नंतर पश्र्चाताप होईल.

अमेरिकेत वैद्यकीय विमा नसताना एखादे दुखणे उद्भवले तर ते खूप खर्चाचे ठरते. तिथल्या आपल्या मुलांनाही.

स्पष्ट विचारतोय, राग मानू नका.
मुली पुण्याला या म्हणत आहेत याचं काही अंशी कारण त्यांची भारतात आल्यावर दगदग कमी व्हावी, की जेणेकरून पुणे - नाशिक असा वेळ विभाजित न होता एकाच गावात जास्त वेळ रहाता येईल हे ही आहे का याची स्पष्ट/ आडून चाचपणी करता आली तर बघा. त्याला अगदी सोपा इलाज म्हणजे पुण्यात आर्थिक दृष्ट्या शक्य असेल तर जागा घेऊन/ भाड्याने त्या आल्या की रहाणे हा पर्याय ठरू शकतो. वर्षा-दोन वर्षांतून तीन आठवड्यांसाठी होणाऱ्या सोयीसाठी उरलेले २२ आठवडे तडजोड काही बरोबर नाही. परदेशी राहून देशातील लोकांनी काय करावे /करू नये ह्या काळजी पोटी असल्या तरी शेवटी उंटावरून शेळ्या हाकणे आहे.
अमेरिकेत मध्यम/ उच्च वर्गीय स्थलांतरीत भारतीय लोक आरोग्य विम्याशिवाय स्वतः रहात नाहीत आणि ज्येना आले तर त्यांना ही राहू देत नाहीत हे सभोवताली पहाणीतून जाणवले. वैयक्तिक अनुभव अर्थात निराळा असू शकतो.
अधिक आणि उणे मुद्दे काढले असले आणि उणे मुद्दे माहीत असले की पुण्यात गेल्यावर पुणे भयानक आहे असे वाटू नये. बाकी आनंद मानण्यावर असतो. परतीचे दोर न कापता ट्राय करू शकता.
व्याही, मेहुणे, इतर नातेवाईकांशी संबंध उत्तम असतील तर अवश्य जा. अडीअडचणींना पगारी नोकर पुण्यात काय आणि नाशिक मध्ये काय लागणारच आहेत. पुण्यात नातेवाईकांचा आधार असेल तर तो नक्कीच सुखावह असेल. त्यांच्या अडचणींना तुम्ही ही उपयोगी पडू शकाल. काठावरून अंदाज घेऊन पाण्यात उतरलात की काही आधी न समजलेले धोके दिसतील. पण पैलातिरापर्यतच्या मुक्कमांची तोंडओळख असेल.

तुमचे वय ७० आणि पत्नीचे ६८ आहे, सध्या तब्येती चांगल्या आहेत तर पुढील २० वर्षांचे प्लॅनिंग करत आहात असे समजून निर्णय प्रक्रिया असावी.
पर्याय १ - नाशिकमधे गरज पडल्यास कुणी नातेवाईक नाही ही बाब सोडता तुम्ही समाधानी आहात असे दिसते तेव्हा तिथेच आधाराचे जाळे विणायचा प्रयत्न करणे. सध्या हिंडते फिरते आहात, मदतीची फारशी गरज नाहिये तरी मदतनीस शोधा. आत्ता निकड नसताना शोध घेतलात तर अजमावून बघत मनासारखे विश्वासू मदतनीस निवडणे सोपे जाईल. त्याशिवाय विश्वासू मदतनीसाशी मालक-नोकर या पलिकडे नाते जाण्यासाठी जो वेळ आवश्यक असतो तो मिळेल.
माझ्या आईबाबांच्या बाबतीत १०-१२ वर्षांपूर्वी त्यांना मदतनीसाची गरज नसताना मी मदतनीसाचा आग्रह धरला. गावात आस्थेने आपणहून विचारपूस करणारे नातेवाईक होते तरी हे केले. आता इतक्या वर्षांंत विश्वासू मदतनीस आणि त्यांच्या कुटुंबीयांशी प्रेमाचे नाते जुळले आहे. आमच्या नातेवाईकांशीही त्यांची छान ओळख झालेय. करोना काळात नातेवाईक आपापल्या घरात अडकून पडलेले असताना मदतनीस बाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी आईबाबांची सर्वतोपरी काळजी घेतली, घेत आहेत. काही वर्षांपूर्वी आईबाबांसाठी आम्ही वृद्धाश्रमाच्या पर्यायाचा विचार केला होता, मात्र समाधानकारक पर्याय मिळाला नाही. त्यावेळी सोसायटीचे सेक्रेटरी व इतर सदस्यांनीही त्याला बराच विरोध केला होता. आम्ही सर्व मिळून लक्ष देवू, गरज पडल्यास नर्स वगैरे ठेवता येइल मात्र इथून हलवू नका असे सांगितले होते. त्यांनीही या काळात म्हटल्याप्रमाणे सर्वप्रकारची मदत केली आणि मला फोनवरुन धीर दिला.
पर्याय २ - मुलीच्या आग्रहानुसार पुण्याला रहायला जाणे. यात तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोलून बघा. उद्या गरज पडल्यास त्यांच्याकडून कितपत मदत मिळेल याचा तुम्हाला अंदाज येइल. कुणाकडून काय मदत मिळू शकेल हे बघून त्यानुसार पुण्याला शिफ्ट होणे, तिथे कुठल्या भागात जागा घेणे योग्य , तिथे उपलब्ध आरोग्य सेवा वगैरे विचार करुन निर्णय घेता येइल. नाशिक मधे तुम्ही सध्या कार चालवता तरी अजून किती काळ चालवू शकाल याचा विचार करा. पुण्यात स्वतः कार चालवणे शक्य नाही तरी गरजेनुसार इतर सोय करु शकाल. सुरुवातीला भाड्याने फ्लॅट घेवून राहून बघा. आवडले तर कायम रहायचा निर्णय घेता येइल.
माझे आईबाबा ९५ साली कायमच्या वास्तव्यासाठी पुण्याला शिफ्ट झाले होते. पुण्यात नातेवाईक होते, पुण्यात रहायला आवडत होते मात्र कॉलेज-होस्टेलची ४ वर्षं सोडल्यास आईचे सर्व आयुष्य पश्चिम किनारपट्टीवर गेलेले, त्यामुळे आईला हवामान फारसे मानवले नाही. नातेवाईकांच्या सल्ल्याने ९९ साली ठाण्याला शिफ्ट करायचे असे ठरले. बाबा ६८ व्या वर्षी ठाण्यात नव्याने कसे रुळतील अशी मला काळजी होती आणि आर्थिक गणिताचाही प्रश्न होताच. ठाण्यात नव्या जागेचे आर्थिक गणित माझ्या नवर्‍याने माझ्या नावावर फ्लॅट घेवून सोडवले. सर्व काही चालत जायच्या अंतरावर आहे असा रिसेलचा छोटा फ्लॅट आईबाबांनी पसंत केला. सोसायटीतल्या सर्वांशी हळूहळू जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. गेली २२ वर्षं ते तिथे रहात आहेत.
पर्याय ३ - अमेरीकेत मुलीकडे कायम वास्तव्यासाठी. मुलगी अमेरीकन सिटीझन असल्यास हे शक्य व्हावे. पेपर्स फाईल केल्यावर एक ते दीड वर्ष लागेल (?). ग्रीनकार्ड मिळवून स्थलांतर केल्यावर हेल्थ इंशुरन्स बाबत आता अ‍ॅफोर्डेबल केअर अ‍ॅक्ट मुळे प्रश्न उद्भवू नये. ५ वर्षांचा वेटिंग पिरिएड संपला की मेडीकेअर्/मेडीकेड कव्हरेज मिळेल. मात्र अमेरीकेत कायम वास्तव्यास आल्यावर पुन्हा नव्याने रुजणे करावे लागेल. मुलगी रहाते तिथे पब्लिक ट्रान्सपोर्टची सोय नसल्यास स्वतंत्र वावरावर मर्यादा येवू शकते. सिनियर सिटीझनसाठी काही ठिकाणी वेगळी मर्यादित स्वरुपाची ट्रान्सपोर्टची सोय असते. तसे असेल तर बरेच सुसह्य होते. घरातील मेंबर कामानिमित्त बाहेर, त्यांच्या डिमांडिंग करीअर्स- मोजक्या रजा वगैरे कारणास्तव एकटेपणा वाटू शकतो. शेवटी पाहूणे म्हणून ४-६ महिने येणे आणि कायमसाठी कुटुंबाचा भाग असणे यात फरक येतो. पुढे वयोमानानुसार असिस्टेड लिविंगची गरज पडल्यास तिथल्या एकंदरीत वातावरणात परके वाटल्यानेही उदास वाटू शकते.

तुम्हाला योग्य पर्याय मिळो

काठावरून अंदाज घेऊन पाण्यात उतरलात की काही आधी न समजलेले धोके दिसतील. पण पैलातिरापर्यतच्या मुक्कमांची तोंडओळख असेल. > +१

पुण्यात राहण्याबद्दल तुम्ही जे प्रश्न लिहीले आहेत त्यातील बहुतांश गोष्टी १-२ वर्षे भाड्याने राहून नक्की समजतील. नातेवाईकांपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर राहणे शक्य असल्यास तसे करून पाहा. एक दोन वर्षात अंदाज येइल. आत्ता माहीत नसलेले इतर फायदे तोटेही समजतील.

. वर्षा-दोन वर्षांतून तीन आठवड्यांसाठी होणाऱ्या सोयीसाठी उरलेले २२ आठवडे तडजोड काही बरोबर नाही.>> अनुमोदन. माझ्या शाळेच्या गृप वर अशी माहिती मिळाली की पुण्यात लोकांनी अमेरिकेत राहणारी मुले मुली येतील म्हणून तीन चार बेडरूमचे मोठे फ्लॅट घेउन ठेवले आहेत. पण एकतर हे लोक दोन ते तीन आठवडेच येतात व त्यांना त्या घरा बद्दल फारसे काही वाट्त नाही. पडून आहेत असे फ्लॅट.

अमेरिकेत शिफ्ट होणे ही मला अवघडच वाट्ते. तिथले हेल्थ इन्सुअरन्स हॉरर कथा, कदान्न व जनरली व्हायोलंट जीवन बघता ह्या वयात आवश्यक ती मनःशांती तिथे मिळणे अवघड वाट्ते. कधी तरी एकदा जीवनात पालकत्व सोडून वानप्रस्थ आश्रम घ्यावा हे धाडस करावे लागते.
अ‍ॅडल्ट मुलांच्या जीवनात परत प्रवेश करून त्यांच्या कलाने जगणे हे तर मला जाम अडकल्या सारखे वाट्ते. त्या पेक्षा आपल्याला परव्डेल तसे पण आपल्या मर्जीनेच राहावे . तिशी पस्तिशीच्या पुढच्या मुलांकडे जाउन राहणे अवघड. त्यात त्यांना पुरण पोळी भरली वांगी करून घालणे ह्यात समधान शोधणे कठीण. नातवंडे तर भारतीय दिसणा री पण आतून पूर्ण पणे परदेशी बनाव्टीची असतात. त्यांच्या लाइफ मध्ये आपल्याला काय किंमत असणार आहे? ह्या प्रश्ना चे उत्तर शोधा वे.

आता तर आपला पसारा आपण असतानाच शक्य तितका आवरून ठेवावा व डिस्पोज ऑफ करावा अशी ट्रेंड आहे. आपल्या माघारी मुलांना आपले सामान डिस्पोज ऑफ करायचा फार स्ट्रेस येतो. भावनिक आयटम सोडून व प्रॉपर्टी हस्तां तरण करून बाकी सर्व गंगार्पण आधीच करावे.

. वर्षा-दोन वर्षांतून तीन आठवड्यांसाठी होणाऱ्या सोयीसाठी उरलेले २२ आठवडे तडजोड काही बरोबर नाही.>> अनुमोदन. माझ्या शाळेच्या गृप वर अशी माहिती मिळाली की पुण्यात लोकांनी अमेरिकेत राहणारी मुले मुली येतील म्हणून तीन चार बेडरूमचे मोठे फ्लॅट घेउन ठेवले आहेत. पण एकतर हे लोक दोन ते तीन आठवडेच येतात व त्यांना त्या घरा बद्दल फारसे काही वाट्त नाही. पडून आहेत असे फ्लॅट.

अमेरिकेत शिफ्ट होणे ही मला अवघडच वाट्ते. तिथले हेल्थ इन्सुअरन्स हॉरर कथा, कदान्न व जनरली व्हायोलंट जीवन बघता ह्या वयात आवश्यक ती मनःशांती तिथे मिळणे अवघड वाट्ते. कधी तरी एकदा जीवनात पालकत्व सोडून वानप्रस्थ आश्रम घ्यावा हे धाडस करावे लागते.
अ‍ॅडल्ट मुलांच्या जीवनात परत प्रवेश करून त्यांच्या कलाने जगणे हे तर मला जाम अडकल्या सारखे वाट्ते. त्या पेक्षा आपल्याला परव्डेल तसे पण आपल्या मर्जीनेच राहावे . तिशी पस्तिशीच्या पुढच्या मुलांकडे जाउन राहणे अवघड. त्यात त्यांना पुरण पोळी भरली वांगी करून घालणे ह्यात समधान शोधणे कठीण. नातवंडे तर भारतीय दिसणा री पण आतून पूर्ण पणे परदेशी बनाव्टीची असतात. त्यांच्या लाइफ मध्ये आपल्याला काय किंमत असणार आहे? ह्या प्रश्ना चे उत्तर शोधा वे.

आता तर आपला पसारा आपण असतानाच शक्य तितका आवरून ठेवावा व डिस्पोज ऑफ करावा अशी ट्रेंड आहे. आपल्या माघारी मुलांना आपले सामान डिस्पोज ऑफ करायचा फार स्ट्रेस येतो. भावनिक आयटम सोडून व प्रॉपर्टी हस्तां तरण करून बाकी सर्व गंगार्पण आधीच करावे.

<खरोखरच पुण्यात नातेवाईक मदत करू शकतील का? त्या पेक्षा येथेच सामाजिक आधार व्यवस्था विकसित करावी का? >

पुण्यातले नातेवाईक म्हणजे व्याही आणि मे व्हणे असतील तर ते तुमच्याच वयाचे असतील त्यांची पुढची पिढी किंवा एक्स्टेंडेड फॅमिलीतलं कोणी आहे का? त्यांची जी सपोर्ट सिस्टम असेल ती तुम्हाला सामावून घेईल का?

इथे तुमचे काही सामाजिक बंध असतीलच. त्यालाच सपोर्ट सिस्टम बनवावं लागेल. त्यासाठी त्यांच्या अडीअडचणीला स्वतः जावं लागेल. या विषयावर त्यांच्याशी उघड बोलावे लागेल.

पुण्यातले नातेवाईक काय किंवा नाशिकचे काय...आजकाल गरजेला धावून जाणे कठीणच. फोनवरच काय त्या भेटी होतात. प्रयत्नपूर्वक आजुबाजूला मित्रमंडळ जमवा. सहज शक्य होईल.

छान आहे नाशिक. तुमची पोस्ट वाचून मलाच पुणं सोडून नाशकात फ्लॅट घ्यायची इच्छा झाली म्हातारपणासाठी.

इथे तुमचे काही सामाजिक बंध असतीलच. त्यालाच सपोर्ट सिस्टम बनवावं लागेल. त्यासाठी त्यांच्या अडीअडचणीला स्वतः जावं लागेल. या विषयावर त्यांच्याशी उघड बोलावे लागेल.>> ऑर पे फॉर इट. व प्रोफेशन ल केअर पैसे टिकवून मिळू शकते.

पोर्शिआ मेडिकेअर हे मी पूर्वी बघून ठेवले होते.

https://www.portea.com/

मला पहिल्या पासून टूरिझम हा एक डिस्क्रिशनरी खर्च वाटत आला आहे म्हणजे उगाच खर्च. पैशे जास्त झाले तर जग बघावे अनुभव घ्यावेत वगैरे नाहीतर सेल्फ केअर साठी चार पैसे बाजूला ठेवावेत. अर्ध्या पेक्षा जास्त टुरीस्ट प्लेसेस यु ट्युब वर जास्त चांगल्या दिसतात. उदा: सातोरिनी बेट इथे मला अगदी बकेट लिस्ट आयटेम म्हणून जायचे आहे/होते परंतु ती कडा सोडल्यास बाकी काय आहे तर पत्थरां पुराने बंडे वो तो अपनेय्ह्या भी दिखते.

तसेच इस्राएल मध्ये मसाडा किल्ला बघायचा आहे. पण तिथे तर अगदीच दगडी वाळवंट आहे. नॉट माय स्टाइल उकडेल किती!!! रोपवे वगैरे आहे हे सर्व घरी सोफ्यावर बसून आरामात कुत्र्याबरोबर पेंगत बघि त ले व पैसे वाचवले.

इथे मानवता वादी टाइप जाहिराती येतात त्यातही होम केअर वाल्या मावशी आठ आठ तासांच्या शिफ्ट ने पुरवल्या जातात.

आपली आपणच लाडात वाढवलेली मुले आपण बेड रिड न झालो तर आपल्याला बघतील हे मलाच सहन होत नाही. त्यासाठी मावशी हेल्प लागेलच मुलांच्या घरी राहिले तरी.

इस्पितळात जायची किंवा बिछान्याला खिळायची वेळ आली तर अँब्युलन्स बोलावणे, पेपर वर्क, पैसे जमा करणे, जोडीदाराचं जेवणखाण , त्याला धीर देणं , पेशंट केअर साठी माणसाची सोय करणे. यासाठी लागणारी सपोर्ट सिस्टम.

NRIs च्या दिल्ली परिसरातल्या पालकांसाठी ही कंपनी हीही सोय देते.
https://www.eldercare.international/emergencycare

मुलींना पुण्यात सोयीस्कर वाटेल म्हणून तिथे जावे हा मुद्दा त्यांच्याशी चर्चेत आला तेव्हा त्यांच्या मते गौण होता. किंबहुना त्यांना सासर नसलेले गाव अधिक आवडेल.

अमा, प्रतिसाद अतिशय आवडला.
खरोखर ज्ये. नांनी ६५ व्या वर्षापासून down sizing ला सुरुवात करावी. अवजड, फार महागाच्या वस्तू कपडे नवे तर घेऊ नयेतच, उलट जवळ असतील त्या अशा वस्तूंची योग्य ती वासलात लावावी. ह्याचे दोन फायदे. १) वस्तूची उपयोगिता आणि किंमत जाणून विकण्यासाठी अथवा दान करण्यासाठी योग्य व्यक्ती/ संस्था हेरण्यास पुरेसा वेळ मिळतो. २) वय वाढल्यावर पसारा आवरणे कठीण जाते. भावनेत आणि आठवणीत गुंतल्यामुळे अनेक वस्तू टाकवत नाहीत आणि नंतर दिसेल त्याला, दिसेल तेथे घाईघाईने देऊन/ विकून टाकावे लागते. हे टळेल.
आपल्या पश्चात मुलांना आवरावे लागेल असे फारसे काही किंमती सामान ठेवू नये. त्यांना हवे तर आधीच विचारून घ्यावे की ह्यापैकी कोणत्या गोष्टी तुम्ही घेऊ इच्छिता? नंतरच्या आवराआवरीसाठी मुलांकडे वेळ नसतो आणि त्यात त्यांना रसही नसतो. पुस्तके असतील तर शहरातल्यापेक्षा एखाद्या ग्रामीण ग्रंथालयास विचारपूर्वक देता येतात. फोटो अल्बम हासुद्धा एक जीव गुंतवणारा प्रकार असतो. जुने फोटो digitalise करणे शक्य असेल तर तसे करून घ्यावे.
अनेक बारीक सारीक गोष्टी असतात त्या सर्वांना माहीत असतात पण तसे वागणे राहून जाते. प्रत्येक महत्त्वाच्या दस्त ऐवजाच्या जितकी मुले तितक्या नकला काढून तितके वेगवेगळे संच करून ठेवावे.
वगैरे.

Pages