आठवण

Submitted by रमेश पुष्पा on 25 July, 2021 - 11:36

कुटुंबावर आणि घरावर येतात मोठी विघ्ने व संकटे,
त्यावेळी आठवण येते देवाची.

कामानिमित्त घराबाहेर भरभर जाताना ठेच लागून रक्त वाहते,
त्यावेळी आठवण येते आईची.

तुटपुंजा पगार, फी भरणे , हप्ता भरणे , घरात पैशाची जरुरी वाढणे,
त्यावेळी आठवण येते वडिलांची.

शाळेच्या आवारात मुले एकत्र येऊन आपल्याला मारहाण करतात,
त्यावेळी आठवण येते मोठ्या भावाची.

रक्षाबंधनच्या दिवशी दुसऱ्या मुलांच्या मनगटावर राखी बघितल्यानंतर,
त्यावेळी आठवण येते बहिणीची.

आई आजारी असते तेव्हा, वडिलांची होणारी धावपळ, आमची शाळा, जेवण इत्यादी कामे,
त्यावेळी आठवण येते आजीची.

युनिफॉर्म घातलेला नातुला शाळेच्या बसमध्ये दप्तर व खाऊचा डब्बा सह बसवले,
त्यावेळी आठवण येते मी अनवाणी जाताना शाळेची.

वार्षिक परीक्षा संपली, उन्हाळ्याची शाळेला सुट्टी लागली,
त्यावेळी आठवण येते गावच्या मामा- मामीची.

अनेक वर्ष परदेशात काम केल्यानंतर,
त्यावेळी आठवण येते भारतमाताची.

इंग्लंड, अमेरिका, कॅनडात फिरताना तेथील भाषेची होणारी अडचण,
त्यावेळी आठवण येते मराठीची.

सागर मंथनातून हलाहल विष शिवणे प्राशन केले ही कथा ऐकताना,
त्यावेळी आठवण येते नीलकंठची.

या कविताचे शेवटचे चरण लिहिल्यानंतर,
त्यावेळी आठवण येते ‘मायबोली’ ची ….

- रमेश पुष्पा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर कविता आहे .बाबा
“या कविताचे शेवटचे चरण लिहिल्यानंतर,
त्यावेळी आठवण येते ‘मायबोली’ ची …..
खूप छान
मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते त्यावेळी तिला आठवण येते आई-वडिलांबरोबर घालवलेल्या प्रत्येक सुंदर क्षणाची….

Mast